Wednesday, February 15, 2017

लाला हरदयाळ व गदर पार्टी


लंडनमध्ये अभिनव भारताने काम केले तसे लाला हरदयाळ यांनी १९१५ च्या सुमारास स्थापन केलेल्या गदर पार्टीने भारतीय स्वातंत्र्य लढयात मोलाचा सहभाग घेतला.

लाला हरदयाळ हे गदर पर्टीचे संस्थापक. सावरकरांप्रमाणेच तेही शामजी कृष्ण वर्मांच्या सहवासात आले व कट्टर राष्ट्रवादी बनले पुढे अमेरिकेत जाऊन त्यांनी गदर पार्टीची स्थापना केली व अमेरिकेत सुध्दा इंडिया हाऊस निर्माण केले.
गदर पार्टीनेच सावरकर कोलु फिरवत आहेत असे काल्पनिक चित्र काढुन अमेरिकेत वाटले होते आणि आवाहन केले कि आपले देशबंधु अंदमानात पिसत असताना तुम्ही देशासाठी काय करणार आहात?

अभिनव भारत प्रमाणेच गदर पार्टीच्या नेयांनी सैंन्यात बंड घडवुन आणण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरुन सिंगापुर येथील ब्रिटीश सैंन्याच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. सुमारे सातशे सैनिकांनी या उठावात भाग घेतला. बारा ब्रिटीश अधिकारी यात ठार झाले. मात्र शेवटी बंडखोरांचा बिमोड झाला. सत्तेचाळीस भारतीय सैनिकांना फाशी देण्यात आले.

गदर पार्टी लाला हरदयाळ यांनी स्थापन केली होती. याचे स्वरुप अभिनव भारत प्रमाणेच संपुर्ण निधर्मी आणि हिंदी राष्ट्रवादी होते. यात सर्व धर्मिय अणि प्रांतीय एकजुटीने लढ्गत होते. विशेष अभिमानाची गोष्ट डॉ. खानखोजे व विष्णु गणेश पिंगळे हे दोन महाराष्ट्र्यियन नेते गदर पार्टीचे अत्यंत महत्वाचे नेते होते.
विष्णु पिंगळे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या कडे अठरा बॉम्ब आणि अन्य स्फोटके होती, पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ब्रिटीश सैन्याची अर्धी रेजिमेंट नष्ट करण्या एवढी हि सामुग्री होती. पण दुर्दैवाने लाहोर मधला कट उघडकीस येऊन सर्व नेते पकडले गेले.राशबिहारी बोस निसटले व जपानला गेले.

पिंगळे व कर्तारसिंग यांच्यावर खटला चालुन १६ नोव्हेंबर १९१५ ला लहोर मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.

अभिनव भारत असो, वा गदर पार्टी सर्व जण एकमेकात जोडलेले होते, एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यात स्पर्धा असे ती सत्तेसाठी नव्हती तर फक्त स्वातंत्र्यासाठी जास्तीत जास्त कोण त्याग करतो याची. यात वेगवेगळ्या विचारसरणी चे लोक होते. चाफेकर , सावरकर, मदनलाल धिंग्रा, भाई परमानंद, राशबेहारी बोस, आशुतोष लाहिरी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते व जे फाशी गेले नाहीत ते हिंदुमहासभेत गेले. साम्यवादी होते, समाजवादी होते व कॉंग्रेसी सुध्दा होते. सर्वांचा झेंडा एकच होता. देशासाठी बलिदान. आपल्याला पुढच्या पिढीतले स्वातंत्र्यलढ्यात थोडाबहुत भाग घेणाऱ्या पण बदल्यात सत्तेची पुरेपुर फळे चाखणाऱ्या घराण्याचे वारसदार आणि हुजरे, तुम्ही देशासाठी काय त्याग केला असा उध्दट प्रश्न विचारतील अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल.

संकलन- चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...