सावरकर ब्रिटीशांबरोबर झालेल्या तहातील सर्व अटींतुन मुक्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. राजकारणात त्यांच्या समवेत अंदमानातच जमठेपीची शिक्षा भगणारे भाई परमानंद व आशुतोष लाहीरी हिंदुमहासभेचेच राजकारण करण्यात सामिल झाले.
सेनापती बापट हे सुध्दा पुन: सावरकरांसमवेत काही सार्वजनिक कामात भाग घेत. त्यांनी हिंदुसभेत प्रत्यक्ष प्रवेश केला नाही तरी हिंदुसभेच्या लढ्यात ते भाग घेत असत.
राशबेहारी बोस यांनी सावरकरांशी पत्रव्यवहार सुरु ठेवला व त्यांच्या सुचनेवरुन जपान मध्ये हिंदुमहासभेची शाखा सुरु केली.
सावरकरांची मुक्तता झाल्यावर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. यावेळी सावरकर १८५७ च्या उठावातील क्रांतीकारकांपासून भगतसिंगा पर्यंत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व क्रांतीकारकांच्या नावाचा प्रकट उच्चार करुन लोकांना त्यांचा जयजयकार करन्यास उद्युक्त करत. आपल्या सहकारी, अनुयायी व अन्य क्रांतीकारकांवर सावरकर लेख लिहित व त्यांचा गौरव करीत. त्यातील काही लेखांचा संग्रह पुस्तक तेजस्वी तारे नावे प्रकशित आहे. थोडक्यात सावरकरांनी अन्य क्रांतीकारकांशी नंतर संबंध ठेवले नाहित वा अन्य क्रांतीकारकांनी सावरकरांशी संबंध ठेवले नाहीत हा काही लोकांचा केवळ अपप्रचार आहे.
राजकारणात आल्यावर लगेचच सावरकरांनी महाराष्ट्र आणि भारत भर दौरे केले.
यातील एक महत्वाचा दौरा उत्तर प्रदेश चा. १ एप्रिल १९३८ ला सावरकर उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर निघाले, तो सर्व वृत्तांत खूप मोठा आहे पण त्यातील काही ठळक घटना.
या दौऱ्यात सावरकरांनी त्यांच्या १८५७ चे सममर या जगभर गाजलेल्या ग्रंथात उल्लेख झालेली ठिकाणे म्हणजे झाशी, कानपुर, बिठुर इ. प्रत्यक्ष पाहिली.प्रत्येक ठिकाणी त्यांनी या वीरांना मौनाद्वारे श्रध्दांजली वाहिली तेव्हा वातावरण भारुन जात असे.
दि. ४ एप्रिल १९३८ ला सावरकर फैजाबाद ला पोचले. या ठिकाणि त्यांचा भव्य सत्कार झाला.फैजाबाद रेल्वे स्थानकापासुन त्यांची सजवलेल्या मार्गावरुन भव्य मिरवणुक निघाली.
मिरवणुकीची सांगता तेथील संस्कृत महाविद्यालयात झाली. तिथे त्यांना संस्कृत भाषेत मानपत्र देऊन गौरवण्यात आले. फैजाबाद मधली सभा संपवुन जात असतानाच अयोध्येचे पन्नास ब्राह्मण संस्कृत वेदमंत्रांचा घोष करत सावरकरांना सामोरे गेले व त्यांनी सावरकरांना रामजन्मभूमि पहाण्याचे आमंत्रण दिले. तथापि पुढचे कार्यक्रम आधीच ठरल्याने पुढील भेटीत रामजन्मभूमिला येण्याचे आश्वासन देउन सावरकर पुढील कार्यक्रमास निघाले. जर त्यांनी रामजन्मभूमिला भेट दिली असती तर आजच्या काळाच्या परिप्रेक्षात ती भेट नक्कीच संस्मरणीय ठरली असती.
यापुढे सावरकर लखनौ भेटीसाठी निघाले. त्यांना लखनौला नेण्यासाठी त्याअंच्या बरोबर लंडनला असलेले अभिनव भारताचे सदस्य व सावरक्रांचे अनुयायी प्रा. महेशचरणसिंग बाराबंकीला आले. यांना स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुले बराच त्य्रास झाला होता. तीस वर्षांनी होत आलेल्या भेटीमुळे दोघांचीही हृदये भरुन आली. लखनौच्या कान्यकुब्ज महाविद्यालयात नागरीक व विद्यर्थ्यांसमोर सावरकरांनी केलेल्या भाषणाने व मार्गदर्षनाने वातावरण भारुन गेले . इतके की कान्यकुब्ज महाविद्यालयाचे संस्थापक श्री. मिश्र यांनी तिथल्या तिथे हिंदुंसाठी सैनिकी महाविद्यालय सुरु करण्याचा संकल्प सोडला.
यानंतर लखनौ मध्ये सावरकरांची एक भव्य मिरवणुक निघाली. सावरकरांना आठ घोडे जुंपलेल्या घोडागाडित बसवुन गाडीपुढे शंभर शस्त्र व कृपाणधारी शीखांचे पथक सत श्री अकाल चा घोष करत पुढे चालत होते. मागोमाग वेदमंत्रांचा घोष करणारे ब्रह्मवृंद चालत होते. पाठोपाठ कुंडलिनी कृपाणांकित ध्वज धारी असे शंभर एक स्वयंसेवक, निरनिराळे कवायती करणारे आखाडे असा सगळा थाट होता. उत्साह प्रचंड असून सुमारे तीन मैलांच्या या मिरवणुकीय किमान एक लाख लोक दुतर्फा उभे होते.
दि. ६ एप्रिलला सावरकर अंदमानात सहकष्टभोगी असलेले काकोरी कटातले प्रमुख क्रांतीकारक शचिंद्र नाथ संन्याल यांच्या घरी भेटीस गेले. त्यांच्या घरी सावरकरांना भेटण्यास समाजवादी गटाचे आचार्य नरेंद्र देव आले व समाजवाद्यांतर्फे तेथे सावरकरांचा सत्कार केला गेला.. या ठिकाणि राजकिय चर्चा होऊन हिंदु मुस्लिम प्रश्नाबाबत सावरकरांनी हिंदुमहासभेची भूमिका देव व संन्याल यांना समजाऊन दिली.
याच दौर्यात सावरकरांची भेट गोविंद वल्लभ पंत आदी विविध पक्षांच्या नेत्यांशीही झाल्या. सर्वपक्षिय मतभेद बाजुला सारुन झालेला असा हा दौरा होता. सव पक्षांनी उत्तर प्रदेश च्या दौऱ्यात सावरकरांचा सन्मान व गौरव केला.
यानंतर सावरकर आग्रा येथे ताजमहाल व आग्रयाचा गड पहाण्यास गेले. दिवाणे खास मध्ये शिवजी महाराजांनी औरंगजेबाला मारण्याचा डाव कसा होता हे सावरकरांनी उपस्थितांना प्रत्यक्ष अंतरे उभे राहुन दाखवला. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने लांब उभे केल्याने राजांचा डाव फसला अशी एक बाजु सांगितली जाते. सावरकरांनि प्रत्यक्ष तिथे उबे राहुण सर्वंच्या मन:चक्षुंपुढे चित्र उभे करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.
हा दौरा अधिकाधीक गाजत गेल्याने येथुन सावरकरांना उ.प्र. मधील हरिद्वारादी ठिकाणांहुन सावरकरांना भेटीची व्याख्यानांची आमंत्रणे येऊ लगली परंतु या सात दिवसंच्या प्रवासाने सावरकर थकल्याने व चार दिवसांवरच मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष या नात्याने सहभाग व भाषण करावयाचे असल्याने सावरकर आग्र्याहुन ९ एप्रिलला परत मुंबईकडे रवाना झाले.
..............................
No comments:
Post a Comment