काही दिवसांपूर्वी आजचा सवाल मध्ये प्रश्न होता प्रश्न होता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर होतो आहे का? आणि चर्चा मात्र केली गेली शिवाजी हिंदुत्ववादी होते का धर्मनिरपेक्ष... निमित्त होते एका नविन नाटकाचे ! वास्तविक पाहता राजकिय हिंदूत्ववाद काय किंवा धर्मनिरपेक्षता / सर्वधर्मसमभाव या संकल्पनाची मांडणी १९-२० व्या शतकातल्या आहेत. मुळात यांच्या डोक्यात जो गोंधळ आहे त्यातून असला चुकीचा प्रश्न निर्माण केला गेला आहे. धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्ववाद या दोन भिन्न गोष्टी आहेत हाच मुळात एक गैरसमज आहे. ज्यावर आरोप करायला हवा तो कदाचित हिंदुधर्मवादावर करत येईल पण प्रत्यक्षात बदनाम केले जाते ते हिंदुराष्ट्रवादाला! हिंदुधर्मवाद किंवा हिंदू जमातवाद म्हणजे हिंदूराष्ट्रवाद नाहि, त्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. राजकिय हिंदुत्ववादाला पार्श्वभूमि होती पारतंत्र्याची, फाळणीच्या संकटाची आणि इस्लाम स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानतो त्याची. जर मुसलमान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानत असतील तर या देशात अन्य कोणी "राष्ट्र" या संकल्पनेला पात्र आहे का याचा शोध घेताना या देशात "हिंदू" हेच स्...