पंतप्रधान मोदी यांच्या कॉंग्रेसमुक्त भारत या अभियानाचा अर्थ काय असावा? सर ऍलन ह्युम या ब्रिटीश अधिकाऱ्याला १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात बाईचा वेष करुन लपत छपत पळुन जाऊन जीव वाचवावा लागला होता. या सशस्त्र उद्रेकाचा त्याने चांगलाच धसका घेतला. भारतीयांनी परत असा उठाव केला तर ब्रिटीशांच साम्राज्य भारतावर रहाणार नाहीच आणि फार मोठी जिवितहानी पण होईल हे त्याच्या लक्षात आल. भारतीयांचा उद्रेक जर साठत गेला तर एक दिवस स्फोट होऊन विनाश अटळ हे त्याने ओळखले व भारतीयांच्या असंतोषाला वाट मिळावी या उद्देशाने त्याने भारतीय र्कॉंग्रेसची स्थापना केली. तिचे वर्णन त्याने कुकरची वाफ जाण्यास जो सेफ्टी वॉल्व्ह असतो त्याप्रमाणे केले. सुरुवातीला कॉंग्रेसचे स्वरुप सेफ्टी शिटी सारखेच होते. कॉंग्रेस मधला मवाळ वर्ग ब्रिटीशांचे राज्य म्हणजे ईश्वरी कृपा समजत असे. अर्थात याचा अर्थ हे मवाळ लोक ब्रिटीश राजनिष्ठ असले तरी त्यांचे देशावर व देशवासियंवर प्रेम नव्हते असे नाही आणि त्यांनी काहीच काम केले नाही असा मात्र नाही. न्यायमुर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सारख्या मवाळांनी भारताची बाजू च...