Skip to main content

रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

१९६७ साली भारताने आपला विसावा स्वातंत्र्य सोहळा साजरा केला. त्या वेळेस तत्कालीन ब्रिटिश राजदूत ‘जौन फ्रिमन’ यांना विचारण्यात आले की, ब्रिटिशांसाठी असा कुठला निर्णायक क्षण होता की, भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही असे लक्षात आले. त्यावेळेस ब्रिटिश राजदूतांनी नि:संदिग्ध आणि अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले की, १९४६च्या नौसनिक उठावामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आले.

ब्रिटिश राजदूतांनी म्हटल्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, असे ब्रिटिशांना लक्षात आणून देणाऱ्या या घटनेची आठवण गेल्या ७० वर्षांत फारशी कधीच, कशी कुणालाच झाली नाही? किंवा भारतीय स्वातंत्र्ययुद्धांच्या इतिहासातील महत्त्वाची अशी ही घटना अनुल्लेखानेच का मारण्यात आली?

१८५७ चा उठाव, उमाजी नाईक, वा.ब.फडके , चाफेकर बंधु, सावरकरबंधु, गदर , १९४२ ची हिंसक चळवळ, पत्री सरकार, आझाद हिंद सेना आणि नाविक दलाचा उठाव अशी एकामागुन एक अशी तेजस्वी सशस्त्र क्रांती परंपरा देशाला आहे. स्वातंत्र्य लढ्यातला एक भाग नि:संशय पणे गांधी व राष्ट्रिय सभेकृत जनजागृती होती हे नाकारता येत नाही.

पण नाविक सामर्थ्य हे ब्रिटीशांचे सर्वात मोठे सामर्थ्य. दुसऱ्या महायुध्दात जिंकुनही कंबरडे मोडलेल्या ब्रिटीशांचा नाविक दलाने बंड केल्यावर तर धीर पुर्ण खचला. सुमारे ७३ warships नी यात भाग घेतला.

१८ फेब्रुवारी १९४६ ला नौसैनिकांनी उठाव केला. मुख्य पुढाकार बी.सी.दत्त यांचा
युद्धाच्या अखेरीस विजयी झालेल्या ब्रिटिश नौदलात, आपणास कसलेच स्थान नाही. भारतातील ब्रिटिश राजसत्ता टिकविण्यासाठीच केवळ एक प्यादे म्हणून आपला उपयोग करून घेण्यात आला, ह्यची दत्त यांना तीव्रतेने खंत वाटली. दत्त व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना वेळोवेळी सहन कराव्या लागणाऱ्या अपमानांमुळे ते सगळे जणच संतप्त झाले होते. त्या सर्वाना ब्रिटिशांनी केवळ बळीचे बकरे म्हणून युद्धात वापरले होते. हे लक्षात आल्यावर त्यांचा संताप शिगेला पोहोचला. या अन्यायाचा प्रतिकार करावा, असे त्यांना तीव्रतेने वाढू लागले.

दत्त यांना अटक झाली. मुंबई , कराची कलकत्ता इ. बंदरात सैनिकांनी बंड केले. मुंबईत सहा दिवस, कलकत्त्यात सात दिवस कराचीत दोन दिवस आणि मद्रास मध्ये एक दिवस हे सुरु होते.

मुंबईतील रस्त्यांवरुन हे सैनिक फिरत होते आणि सर्वसामान नागरीकांमध्ये देशप्रेमाची लहर दौडली. हजारो लोक मुंबईत समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले पाहुन ब्रिटीशांच्या पोटात अक्षरश: गोळा आला. सैनिक शक्ती व लोकशक्तीचा तो अपुर्व मिलाफ होता. जेव्हा बंडखोरांबर ब्रिटीश सैन्य रणगाडे व तोफा घेऊ आले तेव्हा मुंबईच्या नागईकांनी गल्लीबोळाचा सहकार्य घेऊन ब्रिटीश सैन्यावर दगड विटांचा मारा केला. या चर दिवसात मुंबईत २२८ जण मारले गेले तरी लोकांचा प्रतिकार चालु होता. ब्रिटीशांनी युध्द्नौकांची रसद तोडल्यावर लोक अन्नधान्याची पुडकी घेऊन नौकांवर पोचवत होती.

हा सर्व इतिहास मी शाळेत कधीच शिकलो नाही. चार वाक्यात या बंडाचा उल्लेख संपवला जातो. अतिशय रोमहर्षक असा हा सैनिक उठाव आम्हाला अहिंसेने स्वातंत्र्य मिलाले या घोषात दामटुन टाकला गेला आहे. एअरफोेर्स , भूदल यांनीही ब्रिटीश विरु् भारतीय असा लढा झाला तर स्पष्ट पणे आम्ही लोकांच्या बाजूने उभे रहाणार असा निर्णय घेतला होता. स्वातंत्र्य लढ्याचे श्रेय सशत्र लढ्याला आणि सैनिकी शक्तीला पण यथायोग्य मिळायलाच हव, फक्त गांधी किंवा नेहरु वा एका पक्षाने स्वातंत्र्य मिळवले हा खोटा इतिहास असुन, ब्रिटीशांच्याच शब्दात सांगायचे तर भारतात पाठवायला आमच्याकडे पुरेसे सैन्य नाही आणि भारतीय सैन्य स्वातंत्र्य लढ्याच्या बाजुने गेल्याने, आमच्या वर उलटल्याने आम्हाला भारताला स्वातंत्र्य देण भाग पडल हेच मान्य करावे लागते.

©चंद्रशेखर साने

Comments

Popular posts from this blog

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन  दिला. लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे. पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले. आपल्या घ...