Saturday, January 28, 2017

असा होता अल्लाउद्दीन खिलजी

अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत बायको म्हणजे त्याची चुलत बहीण जिच्या बापाला म्हणजे जलाल-उद-दीन खिलजी याला मारुन तो सुलतान झाला. दुसरी त्याने पळवुन आणलेली गुजराथच्या कर्णावतीच्या राजाची म्हणजे करण घेलो याची राणी कमलदेवी. तिसरी महाराष्ट्रातल्या राजा रामदेवराय यादवच्या गळ्यावर सुरी ठेऊन पळवलेली त्याची राजकन्या जेठाई. कमलदेवीला जनान्यात डांबल्यावर गुजरात चा राजा करण घेला मुलगी देवलदेवी सह यादवांच्या आश्रयाला आला. अल्लाउद्दीन चा निर्लज्जपणा असा की पळवलेल्या राणी कमलदेवीच्या मुलीची देवलदेवीची मागणी त्याने स्वत:च्या मुलासाठी केली. देवलदेवीला वाचवण्यासाठी झालेल्या लढाईत राजा करण घेलो मेला, देवलदेवीला अल्लाउद्दीनाने ताब्यात घेतले आणि मुलगा खिज्रखानाशि निकाह लावुन दिला.
(गुजरातीत या विषयावर "करण घेलो" नावाची कादंबरी पण आहे. गुजराती भाषेत लिहिली गेलेली पहिली कादंबरी )

अलाउद्दीन खिलजीच बाकीचे सगळे कामजीवन म्हणजे त्याने बाटवलेेला हिंदु गुलाम ज्याच्याशी त्याचे बळजबरीचे विकृत संबंध होते. ज्यास त्याने खच्चि केले ( castrated ) तो आवडता गुलाम म्हणजे मलिक काफुर, शेवटी यानेच खिलजीला ठार मारले.

आता अशा व्यक्तीमत्वाच्या विकृत सुलता्नात भन्साळ्याला प्रेमभावना कुठ दिसल त्यालाच ठाऊक.

तो कट्टा धर्मांध होता. त्याच्या काळात हिंदुंची अत्यंत दयनीय अशी स्थिती झाली होती. मुसलमानी रियासतीचे लेखक रावबहाद्दुर सरदेसाई इतिहासकारांमधले मोठे नाव, बडोद्याच्या गायकवाडांच्या दरबारातले ख्यातनाम इतिहासकार , ते अल्लाउद्दीन खिलजी विषयी लिहितात,

"हिंदूंना हत्यारे,घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत,उंची पोषाख करु नये,छानछोकीने राहू नये असा बंदोबस्त अल्लाउद्दीन खिलजीने केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे.गाईम्हशींचासुद्धा कर द्यावा लागे.कोणाही हिंदुच्या घरात सोने,चांदी वा सुपारी चा तुकडा सुध्दा उरलाी नाही.हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमानांच्या घरी चाकरी करावी लागे. हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींना मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे" मुसलमानी रियासत पृ. १४१

आधी तुघलक झाले, टिपु झाला , औरंगजेबाचे उदात्तीकरण चालुच आहे, आता खिलजी असे करत करत महमुद गझनीसुध्दा धर्मनिरपेक्ष होईल आणि त्यांच्या हिंदु राण्या, राजकन्या , स्त्रिया यांच्याबरोबरच्या खोट्यानाट्या प्रेमकथा प्रसृत केल्या जातील. आणि परत हिंदु समाजच रांगा लावुन कोटि कोटीचा सिनेमा चालवत मिटक्हेया मारत आपल्या इतिहासाची आणिि ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राची लत्तरे मिटक्या मारत पॉपकॉर्न अन कोक पित चघळतीलाी. विष भिनवण चालु आहे. slow poisoning

©चंद्रशेखर साने
संदर्भ
तारिख ए फिरोजशाही - लेखक झियाउद्दीन बरनी
तुघलकनामा - अमीर खुस्रो
History of Khalajis by K.S.Lal
History of India by Its own Historians VOL III by Elliot and Dowson
मुसलमानी रियासत- गो.स. सरदेसाई

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...