१९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...