Monday, January 30, 2017

खुसरो खानाची गोष्ट

अल्लाउद्दीन खिलजी व नंतर त्याचा मुलगा सुलतान मुबारकखान खिलजी याने हिंदुंवर जे अनन्वित अत्याचार केले त्याचा परीणाम खिलजींच्या भीषण अंतात झाला. अल्लाउद्दीन ने खच्ची केलेला मुळचा हिंदु गुलाम मलिक काफुर . याच्यावर अल्लाउद्दीन खिलजी अतोनाश आशिक होता, समलैंगिक संबंध ठेवुन होता. याच प्रेमकथेने खिलजीचा काटा काढला व नन्तर रामदेवराय यादवाच्या मुलीच्या पोटी जन्मलेल्या अल्लाउदीनच्या ४-५ वर्षांच्या शहद्जाद्याला तख्तावर कठपुतळीसारख बसवुन स्वत: त्याचा पालक म्हणून मलिक काफुर हा गुलाम राज्य पाहु लागला
त्याचा महिनाभरात खून झाला आणि मुबारकखान हा अल्लाउद्दीन खिलजीचा वाचलेला मुलगा सुलतान झाला.
हा मुबारक खिलजी सुध्दा हसन नामक मुळ हिंदु असलेल्या व अल्लाउद्दीन ने पकडुन आणलेल्या एका देखण्या मुलावर आशिक होता. त्याला बढती देऊन नाव दिले होते खुस्रोखान. हा खुसरो खान मात्र मनातून संतप्त होता. सक्तिचे लैंगिक संबंध व सक्तीचे धर्मांतर याचा सूड त्यास घ्यायचा होता.
संधी मिळताच त्याने आपल्या भरवाड या जातीच्या आपल्या नातेवाईकांना व इतर हिंदुंनाही त्याने भराभर सैन्यात भरती करुन घेतले आणि मुबारक चा खून करुन स्वत:च सुलतान झाला. त्याने घेतलेले सुलतान पद हि हिंदु क्रांती होती. कारण सुलतान होताच त्याने व त्याच्या साथीदारांनी उघड उघड हिंदु धर्माअचे आचरण सुरु केले. मशिदींची परत मंदिरे केली. गोहत्या बंदी केली. चार महिने दिल्लीतल्या व सुलतानी राज्यात सर्वत्र हिंदु राज्य सुरु झाले. खुसरो ची व भारवाडांची लष्करी ताकद चांगली होती. मुळात त्या वेळी हि जमात लढवय्यी म्हणून प्रसिध्द होती , सैनिकीकरण हिच त्या जातीची ओळख होती. खुसरो खान दक्षिणेत गेला असता हिंदु राजांशी कटकारस्थाने करुन सत्ता उलथुन टाकु पहात होता. पण त्यास अचानक दिल्लिस परतावे लागले होते. पण या वेळी संधीचा फायदा घेऊन सर्व भारतीय हिंदुंनी एकत्रित उठाव करुन भारत परकिय आक्रमकांआसुन मुक्त करण्याची संधी घेतली नाही व ५-६ महिन्यातच शुस्रुखानाला ठार मारुन तुघलक वंशाची इस्लामी सत्ता दिल्लित प्रस्थापित झाली.
तत्कालिन सुफी संत निजामुद्दीन औलिया हा तुघलकापेक्षा खुसरो खानाच्या बाजूने होता. तुघलक सत्तेवर आल्यानंतरही त्यांच्यात बेबनाव होता. "दिल्ली तो बहोत दुर है" हा वाक्‌प्रचार म्हणजे एकवेळी तुघलकाने निजामुद्दीन औलियावर काढलेल्या एका आदेशाला अवलियाने तुघलकाला दिलेले तुच्छतापुर्ण उत्तर आहे.
इस्लाम खतरेमें चा नारा देऊन तुघलक सत्तेत परतले.
इतिहासात दुर्लक्षिलेले हे एक पान. सर्व मुस्लिम इतिहासकारांनी खुस्रो खानाचे नावे भयानक शिविगाळ केली आहे. त्यावर विश्वास ठेऊन अर्वाचिन इतिहासकारांनी खुसरो खानाच्या या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले आहे. व तवारिखकारांच्या मागे जाऊन खुस्रो ला शिव्यांची लाखोली वाहीली आहे.
सरदेसाई के.एस. लाल सारख्या अगदी मोजक्याच अर्वाचिन इतिहासकारांनी, खुसरो खानाला मुस्लिम दरबाऱ्यांनी एकतर्फी रंगवले आहे व हिंदुंनी त्याकाळ लिहिलेला इतिहास प्रकाशित झाला तर खुस्रो खानाची व या क्रांतीची दुसरी बाजू समजु शकेल असे मत मांडले आहे.
आम्ही मुसलमान होऊ इच्छीतो असा बहाणा करुन खुसरो चे हिंदु साथिदार राजवाड्यात घुसले होते. स्वत:च्या मर्जीने जे मुसलमान होत त्यांना धदौलत व नोकरी देऊन सन्मानित केले जाई.
एरवी युध्दकाळात हातात सापडलेल्यांच्या वाट्याला सक्तीचे धर्मांतर होते अशी साक्ष इतिहासाच्या पानोपानी मिळेल. स्वत:हुन धर्मांतर करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. हे समजण्यास कोणतेही समकालिन पुस्तक उघडुन नजर टाकली तरी समजेल, फार मोठी इतिहासाची वा संशोधनाची गरज नाही. ९९ % धर्मांतरे हि सक्ती व पैसा यांच्या जोरावर झाली.
सर्वसाधारण कोणत्याही जातीचा हिंदु अगदी तळागाळातला सुध्दा धर्म आणि जात सोडण्यास सिध्द नसे. धर्मांतर हे त्याच्या दृष्टीने मरणासमान होते. स्वत:चा धर्म हिंदुंना प्रिय असे. अगदीच नाईलाज झाला तर ते धर्मांतर करत. सर्वसाधारण पणे मुरतिद होणे म्हणजे परत धर्मत्याग करुन हिंदु होण हि उदाहरणे होत नसत. होतच नसत असे मात्र नाही. बरेचदा होत असत आणि हिंदु त्यांना सामावुन पण घेत, पण ते प्रमाण कमी होत गेले. खुस्रोची क्रांती यशस्वी होती तर घरवापसी ची शक्यता होती. तसही १३२० स हा खुसरो चा काळ , याच्चीच पुनरावृत्ती दक्षिणेत १३३६ सन मध्ये होऊन परत हिंदु झालेल्या हरिहर व बुक्क यांनी विजयानगरचे साम्राज्य स्थापन केले हे ठळक उदाहरण आहेच. घरवापसीला जर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळते तर पाकिस्तान निर्माणच झाले नसते.
या स्कॅन पृष्ठातही हिंदुंची तीच भावना उमटलेली स्वच्छ दिसते. तसच परकिय कोण व हिंदुस्थानी कोण अस विभाजन या तवरिखकाराने स्पष्ट पणे केल आहे.
अजाइबुन असफार नावाच्या बखरीतले (तवारीख) हे एक हिंदी भाषांतरीत
पृष्ठ क्र. २१६
पुस्तकाचे नाव खलजी कालिन भारत
भाषांतर कार अतहर अब्बास रिझवी
प्रकाशक अलिगढ मुस्लिम विद्यापीठ
प्रथम आवृत्ती वर्ष १९५५
© चंद्रशेखर साने

No automatic alt text available.

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...