उत्तर थोडक्यात :
बोस हे कॉंग्रेसचे असून नंतर फ‘ओरवर्ड ब्लॉक या पक्षाचे निर्माते झाले तर सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते. मुस्लीम प्रश्नात बोस हे गांधीजींपेक्षाही जास्त प्रमाणात मुस्लिम अनुनय करणारे होते तर सावरकर हिंदु आणि मुस्लिम प्रश्नाविषयी लोकसंख्येचे प्रमाणात प्रतिनिधित्व आणि एक व्यक्ती एक मत या लोकशाही तत्वाचे पुरस्कर्ते होते. सुभाषचंद्र बोस यांना हिंदु-मुस्लीम प्रश्नाची फारशी जाण नव्हती . हिंदु व मुस्लीम हे एकराष्ट्र झालेले असून ब्रिटीश हिंदुस्तानातून जाता क्षणीच हिंदु मुस्लीम प्रश्न शिल्लक रहाणार नाही अशी त्यांची भाबडी समजुत होती , तर सावरकरांनी मुस्लिम मानसिकतेचा आणि हिंदु-मुस्लीम ऐक्याचा सखोल अभ्यास केला होता.
पुढे आझाद हिंद सेनेत सुध्दा पाकिस्तानवादी शिरले होते व त्यांनी सुभाषचंद्रांचा खून करायचा प्रयत्न केला त्याचा बोसांना अतोनात धक्का बसला व त्यांनी पाकिस्तानविरुध्द वीस वर्ष्रे यादवी युध्द खेळेन असे म्हटले होते. सावरकर हे द्रष्टे असल्याने आधीपासुनच सावध होते.
सशस्त्र क्रांतीबाबत मात्र बोस आणि सावरकर एकाच बोटीचे प्रवासी होते. बोसांनी आझाद हिंद सेनेसाठी सावरकरांचे १८५७ चे समर हे पुस्तकाची आवृत्ती काढलेली होती. सावरकरांचे एक सहक्रांतीकारी व जपान हिंदुमहासभेचे अध्यक्ष व सावरकरांचे हिंदुत्व स्विकारलेले राशबिहारी बोस यांनी आझाद हिंद लिग ची स्थापन केली होती व सुभाषचंद्र बोस जपान मध्ये येण्याआधीच त्यांनी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ५०,००० हिंदुस्थानी सैन्य जमवले होते जे सुभाषचंद्र बोस जपान मध्ये येताच त्यांच्या हवली केले गेले. जपान हिंदुमहासभेचे हे अध्यक्ष राशबिहारी बोस, हे या आझाद हिंद सेनेचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहु लागले. आझाद हिंद सेनेची आगेकुच सुरु झाली तेव्हा पुढे रंगुन रेडिओवरुन राशबिहारी बोस व सुभाषचंद्र बोस या दोघांनीही सावरकरांना क्रांतीकारकांचे अग्रणी व द्रष्टे नेते म्हणून त्यांचे आभार मानले.
बोसांनी ब्रिटीशांच्या तावडितून निसटण्यापुर्वी मुंबईत सावरकरांची भेट घेतली होती. ती भेट अचानक होती. हि भेट दोघातच झाली अन्य कोणासही प्रवेश नव्हता. २० जून १९३९ ला हि अचानक झालेली भेट तीन तास लांबली व अपुर्ण राहीली, यात अनेक गोष्टींबाबत चर्चा झाली. राशबेहारी बोस जपानहून सावरकरांना जी पत्रे धाडत त्यात आंतरराष्ट्रिय राजकारणाची चर्चा करत. ती पत्रे सावरकरांनी बोसांना दाखवली. यानंतर २१ जून ला पुन: भेटायचे ठरले व पुन: तीन तास गुप्त चर्चा झाली. सावरकरांनी जे सशस्त्र क्रांतीचे तत्व बोसांना सांगितले ते व शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने जपान व जर्मनीचे सहाय्य घेणे याविषयी सावरकरांनी परदेशात ब्रिटीशांविरुध्द आघाडी स्थापन करण्याविषयी बोसांशी सल्लामसलत केली असे मानले जाते. दुसरे महायुद्ध सुरु होण्यापुर्वीच दहा वर्षे आधी फेब्रुवारी १९२८ सावरकरांचे आगामी महायुध्दाची संधी सोडु नका या मथळ्याचे दोन प्रदीर्घ लेखही प्रसिध्द झाले होते त्यावरुन त्यांचे तत्व नीती आणि धोरणे उघड होतात. क्रांतिकारकांचे अग्रणी हि त्यांची उपाधी अगदी सार्थ असून , सावरकर हे सशस्त्र क्रांती तत्वज्ञानाचा पाया तर सुभाषचंद्र बोस हे कळस झाले.
No comments:
Post a Comment