Saturday, April 2, 2016

सावरकर: अंदमानपुर्वीचे व अंदमाननंतर


सावरकरांना अंदमानातच जिहादाचे खरे रुप समजून आले. अंदमानात त्यांना मुस्लीम अधिकाऱ्यांच्या जिहादि वृत्तीचा अर्थ कळला. अंदमानतच सावरकरांनी कुराणाचा अभ्यास केला. केवळ इंग्लिश भाषांतरावर विसंबुन न राहता , इतरही पुस्तके अभ्यासली. तसेच एका मुस्लीम कैद्याकडून सश्रद्ध मनाने गेय स्वरुपातले, आवाजातील चढ उतार असलेले मूळ अरबी कुराणही ऐकले. अभिनव भारतात मुस्लीम सदस्य होतेच त्यांच्यातील काहिंशी सावरकरांची खूप मैत्री जमली होती असे सेनापती बापट यांनी नमूद केले आहे. मदनलाल धिंग्रा मात्र "इन लोगोंपर ज्यादा भरोसा मत करो" असे सावरकरांना म्हणत असत. सावरकरांची इस्लाम विषयी सर्व मते नंतर बदलली. हिंदुमहासभेत मुस्लीमांना घेऊ नये यावर ते ठाम होते. हिंदुमहासभा फुटुन जनसंघाची स्थापना याचे मुख्य कारण श्यामाप्रसाद मुखर्जी व संघाला सत्तेत यायचे असेल तर मुसलमानांची मते मिळाल्याशिवाय ते शक्य नाही असे वाटत होते, सावरकरांना सत्तेच्या राजकारणासाठी जनसंघ स्थापन झाला तेव्हा तो हिंदुहित पहाणारा पक्ष न उरता त्याची दुसरी कॉंग्रेसच होईल अशी भीती वाटत होती. सत्ताकारण करणाऱ्याला या ना त्या स्वरुपात मुस्लीम लोकानुनय करावा लागतो. सावरकरांना निर्भेळ हिंदुहित जपणारा पक्ष अस्तित्वात हवा होता, ज्याचे आज अस्तित्व उरलेले नाही.

१८५७ चे समर हे हिंदुंसाठी स्वातंत्र्य युद्ध तर मुसलमानांसाठी जिहादच होता. या संघर्षाचे हे दोन पैलु आहेत.

या ग्रंथाने सावरकरांना फार मोठी प्रसिद्धी व स्वातंत्र्याची प्रेरक शक्ती म्हणून स्थान मिळाले. या पुस्तकाचे योगदान फार मोठे आहे. आम्हाला १९३७ चे सावरकर नकोत १९०८ चे हवेत असे म्हणणाऱ्यांना सावरकरांची १८५७ संबंधातली मुसलमानांसंबंधी घेतलेलि भूमिका परत घ्यावी असे वाटत होते, पण सावरकरांना स्वत:ची चूकिची भूमिका समजली होती. त्यांनी यानंतर एका भाषणात गोंधळ घालणाऱ्या समाजवादी/साम्यवादी तरुणांना उद्देशून १९०८ चे सावरकर पटायला ३० वर्षे लागली तसे १९३८ चे हिंदुत्ववादी सावरकर समजायला अजून ५० वर्षे असे उद्‌गार काढले. तथापि ज्यांना आज १९०८ चे सावरकर पटत आहेत त्यांनी तसे कार्य करण्यासाठी हात वर करावेत असे आवाहन केल्यावर मात्र सर्व अतिउत्साही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची दातखीळ बसली व आमची कोणाचीही हात वर करायची हिंमत झाली नाही, असे तेथे उपस्थित असलेल्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...