Thursday, January 19, 2017

सावरकर "पायोनियर ऑफ हिंदुत्व"


रा.स्व.संघ आणि सावरकर यांच्यातले संबंध आणि धोरणात्मक मतभेद काहिही असोत. पण डॉ.हेडगेवार सावरकरांचे हिंदुत्व मानणारे होते व त्यांच्याबरोबरच्या दोऱ्यात दुय्यम भूमिका घेऊन त्यांच्यासमवेत रहात. तर गोळवलकर गुरुजी सावरकरांची भेट वेळ ठरवुन घेत आणि भेटले की त्यांच्या पायाला स्पर्श करुन वंदन करत असत. व्यक्तीश: सरसंघचालकांपासून ते संघ स्वयंसेवकापर्यंत सर्वांना सावरकरांविषयी संपुर्ण आदर असतो.

बाळासाहेब ठाकरे आणि काही प्रमाणात शिवसेना यांचे सावरकर प्रेमही सर्वश्रुत आहेच.

"पायोनियर ऑफ हिंदुत्व" जर का कोणी असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरच !

त्यामुळेच सर्व विरोधी राजकिय पक्ष, समाजवादी/साम्यवादी विचारसरणी या सर्वांचे द्वेषाचे स्थान कोण असेल तर ते सावरकर. त्यांना विचारांनी जिंकता येणे शक्य झाले नाही, इतकेच नाही तर सावरकर विचार येथे रुजलाय आणि वाढतच चाललाय.

त्यामुळेच सावरकरांना जाऊन आज पन्नास वर्षे होऊन गेली , हिंदुत्वाचा विचार मांडुन १०० वर्षे होत आली म्हणून मिळेल त्या मार्गाने सावरकरांना बदनाम करणे त्यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करणे व निंदानलस्ती करणे याचे एकमेव कारण हे त्यांनी रुजवलेले हिंदुत्व हे आहे. कुठुनही सावरकरांचे विचार व महत्व नव्या पिढीपर्यंत पोचु नये हे त्यांचे प्रयत्न तर अपयशी ठरले. मग त्यांची बदनामीच का न करा? कोण खोलात शिरुन खरे सावरकर पहाणार आहेत? असा विचार करुन ५० वर्षांनंनतही सावरकारांना ट्रोल करणारे आज स्वत:वर ट्रोल होतय म्हणून चिडचिड करत आहेत.

अन्यथा देशभक्तीच्या कारणाने वर्षानुवर्षे कष्टपुर्ण असा कारावास भोगलेला, साहित्यकार,बुध्दीवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक, नाटककार, इतिहास विश्लेषक, विद्वान,महाकवि, तत्वचिंतक असा शतपैलु सद्‌गृहस्थ कोणत्याही स्वतंत्र व स्वाभिमानी राष्ट्रात असा उपेक्षित राहिला असता काय? आपण स्वतंत्र आणि स्वाभिमानी आहोत का नक्की ?

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...