Monday, February 20, 2017

कॉंग्रेसमुक्त भारतचा अर्थ


पंतप्रधान मोदी यांच्या कॉंग्रेसमुक्त भारत या अभियानाचा अर्थ काय असावा?

सर ऍलन ह्युम या ब्रिटीश अधिकाऱ्याला १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात बाईचा वेष करुन लपत छपत पळुन जाऊन जीव वाचवावा लागला होता. या सशस्त्र उद्रेकाचा त्याने चांगलाच धसका घेतला. भारतीयांनी परत असा उठाव केला तर ब्रिटीशांच साम्राज्य भारतावर रहाणार नाहीच आणि फार मोठी जिवितहानी पण होईल हे त्याच्या लक्षात आल.

भारतीयांचा उद्रेक जर साठत गेला तर एक दिवस स्फोट होऊन विनाश अटळ हे त्याने ओळखले व भारतीयांच्या असंतोषाला वाट मिळावी या उद्देशाने त्याने भारतीय र्कॉंग्रेसची स्थापना केली. तिचे वर्णन त्याने कुकरची वाफ जाण्यास जो सेफ्टी वॉल्व्ह असतो त्याप्रमाणे केले.

सुरुवातीला कॉंग्रेसचे स्वरुप सेफ्टी शिटी सारखेच होते. कॉंग्रेस मधला मवाळ वर्ग ब्रिटीशांचे राज्य म्हणजे ईश्वरी कृपा समजत असे. अर्थात याचा अर्थ हे मवाळ लोक ब्रिटीश राजनिष्ठ असले तरी त्यांचे देशावर व देशवासियंवर प्रेम नव्हते असे नाही आणि त्यांनी काहीच काम केले नाही असा मात्र नाही. न्यायमुर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सारख्या मवाळांनी भारताची बाजू चांगलीच लावुन धरली यात शंका नाही पण हे सारे मालक व नोकर किंवा कामगर यांच्यातल्या हक्कांच्या लढ्यासारखे होते. मीच मालक होणार असा मवाळांचा दावा नव्हता.

टिळकांचा जहाल पक्ष व सशस्त्र क्रांतीकारक यांना ब्रिटीश आपल्यावर राज्य करतात हेच नको होते.

टिळकांच्या पश्चात सन १९२० ला गांधींकडे देशाचे नेतृत्व चालुन आले. गांधी गोखले यांचेच शिष्य असल्याने मवाळ . पुर्वायुष्यात तर ते ब्रिटीश निष्ठ च होते.
गांधी कॉंग्रेसचेच सर्वैसर्वा झाल्यावर मवाळांचेच याचकाचे धोरण पुढे गेले आणि टिळक पक्षाचा कॉंग्रेसमधुन अस्त झाला.

गांधी आधीपासुन क्रांतीकारी पक्षाचे विरोधक होतेच. लंडनमधल्या इंडिया हाऊस व सावरकरांना भेटल्यावर त्यांनी लिहिले की मी तेथील ब्रिटीश विरोधी व्विषारी वातावरण पाहून दचकलो व तेथुन मागे परतलो. तिथेच त्यांनी मारो-काटो का पंथ या नावे एक पुस्तकही लिहिले होते.

गांधींची भारतीय स्वातंत्र्याची कल्पना साम्राज्यांतर्गत स्वराज्य एवढीच होती. ब्रिटीशांच्याच कृपाछत्राखाली राहून वसाहतीचे स्वराज्य म्हणजे पुर्ण स्वातंत्र्य अशी त्यांची कल्पना होती.

१९२९ ला गांधींनी लाहोर अधिवेशनात पुर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला त्यात हिच कल्पना होती. मात्र या ठरावाला सुभाषचंद्र बोस यांनी उपसूचना मांडली की स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटीश साम्राज्यातून फुटुन निघणे. मवाळ गांधी यावर संतप्त झाले आणि हि उपसुचना रद्द झाली.

नंतर ९ जाने १९३० च्या यंग इंडीयाच्या अंकात गांधींनी लेख लिहिला त्यात स्वातंत्र्य म्हणजे काय यावर स्पष्टीकरण केले. "Colonial self-Government was equivalent to complete Independence."

गांधीजींचेच एकेकाळचे सचिन इंदुलाल याज्ञिक यांनी आपल्या गांधीजींवर लिहिलेल्या पुस्तकात म्हणतात," स्वातंत्र्य या पवित्र शब्दाचा संबंध गांधींजींच्या लाहोरच्या ढोंगी कराराशी जोडणे हे महत्‌पाप आहे."

गांधींनी आपले अन्य एक सेक्रेटरी कृष्णदास यांना अशी आज्ञा दिली की त्यांनी बंगालमध्ये जाऊन ज्या ज्या कॉंग्रेसी शाखात क्रांतीकारी वृत्तीचे लोक कॉंग्रेसमध्ये असतील त्यांची नावे गांधींना कळवावीत. त्या प्रमाणे या नावांची यादी असलेली पत्रे ब्रिटीश सरकारच्या हाती पडत असत व त्यातून ब्रिटीश सरकारला सशस्त्र क्रांतीकारकांचा पत्ता लागत असे.

या गोष्टीचा गौप्यस्फोट १९३५-३६ सली मध्यवर्ती असेंब्लित त्यावेळेचे लॉ मेंबर श्री. एन.एस. सरकार यांनी संतप्त होऊन केला होता.याच सेफ्टी व्हॉल्व्ह धोरणाप्रमाणे १९३९ साली गांधींनी सुभाषचंद्र बोसांनाही कॉंग्रेसमधुन बेदखल केले.

कोंग्रेस ही ब्रिटीशांची या प्रमाणे लाडकी व सेटी वॉल्व्ह असल्याने व त्यांचा हेतुच ब्रिटीश शासन सेफ करणे हा होता. त्यामुळे अर्थातच जे जे लोक त्यांना अनुकुल ठरतील अशांच्या हाती सत्ता सोपवणे त्यांना हिताचे होते व तेच त्यांनी केले.

नेहरु हे माऊंटबॅटनचा खूप भरवसा करत हे तर स्पष्ट च होते व तेच भारताचे पहिले व्हॉईशराय राहिले. भारताची राज्यघटना कशी करायची याची
सल्लामसलत करण्यासाठी नेहरु एप्रिल १९४९ ला ब्रिटनला गेले. कॉमनवेल्थ म्हणजे ज्या राष्ट्रकुलाची किंवा ब्रिटीश कॉमनवेल्थ ची नेहरु पुर्वी थट्टा करित त्याच नेहरुंनी सत्ता हाती येताच कॉमनवेल्थ मध्ये भारताने सामिल होण्याचा निर्णय घेतल हे एक आश्चर्यच होते. ब्रिटीशांच्या राष्ट्र्कुलात रहाण्याने तांत्रिक दृष्ट्या लाक्षणिक अर्थाने का होईना ब्रिटीश साम्राज्याचे प्रभुत्व मान्य करुन ब्रिटीशांचा अहंकार सुखावण्यात आला. भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे डोमिनियन स्टेटस्‌ देणे हा साम्राजय्वादी ब्रिटीशांचा हेतु होता. तो अंतिमत: कॉंग्रेस व त्यातील काही लाडक्या पुढाऱ्यांच्या मदतीने तडीस गेला.

नेहरुंच्या या इंग्लंड भेटीनंतर साम्राज्यवादी ब्रिटिश माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी उद्गार काढले , ’ही योजना फारच नामी आहे आणि मला ती एकदम पसंत आहे. कारण या योजनेमुळे ब्रिटीश राजाची इभ्रत आणि प्रतिष्ठा जगात वाढलेली आहे.’

अद्याप भारत संरक्षण बाबत इंग्लंडच्याच अधिपत्याखाली आहे का काय अशी शंका येते. External affairs department ऐवजी Foreign Department असे नाव भारताने अद्याप का दिले नाही?

पंतप्रधान मोदींना भारत कॉंग्रेसमुक्त करायचा आहे याचा अर्थ भ्रष्टाचार मुक्ती असा आहेच पण जी काही साम्राज्यवादी पाळेमुळे अद्याप भारताच्या स्वातंत्र्याच्या आत छुपेपणे आहेत ती पण नष्ट करणे आवश्यक आहे. ब्रिटीशां सह सर्वच परकिय शक्तींचे व ब्रिटीश पुर्व आक्रमकांचे सेफ्टी व्हॉल्व्ह वा हस्तक म्हणून ज्या ज्या वृत्ती व शक्ती भारतात खूप खोलवर घुसल्या आहेत त्या सर्वांपासून भारत मुक्त करायला हवा आहे. तोच कॉंग्रेसमुक्त भारताचा खरा अर्थ आहे.


No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...