Friday, May 24, 2013

शिवाजी हिंदुत्ववादी का धर्मनिरपेक्ष?

काही दिवसांपूर्वी आजचा सवाल मध्ये प्रश्न होता प्रश्न होता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर होतो आहे का?
आणि चर्चा मात्र केली गेली शिवाजी हिंदुत्ववादी होते का धर्मनिरपेक्ष... निमित्त होते एका नविन नाटकाचे !

वास्तविक पाहता राजकिय हिंदूत्ववाद काय किंवा धर्मनिरपेक्षता / सर्वधर्मसमभाव या संकल्पनाची मांडणी १९-२० व्या शतकातल्या आहेत. मुळात यांच्या डोक्यात जो गोंधळ आहे त्यातून असला चुकीचा प्रश्न निर्माण केला गेला आहे. धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्ववाद या दोन भिन्न गोष्टी आहेत हाच मुळात एक गैरसमज आहे. ज्यावर आरोप करायला हवा तो कदाचित हिंदुधर्मवादावर करत येईल पण प्रत्यक्षात बदनाम केले जाते ते हिंदुराष्ट्रवादाला! हिंदुधर्मवाद किंवा हिंदू जमातवाद म्हणजे हिंदूराष्ट्रवाद नाहि, त्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. राजकिय हिंदुत्ववादाला पार्श्वभूमि होती पारतंत्र्याची, फाळणीच्या संकटाची आणि इस्लाम स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानतो त्याची. जर मुसलमान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानत असतील तर या देशात अन्य कोणी "राष्ट्र" या संकल्पनेला पात्र आहे का याचा शोध घेताना या देशात "हिंदू" हेच स्वयंमेव एकराष्ट्र आहेत असा सिद्धांत सावरकरांनी मांडला. २० % मुसलमान समाज आणि हिंदूंमधील ५-१० % ब्राह्मण ,२ % शीख ,८ % अमुक ५ % तमुक अशी जर विभागणी झाली तर मुसलमान या लोकशाहीत बहुसंख्य ठरतील आणि त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील हे जाणूनसुद्धा फाटाफूटीने त्रस्त झालेल्या, एकराष्ट्र असलेल्या पण एकजिनसी नसलेल्या, हिंदू समाजाची एकजूट घडवणे आवश्यक होते.

तेव्हा हिंदुत्ववादाला धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध मांडून त्याची तुलना मुस्लीम जमातवादाशी करणे हा सर्व तथाकथित पुरोगाम्यांचा १०० वर्षांपासूनचा खेळ चालला आहे.हिंदुत्ववादाचा दुसरा अर्थ धर्मनिरपेक्षतेला विरोध नसून विकृत धर्मनिरपेक्षतेला विरोध असा आहे.

आजच्या संकल्पनांच्या चष्म्यातून पहायचेच ठरवले तर ऐतिहासिक वास्तव असे आहे कि शिवाजी धर्मनिरपेक्ष होते पण विकृत धर्मनिरपेक्ष नव्हते. त्यांच्या सैन्यात मुसलमान होते म्हणून ते धर्मनिरपेक्ष होते अशी उथळ मांडणी करणे हे औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते म्हणून औरंगजेब हिंदुत्ववादी होता अशी उथळ मांडणी करण्यासारखेच आहे.

शिवाजी महाराज खरे धर्मनिरपेक्ष होते म्हणून त्यांनी कुराणाचा सन्मान केला, त्याचबरोबर मुसलमानांना मुसलमान म्हणून सैन्यात प्रवेश नाकारणे असे कधी केले नाही. त्यांच्या सैन्यात मुसलमान नोकरीला होते. पण ते मुसलमान होते त्यांची मते मिळवायची होती म्हणून त्यांनी त्यांचा समावेश करुन घेतला नव्हता. तर आरमार त्यावेळी मुख्यत: मुसलमानांच्या हाती होते म्हणून त्यांना त्यांनी चाकरीत घेतले ,लढणे हा अशा लोकांचा व्यवसाय होता व ते विविध राजांच्या पदरी असत. दोन्ही धर्मांतील लोकांनी स्वराज्याशी एकनिष्ठा बाळगली आणि काहिंनी स्वराज्य द्रोह सुद्धा केला. स्वराज्य द्रोह करणार्‍या हिंदूंमध्ये अनेक अब्राह्मण सुद्धा होते, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते, फार काय पण ज्यांना महाराजांनी शुद्ध करुन घेतले ते त्यांचे व्याही निंबाळकर आणि ज्यास शुद्ध करुन घेतले ते त्यांचे जामात हे दोघेही शुद्धीकरणानंतरच्या काळात पैशाच्या लोभाने शिवाजी महाराजांवर उलटले आणि स्वराज्यद्रोही झाले. नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी शुद्ध करुन घेतले पण परत सैन्यात घेतले नाही. खरा जाणता राजा.

मशिदी व कुराण यांचा सन्मान करणार्‍या शिवाजी महाराजांनी मतांची लाचारी होती म्हणून कधी वेळ पडल्यास मशिदींची गय केली नाही आणि हिंदूंची मंदिरे आपली सत्ता प्रस्थापित होताच पुन: जीर्णोद्धर करण्यास मागेपुढे पाहिले नाही. सक्तीची धर्मांतरे केली म्हणून ४ पाद्रि मिशनर्‍यांची डोकी धडावेगळी करताना शिवाजी महाराजांच्या खर्‍या खुर्‍या धर्मनिरपेक्षतेच्या आड आले नाही. अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री संपूर्णपणे शुद्धीकरणाची बाजू संभाळण्यासाठी होते ,त्यात शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्षता आड आली नाही. मुसलमानी शब्दांचा मराठी भाषेत भरणा दूर करण्यासाठी राज्यव्यवहार कोश निर्माण करुन भाषाशुद्धीला प्राधान्य देताना "तत्कालिन पुरोगामी" (?) लोकांची काय बिशाद होती शिवाजी महाराजांना नावे ठेवण्याची?

शिवाजी महारजांच्या सैन्यात मुसलमान होते , बाबा याकुत सारख्या मुसलमान संतावरही त्यांनी भक्तीभाव बाळगला आणि कोणाही ब्राह्मण इतिहासकाराने हि गोष्ट लपवून ठेवलेली नाही. शिवाजी महाराज श्रद्धाळू होते पण अंधश्रद्ध नव्हते. प्राचीन देवल स्मृतीचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आणि शुद्धीकार्य सुरु केले ते कार्य पुढे अगदी पेशव्यांच्या काळातही चालु होते.पेशव्यांच्या काळात सुद्धा मशिदींना इनामे दिली जात असत. हिंदुत्ववाद हा हिंदुधर्मवाद नाही तर हिंदुराष्ट्रवाद आहे त्यामुळे हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता यात अद्वैत आहे. हिंदुत्ववादाची संकल्पनाच मुलत: विकृत धर्मनिरपेक्षतेचा प्रखर विरोध करण्यासाठी संस्थापित झालेली आहे.हिंदुत्वचाद हा हिंदु जमातवाद नाही...

शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता....

१.
" Sewajee and Portuguese dailly quarrel; the chiefest cause of his hatred to them being for forcing orphans of his cast to turn Roman catholicks. There has also of late happened same disputes among them in the same account. The captain General of Busseen taking the part of same orphans against the Jesuits and forcing the said Jesuits to restore the said orphans to a considerable estate, which they had been possessed of many years which they highly resented." ( English Records vol. II P. 74)

२.
" Sewajee deeply resenting this regiour invaded the pre­cincts of Bardese not farre distant from Goa and there cutt cff heads of four padrees that refused to turn Moreitoes (Marrathas-Hindu) of his own persuasion, they having councelled the destruction of all that were not opinionated as themselves, which terrifyed the Vice Roy that he was forced ;to revoke his fierce and severe edict. He (Shivaji) burnt and destroyed all the country and carried away 150 Lack of pagodaes."
- (English Records, vol  I. No. 138, P. 119)

3.शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणे आणि मूळ मंदिरे असलेल्या पण नंतर मधिदी वा चर्च मध्ये रुपांतरण झालेल्या वास्तुंचे रुपांतर पुन: हिंदू मंदिरांमध्ये केल्याची पंचवीस - तीस तरी उदाहरणे आहेत तशा ऐतिहासिक नोंदी-शिलालेख इ. आहेत. इतकेच काय पण संभाजी महाराजांनी शुद्धीचे धोरण चालु ठेवले याची सुद्धा इतिहासात नोंद आहे. गंगाधर रंगनाथ कुळकरणी यास संभाजीमहाराजांनी पुढाकार घेऊन आणि ब्राह्मण शास्त्रींशी चर्चा करुन, शास्त्रानुसार कुळकरणीस प्रायश्चित देऊन पंक्तीपावन करुन घेतले व त्यास शुद्धीपत्र देवविले. संदर्भ : सावरकर स्मृती साहसदिन स्मरणिका - ले. पांडुरंग बलकवडे (शके चैत्र शुद्ध २- राजवाडे खंड  ८ ,लेख ४०)

४. संभाजी राजे जे संस्कृत पंडीत होते व त्यांचा बुधभूषण हा ग्रंथ बहुत्कांना माहित असे. शिवाजी राजांना गोब्राह्मण प्रतिपालक अशी म्हणण्याचे मागे मागे गेले असता मूळ इथे सापडते.

धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या बुधभूषण ग्रंथाच्या दहाव्या श्लोकात शिवरायांनी गायी व ब्राम्हणांचे रक्षण केले असे म्हटले आहे.

"येन क्षितितले कलावविकलं बुद्धावतारं गते
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छै: समादिते
भूयस्तत्परिपालनाय सकलज्वित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात्‌ //१०//"
.
अर्थ:- पृथ्वीवर हाहा:कार माजला असता बुद्धावतार झाला.तद्वत छ्त्रपती शिवरायांनी म्लेंच्छांनी सर्व वर्णांची पायमल्ली केली असता गायी व ब्राह्मणादि वर्णाचे देवद्वेष्ट्याकडून रक्षण करून रूढ धर्माचा मार्ग दाखवला. (विप्र म्हणजे ब्राह्मण)

शिवाजी महाराजांचे हिंदुत्व ....

१.
 He attacked the caravans which came from distant parts, and appropriated to himself the goods and women. But he made it a rule that whenever his followers went plundering, they should do no harm to mosques, the book of God or any one's women, Whenever a copy of the holy Koran cime into his hands, he treated it with respect and gave it to some one ,of his Mahomedan followers. When the women of any Hindu or Mahomedan were made prisoners by his men, and they had no friend to protect them, lie watched over them till their relations came to buy their liberty "

Elliot and Dawson VII page 260 Kafikhan

२.
 " On comparing Shivaji with the Asiatic conquerors, it will be seen that the latter fully indulged in plunder, rapine, oppression, tyrannies, slavery, forcible conversions. All of these came to put the yoke of foreign rule on this country. They were not only slave making and fanatic Ghazies for converting Hindus into Muslims, but were the destroyers of liberty and autonomy of the Indian people. On the other hand, Shivaji stood forth as the patriotic champion of freedom and independence of his people. He proved himself their liberator from the centuries of foreign rule. There can be no comparison between a patriotic liberator of his mother-land and a destroyer of the liberties of men, between a slave-driver and a slave-liberator, between a fanatic Ghazi and an ardent and respectful admirer of all religions. Comparisons are said to be odious, but the study of history will be fruitess, if readers are not to have a comparative insight into the deeds of great men.
— [Shivaji the great Vol. 2, Part 2, Page 22.)

३.
" Neotagy (Netaji Palkar) offered no insult to the women, for their sex was venerated in Hindustan and they observed that customs better than the Europeans. These soldiers had special reason for this, as it was the order of Sevagy who, while he lived, was both obeyed and loved. And if anybody ever violated any of his orders, the punish­ment was such that there was no second instance ( of the offence ).

-Foreign Biographies on Shivaji

आयुष्यभर शिव इतिहासाचा व्यासंग करणारे शिवचरित्रकार प्रा. गजानन मेहेंदळे यांचे समकालिन पुराव्यांसह केलेले भाषण

https://www.youtube.com/watch?v=5CDMcBZNNd4


No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...