Tuesday, January 31, 2017

शरद पोक्षेंचा नथुराम

मी आधी भूमिका मांडली होती की शरद पोंक्षेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल तरी त्यांनी हा विषय काढण्याने काहिही साध्य होणार नाही. जुने उकरुन नुसत समाजात वाद माजतील.
मात्र साम टिव्ही वर काल ज्या प्रकारे शरद पोंक्षेंना ट्रोल करुन सहा जणांनी मिळुन आवाज बंद केला त्यात परत चार ते पाच वेळा नथुरामला सावरकरांचा पोपट आणि सावरकर नथुरामला लिहुन देत होते आणि त्याप्रमाणे तो बोलत होता असे कोणतेही पुरावे न देता बोलले जात होते, सावरकरांची निष्कलंक सुटका होऊन सुध्दा परत त्यांना आरोपिच्या पिंजऱ्यात उभे केले जात होते ते पाहता नथुराम विरोधी मंडळींचा लोकशाही वरचा विश्वास , इतिहासाचे प्रेम आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोटा दंभ स्पष्ट दिसुन आला. हा नुसता एका नाटकाचा वाद नाही तर दोन विचारधारांची अविरत लढाई आहे, हे नाटक हा अगदीच क्षुल्लक निमित्त आहे आणि हा वाद म्हणजे दोन्ही विचारधारांची पुर्ण व खरी ओळख नाही. हा संघर्ष सतत चालु रहाणार आहे. नथुरामवरचे नाटक बंद केले तरी सावरकरांवर हल्ले होण आणि त्यांची बदनामी करण चालुच रहाणार आहे. मग नाटकाचे प्रयोग का बंद करायचे?
नथुराम हा इतिहास आहे आणि शरद पोंक्षेंना ते वाटक करण्याचा अधिकार तर आहेच आणि त्यांनी त्याचे हजारो प्रयोग करावे असे माझे आता मत झाले आहे.
मी अद्याप हे वा आधीचे नाटक पाहिले नव्हते, जर प्रयोग झाला तर मी आता नक्कीच प्रयोगाला जाऊन हे नाटक पहाणार आहे आणि आवडले तर प्रचार पण करणार आहे.
असिम सरोदे कोणाची वकिल पत्रे घेऊन फिरतात ते चांगले माहीत असल्याने त्यांची पोपट व मैना कोण कोण असु शकते ते सहज समजु शकते. सावरकरांनी स्टेटमेंट लिहुन दिली ती नथुराम वाचत होता या आक्षेप अतिशय गंभीर आहे, असिम सरोदे स्वत:च खोटारडे आहेत. वकिली व्यवसयामुळे खरे काय खोटे काय हे समजुन घेण्यासाठी त्यांनी गांधी विचार परत वर्ध्याला २ वर्षे राहुन समजून घ्यावेत आणि मग परत कोर्टात उभे रहावे अशी एक सुचना.
समाजात असिम सरोदे, महाजन वगैरे सारखे लोक जो पर्यंत आहेत तोपर्यंत हे नाटक व अशा प्रकारची चर्चा वारंवार घडत रहावीच.
ओझा यांनी सावरकरांची प्रेरणा राष्ट्रवादी आणि गांधींची मानवतावादी हा मुद्दा मान्य आहे. सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी असल्याने भारतीय राष्ट्रवादाचे पितृत्व जाऊ शकते , गांधींचा मानवतावाद हा जागतिक असल्याने ते महात्मा होऊ शकतात भारताचे राष्ट्रपिता नाही कारण त्यांना राष्ट्रवादच मान्य नव्हता असे गांधीवादी ओझाच म्हणत आहेत. महात्मा पद मिळवण्यासाठी आपली जात, धर्म राष्ट्र , भाषा संस्कृती यांचा बळी देऊन वाहवा मिळवता येते. मानवतावादी नेत्याने राष्ट्रीयव स्विकारु नये आणि महात्म्याला राष्ट्राने स्विकारले तर त्या राष्ट्राचा घात होतो. कारण राष्ट्राराष्ट्रांमधला आपपर भाव जे राष्ट्र वास्तव म्हणून स्विकारत नाही त्या राष्ट्राचा विनाश अटळ असतो.
साम टीव्ही चा सूत्रसंचालक आणि ट्रोल करणारे ढोंगी लोक यांचा निेषेध हा सूत्रसंचालक पक्षपाती आणि ७ वि. २ याप्रकारे चर्चा घडवुन आणतो. आणि पुरेसा वेळ पण देत नाही. अतिशय भिकार दर्जाअची वाहिनी आहे. चर्चेत बहुतेक वक्ते बऱ्याच खोट्या गोष्टी दडपुन देत होते.
नथुरामचे प्रयोग अवश्य व्हावेत. सिनेमा पण निघावा.
© चंद्रशेखर साने

Monday, January 30, 2017

खुसरो खानाची गोष्ट

अल्लाउद्दीन खिलजी व नंतर त्याचा मुलगा सुलतान मुबारकखान खिलजी याने हिंदुंवर जे अनन्वित अत्याचार केले त्याचा परीणाम खिलजींच्या भीषण अंतात झाला. अल्लाउद्दीन ने खच्ची केलेला मुळचा हिंदु गुलाम मलिक काफुर . याच्यावर अल्लाउद्दीन खिलजी अतोनाश आशिक होता, समलैंगिक संबंध ठेवुन होता. याच प्रेमकथेने खिलजीचा काटा काढला व नन्तर रामदेवराय यादवाच्या मुलीच्या पोटी जन्मलेल्या अल्लाउदीनच्या ४-५ वर्षांच्या शहद्जाद्याला तख्तावर कठपुतळीसारख बसवुन स्वत: त्याचा पालक म्हणून मलिक काफुर हा गुलाम राज्य पाहु लागला
त्याचा महिनाभरात खून झाला आणि मुबारकखान हा अल्लाउद्दीन खिलजीचा वाचलेला मुलगा सुलतान झाला.
हा मुबारक खिलजी सुध्दा हसन नामक मुळ हिंदु असलेल्या व अल्लाउद्दीन ने पकडुन आणलेल्या एका देखण्या मुलावर आशिक होता. त्याला बढती देऊन नाव दिले होते खुस्रोखान. हा खुसरो खान मात्र मनातून संतप्त होता. सक्तिचे लैंगिक संबंध व सक्तीचे धर्मांतर याचा सूड त्यास घ्यायचा होता.
संधी मिळताच त्याने आपल्या भरवाड या जातीच्या आपल्या नातेवाईकांना व इतर हिंदुंनाही त्याने भराभर सैन्यात भरती करुन घेतले आणि मुबारक चा खून करुन स्वत:च सुलतान झाला. त्याने घेतलेले सुलतान पद हि हिंदु क्रांती होती. कारण सुलतान होताच त्याने व त्याच्या साथीदारांनी उघड उघड हिंदु धर्माअचे आचरण सुरु केले. मशिदींची परत मंदिरे केली. गोहत्या बंदी केली. चार महिने दिल्लीतल्या व सुलतानी राज्यात सर्वत्र हिंदु राज्य सुरु झाले. खुसरो ची व भारवाडांची लष्करी ताकद चांगली होती. मुळात त्या वेळी हि जमात लढवय्यी म्हणून प्रसिध्द होती , सैनिकीकरण हिच त्या जातीची ओळख होती. खुसरो खान दक्षिणेत गेला असता हिंदु राजांशी कटकारस्थाने करुन सत्ता उलथुन टाकु पहात होता. पण त्यास अचानक दिल्लिस परतावे लागले होते. पण या वेळी संधीचा फायदा घेऊन सर्व भारतीय हिंदुंनी एकत्रित उठाव करुन भारत परकिय आक्रमकांआसुन मुक्त करण्याची संधी घेतली नाही व ५-६ महिन्यातच शुस्रुखानाला ठार मारुन तुघलक वंशाची इस्लामी सत्ता दिल्लित प्रस्थापित झाली.
तत्कालिन सुफी संत निजामुद्दीन औलिया हा तुघलकापेक्षा खुसरो खानाच्या बाजूने होता. तुघलक सत्तेवर आल्यानंतरही त्यांच्यात बेबनाव होता. "दिल्ली तो बहोत दुर है" हा वाक्‌प्रचार म्हणजे एकवेळी तुघलकाने निजामुद्दीन औलियावर काढलेल्या एका आदेशाला अवलियाने तुघलकाला दिलेले तुच्छतापुर्ण उत्तर आहे.
इस्लाम खतरेमें चा नारा देऊन तुघलक सत्तेत परतले.
इतिहासात दुर्लक्षिलेले हे एक पान. सर्व मुस्लिम इतिहासकारांनी खुस्रो खानाचे नावे भयानक शिविगाळ केली आहे. त्यावर विश्वास ठेऊन अर्वाचिन इतिहासकारांनी खुसरो खानाच्या या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले आहे. व तवारिखकारांच्या मागे जाऊन खुस्रो ला शिव्यांची लाखोली वाहीली आहे.
सरदेसाई के.एस. लाल सारख्या अगदी मोजक्याच अर्वाचिन इतिहासकारांनी, खुसरो खानाला मुस्लिम दरबाऱ्यांनी एकतर्फी रंगवले आहे व हिंदुंनी त्याकाळ लिहिलेला इतिहास प्रकाशित झाला तर खुस्रो खानाची व या क्रांतीची दुसरी बाजू समजु शकेल असे मत मांडले आहे.
आम्ही मुसलमान होऊ इच्छीतो असा बहाणा करुन खुसरो चे हिंदु साथिदार राजवाड्यात घुसले होते. स्वत:च्या मर्जीने जे मुसलमान होत त्यांना धदौलत व नोकरी देऊन सन्मानित केले जाई.
एरवी युध्दकाळात हातात सापडलेल्यांच्या वाट्याला सक्तीचे धर्मांतर होते अशी साक्ष इतिहासाच्या पानोपानी मिळेल. स्वत:हुन धर्मांतर करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. हे समजण्यास कोणतेही समकालिन पुस्तक उघडुन नजर टाकली तरी समजेल, फार मोठी इतिहासाची वा संशोधनाची गरज नाही. ९९ % धर्मांतरे हि सक्ती व पैसा यांच्या जोरावर झाली.
सर्वसाधारण कोणत्याही जातीचा हिंदु अगदी तळागाळातला सुध्दा धर्म आणि जात सोडण्यास सिध्द नसे. धर्मांतर हे त्याच्या दृष्टीने मरणासमान होते. स्वत:चा धर्म हिंदुंना प्रिय असे. अगदीच नाईलाज झाला तर ते धर्मांतर करत. सर्वसाधारण पणे मुरतिद होणे म्हणजे परत धर्मत्याग करुन हिंदु होण हि उदाहरणे होत नसत. होतच नसत असे मात्र नाही. बरेचदा होत असत आणि हिंदु त्यांना सामावुन पण घेत, पण ते प्रमाण कमी होत गेले. खुस्रोची क्रांती यशस्वी होती तर घरवापसी ची शक्यता होती. तसही १३२० स हा खुसरो चा काळ , याच्चीच पुनरावृत्ती दक्षिणेत १३३६ सन मध्ये होऊन परत हिंदु झालेल्या हरिहर व बुक्क यांनी विजयानगरचे साम्राज्य स्थापन केले हे ठळक उदाहरण आहेच. घरवापसीला जर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळते तर पाकिस्तान निर्माणच झाले नसते.
या स्कॅन पृष्ठातही हिंदुंची तीच भावना उमटलेली स्वच्छ दिसते. तसच परकिय कोण व हिंदुस्थानी कोण अस विभाजन या तवरिखकाराने स्पष्ट पणे केल आहे.
अजाइबुन असफार नावाच्या बखरीतले (तवारीख) हे एक हिंदी भाषांतरीत
पृष्ठ क्र. २१६
पुस्तकाचे नाव खलजी कालिन भारत
भाषांतर कार अतहर अब्बास रिझवी
प्रकाशक अलिगढ मुस्लिम विद्यापीठ
प्रथम आवृत्ती वर्ष १९५५
© चंद्रशेखर साने

No automatic alt text available.

Saturday, January 28, 2017

डकरी आणि भन्साळीअप्रस्तुत तुलना

गडकरी पुतळा प्रकरण आणि संजय लीला भन्साळी यांना पडलेले फटके यात समानता शोधायचा अव्यापारेषु व्यापार करु नका.
दोन्ही गोष्टीत आकाशपाताळाच अंतर आहे.
गडकरी प्रकरणात, गडकऱ्यांनी उपलब्ध इतिहास साधने व समजुती यावर लिखाण केले, त्यामागचा हेतु ऐतिहासिक पुरुषाची बदनामी करण्याचा वा घटनांची मुद्दाम मोडतोड करण्याचा नव्हता. पुतळा बसवला त्याला साठ वर्ष्रे झाली आहेत आणि अल्लाउद्दीन खिलजी व त्याच्या वाईट नजरेने जोहार करावा लागणारि पद्मिनी यांच्या कथेला प्रेमकहाणी साफ़र करणारा भन्साळी नावाचा विकृत वर्तमानकालात आहे.
भन्साळी हा इसम हेतुत: समाजमनावर ओरखडे काढतो आहे. अल्लाउद्दीन खिलजी हा एक ऐतिहासिक पात्र आहे आणि त्याची क्रुरता अत्याचार सर्वांना माहीत आहे. त्याने केलेले अत्याचार आणि कत्तलींचा इतिहास आहे. त्याचबरोबर अल्लाउद्दीन खिलजी आणि महाराणी पद्मिनी यांच्यातले नाते शिकारी आणि सावज, भक्श्य आणि भक्षक, शोषक आणि शोषित असे असल्याचे इतिहासात विख्यात आहे, या दुर्दैवी राणीला वासनांध खिलजी मुळे जोहार करावा लागला या इतिहासाशी सर्वसामान्य विद्यार्थी पण परिचित असतो.
गडकरीचे लिखाण त्यावेळी उपलब्ध असलेल्या इतिहासावर आधारीत होते आज चुकीच वाटत असेल तर त्यात इतिहासाच्या असलेल्या अपुऱ्या साधनांचा दोष होता, लेखकाचा नाही. पण भन्साळींचे तथाकथित कलाकृती हेतुत: इतिहासाची मोडतोड करणारे आहे. गल्लाभरु मनोवृत्तीतून , समाजाला मुद्दाम डिवचुन धंदा करण्याचा हेतु आहे. याच्यावर वेळीच खटले भरले गेले पाहिजेत. कायदा हातात घेऊन या गेंडयांच्या कातडीवर जरा सुध्दा ओरखडा येणार नाही. त्याला कायद्याच्याच भाषेत परखड उत्तर दिले पाहिजे .
महाराणी पद्मिनीचे पात्र इतिहासात अस्तित्वातच नाही असे म्हणून त्या मागे दडण्याचा प्रयत्न भन्साळी व पुरोगामी वर्गाकडून केला जाईल. पण पात्र असो नसो जनमानसात हि कथा रुजलेली आहे ति राणी पद्मिनी व तानेक हिंदू स्त्रियांच्या बलिदानाची म्हणूनच. त्याला अशा प्रकारे विकृत धक्का लावण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर तो नक्कीच समाजघातकी गुन्हा आहे. त्या शिवाय अशाच स्वरुपाच्या व्यक्ती व प्रसंग त्याच काळात सत्य स्वरुपात घडलेले आहेतच .
अल्लाउद्दीन खिलजीने गुजराथचा राजा कारण घेला याचा पराभव करून राणी कमलदेवी आणि तिची मुलगी देवलदेवी यांचे अपहरण करुन जनानखान्यात आणुन ठेवली. महाराश्त्रातल्या रामदेवराव यादव याची मुलगी जेठई हिला जबरदस्तीने उचलून नेले होते.
त्याव्यतिरिक्त अल्लाउद्दीन खिलजी हा बळजबरीने समलैंगिक संबंध ठेवणारा विकृत सुलतान होता. गुजरात च्या स्वारीत देखणे असे हिंदु युवक गुलाम करुन त्याने दिल्लीत आणले व त्यंच्याशी संबंध ठेऊन होता. त्याचां खुन सुध्दा त्यानेच समलीन्गीयासक्त होऊन बाळगलेल्या मलिक कापूर या मुल हिंदू असलेल्या गुलामाकडून झाला होता. अशा विकृत सुलतानाची खोटी प्रेमकहाणी तीही बळी गेलेल्या एका विवाहित हिंदु स्त्री बरोबर दाखवुन भन्साळी काय करु पाहतो आहे ते उघड आहे. याला फक्त राजस्थानात नाही तर देशभर आणि महाराष्ट्रात प्रखर विरोध झाला पाहिजे . अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावखाली अशा प्रकारच्या कलाकृतीला मान्यत देण म्हणजे इतिहासाचा खून, आक्रमक विकृतांच्या अत्याचारांचा गौरव आणि बळी गेलेल्यांची क्रुर चेष्टा आहे.
नुसती निदर्साने करून व मिळवून केवळ प्रसिध्दीच मिळते आणि आपला मुर्दाड ब~ओलीवूड वेडा समाज निगरगटट पणे असे सिनेमे तिकीट काढून जाण्यात शरम वाटू देत नाही पण म्हणून भांसालीला मोकाट सुटू न देता रोखायला हवाय .
ज्याला सिनेमा पहायचे तो पाहिलं , नसेल पाहायचा त्यांनी पाहू नका असा विचार या विषयात चुकीचा आहे कारण इथे उघड उघड एका अत्याचाराचे उदात्तीकरण होते आहे. उद्या विषारी गोळ्या विकायला उपलब्ध करून देऊन ज्याला हवे तो त्या खाईल तुम्हाला नको असतील तर नका खाऊ म्हणण्यासारख होईल ते .
© चंद्रशेखर साने

असा होता अल्लाउद्दीन खिलजी

अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत बायको म्हणजे त्याची चुलत बहीण जिच्या बापाला म्हणजे जलाल-उद-दीन खिलजी याला मारुन तो सुलतान झाला. दुसरी त्याने पळवुन आणलेली गुजराथच्या कर्णावतीच्या राजाची म्हणजे करण घेलो याची राणी कमलदेवी. तिसरी महाराष्ट्रातल्या राजा रामदेवराय यादवच्या गळ्यावर सुरी ठेऊन पळवलेली त्याची राजकन्या जेठाई. कमलदेवीला जनान्यात डांबल्यावर गुजरात चा राजा करण घेला मुलगी देवलदेवी सह यादवांच्या आश्रयाला आला. अल्लाउद्दीन चा निर्लज्जपणा असा की पळवलेल्या राणी कमलदेवीच्या मुलीची देवलदेवीची मागणी त्याने स्वत:च्या मुलासाठी केली. देवलदेवीला वाचवण्यासाठी झालेल्या लढाईत राजा करण घेलो मेला, देवलदेवीला अल्लाउद्दीनाने ताब्यात घेतले आणि मुलगा खिज्रखानाशि निकाह लावुन दिला.
(गुजरातीत या विषयावर "करण घेलो" नावाची कादंबरी पण आहे. गुजराती भाषेत लिहिली गेलेली पहिली कादंबरी )

अलाउद्दीन खिलजीच बाकीचे सगळे कामजीवन म्हणजे त्याने बाटवलेेला हिंदु गुलाम ज्याच्याशी त्याचे बळजबरीचे विकृत संबंध होते. ज्यास त्याने खच्चि केले ( castrated ) तो आवडता गुलाम म्हणजे मलिक काफुर, शेवटी यानेच खिलजीला ठार मारले.

आता अशा व्यक्तीमत्वाच्या विकृत सुलता्नात भन्साळ्याला प्रेमभावना कुठ दिसल त्यालाच ठाऊक.

तो कट्टा धर्मांध होता. त्याच्या काळात हिंदुंची अत्यंत दयनीय अशी स्थिती झाली होती. मुसलमानी रियासतीचे लेखक रावबहाद्दुर सरदेसाई इतिहासकारांमधले मोठे नाव, बडोद्याच्या गायकवाडांच्या दरबारातले ख्यातनाम इतिहासकार , ते अल्लाउद्दीन खिलजी विषयी लिहितात,

"हिंदूंना हत्यारे,घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत,उंची पोषाख करु नये,छानछोकीने राहू नये असा बंदोबस्त अल्लाउद्दीन खिलजीने केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे.गाईम्हशींचासुद्धा कर द्यावा लागे.कोणाही हिंदुच्या घरात सोने,चांदी वा सुपारी चा तुकडा सुध्दा उरलाी नाही.हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमानांच्या घरी चाकरी करावी लागे. हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींना मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे" मुसलमानी रियासत पृ. १४१

आधी तुघलक झाले, टिपु झाला , औरंगजेबाचे उदात्तीकरण चालुच आहे, आता खिलजी असे करत करत महमुद गझनीसुध्दा धर्मनिरपेक्ष होईल आणि त्यांच्या हिंदु राण्या, राजकन्या , स्त्रिया यांच्याबरोबरच्या खोट्यानाट्या प्रेमकथा प्रसृत केल्या जातील. आणि परत हिंदु समाजच रांगा लावुन कोटि कोटीचा सिनेमा चालवत मिटक्हेया मारत आपल्या इतिहासाची आणिि ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राची लत्तरे मिटक्या मारत पॉपकॉर्न अन कोक पित चघळतीलाी. विष भिनवण चालु आहे. slow poisoning

©चंद्रशेखर साने
संदर्भ
तारिख ए फिरोजशाही - लेखक झियाउद्दीन बरनी
तुघलकनामा - अमीर खुस्रो
History of Khalajis by K.S.Lal
History of India by Its own Historians VOL III by Elliot and Dowson
मुसलमानी रियासत- गो.स. सरदेसाई

Thursday, January 26, 2017

संघ काळाप्रमाणे बदलतो आहे !

मी संघाचा नाही तरी संघाशी लहानपणापासून परिचित आहे. लहानपणी माझ्यापेक्षा वयाने काहिसा मोठा असलेला व  शेजारी रहात असलेला श्री. रवी बेडेकर माहीमच्या नारळी बागेत भरणाऱ्या संघ शाखेत मला घेऊन जात असे. महिना दोन महिन्यानंतर ती शाखा काही कारणाने बंद झाली होती वाटते. त्यानंतर दैनंदीन शाखेशी संबंध उरला नाही.
काल माझे ज्येष्ठ स्नेही डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले यांच्या विशेष आमंत्रणावरुन दिवसभर संघस्थानावर म्हणजे मोतीबागेत होतो. मुख्य भाग होता समाज माध्यामत असलेली आव्हाने.

त्या निमित्ताने आज  संघाची बैठक , बौध्दीक आणि चर्चा यांना उपस्थिती लावली. फारच छान अनुभव होता. जागतिकीकरणाच्या नव्या आव्हानांना कस सामोर जाव, संघ विचारांपुढची आव्हान, समाज माध्यम, वृत्त वाहिन्या अशा अनेक गोष्टींना, काही ओझरता स्पर्श करणारी तर काही सखोल असणारी, अशी चर्चा झाली. अत्तिशय हसतखेळत, चर्चेचा उच्च स्तर टिकवणारे तोही हास्यविनोदाचे वातावरण राखुन त्यामुळे सर्व वेळ अगदी मजेत व तरिही खूप काही विचार प्रवृत्त करणारा असा गेला.

संघाचा असा मी नसलो , म्हणजे दैनंदिन शाखात मी कधी गेलो नाही ना कधी संघाच्या कोणत्याही सेवाकार्यात किरकोळ घेतलेला सहभाग वगळता, फार मोठा असा सक्रिय सहभाग घेतलेला नाही तरीही, संघ या संस्थेच्या कार्याचे आणि विचारांचे निरिक्षण करत असतो. त्यावरुन सांगु शकतो की संघ बदलत आहे, कात टाकत आहे आणि पुरोगामित्वही अगदी सहजी स्वीकारत आहे. सहभागी १००-१५० स्वयंसेवक सर्व समाजघटकातले होते. काही जण पुर्वीच फेसबुक वर मित्र आहेत त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली.

आज मला जाणवलेला संघ हा पुर्वीपेक्षाही जास्त तरुण, ग्लोबल, आधुनिक आणि परंपराप्रेमी पण सुधारणावादी असा दिसला. जयहिंद !!

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!!

हमारे गांधी तुम्हारे सवरकर

पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सावरकर, नेहरु व पटेल या तीन नेत्यांचे लोकांना उद्देशुन आलेले संदेश केसरी वृत्तपत्राने १७ जाने १९५० एकाच पृष्ठावर शेजारी शेजारी छापले, त्यांचा भावार्थ असा होता,
१. ज्या देशवीरांच्या नि धर्मविरांच्या कृतकृत्य पिढीने आज स्वदेश स्वतंत्र केला आहे त्याच पिढीचे तुम्ही पुत्र अथवा पौत्र आहात! त्या देशस्वातंत्र्याच्या संरक्षणार्थ हातावर शीर घेऊन राष्ट्रिय सैन्यात शिरुन आपल्या मातृभूमिकडे कोणीही शत्रूत्वाने पाहण्यास धजुच नये इतके तिचे शस्त्रबळ नि सैन्यबळ प्रबळ कराल तरच त्या पिढीच्या पोटी तुम्ही जन्मल्याचे सार्थक होईल- स्वातंत्र्यवीर सावरकर.
***
२. वीस वर्शांपुर्वी मी स्वातंत्र्याची शपथ घेतली या काळात आपण जय आणि पराजय पाहिले. ज्या व्यक्तीने आपणाला विजयाकडे नेले ते गांधीजी आपल्यात नाहित. गांधीजींनी आपल्या सर्वच आयुष्यात उच्च प्रतिची नितीमत्ता, प्रामाणिक पणा सहिष्णुता आणि कष्ट या गुणांना महत्व दिले. आपल्या मनातुन भिती व द्वेष काढून टाका. आपला मार्ग चुकल्यास हे स्वातंत्र्य हातून निसटण्याचा संभव आहे. - जवाहरलाल नेहरु
***
३.गांधीजींच्या प्रयत्नाने हे स्वातंत्र्य आपणस मिळाले, पण आज ते आपल्यात नाहित. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण कष्ट व मेहनत घेतली ते टिकवण्यास पण घेतली पाहिजे - सरदार पटेल
***
२० वर्षांपुर्वी शपथ घेतलेले नेहेरु पंतप्रधान होते तर ६० वर्षांपुर्वी शपथ घेतलेल्या सावरकरांना कार्यक्रमाचे साधे सरकारी आमंत्रण पण नव्हते. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्व पिढीला श्रेय दिले, तर पटेल नेहरुंनी मुख्यत: गांधींना दिले. त्यांनी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी कष्ट मेहेनत करण्यास सांगितले. सावरकरांनी शस्त्र, अस्त्र, सैन्य यांचा पुरस्कार केला. तर पटेल-नेहरुंनी सीमा संरक्षण सैन्य यांचा उच्चारही केला नाही.
विचारसरणीतला फरक लक्षात घेण्यासारखा आहे.
-संदर्भ पृ. क्र. ८४ सांगता पर्व. लेखक बाळाराव सावरकर
फक्त आणि फक्त गांधी व कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवले आणि तेही बिव्ना खड्ग बिना ढाल असा प्रचार केला, त्यांनी श्रेय घेण्यात आणि त्याचय जोरावर सत्ता संपादन करण्यात एवढा गफला केलाय की पुढची अनेक वर्षे त्यांना सत्तेत येण्याचा अधिकार आहे का नाही हा एक महत्वाचा , जेव्हा पणतु खापर पणतु पणत्या वगैरे कहा थे आप लोग आजादी की लढाई में म्हणून विचारतात तेव्हा तर किळस येते .

Monday, January 23, 2017

प्रश्न: स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी बोस यांच्यात संबंध काय?


उत्तर थोडक्यात :
बोस हे कॉंग्रेसचे असून नंतर फ‘ओरवर्ड ब्लॉक या पक्षाचे निर्माते झाले तर सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते. मुस्लीम प्रश्नात बोस हे गांधीजींपेक्षाही जास्त प्रमाणात मुस्लिम अनुनय करणारे होते तर सावरकर हिंदु आणि मुस्लिम प्रश्नाविषयी लोकसंख्येचे प्रमाणात प्रतिनिधित्व आणि एक व्यक्ती एक मत या लोकशाही तत्वाचे पुरस्कर्ते होते. सुभाषचंद्र बोस यांना हिंदु-मुस्लीम प्रश्नाची फारशी जाण नव्हती . हिंदु व मुस्लीम हे एकराष्ट्र झालेले असून ब्रिटीश हिंदुस्तानातून जाता क्षणीच हिंदु मुस्लीम प्रश्न शिल्लक रहाणार नाही अशी त्यांची भाबडी समजुत होती , तर सावरकरांनी मुस्लिम मानसिकतेचा आणि हिंदु-मुस्लीम ऐक्याचा सखोल अभ्यास केला होता.
पुढे आझाद हिंद सेनेत सुध्दा पाकिस्तानवादी शिरले होते व त्यांनी सुभाषचंद्रांचा खून करायचा प्रयत्न केला त्याचा बोसांना अतोनात धक्का बसला व त्यांनी पाकिस्तानविरुध्द वीस वर्ष्रे यादवी युध्द खेळेन असे म्हटले होते. सावरकर हे द्रष्टे असल्याने आधीपासुनच सावध होते.
सशस्त्र क्रांतीबाबत मात्र बोस आणि सावरकर एकाच बोटीचे प्रवासी होते. बोसांनी आझाद हिंद सेनेसाठी सावरकरांचे १८५७ चे समर हे पुस्तकाची आवृत्ती काढलेली होती. सावरकरांचे एक सहक्रांतीकारी व जपान हिंदुमहासभेचे अध्यक्ष व सावरकरांचे हिंदुत्व स्विकारलेले राशबिहारी बोस यांनी आझाद हिंद लिग ची स्थापन केली होती व सुभाषचंद्र बोस जपान मध्ये येण्याआधीच त्यांनी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ५०,००० हिंदुस्थानी सैन्य जमवले होते जे सुभाषचंद्र बोस जपान मध्ये येताच त्यांच्या हवली केले गेले. जपान हिंदुमहासभेचे हे अध्यक्ष राशबिहारी बोस, हे या आझाद हिंद सेनेचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहु लागले. आझाद हिंद सेनेची आगेकुच सुरु झाली तेव्हा पुढे रंगुन रेडिओवरुन राशबिहारी बोस व सुभाषचंद्र बोस या दोघांनीही सावरकरांना क्रांतीकारकांचे अग्रणी व द्रष्टे नेते म्हणून त्यांचे आभार मानले.
बोसांनी ब्रिटीशांच्या तावडितून निसटण्यापुर्वी मुंबईत सावरकरांची भेट घेतली होती. ती भेट अचानक होती. हि भेट दोघातच झाली अन्य कोणासही प्रवेश नव्हता. २० जून १९३९ ला हि अचानक झालेली भेट तीन तास लांबली व अपुर्ण राहीली, यात अनेक गोष्टींबाबत चर्चा झाली. राशबेहारी बोस जपानहून सावरकरांना जी पत्रे धाडत त्यात आंतरराष्ट्रिय राजकारणाची चर्चा करत. ती पत्रे सावरकरांनी बोसांना दाखवली. यानंतर २१ जून ला पुन: भेटायचे ठरले व पुन: तीन तास गुप्त चर्चा झाली. सावरकरांनी जे सशस्त्र क्रांतीचे तत्व बोसांना सांगितले ते व शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने जपान व जर्मनीचे सहाय्य घेणे याविषयी सावरकरांनी परदेशात ब्रिटीशांविरुध्द आघाडी स्थापन करण्याविषयी बोसांशी सल्लामसलत केली असे मानले जाते. दुसरे महायुद्ध सुरु होण्यापुर्वीच दहा वर्षे आधी फेब्रुवारी १९२८ सावरकरांचे आगामी महायुध्दाची संधी सोडु नका या मथळ्याचे दोन प्रदीर्घ लेखही प्रसिध्द झाले होते त्यावरुन त्यांचे तत्व नीती आणि धोरणे उघड होतात. क्रांतिकारकांचे अग्रणी हि त्यांची उपाधी अगदी सार्थ असून , सावरकर हे सशस्त्र क्रांती तत्वज्ञानाचा पाया तर सुभाषचंद्र बोस हे कळस झाले.

Image may contain: 2 people, drawing


Sunday, January 22, 2017

शरद पोंक्षेंचा नथुराम पुर्वार्ध

प्रिय श्री. शरद पोंक्षे
नाटक सादर करण्याचा कायदेशीर हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन्ही आपणास आहे. मी तुमच्या त्या हक्का विरुध्द नाही.
मात्र आता त्या नाटकाचा विषय असलेल्या फाळणीच्या व गांधी हत्येच्या दुर्दैवी घटनांपासुन सत्तर वर्षे भविष्यात आपण आलो आहोत.
गांधी हे नाव सोडल तर आज व्यवहारात गांधीवाद शिल्लक नाही. आपण अणुशक्ती धारक व अण्वस्त्रधारी देश आहोत, सैन्य व शस्त्र सज्ज आहोत. आंतरराष्ट्रिय संबंधात कणखर धोरण असल्याचा दावा करणार, हिंदुत्ववादाला तुलनेने का होईना. जास्त जवळ असलेल सरकार केंद्रात आहे. गांधीवाद तोंडी लावण्यापुरताही अस्तित्वात नाही.
नथुराम गोडसे यांनी कोर्टात साक्ष देताना म्हटले कि गांधीवाद रक्तबंबाळ होऊन मृत्युशय्येवर तळमळत पडलाय पण गांधीजी अमर आहेत. हे शब्द तंतोतंत खरे झालेत. त्या इतिहासाची पाने आज सर्व अभ्यासकांना उपलब्ध आहेत. देशातला बराच मोठा वर्ग नथुरामची बाजु समजुन घ्यायला तयार आहे. नथुराम ला माथेफिरु ठरवुन झटकुन न टाकता इतिहास विषय म्हणुन समजुन घेण्यास सिध्द आहे.
गांधीहत्येमुळे हिंदुत्ववादाचे नुकसान झाले, हिंदुमहासभा आणि सावरकर दोघांचे नाव बदनाम झाले. विरोधकांना एक हत्यार उपलब्ध झाले. गांधीवाद नाही तर गांधी हत्या हे त्यांच्या सत्तासोपानाची शिडी झाली.
याव्यतिरिक्त मराठी ब्राह्मण समाजाला पण गांधीहत्येच्या कृतीने बरच काही भोगाव लागल आहे.
अशा परिस्थितीत हे नाटक करण्याने नक्की कोणत हित साधणार आहे? आजचे सत्ताधारी काही गांधीवादी नाहित. हिंदुसमाज पण गांधीवादाच्या प्रभावाखाली नाही. ठोशास ठोसा द्यायला तो शिकला आहे. धार्मिक अन्यायाचा प्रतिकार करण्यास तो कुठे कमी पडत असेल तर तो स्वत:च्या अंगभुत दुर्गुणांनी, गांधी विचारांनी नाही. हिंदुहिताचे शत्रु आता गांधीजी नाहित, गांधीवाद हा एक भूतकाळ आहे व गांधी हे नाव फक्त देव्हार्यात ठेऊन पुजा करण्यापुरते व त्यांच्या समोर नैवेद्य दाखवून, स्वत: च प्रसाद खाण्यापुरते राहिले आहे.
अशा परिस्थितीत आपण या नाटकाचे प्रयोग करुन असे नेमके कोणाचे राजकिय वा सामाजिक हित साधत आहेत? जगात महात्म्यांची नावे घेतली जातात व्यवहारात कोणी आणत नाही. नाव मात्र वापरुन घेतात.
ज्या नथुरामने आपण गांधींना मारले नसुन गांधीवादाला मारले म्हटले त्या गांधींच्या नावाचा गैरफायदा मात्र तुमच्या नव्या नाटकामुळे हिंदुत्व द्वेष्ट्यांना नव्याने मिळवुन देत आहात. तुमचे कणकवली संदर्भातले पत्र वाचले त्यात तुम्ही लिहिताय कि आलेले विरोधक तुमच्या नावाबरोबर ब्राह्मणांच्या नावे पण शिमगा करत होते. याचा अर्थ तुमच्या बरोबर आजचा ब्राह्मण वर्गही फरफटला जात आहे. आणि हे सर्व कशासाठी? मेलेला गांधीवाद पुनरुज्जिवित करण्यासाठी का शिल्लक असलेल्या गांधीनामाविषयी लोकांच्या मनात द्वेष वाढवण्यासाठी? काय साधणार आहे त्यातुन? राष्ट्र आणि देश गांधींचा आदर करत चालत आहे का सावरकर मार्गावरुन चालत आहे? माझ्या मते बहुसंख्य हिंदुमत गांधीवादाच्या ओझ्यातुन मुक्त झालय ! समर्थ, शस्त्रसज्ज, अण्वस्त्र सज्ज, आधुनिक, संगणक युग स्विकारलेला समाज ! विचार करा.
कशासाठी विरोधकांना बळ देणारा हा अट्टाहास? तुम्ही ठामपणे व निर्भयपणे प्रयोग करुन तुमच अभिव्यक्ती स्वातंत्र्य सिध्द केलेच आहे. पण आता इथेच थांबा ! यातून कोणाचेच कसले भले होणार नाही. केवळ समाजात वाद माजेल.
कला व राष्ट्रप्रेम दाखवायचेच असेल तर नथुरामवर नाही तर सावरकरांचे विचार मांडणारे नाटक करा, त्याचे प्रयोग वाढवा, त्यातच खरी सकारात्मकता आहे . सावरकरांचे अंधश्रध्दा निर्मुलनाचे व विवेकवादाचे कार्य अधिक महत्वाचे. सावरकर म्हणाले तस त्यांची समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण रत्नागिरीतले समाजकार्य अधिक महत्वाचे. गांधीभक्तांच्या गांधीवादाचा आधार फक्त नथुराम आहे , नथुरामशिवाय गांधींवर एकही शब्द त्यांना बोलता येत नाही. निदान हिंदुत्ववाद तरी नथुराम मुक्त असु द्यात. सावरकरांनी इतके विचार मांडलेत आणि कार्य केलय कि त्यातला एक एक पैलु घेऊन काम केल तरी सुध्दा जन्म अपुरा पडेल.
धन्यवाद !
-चंद्रशेखर साने
( सावरकर विचारांचा एक अभ्यासक )

Friday, January 20, 2017

सावरकर आणि टागोर

१९१३ साली रविंद्रनाथ टागोरांना नोबेल सन्मान मिळाल्यावर ती वार्ता अंदमानात शिक्षा भोगत असलेल्या सावरकरांना हस्ते परहस्ते मिळाली. ( अंदमानात बातम्या मिळण्याचे वेगवेगळे मार्ग कोणकोणते असत ती माहिती सावरकरांनी माझी जन्मठेप मध्ये दिली आहे. ) या वार्तेने आनंदित झालेल्या सावरकरांनी रविंद्रनाथांच्या अभिनंदनपर काव्य रचले. समग्र सावरकर साहित्यात ती कविता छापताना सावरकरांनी ती रविंद्रनाथांकडे धाडली असा उल्लेख आहे.
काल आमचे फेसबुकवरचे तरुण मित्र Ashish Khadye यांनी एक चित्ताकर्षक प्रश्न केला. हि कविता सावरकरांनी कशी पाठवली अणि त्यावर टागोरांनी कोणते उत्तर पाठवले. कारण सावरकरांना साधा कागदही मिळत नसताना हि कविता लिहिणार कशी , ब्रिटीश त्यांना पाठवु देणार कशी?
प्रश्न रास्त होता. इतर सर्व कविता सावरकरांचे एक सह कष्टभोगी राजबंदी प्राध्यापक रामहरी यांनी मुखोद्‌गत करुन सुटल्यावर सावरकरांच्या धाकट्या भावाकडे जाऊन त्यांना त्या हजारो ओळी म्हणून दाखवल्या व त्यांनी त्या उतरवुन घेऊन टोपण नावाने छापल्या हे माहित होते, पण या 1913 सालच्या कवितेचा प्रश्न सुटेना.
मग मी इमेल द्वारा आमच्या मित्रमंडळींकडे पृच्छा केली असता आमचे दुसरे तरुण मित्र Akshay Jog यांनी ससंदर्भ याचे उत्तर दिले.ते पुढील प्रमाणे,
**********************************************
नमस्कार,
शि ल करंदीकर लिखित सावरकर चरित्रात पृष्ठ क्रमांक ४४५-४४६ ह्याचा संदर्भ मिळतो.
१९०९ साली ५ वर्षांच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाल्यामुळे जे युक्तप्रांतीय राजबंदी अंदमानात धाडण्यांत आले होते त्यांच्यापैकी एकाबरोबर सावरकरांची ही १९१३ साली रचलेली कविता १९१४ साली केव्हांतरी बाहेर आली. या सज्जनाने ही कविता बहुधा कंठगत करूनच हिंदुस्थानात आणली असली पाहिजे. या सज्जानाने ह्या कविता नारायणराव सावरकरांना नेऊन दिल्या असाव्यात म्हणून सावरकरांनी १९१५ च्या पत्रात (Did you get the poems on Shri Guru Govindji & Ravindranath") ( /अंदमानच्या अंधेरीतून या पुस्तकात ही पत्रे समाविष्ट आहेत/) तसा प्रश्न नारायणरावांना विचारला आहे. ही कविता हिंदुस्थानात आल्यावर १९१५ सालच्या सुमारास ती रवींद्रनाथांना परिचित करून देण्यात आली होती.
वि श्री जोशींच्या 'क्रांतिकल्लोळ' ग्रंथात पृष्ठ क्रमांक ५१९ वर खालील उल्लेख मिळतो.
"त्यांची टागोरांवरील कविता टागोरांना धाडण्यात आली होती. पण सावरकर हे नाव असे दाहक होते की, तिची पोच देऊन, त्यासाठी ह्रद्य भरून आभार मानण्याचीही या कविवर्यांची छाती झाली नाही."
**************************************************
रविंद्रनाथांनी उत्तर पाठवले नाही यात आश्चर्य कही नाही. सावरकरांचे सन्मानाने नाव घेणे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संबंध जोडणे खरोखरच त्याकाळात सोपे काम नव्हते. त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे ब्रिटिश सरकारशी वैर घेणे, त्यामुळे कोणीच धजावत नसे हि वस्तुस्थिती होती. केसरी सारख्या वृत्तपत्राने सुध्दा त्यावेळी सावरकरांचा उल्लेख एकेरी केला असुन बहुतेक स्वदेशी वृत्तपत्रे त्यांचा उल्लेख रास्कल अस करत होते तर युरोपियन वृत्तपत्रे व स्वतंत्र देश त्यांना हुतात्मा, Martyr असा करत होती.
श्री. Ashish यांनी इतक्या बारकाईने वाचन करुन प्रश्न विचारला व श्री. Akshay यांनी कष्ट घेऊन उत्तर शोधले म्हणून दोघांचेही अभिनंदन !
****************************************
(प्रकाशकांनी जी तळटिप दिलेली आहे त्यावरुन जणु काही सावरकरांनीच रविंद्रनाथांना प्रत्यक्ष (डायरेक्ट) धाडली असा समज होतो, अशी अर्धवट तळटिप देण चुकीच आहे, एक ओळ कमी लिहिण हा संपादकाच्या आळसाचा भाग आहे)

Thursday, January 19, 2017

सावरकर "पायोनियर ऑफ हिंदुत्व"


रा.स्व.संघ आणि सावरकर यांच्यातले संबंध आणि धोरणात्मक मतभेद काहिही असोत. पण डॉ.हेडगेवार सावरकरांचे हिंदुत्व मानणारे होते व त्यांच्याबरोबरच्या दोऱ्यात दुय्यम भूमिका घेऊन त्यांच्यासमवेत रहात. तर गोळवलकर गुरुजी सावरकरांची भेट वेळ ठरवुन घेत आणि भेटले की त्यांच्या पायाला स्पर्श करुन वंदन करत असत. व्यक्तीश: सरसंघचालकांपासून ते संघ स्वयंसेवकापर्यंत सर्वांना सावरकरांविषयी संपुर्ण आदर असतो.

बाळासाहेब ठाकरे आणि काही प्रमाणात शिवसेना यांचे सावरकर प्रेमही सर्वश्रुत आहेच.

"पायोनियर ऑफ हिंदुत्व" जर का कोणी असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरच !

त्यामुळेच सर्व विरोधी राजकिय पक्ष, समाजवादी/साम्यवादी विचारसरणी या सर्वांचे द्वेषाचे स्थान कोण असेल तर ते सावरकर. त्यांना विचारांनी जिंकता येणे शक्य झाले नाही, इतकेच नाही तर सावरकर विचार येथे रुजलाय आणि वाढतच चाललाय.

त्यामुळेच सावरकरांना जाऊन आज पन्नास वर्षे होऊन गेली , हिंदुत्वाचा विचार मांडुन १०० वर्षे होत आली म्हणून मिळेल त्या मार्गाने सावरकरांना बदनाम करणे त्यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करणे व निंदानलस्ती करणे याचे एकमेव कारण हे त्यांनी रुजवलेले हिंदुत्व हे आहे. कुठुनही सावरकरांचे विचार व महत्व नव्या पिढीपर्यंत पोचु नये हे त्यांचे प्रयत्न तर अपयशी ठरले. मग त्यांची बदनामीच का न करा? कोण खोलात शिरुन खरे सावरकर पहाणार आहेत? असा विचार करुन ५० वर्षांनंनतही सावरकारांना ट्रोल करणारे आज स्वत:वर ट्रोल होतय म्हणून चिडचिड करत आहेत.

अन्यथा देशभक्तीच्या कारणाने वर्षानुवर्षे कष्टपुर्ण असा कारावास भोगलेला, साहित्यकार,बुध्दीवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक, नाटककार, इतिहास विश्लेषक, विद्वान,महाकवि, तत्वचिंतक असा शतपैलु सद्‌गृहस्थ कोणत्याही स्वतंत्र व स्वाभिमानी राष्ट्रात असा उपेक्षित राहिला असता काय? आपण स्वतंत्र आणि स्वाभिमानी आहोत का नक्की ?

अभिनव भारत मंदिर

सशस्त्र क्रांती च्या उद्देशाने सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संघटनेचे काम पुर्ण झाले असे जाणून त्यांनी हि संघटना विसर्जित केली व अभिनव भारत संघटनेचा १९५२ साली समारोप केला.(याचे अध्यक्षपद स्वत: न भुषवता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र अध्यक्षांच्या खुर्चीवर ठेऊन त्यांनी बोसांविषयी आदर व्यक्त केला )

पुढे १९५३ साली या निमित्ताने ते नासिक जिल्हा व त्यांच्या मुळ जन्मगावी भगुर येथे गेले. त्या प्रसंगी नाशिक जिल्ह्यात स्मारक म्हणून अभिनव भारत मंदिर उभारले गेले.

सावरकरांना स्वत:ला कोणतेही वैयक्तिक स्मारक नको होते त्यामुळे त्यांनी तेव्हा ब्रिटिश सरकारने जप्त केलेले स्वत:चे जन्मघर त्यावेळेच्या बाजारमूल्यानुसार सुमारे रु. ५०००/- किमतीत घेणे शक्य असुनही तसे न करता, अभिनव भारत मंदिराला रु. १५०००/- ची देणगी दिली.

त्यांनी स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्याचा मोह टाळला. पण आपणास मात्र कृतज्ञता बुध्दी नसल्याने अजूनही या घराचे स्मारक होऊ शकलेले नाही , ते घर हे राष्ट्रिय स्मारकाचा विषय आहे.


Friday, January 13, 2017

सावरकर आणि खादी

स्वदेशी , खादी यांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा फार जुना संबंध आहे. परकिय कपडयांची पहिली होळी सावरकरांनी पुण्यात केली , गांधीजींनी त्याचा धिक्कार केला, पण पुढे स्वत:च अशी होळी केली, Better late than never.

 लंडनमध्ये असताना आपल्या बातमीपत्रातून (१९०५-१९१०) सावरकरांनी स्वदेशीचे महत्व शिकवणारे व स्वदेशीच्या प्रचाराचा ब्रिटीशांच्या व्यापारावर होत असलेल्या प्रतिकुल परिणामांची आकडेवारी देणारे २-३ लेख लिहिले आहेत.

एका प्रसंगी सावरकरांचे धाकटे बंधु डॉ. नारायणराव सावरकर संपुर्ण खादीच्या वेषात अन्य दोन सावरकर बंधुंना भेटायला तुरुंगात आले असता तुरुंगधिकाऱ्यांनी त्या वेषावरुन अटकाव केला. डॉ.सावरकरांनी न्यायालयात जाऊन संघर्ष करुन, खादीच्या वेषातच तुरुंगात भेटीसाठी जाण्याची परवानगी मिळवली.

स्वा. सावरकर रत्नागिरीत स्वदेशी मालाची विक्री करत. स्वत: गाडीत स्वदेशी माल भरुन तिची विक्री करत. स्वदेशी माल व कापड यावर त्यांनी काही कविता रचल्या व प्रचारल्या.

पुढील फोटो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोकणातील राजापुरच्या खादी भांडाराचे उद्‌घाटन करतानाचा आहे. राष्ट्रप्रेम, देशहित आणि स्वदेशी यावर कोणाचा एकाधिकार असतो का काय? मोदींच्या चरखा छायाचित्रावरुन जो गदारोळ माजवत आहेत त्यावरुन फुरोगामी दिवसेंदिवस संकुचितपणाचा कळस गाठत आहेत ते स्पष्ट होतय.

सावरकर आणि गांधी यांच्यात अनेक मतभेद होते , दोन धृवांवरचे महापुरुष. पण सावरकरांचा स्वदेशीला विरोध नव्हता. आधुनिकता व यंत्रयुग यांचा स्वीकार केला तरी स्वदेशीचे महत्व होतेच. खादी गांधीजींची म्हणून विरोध अशा वैयक्तिक रागलोभाला त्यांच्या आयुष्यात नव्हते. जे जे देशाच्या हिताचे ते ते त्यांनी स्वीकारले. लंडनमध्ये असताना त्यांनी स्वदेशी चळवळीचा ब्रिटीशांच्या व्यापारावर कितपत व कसा परिणाम झाला आहे यावर एक बातमीपत्र आकडेवारी सहित लिहिले होते.परदेशी कपड्यांची होळी तर त्यांनी गांधीजी राजकिय जीवनात येण्याच्या कितीतरी आधी केली होती. ते खादीचाही प्रसार करत असत. स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी एका खादी भांडाराचे उद्‌घाटन सुद्धा केले यात सावरकर खादी पेहेरावात आणि गांधी टोपि घातलेले दिसतात, जे जे हिताचे ते ते त्यांनी अंगिकारले, राष्ट्रहित पहिले वैयक्तिक अहंकार नंतरचा. नुसत्या मजकुराने काम होते त्याच्या दहापट काम एका छायाचित्राने होते म्हणून फोटो शेअर करतोय या मजकुरासोबत. मिळालेले छायाचित्र खूप जुने आणि आकाराने छोटे आहे, त्यास उपाय नाही.

No automatic alt text available.

Wednesday, January 4, 2017

गडकऱ्यांचा कच्चा खर्डा "राजसंन्यास"

संगीत राजसंन्यास या नाटकाच्या खर्ड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जी चुकीची प्रतिमा रंगवली आहे त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. अशा हिन गैरसमजुती अशा वीर पुरुषाविषयी पसराव्यात हे दु:खद आहे. शिवाजी महाराज असोत वा संभाजी महाराज वा इतर सर्व ऐतिहासिक पुरुष . त्यांच्याविषयी आदर बाळगण्यास व सिद्ध करण्यास कोणाच्याही प्रशस्तीपत्रकाची वा जाती प्रमाणीकरणाची गरज नाही.
मात्र राम गणेश गडकऱ्यांनी मुद्दाम बदनामीच्या हेतुने हे नाटक किंवा नाटकाचा खर्डा लिहिला हे ही मला मान्य नाही.
ही निव्वळ एक कलाकृती आहे व होती. तो इतिहास नाही. त्या काळात गडकरी यांना जो इतिहास उपलब्ध होता तो खूप अपुरा व मोडकातोडका होता. या साधनांत कृष्णाजी केळुस्कर या अतिशय विद्वानाने लिहिलेले शिवचरित्र समाविष्ट असून त्यातही केळूस्करांना जी तत्कालिन कागदपत्रे उपलब्ध झाली त्यात त्यांनाही संभाजी महाराजांची प्रतिमा वाईटच आढळली व केळूस्कारांनीही तशिच रंगवली. केळूस्करानां पण इतर सर्व इतिहासकारांप्रमानेच आपण लिहितो तोच इतिहास अंतिम नाही याची जाणीव होती. केळुस्कर हे जातीने मराठा. बखरी या इतिहासात दुय्यम तिय्यम साधने मानली असतात, पण जो पर्यंत इतर साधने उपलब्ध नसतात तो पर्यंत त्यावर भर देण्यावाचून पर्याय नसतो.
इतिहासाकार्य वि.का.राजवाडे म्हणतात अस्सल कागदाचा एक चिठोरा सुध्दा बखरी पेक्षा कितीतरी जास्त पटीने महत्वाचा असतो. तेव्हा त्याविषयी सद्हेतू च्या शंकेला जागा नाही. पारतत्र्याच्या व गुलामीच्या काळात इतिहास लेखन अपुरेच असते , लोकांना रोजच्या जगण्यात सुध्दा अनेकदा परतंत्र अवस्था असते, साधने परकियांच्या ताब्यात असतात ति सहजासहजी पहाण्यास पण मिळतातच असे नाही. खाजगी कागदपत्रे लोक देण्यास नाखूष असतात. वि.का. राजवाडे यांनी किती कष्टाने जुने कागद ऐतिहासिक नोंदी सनदा, पत्रे मिळवून मराठ्यांच्या इतिहासाची साधेने शोधली याचा राजवाडे यांचे कॅरीत्र वाचल्यावर प्रत्यय येईल. अशा प्रतिकूल परिस्थितीत जो काही इतिहास सादर केला जातो तो त्या वेळेपुरता प्रामाणिक असतो. नंतर त्यात नवीन पुराव्यांच्या उपलब्धते प्रमाणे भर पडते, सुधारणा होते. जुन्यांना दोष न देता केलेल्या कामाचे श्रेय व कृतज्ञता व्यक्त करून पुढे जायचे असते . त्यांनी यथाशक्ती केले आपल्याला अजून मेहेनत घेऊन पुढे जायचे आहे याची जाणीव ठेवून चांगली भर टाकायची असते.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांवर अधिक संशोधन झाले त्यात श्री बा.सी. बेंद्रे व डॉ. कमल गोखले व यांनी अपार परिश्रम करुन संभाजी महाराजांवर संशोधन केले व महाराजांचे तेजस्वी रुप समोर आणले, सत्यस्वरुप पुढे आले. त्याआधी ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराज नाटक-कथा-कादंबरी वा इतिहास परिक्षणात्मक लेखन केले त्यात संभाजी धर्मवीर पण चारित्र्याच्या बाबत मात्र चुकीचेच रंगवले. यात त्यांचा कसलाही वाईट हेतु नव्हता तर केवळ इतिहासाची अपुरी साधने हे त्या मागचे कारण होते.
एकदा हे निश्चित झाल्यावर या सर्व लेखनाला बाजूला सारुन आपण आपली दृष्टी स्वच्छ केली पाहिजे. हे सर्व छत्रपती कोणाही एका जातीच्या मालकीचे नाहीत. तो आपला सगळ्यांचा वारसा आहे, स्फुर्तीस्थान आहे आणि ठेव आहे. त्याच्यावरुन राजकारण करणे, जाती मध्ये अडकवुन पुर्वी जे चुकीचे लेखन झाले त्यांची जात शोधणे व या महापुरुषांना जातीचे ठिगळ लावुन त्यावर आपलीच एकाधिकार शाही असल्याचा आविर्भाव आणणे हे सर्व अयोग्य आहे. यातुन कोणाचेच हित साधले जाणार नाही.
उपलब्ध इतिहासाप्रमाणे नाटके , कथा कादंबऱ्या लिहिल्या जातात. नाट्य, कथा वा कादंबरी लेखक हे इतिहास संशोधक नसतात. आणि बराच काळ गेल्यावर आज त्या कलाकृतींचे महत्वच काय? अनेक पुस्तक वा कलाकृतीत आक्षेपार्ह काहीना काही सापडु शकतेच, कधी ना कधी कोणाला ना कोणाला, कोणत्या ना कोणत्या काळात, काही तरी आवडत नाही,रुचत नाही.
प्रत्येक जणच स्वत: किंवा झुंडीने सेन्सॉर बोर्ड होऊन नासधुस करु लागला तर ती तालिबानी वृत्तीच असते. महात्मा फुले यांचे लेखन असो किंवा आंबेडकरांचे रिडल्स असो. मी नथुराम बोलतोय असो किंवा विजय तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल !
कोणीच कोणाचे जाळु नये नष्ट करु नये. एकाने मनुस्मृती जाळली की दुसरा रिडल्स जाळतो. समाजाने सर्वच प्रकारच्या  अभिव्यक्तींना शांतपणे आणि वैचारीक प्रत्युत्तर देऊन पचवले पाहिजे. हिच माणुसकी आहे.

Sunday, January 1, 2017

We all born Free

"स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "
लोकमान्य टिळकांच्या या उद्गारांना शंभर वर्षे पुर्ण झाली , त्या निमित्ताने काही कार्यक्रम पार पडले. हे उद्गार टिळकांनी नेमके कधी काढले, स्वराज्याची त्यांची कल्पना नेमकी काय होती. स्वातंत्र्य व स्वराज्य यात नेमका काय फरक आहे? का दोन्ही समानार्थी यावर काही उद्बोधक चर्चा पण सुरु आहेत.
जहाल मतवादी लोकमान्य हे सशत्र क्रांतीकारी पक्ष आणि सनदशीर मार्गाने प्रयत्न करणारा नेमस्त कॉंग्रेस पक्ष यातला सुवर्णमध्य होता. सावरकरांनी वर्णन केल्याप्रमाणे क्रांतीकारक पक्ष हा तलवारीचे पाते असेल तर टिळक त्या तलवारीची मूठ होती. टिळकांना गांधी (महात्मा) प्रमाणे सशस्त्र क्रांती हे कधी पाप वाटले नाही. योग्य वेळ आणि एकुण शक्ती यांचा मात्र ते विचार करत होते.
१९१६ च्या होमरुल चळवळीचा एक टप्पा आला आणि त्यावेळी लोकमान्यांनी हे प्रसिध्द सुत्र सांगितले. या आधी पर्यंत ब्रिटीशांच्या आधुनिक तंत्रामंत्राने भारावलेला नेमस्त कॉंग्रेस वर्ग ब्रिटीशांचे राज्य म्हणजे ईश्वरी वरदान समजत असे. लोकहितवादी देशमुख, रानडे, गोखले हे त्याचे वाहक! ब्रिटिश म्हणत, काय करणार हो आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ इच्छीतो पण तुम्ही त्यास पात्र नाही. रानडे व गोखले (जे गांधींचे गुरु) यांना ते मनापासुन पटे की होय हो, तुम्ही आम्हाला शिकवा , आम्ही स्वातंत्र्यास पात्र नाही, तुम्हीच आमचे तारणहार.
पण टिळकपक्षाने मात्र सांगितले अहो आमची पात्रापात्रता ठरवणारे तुम्ही कोण? स्वराज्य हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे. तुम्ही देणारे दाते नाहीत आणि आम्ही ते घेणारे याचक नाही, तो आमचा जन्मजात हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. तथापि १९१६ नंतरही कॉंग्रेसला संपुर्ण स्वातंत्र्याचा ठराव करता आला तो एकदम १९२९ सालीच. पण त्या ठरावानेही गांधी संतप्त झाले. टिळकांपेक्षा गोखले हेच त्यांचे गुरु. त्यामुळे या ठरावानंतर संपुर्ण स्वातंत्र्याचा अर्थच मला कळत नाही असे उद्गार त्यांनी काढले.
या व्यतिरिक्त देशात तिसरा पक्ष होता तो तेजस्वी सशस्त्र क्रांतीकारक पक्ष. त्यांना हे असल मागण, अर्ज करण हेच अमान्य होत. सन १९१६ वा सन १९२९ च्या कितीतरी आधि त्यांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी शस्त्रे उचलली होती. स्वातंत्र्य हा आमचा हक्क आहेच We all born free यावर त्यांची अतुट श्रध्दा होती. १९०२ सालाच्या अभिनव भारताच्या शपथेतच संपुर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा होती.
अभिनव भारताचे कवि गोविंद उर्फ आबा दरेकर गर्जुन म्हणाले,
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥
"स्वराज्येच्छुने" पाहिजे युध्द केले.............स्वराज्याच्या इच्छेने युध्द केले पाहिजे कारण युध्दात जिंकल्याविना स्वातंत्र्य मिळत नाही.
-चंद्रशेखर साने

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...