Skip to main content

Posts

Showing posts from October, 2009

एक त्यागमय जीवन : स्वा.सावरकर

आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाजासाठी वाहून घेतलेल्या स्वा.वि.दा.सावरकर यांनी २६ फेब्रुवारी १९६६ ला प्रायोपवेशनाच्या साधनाने आत्मार्पण केले. सर्व आयुष्यभर त्यांनी एकच ध्येय जपले ते म्हणजे भारतीय समाजाची पारतंत्र्यातून मुक्ती ,देशस्वातंत्र्य! त्यासाठी त्यांनी स्वत"चे स्वातंत्र्यही पन्नास वर्षांसाठी पणाला लावले. स्वा.सावरकर हे विज्ञाननिष्ठ व नास्तिक होते. जास्त अचूक शब्द वापरायचा तर अज्ञेयवादि होते. कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध होत नाही तोपर्यंत सिद्धांत म्हणून त्यांनी कधीच स्वीकारली नाही. भारतीय योगशास्त्र मात्र त्यांनी विज्ञाननिष्ठ मानले. "कुंडलिनी" ही भारतीय मानसशास्त्राने जगाला दिलेली देणगी आहे असे त्यांचे मत त्यांनी मांडले.आपल्या मनोबलाच्या आधारे त्यांनी अचाट अशी कृत्ये केली. "कि न घेतले व्रत अम्ही अंधतेने, बुद्ध्याची घेतले म्या वाण करी हे सतीचे" या काव्यपंक्ती त्यांच्या नि:स्वार्थ त्यागाच्या प्रेरणेतूनच स्फुरलेले आहे. देशस्वातंत्र्यासाठी लढताना अगदी जाणूनबुजून ,डोळसपणे दु:खाचा- सतीच्या वाणाचा स्वीकार त्यांनी केला."माझी जन्मठेप" या आपल...