Thursday, February 16, 2017

हिंदुंच्या शुध्दीकरणांचा इतिहास

शुध्दीबंदी बद्दल ब्राह्मण वर्गाला अथवा सवर्णांना दोष देत असतानाच परधर्मात बलाने बाटवलेल्या हिंदुंच्या शुध्दीकरणाच्या घटना सुध्दा खुप घडत असत हे पण लक्षात घेतले पाहिजे. शुध्दीबंदी मुळे हिंदुंनी स्वत:चे नुकसान करुन घेतल्याची बरिच उदाहरणे असली तरी अगदी विरुध्द उदाहरणे सुध्दा आहेत.
१.इस्लामच्या आणि ख्रिश्चनांच्या आक्रमणापुर्वी आलेले सर्व शककुशाणादी आक्रमकांनी हिंदु बौध्दादी भारतीय धर्मच स्विकारुन भारतीय संस्कृती स्वीकारुन मुख्य प्रवाहात सामिल होणेच पसंत केले. नंतर मात्र प्रश्न निर्माण झाले.
 सर्वप्रथम सिंधुच्या तीरावर देवल ॠषी नावाच्या एका ब्राह्मणाने मुस्लिम आक्रमकांनी बाटवलेल्या हिंदुंच्या शुध्कदीरणासाठी एक नविन स्मृती लिहिली ती देवलस्मृती म्हणून प्रसिध्द आहे. या आधारे बऱ्याच प्रमाणात हिंदुंना शुध्द करुन घेतले गेले.
२. सेंट झेवियर याने पोर्तुगीझ राजवटीत अनेक बरेवाईट प्रयत्न करुन हिंदुंचे ख्रिश्चनीकरण केले. पण त्याच्या प्रयत्नांना मुख्य अडथळा असे तो ब्राह्मणांचा होता. सेंट झेवियर ने पोर्तुगीझ राजाला हिंदुंच्या बाटववाबाटवीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी एक पत्र लिहिले ते असे,
"..... ख्रिश्चन धर्मप्रसारास मुख्य अडथळा येतो तो येथील ब्राह्मणां लोकांचा होय ! ते आमच्या धर्मप्रसारास पुढे जाऊ देत नाहीत.धी सामान्य हिंदु लोक आम्ही बाटवत जातो पण मागे वळुन पहातो तर हे ब्राह्मण लोक गुप्तपणे मांडवी नावाच्या नदीच्या तीरावर त्या सर्वांना नेऊन त्यांस सांगतात की या नदीत स्नान करुन आम्ही सांगतो श्लोक म्हणा म्हणजे तुम्ही ख्रिश्चन होण्यातले पाप धुवुन निघुन तुम्ही पुन्हा हिंदुंचे हिंदु व्हाल. अशा थापा मारुन हे ब्राह्मण लोक बाटलेल्या हिंदुंपैकी अनेकांना वरिल स्नानाप्रमाणेच इतर अनेक प्रकारे फसवुन शुध्द करुन घेतात. या ब्राह्मणांवर वचक निर्माण करायचा आम्ही प्रयत्न करतो, पण ते त्यास भीक घालत नाहीत."
३.फिरोजशहा तुघलकच्या काळात (सुमारे सन १३५०) दिल्लीतच एक वृध्द ब्राह्मण आपल्या घरात गुप्तपणे मुर्तीपुजा करत असे. त्याचे वागणे अतिशय पवित्र आणि उपदेश सात्विक होता. अनेक हिंदु व अगदी मुळचे मुसलमान सुध्दा त्याच्या भजनी लागले. फिरोजशहा च्या कानावर हे पडले तेव्हा त्याने त्यास अटक केली आणि सर्वांसमक्ष त्याच्या लाकडी मुर्तीसह त्यास चितेवर बसवुन जिवंत जाळले. हि हकिगत त्याच्या दरबारातीलच इतिहासकार झियाउद्दीन बरनी याने आपल्या तारीख ए फिरोजशाही मध्ये लिहुन ठेवली आहे.
४. अल्‌विलादुरी हा दहाव्या शतकातला इतिहासकार लिहितो, "आठव्या शतकातील सिंध मधील मुस्लिम सत्तेस ओहोटी लागली. बहुतेक सर्व हिंदु मुसलमान धर्माचा त्याग करुन पुन: मुर्तीपुजक बनले. मुसलमानांची संख्या घटली त्यामुळे परत बराच काळ इस्लामी सत्ता स्थापन होऊ शकली नाही.
११ व्या शतकानंतर मुसलमानांची सत्ता स्थिरस्थावर होऊ लागली काहींचे मत शुध्दीकरणाच्या प्रतिकुल बनले, पण शुध्दीकरण करणे अवघडही बनत गेले. शुध्द होऊन परत हिंदु बनणाऱ्याला प्राणदंडच असे, राजकिय विजय मिळाल्याशिवाय ब्राह्मण वर्गाला शुध्दीविधी करणे शक्यच नव्हते. त्यांचा कल शुध्दीच्या बाजूने असो वा नसो. शस्त्रसामर्थ्यावाचून व राजसत्तेच्या पाठिंब्याशिवाय एकटा ब्राह्मणा वर्ग हे काम करु शकणे अवघडच होते, व नंतर ब्राह्मणवर्ग पावित्र्य व बाटण्याच्या कल्पनांनी शुध्दीच्या विरुध्द होऊ लागला. पण तरीही लहान मोठी अशी शुध्दी ची उदाहरणे घडतच राहिली.
५. पंजाबात इस्लामच्या स्वाऱ्या सुरु झाल्यानंतर पंजाबी हिंदु ब्राह्मणांनी शुध्दीकरणे सुरु केले. त्याचे एक उदाहरण "उतबी" या मुस्लिम इतिहासकाराने दिली आहे.
६. १३२० साली खिलजींच्या वंशाचा नाश एका मूळच्या हिंदु ने केला. त्याचे हिंदु नाव इतिहाअसाला अज्ञात आहे. याने खिलजींच्या वंशाचा नायनाट करुन सुलतान नासिरुद्दीन या नावाने दिल्लीचे तख्त काबिज केले. हा मुळचा गुजरातह मधील एका लढवैया जातीचा असून, जबरदस्तीने बाटवला गेला होता. याची सर्व माहिती एकतर्फी असून समकालिन मुसलमान तवारिखकारांनी यास शिव्यांची लाखोली वाहीली आहे. याचे मुख्य कारण त्याने हिंदुत्वाचा पुरस्क्कार केला. निम्म्याहून जास्त सैन्य त्याची भरवाड जात व अन्य हिंदु समाज होता.
गोहत्या बंदी , मशिदींच्या पुन: मंदिरे करणे , जिझया रद्द करणे अशी कामे त्याने केले. त्याची शेवटची लढाई तुघलक वंशाची स्थापना करणाऱ्या ग्यासुद्दीन तुघलका बरोबर झाली. सुलतान नासिरुद्दीनची दहशत प्रचंड होती, सुमारे चार महिने त्याने दिल्लीत राज्य केले. गुजराथची राजकन्या देवलदेवी हिलाही त्याने शुध्द करुन घेतले. अमीर खुस्रोने सुलतान नासिरुद्दीन च्या सैन्याची रणगर्जना ही "जय नारायण" अशी होती असे दिले होते.हिंदु बनलेल्या सुलतान नासिरुद्दीन याच्या काही हिंदु नातेवाईक व साथीदारांची नावे जहारिया, ब्रह्म, रन्धोल, कर्कनाग अशी काही नावे तवारिखात नोंदली आहेत. या हिंदु - मुस्लिम लढ्यात प्रथम तुघलकाचा पाडाव झाला होता. केवळ नशिबानेच पारडे उलटुन ग्यासुद्दीन तुघलकाचा विजय झाला. नासिरुद्धीन मारला गेला, त्याची भारवाडी हिंदु नातेवाईक व सैन्य मारले गेले वा गुजराथ ला पळुन गेले.
७. १३३६ च्या आसपास ग्यसुद्दीन तुघलकाचा मुलगा महंमद तुघलक अथवा वेडा महंमत याने हरीहर आणि बुक्क या दोन तरुणांना बाटवले असता, हे दोघे निसटुन दक्षिणेत गेले. तिथे शंकराचार्य पदवरच्या स्वामी विद्यारण्य यांनी त्यांस परत हिंदु करुन घेतले.
हिंदु झाल्यानंतर याच हरीहर आणि बुक्क यांनी विजयानगरचे हिंदुसाम्राज्य स्थापन केले. विजयानगरचे साम्राज्य दक्षिणेत सुमारे अडीचशे वर्षे टिकले. त्यांच्या दक्षिणेतील पाच मुसलमानी पातशाह्यांशी सतत संघर्ष चालत असे.
विजयानगरचा व्यापार जगभर असे , काही परदेशी प्रवाशांनी विजयानगरच्या सम्राटांची माहिती लिहून ठेवली आहे. काही प्रसंगी विजयानगरात दुर्बल हिंदु राजे होऊन गेले. धर्मनिरपेक्षतेचे अवडंबर माजे. विजयानगरचे हिंदु साम्राज्य आटोपेना तेव्हा सर्व पाच पातशाह्यांनी (निजामसाही, आदीलशाही, कुतुबशाहि, बेदरशाही इ.) एकत्र येऊन विजयानगरचा पाडाव केला. या साम्राज्याची अतिशय लांडगेतोड झाली. नरसिंहाची अक्राळविक्राळ मुर्ती हे विजयाकगरचे दैवत आजही भग्न अवस्थेत पहावयास मिळते.

८. मेवाडचा बाप्पा रावळ याने सिंध प्रांत जिंकुन घेतलाच, पण तेथील मुसलमान राजकन्येशी, मुळ मुसलमान असलेल्या राजकन्येशी, विवाह करुन तिला आपल्या अंत:पुरात स्थान दिले. कोणतीही अडचण ब्राह्मणांनी याविषयी निर्माण केली नाही. इतकेच नव्हे तर या हिंदु करुन घेतलेलय मुसलमान राजकन्येला झालेली संतती शुध्द राजपुत सुर्यवंशाचीच मानली गेली.
९. जेसलमीरच्या रावतचेचकांनी सुलतान हैबतखानाच्या मुलीशी लग्न केले आणि हिंदुसमाजात पचवुन टाकले. कसल्याही बाटण्याच्या अपवित्रतेच्या भानगडी उपस्थित झाल्या नाहीत.
१०.मारवाडच्या राजा रायमलने मुस्लिमांछा पाडाव करुन सहाशे मुस्लिम स्त्रियांना सामुदायिक शुध्हिंदीकरण करुन दु करुन घेतले आणि त्यांचे विवाह आपल्या वेगवेगळ्या सरदारांशी लावुन दिले.
११. मारवाडचाच कुंवर जगमल याने माळव्याच्या सुलतानाचा पराभव करुन त्याच्या शहजादीला हिंदु करुन घेतली व तिच्याशी विवाह केला. झालेली संतती राजपुत रक्ताचीच म्हणूनच वाढली.
१२.मेवाडच्या राणा कुंभ याने मुसलमानांचा पडाअव करुन अनेक स्त्रियांना हिंदु करुन त्यांच्याशी हिंदुंशी लग्ने लावुन हिंदुत्वात यशस्वी पणे विलिन करुन टाकले.
१३.नेपाळचा राजा जयस्थिती याने बंगालच्या नबाबाने शम्सुद्दीन याने नेपाळवर १३६० च्या आसपास केलेल्या स्वारीचा आणि धार्मिक उत्पाताचा सूड म्हणून युध्दात मुसलमानांना चीत केले आणि सर्व बौध्द विहार आणि हिंदु मंदीरे परत बांधली, बाटवलेल्या सर्वच्या सर्व हिंदु बौध्दांना शुध्द करुन नेपाळ निर्मुस्लिम करुन टाकला.
१४.तवारिख इ सोना या तवारीखेत मुसलमान इतिहासकार लिहितो, महंमद गझ्नी च्या स्वाऱ्यांच्या वेळी सुध्दा अनहिल्वड्याच्या राजाने गझनीच्या सैन्यात मागे राहिलेल्या अनेक तुर्की, मोंगल व अफगाण स्त्रियांना पकडुन नेले, आणि नि:शंकपणे हिम्दुंनी त्यांच्याशी लग्ने लावुन त्यांना मुर्तीपुजक बनवुन टाकले. (हि तक्रार आहे अर्थातच)
१५. अजमेरच्या अरुणदेवराय याने मुसलमान आक्रमकंचा पराभव करुन हुसकावुन लावल्यावर एक मोठा यज्ञ केला. याच स्थळि एक मोठे मंदिर व अनासागर नावाचे सरोवर बांधले. आजूबाजूच्या भागातले सरसकट सर्व बाटलेल्यांना या सरोवरात स्नान घालुन शुध्द करुन परत हिंदु करुन घेण्यात आले.
१६. हरीहर आणि बुक्क यांना शुध्द करुन घेणऱ्या शंकराचार्य विद्यारण्य यांनी माधवतीर्थ नावाचे सरोवर बांधून तिथे हिंदुंचा शुध्दीकरण विधी चालु र्हावा अशी व्यवस्था लावुन दिली.
१७. श्रीरामानुजाचार्य त्यांचे शिष्य रामानंद व बंगालमधील श्री चैतन्य प्रभु यांनीशतावधी बाटलेल्या हिंदुंना वैष्णव धर्माची दीक्षा देऊन पुन: शुध्द करुन घेतले.
१८. सन १२०८ पासून चुकुक नावाच्या राजाची राजवट आसामवर चालु झाली. त्यांनी मोगलांना अत्यंत यशस्वी तोंड दिले. या टोळ्यांमधील अत्यंत लढाऊ जात म्हणजे अहोम. आसाममध्ये ज्या काही अहोम, शान इत्यादी टोळ्या होत्या त्यांनी हिंदुंच्या अत्यंत पडत्या काळात म्हणजे सन १५५४ मध्ये हिंदुधर्माचा स्वीकार केला. ज्या राजाने प्रथम हिंदु धर्म स्वीकाराला त्याने क्षत्रिय वर्णातील सिंह हि उपाधी लावुन जयध्वजसिंग हे नाव धारण केले. यांनी व अन्य आदीवासी टोळ्यांनी आसाममध्ये हिंदु धर्मासाठी खूप मोलाची कामगिरी केली आहे.
१९.शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर, निंबाळकर यांना शुध्द करुन घेतले हे तर प्रख्यात आहेच. त्याव्यतिरिक्त सक्तीने बाटवल्या गेलेल्या बाजीप्रभु देशपांडे यांच्या मुलालाही हिंदु करुन घेतले.
२०. शुद्धीकरणासाठी शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र यंत्रणाच उभी केली होती. गोव्यातील मिशनरी हिंदुंची सक्तीने बाटवाबाटवी करत त्यास महाराजांनी सज्जड दम दिला. ते ऐकेनात तेव्हा गोव्यावर स्वारी केली व चार पाद्री लोकांची मुंडकी धडावेगळी केली. भिवंडीतल्या काही मशिदी सुध्दा धान्याचे कोठार म्हणून वापर्ण्यास सुरुवात केली. दक्षिण दिग्विजयात हिंदुंच्य मंदिरांच्या मशिदीत रुपांतरण झाले होते त्यांची परत मंडिरे केली गेली.
२१. संभाजी महाराजांनी रंगनाथ कुळकर्णी नावाच्या एका गृहस्थाला शुध्द करुन घेतले होते.
२२. संभाजी महाराजांच्याच समकालिन , मराठ्यांवर चालुन येण्या आधी औरंगजेबाने राजपुतांचा समुळ नाश करण्यासाठी आक्रमण केले. जोधपुर संस्थानाचा वीर सेनापती दुर्गादास राठोड याने सर्व मशिदी पाडून त्या ठिकाणी परत मंदीरे उभारली. औरंगजेबाने नव्यानेच बाटवलेल्या हिंदुंनाच काय पण शक्य तितक्या मूळच्या मुसलमानांनाही दुर्गादस ने शुध्द करुन हिंदु करुन घेतले. मुस्लिम स्त्रियांना शुध्द करुन एकतर त्यांची लग्ने राजपुतांशी लावली किंवा मुसलमान जसे करत तसे गुलाम केल्या गेल्या. मुसलमान जसजसे देवळातुन गायी कापत जात त्या प्रत्युत्तर म्हणुन दुर्गादास मशिदीमशिदीतून डुकरे कापत जात असे. त्याचे ते रौद्र स्वरुप पाहुन मुसलमान समाज तर गर्भगळित झालाच, हिंदु समाजात पण जागृती होऊन रोटीबंदीचा विधिनिषेध कोणी बाळगु लागेनासा झाला. सहवासाने वा खाण्यापिण्याने आपला धर्म बुडतो हि मानसिकता दुर्गादासच्या काळात नष्ट होऊन गेली.सुमारे तीस ते चाळीस वर्षे दुर्गादास राठोडांचा कार्यकाळ होता. मात्र दुर्गादास च्या पश्चात हे सर्व धार्मिक क्रांती परत ओसरुन हिंदु समाज मुळ पदावर आला हे सांगणे नकोच.
२३. तंजावरच्या भोसल्यांनी राज्यकाअरभारात आणि प्रदेशात बराच गोंधळ माजु लागला तेव्हा एक वटहुकुम काढुन सर्व धर्मांतरीतांना परत हिंदु होण्यास फर्मावले.
२४. पेशव्यांच्या काळातही शुध्दी होत असे, मात्र अति चिकित्सा असे. पेसवाईच्याच काळात निर्मळ क्षेत्रातल्या ब्राह्मणांनी टवलेल्या अनेक लोकांस शुध्द करुन घेतले. शुध्दीकरणाच्या खर्चासाठी मराठ्यांनी एक करच बसवला होता असे वसईचे डॉ. कुन्हा म्हणतात.
२५. विष्णुबुवा ब्रह्मचारी(१८२५-१८७१):- ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या हिंदु धर्मावरील आक्रमणाला प्रारंभी पायबंद घालणारे हे स्वतंत्र विचाराचे हिंदु मिशनरी होत. पूर्ण नाव विष्णु भिकाजी गोखले मूळ्चे ठाणे येथील राजापुर तालुक्यातील शिखली गावाचे.काही काळ नोकरी व अन्य व्यवसाय केल्यानंतर उपरती होऊन ते सप्तशृंगीच्या डोंगरावर तप:श्चर्या करण्यास गेले असता त्यांना पाखंड मताचे खंडन करुन वैदिक धर्माचा प्रसार करण्याचा आदेश मिळाला. तेव्हापासून त्यांनी व्याख्यानांचा दौरा काढला व मुंबईस आले. मुंबस ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आक्षेपांना आपल्या व्याख्यानांतून सडेतोड उत्तरे देत असत.प्रथम बंदिस्त जागेत व्याख्याने देत पुढे लोकांची गर्दी वाढु लागली असता जागा अपुरी पडून समुद्रकिनार्‍यावर व्याख्याने होऊ लागली.१८५७ च्या स्वातंत्र्य समत्राच्या कालावधीत ब्रिटिश सरकारने यांना भाषणे देण्यास बंदी घातली असता त्यांनी "वेदोक्त धर्मप्रकाश" हा ग्रंथ लिहून आपले म्हणणे सर्वांपुढे मांडले.रोटीबंदीला ते मुळीच जुमानत नसत. १८५६ मधे "भावार्थसिंधु" हा ओवीबद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला. भगवद्‌गीतेवरील सेतुबंधनी टीकेचा अठरावा अध्याय लिहिणे चालू असताच ते मरण पावले.आपल्या मतचा प्रसारार्थ त्यांनी मद्रास, कलकत्ता या भागांतही प्रवास केला होता.
२६ . पाचलेगांवकर महाराज हे हैदराबाद च्या जुलमी निजामशाही विरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढलेले गुरू होत. यांचा जन्म ८/११/१९१२ या दिवशी पाचलेगावी ता. जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्यात झाला. श्री राजारामपंत कुळकर्णी आणि सौ. कृष्णाबाई उर्फ भागाबाई असे त्यांच्या पालकांचे नाव होते. त्यांचे नृसिंह असे नामकरण झाले. श्री नृसिंह स्वरस्वती हे त्यांचे गुरू होत. त्यांच्या कार्यास बोरी या मराठवाड्यातील गावी जाऊन गाडगेबाबा, दासगणू महाराज आणि जगतगुरु शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांनी पाठिंबा दिला होता. पाचलेगांवकर महाराज जातीभेदाच्या विरोधात प्रवचने देत. व्यायाम, शक्ती आणि एकजूट यावर त्यांचा भर असे. निजामाच्या विरुद्ध प्रचार केल्याने त्यांना इ.स.१९२८ मध्ये हद्दपार करण्यात आले.
कार्याची त्रिसूत्री
१.देशाच्या स्वातंत्र्यासाठी व उन्नतीसाठी अन्याय प्रतिकार नि न्याय रक्षक अशी कर्तृत्वशाली जनशक्ती जाग्रत करणे.
२.एका कार्यक्षम बलवान जनशक्तीला योग्य वळण देणे.
३.अराष्ट्रीय वृत्तीने भरलेल्या लोकांचे संख्याबळ शुद्धीच्या द्वारे घटवून संभाव्य संकटाच्या खाईतून देशाला वाचविणे.
कार्य विस्तार
हे कार्य करण्यासाठी त्यांनी मुक्तेश्वर दलाची स्थापना केली. हे दल पुढे बाबाराव सावरकर यांनी स्थापन केलेल्या तरुण हिंदुसभा या संस्थेबरोबर एकत्रित कार्य करु लागले. त्यांनी सावरकरांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनीही त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. महाराज भुमीगत झाले व त्यांनी भारत भ्रमण केले.
धर्मांतरास विरोध
महाराजांनी हिंदूंच्या ख्रिस्ती व मुस्लीम धर्मांतरास कडडून विरोध केला. मिरज येथे त्यासाठी जनजागृती केली. हिंदु महासभेच्या शाखा त्यासाठी स्थापन केल्या. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथे हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. जातीभेद विरहित सहभोजने, हिंदू संघटन आणि शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक यावर भर दिला जाई. ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना परत हिंदू करून घेतले. खांडवा व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून ख्रिस्ती प्रसाराची लाट थोपवली. तेथेही अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः याच काळात कडवा मिशनरी फॉनवेल हा महाराजांचे कार्य पाहून चकित झाला. हिंदू तत्वज्ञान त्याने समजून घेतले. व तो ही हिंदू होण्यास उत्सुक झाला. यास सहकुटुंब शुद्ध करून घेतले. एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले गेले. बऱ्हाणपूर येथे मुस्लीम पंथीयांनी बाटवलेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संगठन यज्ञ घेतला. यासाठी एक लाखाहून अधीक लोक उपस्थित होते. यावेळी १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले गेले. सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश त्यासाठी आले होते. तत्कालिन शिक्षण मंत्री (मध्य प्रदेश) श्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला होता.
क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या आग्रहावरुन व चर्चा विनंतीवरुन पाचलेगावकर महाराजांनी आपल मुक्तेश्वर दल राष्ट्रिय स्वयंसेवक संघात विलिन केल आणि संघ शक्ती वाढवण्यास मोलाचा हातभार लावला.

२७. मसुरकर महाराज
धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्त्रोत होते. मसुरकर महाराजांनी 'मसुराश्रम' या आश्रमाची स्थापना १९२० साली गोरेगाव पूर्व, मुंबई येथे केली. त्यांनी समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बलवान स्वातंत्र्य सैनिक तयार करण्यासाठी सूर्यनमस्काराची उपासना व दासबोधाचे वाचन ही मसूरकर महाराजांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली मोहीम होती. मसुरकर महाराज यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू सन १९३१ साली कराड येथील मसुराश्रमाच्या शिबिरात आले होते. रत्नागिरी येथे १९३१ साली पतितपावन मंदिराची स्थापना झाली. त्या वेळी स्वामी मसुरकरमहाराजांची व संतश्रेष्ठ गाडगेमहाराजांची भेट झाली.
धर्मांतरास विरोध
मसुराश्रम येथे गुजरात व गोवा येथील ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य केले व करत आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार व बलोपासनेचाही त्यांनी पुरस्कार केला. शुध्दी चळवळीला एक दिशा देण्याचे काम केलेले मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथजी, वामनमूर्ती व इतर अनेकांनी केले. युखॅरिस्ट काँग्रेस, वादग्रस्त फादर फेरार प्रकरण, केरळमधील नन्सच्या विक्रीचे स्कँडल, भिवंडीची व जळगावची दंगल, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेले भारताचे विभाजन प्रयत्न, आंध्रच्या किनारपट्टीवर मिशनऱ्यांनी ‘ख्रिस्तस्थान’ तयार करण्याची केलेली रचना या विरोधात आश्रमाने कार्य केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस घेऊन येणारा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी त्यांनी जनजागृती केली. स्वागतयात्रा, शोभायात्रा आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. या मध्ये पारंपरिक ध्वजपथक, लेझीम, मानवी मनोरे, तलवारबाजी, मंगळागौर असे देखावे उभारण्यात मसुराश्रम अग्रणी आहे. तसेच मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन (गोरेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही येथे केले गेले आहे. पांडुरंगवाडीत रसिकांसाठी "दीपावली स्वरप्रभात", "पहाटराग मैफल' आयोजित केली जाते. यात शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात. मंगला पाध्येंचे शास्त्रीय गायन यात झाले आहे. तसेच डॉ. भालचंद्र फडणवीस यांचे संतुरवादन सादर झाले आहे. येथे 'हिंदु युवा संघटन मेळावा' आयोजित केला जातो. संस्कार भारती-गोरेगाव आणि मसुराश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यानेही आयोजित केली जातात.
पुस्तके
होय आम्ही हिंदू झालो मनोरमा प्रकाशन



No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...