Monday, February 13, 2017

चार बोधकथा


१. वाघाचे कातडे पांघरलेले गाढव

एका धोब्याजवळ एक गाढव होते. गाढवाला खूप काम करावे लागे. धोब्याला फारसे पैसे मिळत नसत तर तो तरी गाढवाला किति खाऊ पिऊ घालणार? एके दिवशी धोब्याला वाघाचे कातडे मिळाले. त्याने आपल्या गाढवाच्या अंगावर पांघरले. लोक गाढवाला वाघ समजून घाबरतील आणि गाढवाला खाऊ पिऊ घालण्याचा खर्च वाचेल, परस्पर भागेल असे त्यास वाटले.
त्याचा अंदाज बरोबर ठरला. शेताच्या राखणदारांना वाटे खराच वाघ आला आहे. ते घाबरुन दुर पळत. गाढवाची मात्र खरोखरच चैन झाली. शेतात रात्री मनमुराद खावे व मस्त ताणून द्यावी, असा दिनक्रम खूप दिवस चालला. गाढव एव्हाना गलेलठ्ठ झाले. त्याला धडपणे पळता येईना. एके दिवशी दुरून त्याला गाढवीचा आवाज ऐकू आला. न राहवून त्यानंदेखील प्रतिसाद दिला. वाघाचे सोंग बाहेर आले. गाढवाच्या ओरडण्याने राखणदार जागा झाला आणि गाढवाला चांगलाच चोप मिळाला.

२. गाढवाचा गाढवपणा
एक गाढव होत. व्यापारी त्याच्यावर बराच माल लादुन नेत असे. एके दिवशी व्यापाऱ्याने मिठाच्या गोणी गाढवाच्या पाठीवर लादल्या. प्रवासात नदी पार करताना सारे मीठ नदीच्या पाण्यात विरघळुन गेले आणि गाढवाचा भार हलका झाला.
परत एकदा नदी ओलांडायची वेळ आली. गाढवाला वाटले चांगली संधी आहे. त्याने खोल पाण्यात डुबकी मारली पण त्याच्या पाठीवर होता स्पंज भरलेला. स्पंजाने पाणी शोषून घेतले आणि तो भार असह्य होऊन गाढव नदीत बुडुन मेले.

३. गर्वाने फुगलेले गाढव
एकदा एका व्यापाऱ्याने आपल्या गाढवाच्या पाठिवर देवाची मुर्ती ठेवली आणि दुसऱ्या शहरात विक्रीसाठी नेऊ लागला. जाता येता लोक आपल्या दैवताची मुर्ती पाहुन थांबुन थांबुन नमस्कार करु लागले. गाढवाला वाटले हे सगळा नमस्कार आपल्याला मिळत आहेत. त्याला गर्व चढला
काही वेळाने त्याने पुढे चालायचे साफ नाकारले आणि आपल्या सन्मानामुळे मद चढल्यासारखा आनंदाने जोरजोरात खिंकाळु लागले.
व्यापाऱ्याला काही कळेना आतापर्यंत शिस्तीत वागणार गाढव अस वारा प्यायल्यासारख का करतय? पण लवकरच त्याच्या ध्यानी सगळा प्रकार आला.

त्याने गाढवाच्या पाठीवर काठीचे दोन सणसणीत रट्टे दिले.
गाढवने जीभच बाहेर काढली, आणि निमुट चालु लागले.

व्यापारी म्हणाला अरे गाढवा, लोक तुझा सन्मान करीत नसून तुझ्या पाठीवर ज्या दैवताची मुर्ती ठेवली आहे तिचा सन्मान करत आहेत. गाढवाचा गाढवच राहिलास रे तू !

४. गाणार गाढव
एकदा एका गाढवाची आणि कोल्ह्याची मैत्री झाली. दोघांनी एकत्रित पणे पोटापाण्याची व्यवस्था करायचे ठरवले. त्याप्रमाणे ते एका काकडीच्या शेतात गेले. कोल्हा म्हणाला मी आधी काकड्या खाऊन घेतो तू राखण कर. गाधवाने ते मान्य केले. कोल्ह्याने पोटभर काकड्या खाल्या आणि गाढवाला म्हणाले आता तू खा.
गाढव म्हणाले किती अरसिक रे तू. एवधे सुंदर चांदने पदले आहे. थोड गण गाईन म्हणतो.
कोल्हा म्हणाला अरे बाबा आपण इथे गाण्याची मैफल करायला नाहि चोरी करायला आलो आहे आणी तसही तुला गाण्यातल काय कळत?
गाढवाला राग आला . त्याने कोल्ह्याला आपल्याला गाण्यातल खूप कलत अस सांगायला सुरुवात केली. कोल्हा म्हणाला ठिक आहे मी जरा दुर उभे राहून राखणदार येतो का ते पहातो, मी दुर गेलो की तु गाण सुरु कर..
कोल्हा लांब जाताच गाढवाने गायला सुरुवात केली. खिंकाळणेच ते, राखणदार आला व त्याने गाढवाला बेदम मारले.

पंचतंत्र व इसापनिती वर आधारीत

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...