फाळणीनंतर पाकिस्तानच्या वाट्याला जे ५५ कोटी रुपये देणे निघत होते ते लगेच देण्याचा हट्ट गांधींनी धरला हे गांधीहत्येचे तत्कालिन कारण झाले असे गांधीहत्येह्च्या कटात सहभागी असलेले व नथुराम गोडसे यांचे बंधु श्री.गोपाळ गोडसे यांचे प्रतिपादन होते.
हे देणे अशावेळी दिले गेले ज्यावेळी पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या वेषात आपले सैन्य काश्मिरात घुसवले होते. देणे द्यायचे होते ते पाकिस्तानने सैन्य माघारी घेतल्यावर दिले असते तर योग्य होते व तसाच योग्य निर्णय भारत सरकारने घेतलाही होता, पण गांधींनी हे देणे द्याच म्हणून उपोषण केले व त्यानंतर लगेचच सरकारने गांधींच्या दबावाला बळि पडुन आपला आधीचा निर्णय फिरवुन हे पैसे पाकिस्तानला द्यायचा निर्णय घेतला.
गांधीजी अशा प्रकारे भारताच्या आंतराष्ट्रिय धोरणांवर समांतर सत्ताकेंद्र होऊन भारताच्या हिताच्या विरोधी निर्णय घेण्यास स्वतंत्र भारत सरकारला भाग पाडत होते, वेठीस धरत होते व ते असेच जगत राहिले तर सातत्याने आपला प्रभाव भारत सरकारच्या धोरणांवर टाकण्याचे काम करत राहतील या भीतीने खुन्यांनी हे आततायी कृत्य केले असा नथुरामवाद्यांचा दावा होता व असतो.
गांधी हत्येचे एकुणात कारण केवळ ५५ कोटी हे एकमेव नव्हते तर एकुणच कॉंग्रेसने तिच्या स्थापनेपासून व पुढे टिळकांच्या काळात व नंतर मुख्य जे सर्वैसर्वा झाले ते गांधी यांनि मुसलमानांचे जे तुष्टीकरण केले त्याची चीड खुन्यांच्या मनात साठत गेली व त्यातून ही राजकिय हत्या झाली असे नथुराम गोडसे यांच्या कोर्टातल्या निवेदनावरुन दिसते.
"गांधीहत्या आणि मी" व "५५ कोटींचे बळी" याच दोन पुस्तकांचा मुख्य आधार व अन्य दुय्यम पुस्तके यांच्या आधारावर शरद पोंक्षे यांची नाटके सजली होती व आहेत.
फाळणी झाली ते योग्य का अयोग्य हे आता आपण वेगवेगळ्या चष्म्यातून पाहु शकतो, काही जण म्हणु शकतात की आज जर बांगला देश व पाकीस्तानची लोकसंख्या हिंदुस्थानात अधिक केली तर ते धोक्याचे ठरले असते. त्याची चर्चा वेगळी करता येईल. Historians are wiser after the Event. आपण काळाच्या उलट्या दुर्बिणीतून पाहुन जर तर च्या भाषेत समर्थपणे बोलु शकतो. पण त्या त्या वर्तमानात नेमके पुढे काय होईल हे ठरवणे अवघड असते.
तत्कालिन घटना हे तत्कालिन वातवरणातून घडतात.
पण सोकॉल्ड गांधीभक्तांकडुन मुख्य आक्षेप घेतला जातो तो असा की मुळात गांधीजींचे उपोषण हे ५५ कोटी देण्यासाठी नव्हतेच, ते हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी होते. आणि गोपाळ गोडसे यांनी हि थाप मारली आणि नथुरामच्या हेतु चे समर्थन करणाऱ्यांनी हिच थाप पुढे चालवली. हा थापाथापीचा आक्षेप खरा आहे का? हि गोपाळ गोडसे यांची निव्वळ थाप आहे का? इतिहासाचा हा विपर्यायास आहे का या पुरतेच आपण पाहु.
जर ही थाप असेल इतकी वर्षानुवर्षे हि तथाकथित थाप कशी चालु शकेल ? इतकी वर्षे गांधींचेच नाव घेणाऱ्यांचे सरकार चालु होते त्यांनी या थापेवर कधीच आक्षेप कसा घेतला नाही आणि आज अचानक यावर प्रकाश पडला आणि जणु काही एक षडयंत्र उघडकिस आणले असा तथाकथित गांधी वाद्यांचा जो आविर्भाव आहे तो मात्र चुकीचा आहे.
वस्तुत: हे उपोषण ५५ कोटी देण्यासाठी नव्हतेच , त्या कारणाने हत्या झाली हे गोपाळ गोडसे यांचे म्हणणे हा इतिहासाचा विपर्यास आहे असे म्हणून मुळात फार पुर्वीच म्हणजे "गांधी हत्या आणि मी" ची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हाच सरकारने या पुस्तकावर बंदी आणली आणि पुस्तके जप्त केली होती.
लेखक आणि प्रकाशक या बंदीविरुध्द न्यायालयात गेले. या पुस्तकावरची बंदी उठवताना माननीय न्यायलयाने स्पष्ट पणे निकाल दिला आहे की लेखक गोपाळ गोडसेंनी ५५ कोटी देण्यासाठी गांधींनी उपोषण केले असे म्हणणे ही इतिहासाची अजिबात मोडतोड नाही. गांधीजींचे उपोषण हे ५५ कोटी पाकिस्थानला देण्यासाठीच केले होते या संबंधीचे पुरेसे पुरावे लेखकाने समोर आणले आहेत आणि त्यानी इतिहासाचे विकृतीकरण केलेले नाही हे स्पष्ट आहे. इतके स्पष्ट झाल्यावर परत परत या हत्येमागचे कारण गांधींचा ५५ कोटी पाकिस्तानला देण्याचा नव्हताच व ती थाप आहे असे प्रतिपादन परत परत का केले जाते?
गांधीविचारांचा बचाव करण्यासाठी अशी खोटी कारणे देण्यापेक्षा काही ठोस वैचारीक लढाई सोकॉल्ड गांधीभक्तांनी का करु नये? न्यायालयाच्या निर्णयपत्रकाचा ५५ कोटी संबंधीचा भाग "गांधीहत्या आणि मी " या पुस्तकाच्या आवृत्तीत छापला आहे, तो पाहीला की ५५ कोटी चा गांधीहत्येशी असलेला संबंध आणि ते कारण हि गोडसेंची थापाथापी नसल्याचे सहज स्पष्ट होते.
त्या पृष्ठाच छायाचित्र पुढे देत आहे. त्यावरुन माननीय न्यायालयाने गांधीजींचे हे उपोषण ५५ कोटी देण्यासाठी होते हा लेखक व कटातले एक शिक्षा भोगलेले आरोपी लेखक गोपाळ गोडसे यांचे म्हणणे मान्य केले आहे आणि त्यात इतिहासाचा कोणताही विपर्यास नाही असे म्हणून सरकारचे म्हणणे फेटाळून लावले आहे.
हा खटला लेखक श्री. गोडसे व प्रकाशक यांनी जिंकला, पुस्तकावरची बंदी उठवण्यात आली व खर्चापोटी रु. २००० सरकारला गोडसे व प्रकाशक यांना द्यावे लागले. इतके झाल्यानंतर या पुस्तकांन व त्यावर आधारीत नाटकाला कायदेशीर बंदी येऊच शकत नाही हे उघड आहे
मूळ पोस्ट मध्ये प्यारेलाल नायर यांच्या Mahatma Gandhi Last Phase चा उल्लेख केला आहे, ज्यात गांधी म्हनतात की पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा निर्णयामागचे कारण माझा उपास हेच होय. त्या पृष्ठाचे छायाचित्र. प्यारेलाल नायर हे सुशिला नायर यांचे भाऊ व गांधींचे स्वीय सचिव होते.
No comments:
Post a Comment