Skip to main content

Posts

Showing posts with the label Bose

Savarkar, Rashbehari and Subhashchandra Bose

गुप्त क्रांतीकारी चळवळींनंतर उघड लोकशाहीचे राजकारण करतानाही सावरकरांनी खुलेआम ब्रिटीश विरोध केला. लोकशाही आंदोलनात भाषणे, लेख आणि लोकचळवळी ऊभाराव्या लागत्तात. वर लिहिल्या प्रमाणे महायुद्ध काळात आणि फारशी मोठी कार्यकर्त्यांची संख्या नसल्याने सावरकरांना "चळवळ" अशी उभारता आली नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी ब्रिटीशांना विरोध केला नाही. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून हिंदु पक्षाचे धोरण त्यांनी ठरवले. सप्टेंबर १९३८ च्या "हिंदुस्थान नि झेकोस्लोव्हाकीया" या विषयावरील भाषणात ते म्हणाले," ....आज जपान प्रबळ आहे.आता तो चीनमधे त्याचे राज्य वाढवतो आहे. अशा परिस्थितीत चीन चांगला की जपान चांगला हे ठरवताना आपल्या देशाचा हिताचा कोण हाच मुख्य कस लावला पाहिजे. आमच्या स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा शत्रू बनून जर जपान आपणाला सहाय्य करणार असेल तर आपण त्याच्याशी मैत्री करणेच राष्ट्र हिताचे ठरेल."हिंदुंनी कोणत्या अटिंवर ब्रिटीश सैंन्यात भरती व्हावे याविषयी सावरकर म्हणतात, १. भावी संघराज्यात सर्व भारतीय सैनिकांवर फक्त भारतीय अधिकार्यांचाच अधिकार चालावा. २ . भारतीय सैन्याला सर्व स...