Saturday, February 11, 2017

अभिनव भारत व सावरकरांचे परदेशातील कार्य व योजना


ब्रिटीश अधिकाऱ्यांचे वध करुन शासन यंत्रणा खिळखिळी करणे एवढा एकच मार्ग सावरकरांच्या "अभिनव भारत" संघटनेचा उद्देश होता असा आपला सर्वसाधारण समज असतो. शालेय इतिहासत एक दोन वाक्यात हा इतिहास संपवला जात असल्याने अस होत. प्रत्यक्षात ब्रिटीश अधिकाऱ्यांना मारणे हा सशस्त्र क्रांतीचा फक्त एक लहानसा भाग होता. मुळ उद्दीष्टे पुढिल प्रमाणे होती.

१. स्वदेशीचा पुरस्कार, बहिष्कार तंत्र व रष्ट्रिय शिक्षण या द्वारे लोकजागृती करण
२.परदेशात शस्त्रे खरेदी करुन गुप्तपणे भारतात पाठवणे
३.जिथे शक्य असेल तिथे गनिमी काव्याने युध्द चालु ठेवणे
४. ब्रिटीशांच्या सैन्यातील भारतीय जवानांमध्ये स्वातंत्र्याच प्रचार व ब्रिटीशांविरुध्द असंतोष भडकवुन त्यांना ब्रिटीशांविरुध्द लढ्यात सामिल करुन घेणे
५. युरोपात युध्दे (/ महायुध्द) सुरु होण्याच्या संधी ची वाट पहाणे, हे सुरु झाले की भारतासाठी स्वातंत्र्याची दारे उघडी होतील आअ अभिनव भारताच्या सदस्यांना विश्वास होता.

अभिनव भारत चे प्रमुख व अध्यक्ष होते स्वातंत्र्य्वीर सावरकर आणि उपाध्यक्ष होते व्हि.व्हि.एस.अय्यर.

स्फुर्तीदायक व प्रेरक अशा ऐतिहासिक गोष्टी सांगणे, देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणे, मातृभूमि पारतंत्र्यात असताना वैयक्तिक सुखाला गौण मानणे इत्यादी गोष्टी सावरकरांच्या लेखनातुन व भाषणातुन प्रकट होत आणि शामजी कृष्ण वर्मा पॅरिस ला गेल्यानंतर सर्व चळवळीचे नेतृत्व सावरकरांकडे आले. अभिवव भारतची सदस्य संख्या वाढवण्यासाठी सावरकरांनी फ्री ईंडिया सोसायटीची स्थापना लंघ्डनमध्ये केली. त्यांच्या व्यक्तीमत्वाने परदेशात शिक्षणासाठी आलेले सर्व बुध्दीमान भारतीय तरुण भारुन गेले होते. जगविख्यात टाईम्स मासिकाने सावरकरांच्या घेतलेल्या मुलाखतीत ते हि सावरकरांच्या आदबशीर व्यक्तीमत्व विनोदबुध्दी यांनी चकित होऊन गेले.

१८५७ चे समर, मॅझिनीच्या आत्मवृताची प्रस्तावना इ. लेखन तसेच १८५७ चा पन्नासावा वर्धापन दिवस , गुरु गोविंद सिंग यांची जयंति अशा विविध कार्यक्रमांनी लंडन आणि युरोप दणाणुन सोडले होते.

सावरकरांनी लंडनहुन वीस पिस्तुले जाड पुस्तकांच्या पोकळीत लववुन भारतात धाडली. त्यातीलच एक पिस्तुलाने अनंत कान्हेरेंनी कलेक्टर जॅक्सन चा वध केला. तर खुद्द लंडनमध्येच मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा वध केला.
सावरकरांना अटक होऊन शिक्षा झल्यानंतर अभिनव भारत विखुरली तरी अभिनव भारत चा एक सदस्य वांची अय्यर याने कलेक्टर ऍशेला गोळी घालुन ठार मारले.

सावरकर प्रभावळीत अनेक हिंदु मुस्लीम युवक जमा झाले. कम्युनिस्ट लिडर मानवेंद्र नाथ रॉय, श्रीपाद डांगे पुढे कॉंग्रेसवासी झालेले राजगोपालाचारी हे सर्व सावरकरांच्याच विचारांनी प्रेरित झालेले.
बॅ. असफाली यांनी सावरकरांमध्ये शिवाजी व राणा प्रताप यांचे गुण आहेत असे प्रतिपादन केले. याच काळात सावरकरांचा आंतरराष्ट्रिय क्रांतीकारकांशी संबंध येत होता. लेनिन , स्टलिन यांचे सुध्दा इंडिया हाऊस मध्ये येणे होत असे , भेटी होत असत असे.

सावरकरांना मुख्यत: अपेक्षा होती ती युरोपात युध्द सुरु झाल्यास भारतातील ब्रिटीश साम्राज्य उलथुन टाकणे शक्य आहे. महायुध्द सुरु झाले तर एक संयुक्त आघाडि उघडुन भारतच नाही तर ब्रिटीश साम्राज्याच्या जगातील वेगवेगळ्या विभागात एकाच वेळी उठाव करणे.

तशी एक योजना सावरकरांनी संकल्पित करुन काहिशी कार्यान्वित सुध्दा केली होती.इजिप्त मधील राष्ट्रवादी चळवळीचे काही नेते लंडन व पॅरिस मध्ये होते त्यांनी अभिनव भारतच्या सावरकरदी नेत्यांना वचन दिले होते कि अभिनव भारत जेव्हा भारतात सशस्त्र उठाव करेल त्यावेळी इजिप्तिशियन क्रांतीकारक सुएज कालव्याची नाकेबंदी करतील. सुएज कलना इंग्लंड व आशियाला जोडतो. उठाव होताच ब्रिटनची भारतात पोचणारी रसद व कुमक त्याद्वारे तोडली जाईल.

अय्यरांनी तुर्कस्थानच्या तुर्कस्थानच्या केमाल पाशाची भेट घेऊन त्याचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तर अन्य आचार्य, दत्त व खान या तीन सहकाऱ्यांना सावरकरांनी प्रत्यक्ष युध्दाचे प्रशिक्षण घेण्यास मोरोक्को येथे पाठवले. ती युध्द्कला शिकुन आले , अनुभव घेऊन आले, मात्र स्पनिश क्रांतीकारकांनि मात्र त्यांना कसलेच फारसे सहाय करण्याचे स्वीकारले नाही.

इंडीया हाउस च्या मागच्या भागात सावरकर बॉंब बनवण्याचे प्रयोग गुप्तपणे करत असत. एकदा मोठा बाका प्रसंग आला होता. उकळत असलेले द्रावण आलेले पातेले उचलण्यास चिमटा सापडेना तेव्हा मदनलाल धिंग्रा याने क्षणाचाही विचार न करता नुसत्या हातानेच ते पतेले हात पोळले तरी उचलले, अन्यथा स्फोट झाला असता.
नंतर अभिनव भारताच्या सेनापती बापटांनी रशियन क्रांतीकारकांकडुन बॉंब तयार करण्याची सोपी पध्दत मिळवुन तीन प्रति तयार करवुन घेतल्या. त्यांना भारतात पाठवण्यात आले.
अभिनव भारताने एक बॉम्ब बनवण्याचा गुप्त कारखाना सुध्दा सुरु केल्याची माहीटी अभिनव भारताचे सदस्य व सावरकरांचे मावस बंधु डॉ. वि.म. भट यांच्या पुस्तकात दिली आहे.

ब्रिटीशांच्या सैन्यातील भारतीय जवानांमध्ये अभिनव भारतातले काहि सदस्य उठावाची पत्रके पाठवत , त्यातले मीरत च्या छावणीतली काही पत्रके पकडली गेली.
१८५७ ला पहिला उठाव मीरत लाच झाल्यने एकच खळबळ उडाली होती.

जर सावरकरांच्या या सुवर्ण काळात पहिले महायुध्द सुरु होते तर परदेशी क्रांतीकारकांच्या मदतीने व भारतीय सैन्याच्या बंडामुळे भारतावर चालुन आलेले पहिले सैन्य कदाचित सावरकरांच्या नेतृत्वाखाली आलेले दिसणे अशक्य नव्हते. पण ते व्हायचे नव्हते.

सावरकरांच्या अटकेनंतर हा प्रयत्न लाला हरदया्ळ यांच्या गदर पार्टीने महायुध्दाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. गदर पार्टीचा इतिहास असाच रोमहर्षक असून डॉ. पांडुरंग खानखोजे आणि विष्णु गणेश पिंगळे या दोन तेजस्वी मराठी लोकांचा त्यात फार मोलाचा वाटा होता. तो इतिहास नंतर कधीतरी.

©चंद्रशेखर साने

अधिक वाचनासाठी
१. शत्रूच्या शिबिरात- स्वा. सावरकर http://www.savarkarsmarak.com/bookinpdfformat.php?id=78
3. सावरकर चरित्र- शि.ल.करंदीकर http://www.savarkar.org/…/pdfs/mr/savarkar_biography_mr_v00… )
4. १८५७ ते सुभाष - बाळशास्त्री हरदास
5. स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत- ग.प्र.प्रधान
6. Life of Br. Savarkar - Chitragupt ( RajgopalacharI )
http://www.savarkar.org/…/life_of_barrister_savarkar_by_chi…
8. अभिनव भारत - डॉ. वि.म.भट http://www.savarkar.org/…/pdfs/mr/abhinav_bharat_mr_v001.pdf

संघशाखेच्या दर्शनाने भारले महात्मा गांधी




गांधींनी डॉ. हेडगेवार हयात असताना एकदा वर्ध्याला संघशाखेला भेट दिली होती. संघाची शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव, साधेपणा यांनी ते अत्यंत प्रभावित झाले होते. संघकार्याविषयी गांधींना आस्था व आदर होता. असे गांधी साहित्यातच छापले गेले आहे. संघाच्या हिंदु धर्म व सांस्कृतिक कार्याविषयी गांधींना आस्था होती
Collected works of Mahatma Gandhi Vol 96 मध्ये पृ. ३८० वर हे छापले गेले आहे.
492. SPEECH AT R. S. S. RALLY1
NEW DELHI, September 16, 1947
Gandhiji said that he had visited the Rashtriya Swayamsevak Sangh camp years ago at Wardha, when the founder Shri Hedgewar was alive. The late Shri Jamnalal Bajaj had taken him to the camp and he (Gandhiji) had been very well impressed by their discipline, complete absence of untouchability and rigorous simplicity. Since then the Sangh had grown. Gandhiji was onvinced that any organization which was inspired by the ideal of service and self-sacrifice was bound to grow in strength. But in order to be truly useful, self-sacrifice had to be combined with purity of motive and true knowledge. Sacrifice without these two had been known to prove ruinous to society.
The prayer that was recited at the beginning was in praise of Mother India, Hindu culture and Hindu religion. He claimed to be a sanatani Hindu. He took the root meaning of the word sanatana. No one knew accurately the origin of the word Hindu.
Image may contain: text

Friday, February 10, 2017

फाळणीच्या प्रसंगी गांधींनी हिंदुंसाठी कार्य केले हिंदुमहासभेने वा हिंदुत्वनिष्ठांनी काय केले असा प्रश्न विचारला जातो. त्याचा भावार्थ असतो की हिंदुंसाठी खरे प्रयत्न गांधींनीच केले गांधी हत्यारे तमाशा पहात बसले होते. हे वास्तव नाही, गांधी हत्येच्या कटात शिक्षा झालेले श्री. करकरे व हिंदु सभा यांनी नौखाली व अन्यत्र हिंदुंना केलेले सहाय्य या संबंधी माझा एक लहानसा लेख व हिंदुमहसभेच्या प्रतिवृत्तची लिंक
**********************
नौखालीतील अत्याचारांच्या वार्ता अतिशय भीषण होत्या. बंगाल हिंदुसभेने या संबधात एक पुस्तिका (श्वेतपत्रिका) प्रसिद्ध केली. गांधीजींनीही नौखालीत लष्कराच्या संरक्षणात भेट दिली. हिंदुसभेचे अनेक कार्यकर्ते नौखाली , बंगाल मधे गेले व त्यांनी मदतकेंद्रे सुरु केली. हिंदुसभेचे कार्यवाह व सावरकरांबरोबर अंदमानात असलेले क्रांतीकारी आशुतोष लाहिरी व डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मदत कार्य सुरु केले व हिंदूंसाठी सहाय्य निधीची मागणी केली. नगर हून हिंदुसभेचे एक कार्यकर्ते श्री.विष्णु रामकृष्ण करकरे यांनी महाराष्ट्रातून निधी गोळा करुन सोबत चार कार्यकर्ते घेऊन पूर्व बंगाल मधे गेले.
गांधीजींना तेथील सर्वधर्मिय प्रार्थनेत रामनाम सुरु झाले की मुसलमान उठून निघून जात हे पाहून खूप दु:ख झाले. हिंदुंची सक्तीची धर्मांतरे खून .बलात्कार ,मंदिरे-राजवाडे यांची नासधूस याची दखल स्वत: गांधीजींनीच आपल्या भाषणात घेतली.(दि.१५-११-१९४६ अ.प्रे.हिंद या वार्ता संस्थेचे वृत्त.) गांधीजींना हिंदु-मुस्लीम एकता धोरणाचे धोरणाचे "हेचि काय फल मम तपाला" असे झाले असावे.
पुढे गांधीजींच्या हत्येत सहभागी असलेले श्री. विष्णु करकरे हे सुद्धा ५ नोव्हेंबर १९४६ ला बंगालकडे रवाना झाले होते. नागपुरला त्यांना हिंदुमहासभेचे कार्यकर्ते श्री..द.मा.देशमुख व श्री. चांदे येऊन मिळाले. मध्यप्रदेश चे त्यावेळचे गृहमंत्रींनी या हिंदुत्वनिष्ठांना नौखाली च्या हिंदूंसाठी मदत निधी दिला. करकरे रायपुर ला पोचताच चंद्राबाई नावाच्या तरुणीला शेरखां अब्दुल हुसेन नावाचा गुंड नेत असल्यचे लक्षात येताच त्यांनी तिची सुटका करवुन हिंदु पुढारी लाला गुरुदत्त मल्ल यांच्या कडे पोचवले तिची शुद्धी करवून ,तिच्या चरितार्थाची सोय करण्यात आली.
हिंदुसभेचे हे पथक कलकत्याला पोचले. हिंदुसभेने तेथे निर्वासित आश्रय केंद्र व हॉस्पिटल उघडले होते. करकरे यांनी पुढे वेगवेगळी मदत केंद्रे सुरु केली. कपडे व अन्न यांचे वाटप सुरु झाले. चांदपुर ला एक पत्रकार करकरे यांना भेटला तेथे त्याचे हिंदूंच्यावर झालेल्या अत्याचारांचे टिपण करकरेंना पहावयास मिळाले. चांदपुर हून करकरे व हिंदुसभेचे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या.
दौलतगंज,विपुला.सोनाइमुरी इ.हिंदु वस्ती च्या गावांना भेटी दिल्या असता एकही हिंदु तिथे शिल्लक राहिला नव्हता. तेथुन जवळच करकरे दलाल बाजार येथे रॉय या संपन्न कुटुंबाकडे गेले. त्यांची तिजोरी मुसलमानांना फोडता न आल्याने त्या गुंडांनी क्रेन आणून ती नेली व पेट्रोल ने वाडा जाळला होता. तेथून नंदिग्राम,हाजीगंज,श्रीपुर,बादलपुर अशा अनेक गावांना नथुराम गोडसे यांचे सहकारी करकरे यांनी भेटी दिल्या व मदत कार्य केले.
नौखाली चे हिंदुसभा अध्यक्ष त्यावेळी राजेंद्रलाल राय हे होते. हिंदुंना मुसलमानांपासून वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी लढता लढता प्राणार्पण केले. त्यांच्यावर एका मोठ्या जमावाने हल्ला केला होता, त्यांनी एकहाती लढत आपले प्राण दिले.
करकरेंनी या दौर्‍याचे वृत्त वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केले. या दौर्‍याचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. पुढे गांधी वधाच्या खटल्यात त्यांनाही शिक्षा झाली.
हिंदुमहासभा निवडणुकात पराभूत झाल्याने त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. त्यामुळे काही जणांना हिंदुत्ववादी पक्ष महात्मा गांधी व कॉंग्रेसविरुद्ध फक्त आरडाओरडा करत राहिले त्यांनी प्रत्यक्ष असे कार्य काहिच केले नाही असा समज करुन घेतात. पण ते यथाशक्ती सहाय्य करत होते, त्याग करत होते आणि बलिदान सुध्दा देत होते. शालेय इतिहासात तर हिंदुमहसभा-जनसंघ इ. नावेच नाहीत. इतिहास विजेत्यांचा पक्षपाती असला तरी त्यांना इतिहास सहजासहजी पुसता येत नाही. तो कुठे ना कुठे तरी अस्तित्वात असतोच.
पुढे नौखालीस हुतात्मा झालेले श्री. राजेंद्रलाल राय यांचे छायाचित्र दिले आहे. असे अनेक ज्ञात अज्ञात हिंदुत्वनिष्ठ हुतात्मा झाले आहेत, केवळ एक व्यक्ती वा एक घराणे नाही.

© चंद्रशेखर साने


Image may contain: 1 person


President: Noakhali District Hindu Mahasabha; President: Noakhali District Bar Association.
In 1947, he died a martyr’s death in his village home, fighting almost single-handedly against thousands of armed hooligans.


Image may contain: 1 person, text

Image may contain: one or more people


आंतरजालावर हिंदुमहासभेच्या कार्याविषयक रिपोर्ट - श्वेतपत्रिका उपलब्ध आहे , सत्यशोधक मंडळींसाठी त्याचे अनुसंधान (लिंक) याप्रमाणे,

Thursday, February 9, 2017

गांधीजी आणि रु. ५५ कोटी

फाळणीनंतर पाकिस्तानच्या वाट्याला जे ५५ कोटी रुपये देणे निघत होते ते लगेच देण्याचा हट्ट गांधींनी धरला हे गांधीहत्येचे तत्कालिन कारण झाले असे गांधीहत्येह्च्या कटात सहभागी असलेले व नथुराम गोडसे यांचे बंधु श्री.गोपाळ गोडसे यांचे प्रतिपादन होते.
हे देणे अशावेळी दिले गेले ज्यावेळी पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या वेषात आपले सैन्य काश्मिरात घुसवले होते. देणे द्यायचे होते ते पाकिस्तानने सैन्य माघारी घेतल्यावर दिले असते तर योग्य होते व तसाच योग्य निर्णय भारत सरकारने घेतलाही होता, पण गांधींनी हे देणे द्याच म्हणून उपोषण केले व त्यानंतर लगेचच सरकारने गांधींच्या दबावाला बळि पडुन आपला आधीचा निर्णय फिरवुन हे पैसे पाकिस्तानला द्यायचा निर्णय घेतला.
गांधीजी अशा प्रकारे भारताच्या आंतराष्ट्रिय धोरणांवर समांतर सत्ताकेंद्र होऊन भारताच्या हिताच्या विरोधी निर्णय घेण्यास स्वतंत्र भारत सरकारला भाग पाडत होते, वेठीस धरत होते व ते असेच जगत राहिले तर सातत्याने आपला प्रभाव भारत सरकारच्या धोरणांवर टाकण्याचे काम करत राहतील या भीतीने खुन्यांनी हे आततायी कृत्य केले असा नथुरामवाद्यांचा दावा होता व असतो.
गांधी हत्येचे एकुणात कारण केवळ ५५ कोटी हे एकमेव नव्हते तर एकुणच कॉंग्रेसने तिच्या स्थापनेपासून व पुढे टिळकांच्या काळात व नंतर मुख्य जे सर्वैसर्वा झाले ते गांधी यांनि मुसलमानांचे जे तुष्टीकरण केले त्याची चीड खुन्यांच्या मनात साठत गेली व त्यातून ही राजकिय हत्या झाली असे नथुराम गोडसे यांच्या कोर्टातल्या निवेदनावरुन दिसते.
"गांधीहत्या आणि मी" व "५५ कोटींचे बळी" याच दोन पुस्तकांचा मुख्य आधार व अन्य दुय्यम पुस्तके यांच्या आधारावर शरद पोंक्षे यांची नाटके सजली होती व आहेत.
फाळणी झाली ते योग्य का अयोग्य हे आता आपण वेगवेगळ्या चष्म्यातून पाहु शकतो, काही जण म्हणु शकतात की आज जर बांगला देश व पाकीस्तानची लोकसंख्या हिंदुस्थानात अधिक केली तर ते धोक्याचे ठरले असते. त्याची चर्चा वेगळी करता येईल. Historians are wiser after the Event. आपण काळाच्या उलट्या दुर्बिणीतून पाहुन जर तर च्या भाषेत समर्थपणे बोलु शकतो. पण त्या त्या वर्तमानात नेमके पुढे काय होईल हे ठरवणे अवघड असते.
तत्कालिन घटना हे तत्कालिन वातवरणातून घडतात.
पण सोकॉल्ड गांधीभक्तांकडुन मुख्य आक्षेप घेतला जातो तो असा की मुळात गांधीजींचे उपोषण हे ५५ कोटी देण्यासाठी नव्हतेच, ते हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी होते. आणि गोपाळ गोडसे यांनी हि थाप मारली आणि नथुरामच्या हेतु चे समर्थन करणाऱ्यांनी हिच थाप पुढे चालवली. हा थापाथापीचा आक्षेप खरा आहे का? हि गोपाळ गोडसे यांची निव्वळ थाप आहे का? इतिहासाचा हा विपर्यायास आहे का या पुरतेच आपण पाहु.

जर ही थाप असेल इतकी वर्षानुवर्षे हि तथाकथित थाप कशी चालु शकेल ? इतकी वर्षे गांधींचेच नाव घेणाऱ्यांचे सरकार चालु होते त्यांनी या थापेवर कधीच आक्षेप कसा घेतला नाही आणि आज अचानक यावर प्रकाश पडला आणि जणु काही एक षडयंत्र उघडकिस आणले असा तथाकथित गांधी वाद्यांचा जो आविर्भाव आहे तो मात्र चुकीचा आहे.

वस्तुत: हे उपोषण ५५ कोटी देण्यासाठी नव्हतेच , त्या कारणाने हत्या झाली हे गोपाळ गोडसे यांचे म्हणणे हा इतिहासाचा विपर्यास आहे असे म्हणून मुळात फार पुर्वीच म्हणजे "गांधी हत्या आणि मी" ची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हाच सरकारने या पुस्तकावर बंदी आणली आणि पुस्तके जप्त केली होती.
लेखक आणि प्रकाशक या बंदीविरुध्द न्यायालयात गेले. या पुस्तकावरची बंदी उठवताना माननीय न्यायलयाने स्पष्ट पणे निकाल दिला आहे की लेखक गोपाळ गोडसेंनी ५५ कोटी देण्यासाठी गांधींनी उपोषण केले असे म्हणणे ही इतिहासाची अजिबात मोडतोड नाही. गांधीजींचे उपोषण हे ५५ कोटी पाकिस्थानला देण्यासाठीच केले होते या संबंधीचे पुरेसे पुरावे लेखकाने समोर आणले आहेत आणि त्यानी इतिहासाचे विकृतीकरण केलेले नाही हे स्पष्ट आहे. इतके स्पष्ट झाल्यावर परत परत या हत्येमागचे कारण गांधींचा ५५ कोटी पाकिस्तानला देण्याचा नव्हताच व ती थाप आहे असे प्रतिपादन परत परत का केले जाते?

गांधीविचारांचा बचाव करण्यासाठी अशी खोटी कारणे देण्यापेक्षा काही ठोस वैचारीक लढाई सोकॉल्ड गांधीभक्तांनी का करु नये? न्यायालयाच्या निर्णयपत्रकाचा ५५ कोटी संबंधीचा भाग "गांधीहत्या आणि मी " या पुस्तकाच्या आवृत्तीत छापला आहे, तो पाहीला की ५५ कोटी चा गांधीहत्येशी असलेला संबंध आणि ते कारण हि गोडसेंची थापाथापी नसल्याचे सहज स्पष्ट होते.

त्या पृष्ठाच छायाचित्र पुढे देत आहे. त्यावरुन माननीय न्यायालयाने गांधीजींचे हे उपोषण ५५ कोटी देण्यासाठी होते हा लेखक व कटातले एक शिक्षा भोगलेले आरोपी लेखक गोपाळ गोडसे यांचे म्हणणे मान्य केले आहे आणि त्यात इतिहासाचा कोणताही विपर्यास नाही असे म्हणून सरकारचे म्हणणे फेटाळून लावले आहे.
हा खटला लेखक श्री. गोडसे व प्रकाशक यांनी जिंकला, पुस्तकावरची बंदी उठवण्यात आली व खर्चापोटी रु. २००० सरकारला गोडसे व प्रकाशक यांना द्यावे लागले. इतके झाल्यानंतर या पुस्तकांन व त्यावर आधारीत नाटकाला कायदेशीर बंदी येऊच शकत नाही हे उघड आहे

© चंद्रशेखर साने

No automatic alt text available.

मूळ पोस्ट मध्ये प्यारेलाल नायर यांच्या Mahatma Gandhi Last Phase चा उल्लेख केला आहे, ज्यात गांधी म्हनतात की पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा निर्णयामागचे कारण माझा उपास हेच होय. त्या पृष्ठाचे छायाचित्र. प्यारेलाल नायर हे सुशिला नायर यांचे भाऊ व गांधींचे स्वीय सचिव होते.

Image may contain: text

Wednesday, February 8, 2017

विभिषणा दिधली लंका । लक्ष्मणा वनवासची ॥


रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म्‌ " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत.
राम-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले. रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत्करला. आयुष्यभर साथ देणाऱ्या सीतेचा (स्त्री-पत्नी)लोकांच्या शब्दासाठी आणि कालपुरुषाला दिलेल्या शब्दासाठी लक्ष्मणाचा (पुरुष-बंधु) रामाने त्याग केला आणि स्वत: व्रतस्थ जीवन जगुन शरयुत आत्मसमर्पण केले.
दुर्योधन म्हणतो धर्म काय आणि अधर्म काय हे मला चांगल कळत पण मला धर्म धरवत नाही आणि अधर्म सोडवत नाही.
शरण आलेल्या शत्रूला मारायचे नाही, धर्मयुद्ध, हातात सापडलेल्या शत्रुला बावळट कल्पनांच्या आहारी जाऊन सोडून द्यायचे इ . नीतीकल्पनांनी भारतीय इतिहासात पराभवांचे इतिहास गेले. श्रीकृष्ण हा उपयुक्ततावादाचा पहिला आचार्य. वेळ पडली तर कालयवनासमोरुन भरधाव पळ काढून झोपलेल्या मुचुकुंदाच्या गुहेत लपणारा, जरासंधाच्या द्वारकेवरच्या स्वाऱ्यांपासून पळुन जाऊन रणछोड हि उपाधी पत्करणारा, भीष्माला त्याच्याच कडे जाऊन त्यास मारण्याचा उपाय विचारण्याचा सल्ला देणारा, शंभर अपराध सहन करुन शेवटी यज्ञभूमिवर शिशुपाला चा वध करणारा, युद्धाचा बोल पांडवांवर येऊ नये म्हणून केवळ पाच गावे द्या म्हणून चलाख शिष्टाई करणारा, कंसमामाचा वध करुन भावंडांच्या हत्येचा सूड घेणारा, न धरि शस्त्र करी ची प्रतिज्ञा मोडून रथाचे निखळलेले चाक हातात घेऊन अनावर झालेल्या भीष्मावर चालुन जाणारा श्रीकृष्ण, गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी फोडवणारा भगवान श्रीकृष्ण हिच आपली राजनीती असली पाहिजे. पण अहिंसा आणि सद्‌गुण विकृतीला बळी पडून आपण आपले स्वातंत्र्य गमावले आणि ८०० वर्षे पारतंत्र्यात गेलो.
रामायण महाभारतात अनेक नीती कल्पनांची उकल आहे. वरवरची घटना पाहुन , एक एक घटना स्वतंत्र करुन महाकाव्याची संगती लावता येत नाही, संपुर्ण काळाच्या परिघात प्रदक्षिणा घालून त्यांची संगती लावावी लागते.
अन्याय करणारे स्वत:च्या सोयीचे तत्वज्ञान निर्माण करुन स्वत:च्या अन्यायांचे समर्थन करत असतात. आणि अशा तत्वज्ञानाला कोत्या बुद्धीने विचार करणारे बळी पडत असतात आणि रावण-वाली--शूर्पणखा-दुर्योधन-कर्ण-कैकेयी- महिषासूर हे सर्व त्यांच्या दृष्टीने शोषित ठरतात व हेतुत: लोकांचा बुद्धीभेद करत असतात.
न बुद्धीभेदं जनयेद !
©चंद्रशेखर साने

सावरकरांना मिळणारे तथाकथित पेन्शन

सावरकरांना रत्नागिरीत असताना ब्रिटीशांकडून निर्वाहभत्ता मिळत होता या विषयी जणु काही ते ब्रिटीशांचे पगारी नोकर होते अशा प्रकारचा समज करुन दिला जातो. यावरची वस्तुस्थिती अनेकदा सांगितली आहे. पण तरिही बऱ्याचजणांकडुन अद्यापही हा प्रश्न विचारला जातो. काही प्रामाणिक कुतुहलाने विचारतात तर काही लबाडी म्हणून विचारतात ! त्यामुळे त्यावर परत एक कायमस्वरुपी लेखन व संपादन करुन ठेवतो आहे.
* इंग्लंडमध्ये सावरकरांची आर्थिक स्थिती कशी होती *
सावरकरांना उच्च शिक्षणासाठी पं. शामजी कृष्णवर्मा यांनी शिष्यवृत्ती दिली होती. तिची रक्कम दर सहामाहीसाठी ४०० रू. अशी होती. प्रत्येकी ४०० रू. चे पाच हप्ते याप्रमाणे एकंदर २ हजार रू.ची ही शिष्यवृत्ती होती. त्यावेळी विनिमयाचा दर, १५ रू. = १ पौंड असा होता. याचाच अर्थ सावरकरांना सुमारे १३३ पौंड मिळणार होते. (दरवर्षी सुमारे ४४ पौंड). इंडिया हाऊसमध्ये राहण्याचा खर्च आठवडयाला १ पौंड होता असे सावरकरांनी १९ मार्च १९०९ च्या आपल्या वार्तापत्रात नमूद केले आहे. (सावरकरांनी ‘दर आठवडयाला’ असे वेगळे नमूद केलेले नाही. परंतु त्याकाळी सर्व जमाखर्च साप्ताहिक कोष्टकानुसार होत असे त्यावरून हे अनुमान आम्ही केले आहे.) याप्रमाणे एका वर्षाचा खर्च ५२ पौंड होतो परंतु सावरकारांना सुमारे ४४ पौंडच शिष्यवृत्ती मिळत असे. उरलेला खर्च त्यांना त्यांचे श्वशुर श्री. चिपळूणकर यांचेकडून मिळत असे. या नित्य खर्चाव्यतिरिक्त सावरकरांना खालीलप्रमाणे अन्य खर्च आला होता.
१) मुंबई – लंडन जहाज प्रवास – १७ पौंड (सुमारे)
२) कपडे
३) शिक्षणाचे शुल्क
४) परीक्षा शुल्क
५) पुस्तके
६) इंग्लंडमधील प्रवास
आपल्या श्वशुरांच्या सहाय्यामुळेच सावरकर हा खर्च करू शकले. याप्रमाणे इंग्लंडमधील त्यांची आर्थिक स्थिती जितक्यास तितकीच होती.
* काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतरची आर्थिक परिस्थिती *
पन्नास वर्षे काळे पाण्याची शिक्षा होण्याबरोबरच सावरकरांची सर्व मालमत्ता जप्त झाली होती. त्यांचा चष्मा सुध्दा आणि कपडे सुध्दा सरकारी मालमत्ता झाली होती. त्यांना अंदमानात जो चष्मा वापरायला मिळाला तो व गीतेची एक प्रत बाळगण्यास मान्यता मिळाली ती सुध्दा सरकारी मालमत्ता म्हणूनच.
६ जाने १९२४ ला रत्नागिरिच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर तुरुंगातील कपडे बदलण्याचा प्रश्न समोर आला कारण तुरुंगातले कपडे घातल्यावर जे आधी चे कपडे होते ते सरकार दरबारी जमा झाले होते ते सापडेनात, म्हणून एका स्नेह्याची कपडे उसने घालावे लागले.
या मधल्या काळात सावरकरांच्या पत्नीला व वहीनीला काही नातेवाईक गुपचुप मदत करत असावेत , त्याव्यतिरिक्त मॅडम कामा काही आर्थिक मदत पॅरिस हून करत होत्या. सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकरांवर सर्व मुख्य भार पडत असे. दोन्ही मोठ्या सावररकरांना शिक्षा झाली तेव्हा त्यांचे शिक्षण चालु होते.
* सावरकरांची सुटका माफीन्वये नाही तर तहाद्वारे *
१९१० ते १९२१ अंदमानात व पुढे तीन वर्षे रत्नागिरीच्या तुरुंगात सजा काटल्यावर, कोणत्याही माफी अर्जाशिवाय पाच वर्षे राजकारणात भाग घेणार नाही व रत्नागिरिच्या बाहेर न पडण्याची अट मान्य करुन सावरकरांनी सुटका करुन घेतली.
याच अटींचा दुसरा भाग होता की ब्रिटीश सरकारने जुन्या गोष्टी उगाळायच्या नाहीत, अभिनव भारत व सावरकरंचे सहकारी व कटाची माहिती सावरकर सांगणार नाहीत, जुने गेले ते परत काढायचे नाही.
राजकारणात भाग न घेणे आणि स्थानबध्दता या अटींवर केवळ सावरकरच सुटले असा समज पसरला आहे पण ती खोटी गोष्ट आहे. केवळ सावरकरच नाहीत तर शेकडो राजबंदी याच अटींवर सुटले होते. सशस्त्र क्रांतीचा गुन्हाच ब्रिटीशांच्या दृष्टीने एवढा भयंकर होता की तह केल्यावाचून सुटका शक्यच नव्हती. या सर्वांची सुटका एक प्रकारे तह म्हणता येते, माफी नाही.
*सुटका झाल्यानंतरची रत्नागिरीतली आर्थिक स्थिती*
अशी सुटका झालेल्या सर्वांचीच आर्थिक स्थिती सहसा चांगली नव्हती. सावरकरांच्या बाबत तर फारच दारुण होती, कारण त्यांची सनद रद्द झाली होती , इतकेच नाही बॅरिस्टरी बरोबर B.A. ची पदवी सुध्दा रद्द झाली होती.
त्यांचे श्वशुर चिपळुणकर यांचीही सर्व मालमत्ता जप्त करुन ब्रिटीशांनी सर्व रसद तोडलेली होती. रत्नागिरीसारख्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळणे अवघड होते. सावरकरांशी संबंध ठेवण म्हणजे सरकारी अवकृपा ओढावुन घेणे असा अर्थ असलुयाने लोक त्यांच्यापसून अंतर राखत होते तिथे नोकरी मिळण्याची कल्पनाच शक्य नव्हती.
अगदी दुष्टातल्या दुष्ट कैद्यालाही तुरुंगात केलेल्या कामाचा मेहनताना मिळत असतो. स्थानबध्द केल्या गेलेल्या स्वातंत्र्य विराला उपजिविकेचे कोणतेही साधन नसल्याने तसा भत्ता मिळणे हा हक्क आहे. इथे प्रश्न होता तो देशस्वातंत्र्यासाठी सर्वस्व गमावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा !
सावरकरांच्या बरोबर सुटलेल्या बंगाली क्रांतीकारकांना सुटल्याबरोबर महिना रु. १००/- महिना निर्वाहभत्ता मिळत होता तर सावरकरांना रु. ६०/- मिळु लागला तोही पहिली साडे पाच वर्ष म्हणजे ६ जाने १९२४ ते ३१ जुलै १९२९ या कालावधीत मिळाला नाही.हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. पहिली पाच वर्षे सावरकरांनी कशी काढली असतील याची कल्पनाही करवत नाही. व नंतरही इतर राजबंद्यांपेक्षा कमी म्हणजे केवळ साठ % च निवृत्तीवेतन मिळणे हा ब्रिटीशांचा सावरकरांविषयीचा आकस दर्शवते, मेहेरबानी नाही.
सावरकरांना १ ऑगस्ट १९२९ पासून ब्रिटिश सरकारकडून दरमहा ६० रू. निर्वाह भत्ता मिळत असे. परंतु हा पैसा ब्रिटीशांचा नसून भारतीयांचाच होता. सावरकरांची मालमत्ता आणि देशाचीही मालमत्ता लुटुन ब्रिटीश सरकारने लुट चालवली होती तोच आपण मिळवुन देशासाठीच वापरत आहोत अशीच सावरकरांची भावना होती. कुटुंबाचा वाढता खरच असूनही अनेक सार्वजनिक कामात सावरकरांना खर्च येत असे.
क्वचित त्यांना जनतेकडून गौरव-निधी प्राप्त होत असे. सावरकरांनी ही रक्कम कंपनीत गुंतवली असती तर त्यांना त्यावर व्याज मिळाले असते. परंतु, त्यांनी तसे केल्याचे दिसत नाही. काही वेळा ते आपल्या काही परिचितांना व्याजाने कर्जाऊ रक्कम देत असत. परंतु, त्यांची ही बहुतेक सर्व कर्जे परत फेडण्यात आली नाहीत. त्यामुळे सावरकरांनी पुढे सर्व प्रॉमिसरी नोटा जाळून टाकल्या आणि स्वत:पुरता हा विषय संपवला !
रत्नागिरी येथे सावरकरांना तीन अपत्ये झाली. कन्या प्रभात – १९२५, (जन्म साता-याला) दुसरी कन्या शालीनी ही अल्पवयात गेली. पुत्र विश्वास – मार्च १९२८ (जन्म मुंबईत). एकुण रत्नागिरी येथील मुक्कामात सावरकरांची आर्थिक स्थिती बेतास बात होती आणि जमाखर्चाची जेमतेम तोंडमिळवणी होत असे.
* मात्र या स्थितीतही त्यांनी मांग जातीतील एका मुलीचे पालनपोषण - शिक्षण केले होते !* हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आणि त्यांचे कर्ते सुधारकपण दाखवणारा आहे.
सावरकरांच्या आयुष्यात वैयक्तिक स्वार्थाला आधी व नंतरही नगण्य स्थान होते. त्यांना मिळत असलेला निर्वाह भत्ता हा त्यांचा पुर्ण हक्क होता. त्यांची जप्त झालेली वडीलोपार्जित जहागिर/शेतीवाडिचे उत्पन्न कितीतरी पटीने अधिक मिळते. बॅरिस्टरी करते तर अन्य अनेक नेत्यांप्रमाणे सनदशीर मार्गाने देशसेवा करत खोऱ्याने पैसाही मिळवु शकले असते. तेव्हा रु.. ६०/- हि तूटपुंजी रक्कम म्हणजे जणुकाही ब्रिटीशांची मेहेरबानी , माफी व त्यातून सुटका करुन सावरकर देशाच्या विरुध्द कार्य करत होते असा अतिशय आचरट आणि हास्यास्पद भूमका समाजात पसरवण ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
पण एकंदर केवळ माहितीचा धबधबा आणि ज्ञानाचा अभाव आणि विरोधक व हिंदुत्वद्वेष्ट्यांचे प्रभावी अपप्रचार तंत्र या रगाड्यात सहज बुध्दीने (common sense) सुध्दा कळु शकणारी वस्तुस्थिती सुध्दा झाकोळली जाते.
© चंद्रशेखर साने

संदर्भ

१.शोध सावरकरांचा - य.दी.फडके
२. www.savarkar.org


Tuesday, February 7, 2017

गर्जेल तो पडेल काय?

माझ्या लहानपणी दारासिंग या नावाची प्रचंड धुम असे. दारासिंग विषयी अचाट कल्पना मनात असत. त्याची कोणाशी लढत प्रत्यक्ष मात्र कधी पाहिली नव्हती. सगळ ऐकिव आणि वाचीव.
दुसरा त्याचा धाकटा भाऊ रंधावा. तो म्हणजे अफाटच पण दुय्यम.
त्यावेळी परदेशातून कोणीतरी अन्य एक पहेलवान आणि रंधावा यांच्यात लढत ठरल होती. हा पहेलवान खूप आक्रमक भाषा बोलत होता. वृत्तपत्रातून त्याची लागोपाठ वेगवेगळी निवेदन व फोटो येत असत. रंधावाला दोन मिनिटात असा चीत करतो रंधावाला दोन मिनिटात तसा चीत करतो.
आम्हाला अर्थातच रंधावा जिंकावा असे वाटत होते, पण त्या पहेलवानाची ( नाव लक्षात नाही पण तो किंगकॉंग नावाचा पहेलवान नसावा, वेगळा कोणीतरी होता बहुदा) आक्रमकता आणि धिप्पाड शरीराचे फोटो पेपर मध्ये छापुन येत तेव्हा मनात भीती दाटुन येई की आता रंधावाचे काही खरे नाही.
त्या पहेलवानाला रंधावा किरकोळ उत्तरे देत होता, पण त्या उत्तरांचा आमच्यावर फारसा प्रभाव पडत नव्हता. मग त्या पहेलवानाची हिंमत अधिकच वाढली. तो थेट बोलु लागला की दारासिंग मला घाबरतो आहे आणि म्हणूनच त्याने रंधावाला बळीचा बकरा बनवायला त्याची माझ्याशी लढत ठेवली आहे. हिंमत असेल तर त्यानेच माझ्याशी लढावे. मी त्याला सुद्धा मी लोळवु शकतो.
त्याची आक्रमकता इतकी जबरदस्त होती, आत्मविश्वास इतका प्रचंड होता की वाटल यापुढे तर तो दोघेही या, दोघांनाही एकाच वेळी लोळवतो अस आव्हान देणार आणि ते खरही करुन दाखवणार अस वाटु लागल.
सलग तीन दिवस तो पेपरमधुन दारासिंगला आव्हाने देत होता. आमची मने काळजीने व्यापुन गेली कारण तेव्हा अमिताभचा ऍंग्री यंग मॅन तयार व्ह्यायचा होता, दारासिंग हे भारतीयांच्या शूरतेचे प्रतिक होता.
दारासिंगाने त्या पाहुण्या पैलवानाला एकही तोंडी प्रत्युत्तर दिले नाही. तो गपगुमान राहिल्याने तर आमचा धीरच सुटला होता. चौथ्या दिवशी बातमी आली की रंधावाची त्या पहिलवानाशी कुस्ती रद्द करुन दारासिंगाने स्वत:च ते आव्हान घेतले आहे. पण पहिलवानाची आक्रमकता काहि थांबत नव्हती. बहुतेक दारासिंग हरणार आणि आपले भारतीयांचे नाक कापले जाणार याच कल्पनेने आमची मने निराश झाली
फ्रिस्टाईल कुस्तीचा दिवस उजाडला. दारासिंग आणि त्या पहेलवानाची जुंपली आणि अक्षरश: पाच-दहा मिनिटात त्या पहिलवानाने माती खाल्ली.
गर्जेल तो पडेल काय? या उक्तीचा आम्हा सर्वाना डोळ्यादेखत अनुभव आला.
©चंद्रशेखर साने
टिप: हि पोस्ट राजकीय नाही, कोणास तसे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Thursday, February 2, 2017

मुंबई महापालिका निवडणुक

माझा अंदाज मुंबई पालिकेत भाजपा बाजी मारणार. अंदाज आहे याचा अर्थ मला तस व्ह्यायला हवय अस नाही किंवा व्हायला नको आहे असही नाही. सेना आली तरी चालेल, मनसे आली तरी चालेल, भाजपा आली तरी बिघडत नाही. कोणाही पक्षाच्या समर्थकाला ते माझ कोणाही पक्षाच्या विरोधी मत समजुुन मनाला लावुन घेण्याच कारण नाही.
मुद्दा असा होता की जर आज मुंबईतला मराठी टक्का २२ % इतका घसरला असेल तर तो सुधरणार कसा? हा प्रश्न मुख्यत: मराठी अस्मितेचे राजकरण करणाऱ्या शिवसेनेकडे आपोआप जातो. पण त्यांनी काही थातुरमातुर वडापावच्या गाड्या लावल्या अशी उत्तरे दिली आणि मला भाजपाचा प्रवक्ता असल्यासारख मानून भाजपाने काय केले असा प्रश्न केला. भाजपा मराठी मतांच गणितच मांडत नाही मुळात. आणि मी भाजपाचा प्रवक्ताही नाही त्यामुळे हा प्रश्नच अस्थानी होतो.
मला अस वाटतय की आजपर्यंत सेना भाजपाची युती असल्यामुळेच केवळ मुंबईतील मराठी माण्साची ताकद "झाकली मुठ्य सवा लाखाची" या न्यायाने लपुन राहिली होती. युती तुटल्याने ती मुठ आता उघडत असुन य्या मुठीय काय दडलेले आहे याची चिंता आहे. २२% सर्वच्या सर्व एकगठठा मते शिवसेनेच्या पाअड्यात पडतील अस वाटत नाही. त्यातली जास्तीत जास्त मते शिव्सेनेच्या पारड्यात गेली अस मानल तरी उरलेली ७८ % मत सुध्दा जास्तीत जास्त भाजपाच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. मनसे क्षीण झाल्याने मराठी मतांचे विभाजन झाले नाही तरी अमराठी ७८ % मतांतल्या २८ % मतांचे ध्रुविकरण तरी भाजपा कडे होऊ शकते.
कॉंग्रेस आज गटबाजीने त्रस्त आअहे, मनसेची ताकद नाही, राष्ट्रवादी मुळातच मुंबईत नगण्य आहे. अशावेळी २२ % मराठी माणसांचा शिवसेना मोठा का ७८ % वाल अमराठी गट मोठा? हा एक वस्तुस्थितीवर आधारित प्रश्न आहे. मी मराठी असल्याने आणि माझ निम्म आयुष्य मुंबईतच गेल;ए असल्याने मुंबई मराठी रहावी अस मला अगदी स्वभाविकपणे वाटत. त्यावेळेपेक्षा मुंबईच मराठी पण हरवलेल मला दिसत. माझे मित्र नातेवाईक माझ्याशी व इतरांशि बोलताना हिंदी व इंग्लिश मध्ये बोलताना दिसतात. मी माटुंगा स्थानकावर वर मराठीतून तिकिट मागितल्यावर, तिकिट देणारा मी परकिय भाषा बोलत असल्यासारखा कटाक्ष टाकतो. हे अस १९९० पर्यंत तरी निश्चित नव्हत. मुंबईत मला कधीही मराठी या नात्याने उपऱ्यासारख वाटल नव्हत , ते आता वाटत.
जर असे झाले आले आणि शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही तर मराठी माणसाची उरली सुरली पण पत जईल. आपण मानल की मराठी माणूसाने एकजुटीने सेनेला गठठा मतदान केले आणि सेना निवडुन आली तरी पुढे काय? दरवेळि मराठी माणूस युतीलाच मतदान करत आहे. आताही केल तरी मराठी टक्का असाच घसरत राहाणार आहे तर उपयोग काय शिवसेना जास्तीत जास्त मोठा पक्ष ठरुन पण ?
यावर वचननाम्यात काय म्हटले आहे? कोणत प्रारुप सेनेने आखले आहे कि ज्याने मराठी माणसांचा टक्का परत ४० % च्या वर जाईल.
या प्रश्नाला शिवसेना आणि सोशल माध्यमातील सर्थन उत्तर द्यायला घाबरतो आहे. प्रश्न विचारणाऱ्याला भाजपाई ठरवून उत्तर टाळत आहे.
समस्या शिवसेना पालिकेत येईल का नाही येणार हा नसून मराठी माणसाची झाकलेली मूठ उघडी पडणार आहे ही आहे. उघडलेल्या मुठीतून सवा लाख बाहेर पडतायत का सव्वा रुपया या प्रश्नाला सामोरे जाण्याचे धाडस समर्थक मंडळी करत नाहीत. २३ फेब्रुवारीला याच प्रश्नाची तड लागणार आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कोणालाच गरज नाही मुंबई महाराष्ट्रातच ठेऊन मुंबईचे स्वरुन अमराठी झाले आहे त्यावर अंतिम अधिकृत शिक्कामोर्तब २३ फेब्रु्वारीला होईल का मराठी वज्रमुठीचे दर्शन होऊन मराठी टक्का परत वाढवायच सामर्थ्य सेना किंवा अन्य कोणताही पक्षा दाखवणार का हा खरा मुद्दा आहे.

Tuesday, January 31, 2017

शरद पोक्षेंचा नथुराम

मी आधी भूमिका मांडली होती की शरद पोंक्षेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल तरी त्यांनी हा विषय काढण्याने काहिही साध्य होणार नाही. जुने उकरुन नुसत समाजात वाद माजतील.
मात्र साम टिव्ही वर काल ज्या प्रकारे शरद पोंक्षेंना ट्रोल करुन सहा जणांनी मिळुन आवाज बंद केला त्यात परत चार ते पाच वेळा नथुरामला सावरकरांचा पोपट आणि सावरकर नथुरामला लिहुन देत होते आणि त्याप्रमाणे तो बोलत होता असे कोणतेही पुरावे न देता बोलले जात होते, सावरकरांची निष्कलंक सुटका होऊन सुध्दा परत त्यांना आरोपिच्या पिंजऱ्यात उभे केले जात होते ते पाहता नथुराम विरोधी मंडळींचा लोकशाही वरचा विश्वास , इतिहासाचे प्रेम आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोटा दंभ स्पष्ट दिसुन आला. हा नुसता एका नाटकाचा वाद नाही तर दोन विचारधारांची अविरत लढाई आहे, हे नाटक हा अगदीच क्षुल्लक निमित्त आहे आणि हा वाद म्हणजे दोन्ही विचारधारांची पुर्ण व खरी ओळख नाही. हा संघर्ष सतत चालु रहाणार आहे. नथुरामवरचे नाटक बंद केले तरी सावरकरांवर हल्ले होण आणि त्यांची बदनामी करण चालुच रहाणार आहे. मग नाटकाचे प्रयोग का बंद करायचे?
नथुराम हा इतिहास आहे आणि शरद पोंक्षेंना ते वाटक करण्याचा अधिकार तर आहेच आणि त्यांनी त्याचे हजारो प्रयोग करावे असे माझे आता मत झाले आहे.
मी अद्याप हे वा आधीचे नाटक पाहिले नव्हते, जर प्रयोग झाला तर मी आता नक्कीच प्रयोगाला जाऊन हे नाटक पहाणार आहे आणि आवडले तर प्रचार पण करणार आहे.
असिम सरोदे कोणाची वकिल पत्रे घेऊन फिरतात ते चांगले माहीत असल्याने त्यांची पोपट व मैना कोण कोण असु शकते ते सहज समजु शकते. सावरकरांनी स्टेटमेंट लिहुन दिली ती नथुराम वाचत होता या आक्षेप अतिशय गंभीर आहे, असिम सरोदे स्वत:च खोटारडे आहेत. वकिली व्यवसयामुळे खरे काय खोटे काय हे समजुन घेण्यासाठी त्यांनी गांधी विचार परत वर्ध्याला २ वर्षे राहुन समजून घ्यावेत आणि मग परत कोर्टात उभे रहावे अशी एक सुचना.
समाजात असिम सरोदे, महाजन वगैरे सारखे लोक जो पर्यंत आहेत तोपर्यंत हे नाटक व अशा प्रकारची चर्चा वारंवार घडत रहावीच.
ओझा यांनी सावरकरांची प्रेरणा राष्ट्रवादी आणि गांधींची मानवतावादी हा मुद्दा मान्य आहे. सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी असल्याने भारतीय राष्ट्रवादाचे पितृत्व जाऊ शकते , गांधींचा मानवतावाद हा जागतिक असल्याने ते महात्मा होऊ शकतात भारताचे राष्ट्रपिता नाही कारण त्यांना राष्ट्रवादच मान्य नव्हता असे गांधीवादी ओझाच म्हणत आहेत. महात्मा पद मिळवण्यासाठी आपली जात, धर्म राष्ट्र , भाषा संस्कृती यांचा बळी देऊन वाहवा मिळवता येते. मानवतावादी नेत्याने राष्ट्रीयव स्विकारु नये आणि महात्म्याला राष्ट्राने स्विकारले तर त्या राष्ट्राचा घात होतो. कारण राष्ट्राराष्ट्रांमधला आपपर भाव जे राष्ट्र वास्तव म्हणून स्विकारत नाही त्या राष्ट्राचा विनाश अटळ असतो.
साम टीव्ही चा सूत्रसंचालक आणि ट्रोल करणारे ढोंगी लोक यांचा निेषेध हा सूत्रसंचालक पक्षपाती आणि ७ वि. २ याप्रकारे चर्चा घडवुन आणतो. आणि पुरेसा वेळ पण देत नाही. अतिशय भिकार दर्जाअची वाहिनी आहे. चर्चेत बहुतेक वक्ते बऱ्याच खोट्या गोष्टी दडपुन देत होते.
नथुरामचे प्रयोग अवश्य व्हावेत. सिनेमा पण निघावा.
© चंद्रशेखर साने

Monday, January 30, 2017

खुसरो खानाची गोष्ट

अल्लाउद्दीन खिलजी व नंतर त्याचा मुलगा सुलतान मुबारकखान खिलजी याने हिंदुंवर जे अनन्वित अत्याचार केले त्याचा परीणाम खिलजींच्या भीषण अंतात झाला. अल्लाउद्दीन ने खच्ची केलेला मुळचा हिंदु गुलाम मलिक काफुर . याच्यावर अल्लाउद्दीन खिलजी अतोनाश आशिक होता, समलैंगिक संबंध ठेवुन होता. याच प्रेमकथेने खिलजीचा काटा काढला व नन्तर रामदेवराय यादवाच्या मुलीच्या पोटी जन्मलेल्या अल्लाउदीनच्या ४-५ वर्षांच्या शहद्जाद्याला तख्तावर कठपुतळीसारख बसवुन स्वत: त्याचा पालक म्हणून मलिक काफुर हा गुलाम राज्य पाहु लागला
त्याचा महिनाभरात खून झाला आणि मुबारकखान हा अल्लाउद्दीन खिलजीचा वाचलेला मुलगा सुलतान झाला.
हा मुबारक खिलजी सुध्दा हसन नामक मुळ हिंदु असलेल्या व अल्लाउद्दीन ने पकडुन आणलेल्या एका देखण्या मुलावर आशिक होता. त्याला बढती देऊन नाव दिले होते खुस्रोखान. हा खुसरो खान मात्र मनातून संतप्त होता. सक्तिचे लैंगिक संबंध व सक्तीचे धर्मांतर याचा सूड त्यास घ्यायचा होता.
संधी मिळताच त्याने आपल्या भरवाड या जातीच्या आपल्या नातेवाईकांना व इतर हिंदुंनाही त्याने भराभर सैन्यात भरती करुन घेतले आणि मुबारक चा खून करुन स्वत:च सुलतान झाला. त्याने घेतलेले सुलतान पद हि हिंदु क्रांती होती. कारण सुलतान होताच त्याने व त्याच्या साथीदारांनी उघड उघड हिंदु धर्माअचे आचरण सुरु केले. मशिदींची परत मंदिरे केली. गोहत्या बंदी केली. चार महिने दिल्लीतल्या व सुलतानी राज्यात सर्वत्र हिंदु राज्य सुरु झाले. खुसरो ची व भारवाडांची लष्करी ताकद चांगली होती. मुळात त्या वेळी हि जमात लढवय्यी म्हणून प्रसिध्द होती , सैनिकीकरण हिच त्या जातीची ओळख होती. खुसरो खान दक्षिणेत गेला असता हिंदु राजांशी कटकारस्थाने करुन सत्ता उलथुन टाकु पहात होता. पण त्यास अचानक दिल्लिस परतावे लागले होते. पण या वेळी संधीचा फायदा घेऊन सर्व भारतीय हिंदुंनी एकत्रित उठाव करुन भारत परकिय आक्रमकांआसुन मुक्त करण्याची संधी घेतली नाही व ५-६ महिन्यातच शुस्रुखानाला ठार मारुन तुघलक वंशाची इस्लामी सत्ता दिल्लित प्रस्थापित झाली.
तत्कालिन सुफी संत निजामुद्दीन औलिया हा तुघलकापेक्षा खुसरो खानाच्या बाजूने होता. तुघलक सत्तेवर आल्यानंतरही त्यांच्यात बेबनाव होता. "दिल्ली तो बहोत दुर है" हा वाक्‌प्रचार म्हणजे एकवेळी तुघलकाने निजामुद्दीन औलियावर काढलेल्या एका आदेशाला अवलियाने तुघलकाला दिलेले तुच्छतापुर्ण उत्तर आहे.
इस्लाम खतरेमें चा नारा देऊन तुघलक सत्तेत परतले.
इतिहासात दुर्लक्षिलेले हे एक पान. सर्व मुस्लिम इतिहासकारांनी खुस्रो खानाचे नावे भयानक शिविगाळ केली आहे. त्यावर विश्वास ठेऊन अर्वाचिन इतिहासकारांनी खुसरो खानाच्या या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले आहे. व तवारिखकारांच्या मागे जाऊन खुस्रो ला शिव्यांची लाखोली वाहीली आहे.
सरदेसाई के.एस. लाल सारख्या अगदी मोजक्याच अर्वाचिन इतिहासकारांनी, खुसरो खानाला मुस्लिम दरबाऱ्यांनी एकतर्फी रंगवले आहे व हिंदुंनी त्याकाळ लिहिलेला इतिहास प्रकाशित झाला तर खुस्रो खानाची व या क्रांतीची दुसरी बाजू समजु शकेल असे मत मांडले आहे.
आम्ही मुसलमान होऊ इच्छीतो असा बहाणा करुन खुसरो चे हिंदु साथिदार राजवाड्यात घुसले होते. स्वत:च्या मर्जीने जे मुसलमान होत त्यांना धदौलत व नोकरी देऊन सन्मानित केले जाई.
एरवी युध्दकाळात हातात सापडलेल्यांच्या वाट्याला सक्तीचे धर्मांतर होते अशी साक्ष इतिहासाच्या पानोपानी मिळेल. स्वत:हुन धर्मांतर करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. हे समजण्यास कोणतेही समकालिन पुस्तक उघडुन नजर टाकली तरी समजेल, फार मोठी इतिहासाची वा संशोधनाची गरज नाही. ९९ % धर्मांतरे हि सक्ती व पैसा यांच्या जोरावर झाली.
सर्वसाधारण कोणत्याही जातीचा हिंदु अगदी तळागाळातला सुध्दा धर्म आणि जात सोडण्यास सिध्द नसे. धर्मांतर हे त्याच्या दृष्टीने मरणासमान होते. स्वत:चा धर्म हिंदुंना प्रिय असे. अगदीच नाईलाज झाला तर ते धर्मांतर करत. सर्वसाधारण पणे मुरतिद होणे म्हणजे परत धर्मत्याग करुन हिंदु होण हि उदाहरणे होत नसत. होतच नसत असे मात्र नाही. बरेचदा होत असत आणि हिंदु त्यांना सामावुन पण घेत, पण ते प्रमाण कमी होत गेले. खुस्रोची क्रांती यशस्वी होती तर घरवापसी ची शक्यता होती. तसही १३२० स हा खुसरो चा काळ , याच्चीच पुनरावृत्ती दक्षिणेत १३३६ सन मध्ये होऊन परत हिंदु झालेल्या हरिहर व बुक्क यांनी विजयानगरचे साम्राज्य स्थापन केले हे ठळक उदाहरण आहेच. घरवापसीला जर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळते तर पाकिस्तान निर्माणच झाले नसते.
या स्कॅन पृष्ठातही हिंदुंची तीच भावना उमटलेली स्वच्छ दिसते. तसच परकिय कोण व हिंदुस्थानी कोण अस विभाजन या तवरिखकाराने स्पष्ट पणे केल आहे.
अजाइबुन असफार नावाच्या बखरीतले (तवारीख) हे एक हिंदी भाषांतरीत
पृष्ठ क्र. २१६
पुस्तकाचे नाव खलजी कालिन भारत
भाषांतर कार अतहर अब्बास रिझवी
प्रकाशक अलिगढ मुस्लिम विद्यापीठ
प्रथम आवृत्ती वर्ष १९५५
© चंद्रशेखर साने

No automatic alt text available.

Saturday, January 28, 2017

डकरी आणि भन्साळीअप्रस्तुत तुलना

गडकरी पुतळा प्रकरण आणि संजय लीला भन्साळी यांना पडलेले फटके यात समानता शोधायचा अव्यापारेषु व्यापार करु नका.
दोन्ही गोष्टीत आकाशपाताळाच अंतर आहे.
गडकरी प्रकरणात, गडकऱ्यांनी उपलब्ध इतिहास साधने व समजुती यावर लिखाण केले, त्यामागचा हेतु ऐतिहासिक पुरुषाची बदनामी करण्याचा वा घटनांची मुद्दाम मोडतोड करण्याचा नव्हता. पुतळा बसवला त्याला साठ वर्ष्रे झाली आहेत आणि अल्लाउद्दीन खिलजी व त्याच्या वाईट नजरेने जोहार करावा लागणारि पद्मिनी यांच्या कथेला प्रेमकहाणी साफ़र करणारा भन्साळी नावाचा विकृत वर्तमानकालात आहे.
भन्साळी हा इसम हेतुत: समाजमनावर ओरखडे काढतो आहे. अल्लाउद्दीन खिलजी हा एक ऐतिहासिक पात्र आहे आणि त्याची क्रुरता अत्याचार सर्वांना माहीत आहे. त्याने केलेले अत्याचार आणि कत्तलींचा इतिहास आहे. त्याचबरोबर अल्लाउद्दीन खिलजी आणि महाराणी पद्मिनी यांच्यातले नाते शिकारी आणि सावज, भक्श्य आणि भक्षक, शोषक आणि शोषित असे असल्याचे इतिहासात विख्यात आहे, या दुर्दैवी राणीला वासनांध खिलजी मुळे जोहार करावा लागला या इतिहासाशी सर्वसामान्य विद्यार्थी पण परिचित असतो.
गडकरीचे लिखाण त्यावेळी उपलब्ध असलेल्या इतिहासावर आधारीत होते आज चुकीच वाटत असेल तर त्यात इतिहासाच्या असलेल्या अपुऱ्या साधनांचा दोष होता, लेखकाचा नाही. पण भन्साळींचे तथाकथित कलाकृती हेतुत: इतिहासाची मोडतोड करणारे आहे. गल्लाभरु मनोवृत्तीतून , समाजाला मुद्दाम डिवचुन धंदा करण्याचा हेतु आहे. याच्यावर वेळीच खटले भरले गेले पाहिजेत. कायदा हातात घेऊन या गेंडयांच्या कातडीवर जरा सुध्दा ओरखडा येणार नाही. त्याला कायद्याच्याच भाषेत परखड उत्तर दिले पाहिजे .
महाराणी पद्मिनीचे पात्र इतिहासात अस्तित्वातच नाही असे म्हणून त्या मागे दडण्याचा प्रयत्न भन्साळी व पुरोगामी वर्गाकडून केला जाईल. पण पात्र असो नसो जनमानसात हि कथा रुजलेली आहे ति राणी पद्मिनी व तानेक हिंदू स्त्रियांच्या बलिदानाची म्हणूनच. त्याला अशा प्रकारे विकृत धक्का लावण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर तो नक्कीच समाजघातकी गुन्हा आहे. त्या शिवाय अशाच स्वरुपाच्या व्यक्ती व प्रसंग त्याच काळात सत्य स्वरुपात घडलेले आहेतच .
अल्लाउद्दीन खिलजीने गुजराथचा राजा कारण घेला याचा पराभव करून राणी कमलदेवी आणि तिची मुलगी देवलदेवी यांचे अपहरण करुन जनानखान्यात आणुन ठेवली. महाराश्त्रातल्या रामदेवराव यादव याची मुलगी जेठई हिला जबरदस्तीने उचलून नेले होते.
त्याव्यतिरिक्त अल्लाउद्दीन खिलजी हा बळजबरीने समलैंगिक संबंध ठेवणारा विकृत सुलतान होता. गुजरात च्या स्वारीत देखणे असे हिंदु युवक गुलाम करुन त्याने दिल्लीत आणले व त्यंच्याशी संबंध ठेऊन होता. त्याचां खुन सुध्दा त्यानेच समलीन्गीयासक्त होऊन बाळगलेल्या मलिक कापूर या मुल हिंदू असलेल्या गुलामाकडून झाला होता. अशा विकृत सुलतानाची खोटी प्रेमकहाणी तीही बळी गेलेल्या एका विवाहित हिंदु स्त्री बरोबर दाखवुन भन्साळी काय करु पाहतो आहे ते उघड आहे. याला फक्त राजस्थानात नाही तर देशभर आणि महाराष्ट्रात प्रखर विरोध झाला पाहिजे . अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावखाली अशा प्रकारच्या कलाकृतीला मान्यत देण म्हणजे इतिहासाचा खून, आक्रमक विकृतांच्या अत्याचारांचा गौरव आणि बळी गेलेल्यांची क्रुर चेष्टा आहे.
नुसती निदर्साने करून व मिळवून केवळ प्रसिध्दीच मिळते आणि आपला मुर्दाड ब~ओलीवूड वेडा समाज निगरगटट पणे असे सिनेमे तिकीट काढून जाण्यात शरम वाटू देत नाही पण म्हणून भांसालीला मोकाट सुटू न देता रोखायला हवाय .
ज्याला सिनेमा पहायचे तो पाहिलं , नसेल पाहायचा त्यांनी पाहू नका असा विचार या विषयात चुकीचा आहे कारण इथे उघड उघड एका अत्याचाराचे उदात्तीकरण होते आहे. उद्या विषारी गोळ्या विकायला उपलब्ध करून देऊन ज्याला हवे तो त्या खाईल तुम्हाला नको असतील तर नका खाऊ म्हणण्यासारख होईल ते .
© चंद्रशेखर साने

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...