माझा अंदाज मुंबई पालिकेत भाजपा बाजी मारणार. अंदाज आहे याचा अर्थ मला तस व्ह्यायला हवय अस नाही किंवा व्हायला नको आहे असही नाही. सेना आली तरी चालेल, मनसे आली तरी चालेल, भाजपा आली तरी बिघडत नाही. कोणाही पक्षाच्या समर्थकाला ते माझ कोणाही पक्षाच्या विरोधी मत समजुुन मनाला लावुन घेण्याच कारण नाही.
मुद्दा असा होता की जर आज मुंबईतला मराठी टक्का २२ % इतका घसरला असेल तर तो सुधरणार कसा? हा प्रश्न मुख्यत: मराठी अस्मितेचे राजकरण करणाऱ्या शिवसेनेकडे आपोआप जातो. पण त्यांनी काही थातुरमातुर वडापावच्या गाड्या लावल्या अशी उत्तरे दिली आणि मला भाजपाचा प्रवक्ता असल्यासारख मानून भाजपाने काय केले असा प्रश्न केला. भाजपा मराठी मतांच गणितच मांडत नाही मुळात. आणि मी भाजपाचा प्रवक्ताही नाही त्यामुळे हा प्रश्नच अस्थानी होतो.
मला अस वाटतय की आजपर्यंत सेना भाजपाची युती असल्यामुळेच केवळ मुंबईतील मराठी माण्साची ताकद "झाकली मुठ्य सवा लाखाची" या न्यायाने लपुन राहिली होती. युती तुटल्याने ती मुठ आता उघडत असुन य्या मुठीय काय दडलेले आहे याची चिंता आहे. २२% सर्वच्या सर्व एकगठठा मते शिवसेनेच्या पाअड्यात पडतील अस वाटत नाही. त्यातली जास्तीत जास्त मते शिव्सेनेच्या पारड्यात गेली अस मानल तरी उरलेली ७८ % मत सुध्दा जास्तीत जास्त भाजपाच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. मनसे क्षीण झाल्याने मराठी मतांचे विभाजन झाले नाही तरी अमराठी ७८ % मतांतल्या २८ % मतांचे ध्रुविकरण तरी भाजपा कडे होऊ शकते.
कॉंग्रेस आज गटबाजीने त्रस्त आअहे, मनसेची ताकद नाही, राष्ट्रवादी मुळातच मुंबईत नगण्य आहे. अशावेळी २२ % मराठी माणसांचा शिवसेना मोठा का ७८ % वाल अमराठी गट मोठा? हा एक वस्तुस्थितीवर आधारित प्रश्न आहे. मी मराठी असल्याने आणि माझ निम्म आयुष्य मुंबईतच गेल;ए असल्याने मुंबई मराठी रहावी अस मला अगदी स्वभाविकपणे वाटत. त्यावेळेपेक्षा मुंबईच मराठी पण हरवलेल मला दिसत. माझे मित्र नातेवाईक माझ्याशी व इतरांशि बोलताना हिंदी व इंग्लिश मध्ये बोलताना दिसतात. मी माटुंगा स्थानकावर वर मराठीतून तिकिट मागितल्यावर, तिकिट देणारा मी परकिय भाषा बोलत असल्यासारखा कटाक्ष टाकतो. हे अस १९९० पर्यंत तरी निश्चित नव्हत. मुंबईत मला कधीही मराठी या नात्याने उपऱ्यासारख वाटल नव्हत , ते आता वाटत.
जर असे झाले आले आणि शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही तर मराठी माणसाची उरली सुरली पण पत जईल. आपण मानल की मराठी माणूसाने एकजुटीने सेनेला गठठा मतदान केले आणि सेना निवडुन आली तरी पुढे काय? दरवेळि मराठी माणूस युतीलाच मतदान करत आहे. आताही केल तरी मराठी टक्का असाच घसरत राहाणार आहे तर उपयोग काय शिवसेना जास्तीत जास्त मोठा पक्ष ठरुन पण ?
यावर वचननाम्यात काय म्हटले आहे? कोणत प्रारुप सेनेने आखले आहे कि ज्याने मराठी माणसांचा टक्का परत ४० % च्या वर जाईल.
या प्रश्नाला शिवसेना आणि सोशल माध्यमातील सर्थन उत्तर द्यायला घाबरतो आहे. प्रश्न विचारणाऱ्याला भाजपाई ठरवून उत्तर टाळत आहे.
या प्रश्नाला शिवसेना आणि सोशल माध्यमातील सर्थन उत्तर द्यायला घाबरतो आहे. प्रश्न विचारणाऱ्याला भाजपाई ठरवून उत्तर टाळत आहे.
समस्या शिवसेना पालिकेत येईल का नाही येणार हा नसून मराठी माणसाची झाकलेली मूठ उघडी पडणार आहे ही आहे. उघडलेल्या मुठीतून सवा लाख बाहेर पडतायत का सव्वा रुपया या प्रश्नाला सामोरे जाण्याचे धाडस समर्थक मंडळी करत नाहीत. २३ फेब्रुवारीला याच प्रश्नाची तड लागणार आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कोणालाच गरज नाही मुंबई महाराष्ट्रातच ठेऊन मुंबईचे स्वरुन अमराठी झाले आहे त्यावर अंतिम अधिकृत शिक्कामोर्तब २३ फेब्रु्वारीला होईल का मराठी वज्रमुठीचे दर्शन होऊन मराठी टक्का परत वाढवायच सामर्थ्य सेना किंवा अन्य कोणताही पक्षा दाखवणार का हा खरा मुद्दा आहे.
No comments:
Post a Comment