Skip to main content

Posts

Showing posts from 2017

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...

सावरकर आणि राजकिय पक्ष

हिंदुमहासभा प्रवेश हा सावरकरांच्या चरित्रातला केवळ एक टप्पा होता. केवळ अन्य चांगला पर्याय नसल्याने ते निरुपायाने हिंदुमहासभेत गेले, आणि तीवर आपला इतका मोठा ठसा उमटवला की सावरकर आणि हिंदुमहासभा हे अद्वैत वाटु लागले. सन १९३८ ते सन १९४३ अशा केवळ सहा वर्षांच्या कारकिर्दित एका लहानशा मृतप्राय पक्षाला अत्यंत बलाढ्य अशा आणि १८८५ ते १९३८ अशा साठ वर्षे आधीच तळागाळात पोचलेल्या कॉंग्रेसारख्या, सर्व प्रकारची साधनसामुग्री व संपत्ती असलेल्या राजकिय पक्षाला, तो पर्यंतच्या आयुष्यात जी काय लोकप्रियता मिळाली ती पणाला लावुन आव्हान देण्याचा प्रयत्न करणे हाच मोठा भीमपराक्रम होता. सावरकरांच्या जागी सर्वसामान्य खचलेला नेता असता तर कॉंग्रेस ला आणि गांधी-नेहरु जोडगोळीला शरण जाऊन कॉंग्रेसमध्ये जाऊन लोकप्रियतेचा स्वस्त मार्ग निवडुन, स्वत:च्या तत्वांशी तडजोड करुन पैसा, मानमरातब व सत्ता मिळवता झाला असता. पण लोकहितासाठी लोकप्रियतेचा मी बळी देतोय अस स्पष्ट सांगुनच त्यांनी आपले मार्ग निवडले. सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे अशी अपेक्षा सुभाषचंद्...

हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद

हिंदुत्व हि राजकीय आणि इहवादी संकल्पना आहे. हिंदुत्व आणि हिंदुधर्म अथवा हिंदुइझम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोहत्याबंदी हिंदुधर्माचा भाग असू शकेल मात्र हिंदुत्वाचा तो भाग नाही. हिंदुधर्माच्या अभिमानात कदाचीत गोहत्या, मुर्तीपुजा, आरती, जन्म पुनर्जन्म, उपासना येत असेल, हिंदुत्वाच्या अभिमानासाठी मात्र या गोष्टी पाळण्याची अट लागु नाही. एखादा बुध्दीवादी किंवा नास्तिक सुध्दा हिंदुत्वाचा अभिमानी असू शकतो. हिंदु समाजाचे न्याय्य हक्क जोपासणे आणि ऐहिक हित जपण हाच हिंदुत्वाचा अर्थ आहे. पारलौकिक बाबींसाठी हिंदुत्व नाही. हिंदुधर्मातील मूल्यांची चिंता हिंदुत्व करत नाही, पण ज्या हिंदुंना हिंदुधर्मातील मूल्ये पाळायची इच्छा असेल आणि जर अन्य लोकांकडून त्यावर आक्रमण होत असेल आणि ते नैसर्गिक हक्कांवर आक्रमण असेल तर तिथे हिंदुत्व नक्कीच दखल घेते. हिंदु धर्म व हिंदुत्व यातील शब्दसाधर्म्यामुळे खूप घोळ झालेत. अगदी न रुचणार सांगायचे तर संघ व गांधी यांच्यात समानता आहे तिचे नाव हिंदु धर्माचा अभिमान हे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हा हिंदुसमाजाचा स्वाभिमान व इहवादी दृष्टीकोन आहे. संघाला गांधींचे हिंदुपण साव...

सावरकरांचे अन्य क्रांतीकारकांशी संबंध व उत्तर प्रदेश दौरा

सावरकर ब्रिटीशांबरोबर झालेल्या तहातील सर्व अटींतुन मुक्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. राजकारणात त्यांच्या समवेत अंदमानातच जमठेपीची शिक्षा भगणारे भाई परमानंद व आशुतोष लाहीरी हिंदुमहासभेचेच राजकारण करण्यात सामिल झाले. सेनापती बापट हे सुध्दा पुन: सावरकरांसमवेत काही सार्वजनिक कामात भाग घेत. त्यांनी हिंदुसभेत प्रत्यक्ष प्रवेश केला नाही तरी हिंदुसभेच्या लढ्यात ते भाग घेत असत. राशबेहारी बोस यांनी सावरकरांशी पत्रव्यवहार सुरु ठेवला व त्यांच्या सुचनेवरुन जपान मध्ये हिंदुमहासभेची शाखा सुरु केली. सावरकरांची मुक्तता झाल्यावर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. यावेळी सावरकर १८५७ च्या उठावातील क्रांतीकारकांपासून भगतसिंगा पर्यंत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व क्रांतीकारकांच्या नावाचा प्रकट उच्चार करुन लोकांना त्यांचा जयजयकार करन्यास उद्युक्त करत. आपल्या सहकारी, अनुयायी व अन्य क्रांतीकारकांवर सावरकर लेख लिहित व त्यांचा गौरव करीत. त्यातील काही लेखांचा संग्रह पुस्तक तेजस्वी तारे नावे प्रकशित आहे. थोडक्यात सावरकरांनी अन्य क्रांतीकारकांशी नंतर संबंध ठेवले नाहित वा अन्य क्रांतीकारकांनी सावर...

सावरकर कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत?

स्वातंत्र्य पुर्व काळात लंडनमध्ये असलेल्या भारतीयांमध्ये दोन तट पडले होते. यांच्यात वादविवाद होत असत. एका गटाचे नेते होते गांधी तर दुसऱ्याचे सावरकर. वादात ज्याची बाजू पटत असे त्याच्या बाजूने जमलेले तरुण जाऊन बसत. हे सर्व तरुण म्हणजे हिंदुस्थानातून उच्च शिक्षणासाठी आलेला बुध्दीमान तरुण वर्ग होता. त्यांच्या समोर बुवाबाजी व महात्मेगिरीची लटपटपंची चालणेच शक्य नव्हते. हळु हळु सावरकरांच्या बाजूला बसणाऱ्यांची संख्या वाढु लागली व एक दिवस असा आला की एका बाजूला गांधी एकटे व दुसऱ्या बाजूला सावरकर आणि त्यांच्या प्रभावळीतले तरुण. त्यानंतर गांधींनी इंडीया हाऊस मध्ये जाणे सोडले व "मारो काटो का पंथ" या नावे क्रांतीकारकांवर टिका करणारे एक राजनिष्ठ पुस्तक लिहिले. त्याच्या प्रस्तावनेत गांधी लिहितात, लंडनमधले इंडीया हाऊस मधले ब्रिटीशांविरुध्द पसरलेले विषारी वातावरण पाहुन मी दचकलो आणि तेथुन मागे फिरलो. दुर्दैवाने पुढे सावरकर पकडले गेले आणि अभिनव भारत संस्था उध्द्वस्त झाली. सावरकरांना कठोरातली कठोर अशी काळ्या पाण्याची दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली गेली. अंदमानात ११ वर्षे व रत्नागिरीत तीन वर...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव

कै. बाळाराव उर्फ शांताराम शिवराम सावरकर हे १९५० ते १९६६ अशी सोळा वर्षे सावरकरांचे स्वीय सचिव ( Personal secretary) म्हणून काम पहात असत. बाळाराव सावरकर हे सावरकरांचे नात्यातले नव्हेत तर केवळ आडनाव बंधु, त्यांचे नाते गुरु शिष्याचे. बाळाराव हे चित्पावन नसून कऱ्हाडे ब्राह्मण होते. स्वातंत्र्य वीर सावरकरांचे धाकटे बंधु बाळाराव उर्फ डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्याशी त्यांच्या नामसाधर्म्याची गल्लत करु नये. बाळारावांची आणि माझी ओळख खूप पुर्वीपासुनची. सुमारे दहा वर्षे म्हणजे सन १९८६-८७ ते पुढे बाळाराव जाईपर्यंत ती टिकली. मी पुण्यात आल्यानंतर माझ्या कडे आल्याशिवाय बाळाराव पुण्यातून कधीच परस्पर परत गेले नाहीत. सावरकर साहित्याच्या निमित्ताने आमची गाढ ओळख व वयाने ते माझ्याहून खूपच मोठे असले तरी आमची मैत्रीही झाली. त्यांच्या सावरकरांच्या सहवासातल्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळत. बऱ्याचशा त्यांनी पुस्तकात लिहुन ठेवल्याच आहेत. बाळाराव सावरकरांचे काम करत मात्र त्या बदल्यात सावरकर बाळारावांना काहीही वेतन देत नसत. सावरकरांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी लोकांकडुन त्यांना काही रुपये कृत...

पहिली गरज नास्तिकांच्या प्रबोधनाची

वरवरचा विचार करणाऱ्यांना प्रश्न पडु शकेल की मी फेसबुकवर फार कमी कालावधीत हिंदुत्ववादी लिखाण टाकतो नंतर गोहत्याबंदी विरोधी पण टाकतो. एका बाजुने नास्तिक मताचा प्रसार करतो तर दुसरी कडे आस्तिकांची बाजू घेतो. एकिकडे उपयुक्ततावादा सारख्या रुक्ष, कठोर आणि परखड तत्वज्ञान सांगणाऱ्या सावरकरांना मानतो आणि भावना आणि श्रध्दांनाही महत्व देणाऱ्या पोस्ट टाकतो. स्वत: मी देवळात जात नाही, मुर्तीपुजा करण्यात रस नाही पण काही लिखाणात मात्र मी मुर्तीपुजेवर श्रध्दा असणाऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वाचकांपैकी एक दोन मित्रांना हा विरोधाभास वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे. वर वर पाहिल तर काहिंना हा माझ्यातला परस्परविरोध किंवा अंतर्विरोध वाटु शकेल हे मान्य. पण माझी सुचना अशी आहे की जर त्यांनी सूक्ष्मतेने पाहिले तर माझ्या लेखनाच्या मागे त्यांना एक विशिष्ट सूत्र सापडेल. हे सूत्र आहे तारतम्य नावाचे. मी नास्तिकांना पण समजून घेऊ शकतो कारण मी स्वत:च नास्तिकतेकडे झुकलेलो आहे. पण मी आस्तिकांनाही समजून घेऊ शकतो कारण माणसाच्या मन, बुध्दी अहंकार व पंचकर्मेंद्रिये -ज्ञानेंद्रियांच्या मर्यादांची पण मला पुर्ण ...

शाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती

शाकाहार का मांसाहार हा संस्कृती विरुध्द प्रकृती असा संघर्ष आहे. त्याचा श्रध्दा वा अंधश्रध्देशी संबंध फारसा जोडता येत नाही. आपण जगताना अनेक सूक्ष्म जीव मरतातच कि किंवा वनस्पतींची पण हत्या शाकाहार करताना होतेच की असा मांसाहार करणाऱ्यांचा स्वसमर्थनार्थ युक्तीवाद असतो. अशा युक्तीवादात "हेतु" चा विचार केला जात नाही. त्या व्यतिरिक्त मांसाहार असल्याने जगात वनस्पती जन्य अन्नपुरवठा पुरेसा होतो, मंसाहारी लोक शाकाहारी बनले तर अन्नधान्याचा तुटवडा पडेल असाही एक युक्तीवाद केला जातो. ज गताना नकळत मारले जाणारे सूक्ष्म जीव, औषधी कारणांसाठी होणारी प्राणीहत्या आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केलेल्या हत्या यात एकत्रित पणे कशा पहाता येतील? अन्न धान्याचा तुटवडा पडेल हाही एक चुकीचा युक्तीवाद आहे, मागणी तसा पुरवठा या न्यायाने अन्न धान्याचे उत्पादन वाढवता येऊ शकते. हा एक हयपोथेटिकल दावा आहे. शेतीचे द्न्यान नसताना गुहेत वल्कले नेसुन शिकार करणारा मानव व आता सुसंस्कृत झालेला मानव यात आपण काय निवडायचे तो विचार प्रत्येकाने करावा. राज्यघटना हि पण संस्कृतीच आहे अराजक हे स्वाभाविक आहे, मग कशाची निव...

सावरकरांचे चारित्र्य : समज-अपसमज

कोणत्याही महान व्यक्तीच्या खाजगी चारित्र्याविषयी, त्यांच्या वर्तनाचा राष्ट्रिय हितावर दुष्परिणाम झाल्याचा पुरावा सापडत नाही तोपर्यंत इतिहासकाराने टिकाटिप्पणी करु नये. चरित्रकारांना मात्र चरित्रात त्या कथित कथांची दखल घ्यावी लागते. पाश्चिमात्य चरित्रकार खूप मोकळेपणे या विषयाची चर्चा करतात. त्याने कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत किंवा नाही टिकाकारांनाही ते एक विरोधासाठी उपलब्ध झालेले शस्त्र वाटत नाही. थोर/महान/इतिहासावर ठसा उमटवणार्‍या व्यक्ती तीव्र कामवर्तनाच्या असल्या किंवा समलैंगिक प्रवृत्तीच्या असल्या तरी पाश्चिमात्य जगात त्यांचे मोठेपण कमी होत नाहि. कामवासना हि सर्व जीवांची मूलभूत प्रेरणा असते. महात्मा गांधी यांच्या सत्याच्या प्रयोगात त्यांनी निर्भयपणे त्यांच्या खाजगी आयुष्याची चर्चा केली आहे. सेनापती बापट यांची रशियन मैत्रिण होती. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मन स्त्री शी विवाह केला होता तर रासबेहारी बोस यांनी जपानी स्त्री शी विवाह केला. मात्र ते रितसर विवाह होते. त्यामुळे त्याविषयी कसलेच लोकापवाद नाहीत. नेहरुंच्या आयुष्यातील स्त्रियांविषयीही बरेच बोलले जाते. त्या...

मानससरोवर यात्रा

हज यात्रेला मिळत असलेली सबसिडी बंद करण्याचा निर्णय परस्पर घेणे योगी आदीत्यनाथांच्या हाती नसला तरी मानस सरोवरासाठी सबसिडी देण्याची त्यांनी घोषणा केली आहे, हि एक चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकारने काही वर्षांनी योग्य वेळ येताच वाटल्यास सर्वच बंद करावे. पण आता मानस सरोवर यात्रेला जास्तीत जास्त हिंदुंनी जावे. अर्थात हि यात्रा काही सोपी नाही. हि यात्रा करण्यास फिटनेस अर्थातच महत्वाचा असतोे, त्या वाचून यात्रेकरु होण्यास परवानगीच मिळत नाही. मानस सरोवराचे सौंदर्य अप्रतिम आहे. आपला एक सांस्कृतिक , धार्मिक आणि राष्ट्रिय सीमावर्ती विभागातला ठेवा, स्वातंत्र्यानंतर आपणास लाभलेल्या व आपण निवडलेल्या ढिसाळ नेतृत्वामुळे आपल्या हातातुन गेल्याचे दु:ख होते. या यात्रेचा आणि सबसिडिचा काही हिस्सा चीनला जात असला तर ते पाप जुन्या राज्यकर्त्यांचे आहे. ज्यांना हा हिस्सा चीनला जातो आहे म्हणून दु:ख होते त्यांनि चीनी मालावर बहिष्कार घाला म्हणुन प्रचार करणे , व स्वत:ही तो अमलात आणणे हे जास्त व्यावहारीक आहे. चीनला यात्रेतुन जाऊ शकणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा चीनी मालामुळे जातो आणि देश...

आज कै. श्री. ग.वा.बेहेरे यांचा स्मृतीदिन

माझी बेहेरेंबरोबर दोनदा भेट झाली. माझे काही लेख / पत्रे त्यांनी छापलीही होते. सोबत मधुनच माझा सावरकर सिनेमाच्या संदर्भात श्री. सुधीर फडक्यांशी थोडासा वादविवादही झाला होता. मी बेहेऱ्यांची एकदा त्यांच्याच कार्यालयात भेट घेतली होती. मी ज्यांच्या ओळखीने आणि ज्या संदर्भात त्यांना प्रथम भेटलो होतो, त्यांच्याशी बेहेऱ्यांचा विसंवाद होता. ते मला त्यावेळी माहीत नव्हते. त्यामुळे आमची भेट फारशी सुखावह झाली नाही. मला लेखनाला फारसे प्रोत्साहनही त्यांनी दिले नाही. पण माझा बेहेऱ्यांविषयी आदर कायमच होता. पण त्यावेळी मी दिलेला लेख काही सोबत मध्ये छापुन आला नाही, पण नंतरचे छापुन आले. दुसऱ्यांदा भेट झाली ती सातारच्या सावरकर साहित्य संमेलनात. ती भेट ५-१० लोकांच्या गराड्यातली होती. साताऱ्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबरोबर एकाच व्यासपीठावर भाषणे केली होती. संमेलनात आणि नंतर सार्वजविक सभेत. सातारचे दैनिक "ऐक्य" बहुदा त्याच दिवशी सुरु झाले होते. महाराष्ट्रातले वातावरण हिंदुत्वाने भारले जाऊ लागले होते. त्यांची भाषणं लेखणीप्रमाणेच प्रभावी वाटलीे. संमेलनात जेव्हा थोडी बेशिस्त माजली...

सरसंघचालक का राष्ट्रपती?

सामनाचे पत्रकार व कार्यकारी संपादक राऊतांनी भागवतांचे नाव राष्ट्रपती पदा साठी सुचवणे किंवा परवा माझ्या फेसबुक वॉल वर येऊन ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश अकोलकर यांनी येऊन असंबध्द पध्दतीने मूळ विषयाचे विषयांतर करुन "मग करा ना भागवतांना राष्ट्रपती" हे पालुपद वारंवार आळवणे या सगळयाची मजा वाटते. ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि त्यांच्या कार्यपध्दतीचे कणभरही ज्ञान आहे, त्यास, भागवतांना संघाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणे अथवा भागवतांनी ते स्वीकारणे अथवा या सुचनेमुळे सर्वसामान्य संघस्वयंसेवक सुखावला असेल अस वाटण हे सगळच असंभव होते. संघस्वयंसेवकाला भागवत राष्ट्रपती होणे अथवा न होणे यावर विशेष काही स्वारस्य असेल अस कुठेही जाणवल नाही. त्यांनी तशा काही भावना प्रकट करण हा त्यांचा स्वभावही नाही. ज्यांच सगळ राजकारण आणि आयुष्यच पदांभोवती फिरत असत , त्यांची विचारांची झेपच मुळात तितकी तोकडी आहे , ज्यांना संघाचा राजकारणात सहभाग नाही हेच मान्य नाही ते असे तारे तोडत असतात. त्यात राऊत काय अकोलकर काय पत्रकारच, तेव्हा सध्याच्या पत्रकारांची पत्रकारीता पहाता जिथे ते जनमताचा अ...

हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा

हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा असा मुद्दाम हिंदु शब्दाचा उल्लेख करावा का न करावा? जर आपण १ जानेवारीला ख्रिश्चन नव-वर्षाच्या शुभेच्छा असा उल्लेख करत नसु तर मुद्दाम हिंदु नववर्ष असा उल्लेख का करायचा? नुसताच नववर्षाच्या शुभेच्छा एवढच का म्हणु नये, असा काहिंचा प्रश्न आहे . गुढी पाडवा हे नुसत मराठी नववर्ष म्हणण तर त्याहून जास्त चुक आहे. मराठी असण्या नसण्याशी याचा संबंध नाही. १ मे हा महाराष्ट्र दिन (किंवा जागतिक कामगार दिन) तस गुढी पाडवा फक्त महाराष्ट्राशी संबंधित नाही. पण व्यवहारात जो पर्यंत १ जानेवारी हा नविन वर्षाचा प्रारंभ मानला जातो तोपर्यंत आणि त्यामुळे हा हिंदु नववर्षाचा म्हणावे लागेल. वस्तुत: निसर्गचक्राप्रमाणे सुर्याचा मेषेतला प्रवेश, वसंत संपात हेच वास्तविक नववर्ष मोजण्यास प्रारंभ करायचा दिवस. त्यामुळ गुढी पाडवा हा अगदी शास्त्रशुध्द नैसर्गिक दिवस. अगदी जगभर हिच नैसर्गिक पध्दत नववर्षारंभासाठी होती. कारण पुर्वी म्हणजे १६ व्या किंवा १७ व्या शतकापर्यंत चैत्र गुढीपाडव्याच्याच सुमारास येणारा १ एप्रिल हाच नविन वर्षारंभ युरोपचाही होता. नंतर एका राजाने तो बदलुन १ जाने वार...

गुढी पाडवा प्राचीन उत्सव

गुढी पाडवा काश्मिरात हिंदुंच्या तुर्कांवरिल विजयाप्रीत्यर्थ साजरा होई असा स्पष्ट उल्लेख अल्‌बेरुनी हा अरबी प्रवासी , लेखक आपल्या प्रवासवर्णनात सन १००० ला इतक्या जुन्या कालात करतो . "अगडुस" असा शब्द वापरलेला दिसतोय त्याला उच्चार करता आला तसा. तरीही जो अपप्रचार होतो त्याविषयी काय बोलायच कप्पाळ. सण जुना तर आहेच पण अगदी काश्मिरात पण साजरा केला जाई. महाराष्ट्राबाहेर हा सण साजरा होतो आजही. अल्‌ बेरुनी चा जीवनकाल 4 September 973 ते 9 December 1048 म्हणजे किमान १००० वर्षे हा सण स ाजरा होत असल्याचा ऐतिहासिक पुरावा सिध्द झाला. महाराष्ट्राबाहेर काश्मिरलही होत असल्याचे सिध्द झाले तुर्कांवरील म्हणजे मुसलमानांवरील विजयाचे प्रतिक असल्याचे सिध्द झाले. अगुडस हा शब्द नेमका कळत नाही पण गुढीशी साधर्म्य आहे. कर्नाटक, तामिळनाडु इ/ ठिकाणि उगडी या नावे हा साजरा करतात, अर्थात शब्द काय हा विषय इथे गौण आहे. कारण मुट्टाई राजा या उच्चारालाही काही अर्थ नाही. लेखक परकिय असल्याने चुकिचे उच्चार सर्रास आढळतात. (तपशील राजतरंगिणीत शोधावा लागेल . राजतरंगिणी हा काश्मिरचा अधिकृत व समकालिन...

शहाण्याला शब्दाचा मार....

एखाद्या थोरामोठ्याचे, व्यक्तीचे चार-दोन शब्द पकडुन त्याच्या समग्र विचारविश्वाच आकलन किंवा चरित्र वा कार्य यांचा निष्कर्ष काढायचा नसतो. विशिष्ट वाक्य अथवा वाक्यांचा समूह पकडुन आकलन करताना, ती वाक्ये कोणत्या संदर्भात आहेत कोणाला उद्देशुन आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत त्याचा विचार करायचा नाही आणि त्या व्यक्तीवर आपल्या सोयीचा शिक्का मारायचा, सोयीप्रमाणे वापरायचे किंवा वैचारिक प्रतिस्पर्ध्याला आपण कसे नामोहराम केले अशा आविर्भावात ती वाक्ये फेकत रहायची हा पायंडा पडत चालला आहे. आप ण साधी माणस सुध्दा प्रसंगानुरुप बोलतो. मुलांना तु लहान आहेस तुला नाही कळायच अस एका प्रसंगात म्हणतो आणि कदाचित तासाभरातच अरे तु मोठा झालास जबाबदारीने वागायला हवस असही म्हणतो. कारण देश - काल- परिस्थिती चे संदर्भ असतात. तो दुटप्पीपणा नसतो. मोठ्या व्यक्तींना तेच लागु आहे. विभिन्न परिस्थिती आणि विभिन्न माणसे हाताळताना त्यांच वागण , विचार व उपदेश वेगवेगळे असतात. थोरा मोठ्या व्यक्तींना आपल्या पेक्षा कितीतरी मोठ्या प्रसंगांना , विविध वयोगटांना, विचारगटांना अथवा समाजगटांचे भान ठेवायचे असते. वाचकांचे वा...

जीना हाऊस: द्विराष्ट्रवादाचे स्मारक

खरतर कोणतीही ऐतिहासिक वास्तु ची नासधुस करण, तिच्यावर राग काढण मला योग्य वाटत नाही. त्यामुळे जीना हाऊस ला धक्का पोचवु नये अस तात्विक मत आहे. पण ज्या प्रकारे भारतात ढिलाई चालते ती पहाता हा कळीचा मुद्दा नक्कीच बनतो. शिवाजी महाराजांनी मरणान्तानी वैराणी या हिंदु धर्मनीतीस अनुसरुन, रावणाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या आदर्श श्रीरामाच्या पावलावर पाऊल टाकून अफजलखानाचे त्याच्या त्याच्या धार्मिक कल्पने प्रमाणे योग्य ते विधी करवुन घेतले. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे थडगे बांधले का नाही हा मुद्दा तर ऐतिहासिक दृष्ट्या वादग्रस्तच आहे. तसा समकालिन पुरावा उपलब्ध नाही. १९३५ पर्यंत ती एक साधी कबरच होती असे उपलब्ध छायाचित्रावरुन दिसते. पण आता त्याचे फार मोठेे अवडंबर झाले आहे. एका किरकोळ झोपडिवजा थडग्याचे प्रचंड मोठ्या दर्ग्यात रुपांतर झाले आहे. कोर्टाने आदेश देऊनही हे अधिक झालेले बांधकाम अद्यापही पाडले गेलेले नाही. मरणान्तानी वैराणि इ. आदर्श कल्पना न बाळगता ब्रिटीशांनी शनिवारवाडा अथवा गडकिल्ले यांना भारतीयांना प्रेरणा ठरतील अशी स्मारके बनवु दिले नाही. उलट अशा स्मारकात पण जातीवाद आणणारे घटक...