Skip to main content

Posts

Showing posts with the label history

इतिहास लेखन, वाचन व संशोधन

बखरी,तवारिखा या खोटया असतात असे कोणताच शहाणा इतिहासकार म्हणत नाही. हि साधने दुय्यम असतात एवढेच त्यांचे म्हणणे असते. वि.का.राजवाडे हे सुद्धा बखरींना दुय्यम मानतात. एखाद्या अस्सल कागदपत्राच्या चिटोर्‍याचा पुरावा बखरीला खोटे पाडू शकतो असे ते म्हणतात. पण त्यासाठी आधी अस्सल कागदपत्राचा चिटोरा मिळावा लागतो व नंतरच बखरीतील काही भाग चुकीचा ठरु शकतो.पण त्या टाकाऊ असतात असा त्याचा अजिबात अर्थ नाही. बखरी ,तवारिखा दुय्यम असतात याची वेगवेगळी कारणे आहेत. तो दरबारी खुषमस्कर्‍या असू शकतो, वैयक्तिक रागलोभ, विचारधारा इ.त्याच्यात असू शकतात, त्याला त्याच्या वर्तमानातील एखादा पक्ष असू शकतो, काही वेळा तो आठवणींवर लिहित असतो व त्याची स्न्मरणशक्ती त्याला दगा दिलेली असू शकते. पण याचा अर्थ असा समजता कामा नाही कि त्याचे मोलच नाही किंवा त्यातली प्रत्येक गोष्ट हेतुत: किंवा मुद्दाम खोटी लिहिलेली असते. अन्यथा सर्व इतिहास ज्यावर सजलेला असतो त्याचा आधारच नष्ट होईल. इतिहास, इतिहास म्हणून फार काही शिल्लकच रहाणार नाही. कारण अस्सल क्कागदपत्रे मिळण्याचे प्रमाण दुय्यमच असणार हे उघड आहे. आज केवळ ३...