Sunday, February 19, 2017

----मराठा/ मराठी/महाराष्ट्रियन समाजाकडे ब्रिटीश कसे पहात होते?----

मायकेल ओडवायर हा पंजाबचा गव्हर्नर, याच्याच काळात जालियनवाला बाग घटना घडली, व त्या घटनेचा सूड उधमसिंग या क्रांतीकारकाने लंडनला जाऊन ओडवायचा वध करुन घेतल. या ओडवायरने हिंदुस्थानाविषयी आपल्या एका इतिहासवजा पुस्तकात काही निरिक्षण नोंदवली आहेत, त्यात तो म्हणतो,

"....या लोकांपैकी अत्यंत शक्तीमान असे मराठे लोक आहेत, त्यांनी मोगलांच्या साम्राज्याला नवव्या भागात सांगितल्याप्रमाणे चांगलाच हादरा देऊन ते साम्राज्य हस्तगत करण्याचा धाडसी प्रयत्न केला. हे मराठे लोक मुंबई इलाख्यात रहातात. त्या इलाख्यातील कोल्हापुर राज्यावर आजही त्या थोर शिवाजीचा वंशज कोल्हापुरचा महाराजा, राज्य करीत आहे. याशिवाय पश्चिम आणि मध्य भारतामध्ये शिंदीया, होळकर, गायकवाड या मराठी राजांचीही राज्ये आहेत, आणि ही ब्रिटीशांची मांडलिक आहेत. ह्या मराठ्यांच्या जातीची लोकसंख्या चाळिस ते पन्नास लाख आहे. पण हिंदुस्थानच्या अथांग जनसागरात ही जमात म्हणजे शिखांप्रमाणे एक अल्पसंख्य जमात ठरते. हे मराठे लोकही शिखांप्रमाणेच अत्यंत शूर आ्णि लढाऊ आहेत. जर कधीकाळी आमच्या सत्तेला (चळवळीमुळे) हादरा बसला आणि ती खिळखिळि झाली तर हे मराठे राजे त्याचा फायदा घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. पण जसा एका शतकापूर्वी हा मराठा संघ (मराठा कॉन्फिडरसी) यशस्वी झाला तसा या काळी यशस्वी होणे सक्य नाही. कारण त्यांचे नेतृत्व करण्यास आता पुण्याचा ब्राह्मण पेशवा अस्तित्वात नाही."

मराठी ब्राह्मण आणि अन्य मराठी समाज यात फुट पाडण्याचा ब्रिटीशांचा मनसुबा होता. मराठी ब्राह्मण समाज ब्रिटीशांना सलत होता आणि तिला अनुसरुन ब्राह्मणेतर चळवळीला खतपाणी घालुन फोडा आणि झोडा नीतीने महाराष्ट्रातही ब्राह्मणांविषयी वातावरण कलुषित केले गेले यात शंका नाही.

हाच ओडवायर आपल्या याच पुस्तकात अन्यत्र म्हणतो,"....या चळवळीचा शेवट कसा होईल सांगणे अवघड आहे. हिंदु बुध्दीमान वर्गात फक्त मराठा ब्राह्मण हीच एक जात अशी आहे, की तिच्यामागे २०० वर्षांची स्वराज्याची अव्याहत परंपरा आहे. यामुळे याच वर्गाची त्याच्या या दीर्घ अनुभवामुळे स्वराज्याची मागणी शोभुन दिसते....महाराष्ट्र ब्राह्मण मग ते नरम दलाचे गोखले असोत किंवा गरम दलाचे टिळक असोत. ते आज अव्याहत ३० वर्षेपोवेतो अवघ्या हिंदुस्थानात राजकिय चळवळीचे नेतृत्व करत आहेत, याचे कारण त्यांची ही ऐतिहासिक परंपरा आहे...."

मराठी ब्राह्मणांची हि चळवळ मोदुन काढण्याचा आणि ब्राह्मणांविरुध्द इतर समाजाला चार खऱ्या खोट्या गोष्टी सांगून बाजूला करण्याचा ब्रिटीशांचा व त्यांच्या हस्तकांचा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणण्यास बराच वाव आहे.

असे असले तरी ब्राह्मण वर्ग नेतृत्वासाटी अडुन बसला नाही. तो सातत्याने स्वातंत्र्याच्या चळवळीत कार्यरत राहिला. असे अनेक पुरावे आणि उदाहरणे आहेत. शनिवारच्या लोकसत्ता (१८ फेब्रुवारी २०१७) मध्ये श्री. प्रकाश बाळ यांचाही एका पुस्तकाच परिक्षण करणारा लेख आला आहे. त्यातील एका उताऱ्यात नरहरी गोविंद गणपुले व तळवळकर या दोन मराठी ब्राह्मणांचे जर्मनीतील कार्यासंदर्भात अल्पसा प्रकाश टाकला आहे. या दोघांनी सन १९२२ नंतरच्या काळात जर्मनीत हिंदुस्थान हाऊस ची स्थापना करुन स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे कार्य सुरु केले होते. हा मजकुर ब्राह्मण वर्ग स्वातंत्र्यासाठी कसा सतत संघर्ष मग्न होता त्याचे हे एक उदाहरण आहे.

ब्राह्मण वर्ग आज काहीसा स्वसंतुष्ट आणि आपण बरे आणि आपले काम बरे अशा प्रवृत्तीत गेला आहे किंवा जाणीवपुर्वक घालवला गेला आहे. सर्वच समाजाने या गोष्टीच गंभीरपणे विचार करायला हवा. कोणत्याही प्रकारे अकारण द्वेष एकमेकांत बाळगला नाही तर ते संपुर्ण समाजाच्या प्रगतीला हितकारक ठरेल.

© चंद्रशेखर साने

Image may contain: text

"....या लोकांपैकी अत्यंत शक्तीमान असे मराठे लोक आहेत, त्यांनी मोगलांच्या साम्राज्याला ननव्या भागात सांगितल्याप्रमाणे चांगलाच हादरा देऊन ते साम्राज्य हस्तगत करण्याचा धाडसी प्रयत्न केला. हे मराठे लोक मुंबई इलाख्यात रहातात. त्या इलाख्यातील कोल्हापुर राज्यावर आजही त्या थोर शिवाजीचा वंशज कोल्हापुरचा महाराजा, राज्य करीत आहे. याशिवाय पश्चिम आणि मध्य भारतामध्ये शिंदीया, होळकर, गायकवाड या मराठी रजांचीही राज्ये आहेत, आणि ही ब्रिटीशांची मांडलिक आहेत. ह्या मराठ्यांच्या जातीची लोकसंख्या चाळिस ते पन्नास लाख आहे. पण हिंदुस्थानच्या अथांग जनसागरात ही जमात म्हणजे शिखांप्रमाणे एक अल्पसंख्य जमात ठरते. हे मराठे लोकही शिखांप्रमाणेच अत्यंत शूर आ्णि लढाऊ आहेत. जर कधीकाळी आमच्या सत्तेला (चळवळीमुळे) हादरा बसला आणि ती खिळखिळि झाली तर हे मराठे राजे त्याचा फायदा घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. पण जसा एका शतकापूर्वी हा मराठा संघ (मराठा कॉन्फिडरसी) यशस्वी झाला तसा या काळी यशस्वी होणे सक्य नाही. कारण त्यांचे नेतृत्व करण्यास आता पुण्याचा ब्राह्मण पेशवा अस्तित्वात नाही."



Image may contain: text


No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...