Thursday, January 26, 2017

संघ काळाप्रमाणे बदलतो आहे !

मी संघाचा नाही तरी संघाशी लहानपणापासून परिचित आहे. लहानपणी माझ्यापेक्षा वयाने काहिसा मोठा असलेला व  शेजारी रहात असलेला श्री. रवी बेडेकर माहीमच्या नारळी बागेत भरणाऱ्या संघ शाखेत मला घेऊन जात असे. महिना दोन महिन्यानंतर ती शाखा काही कारणाने बंद झाली होती वाटते. त्यानंतर दैनंदीन शाखेशी संबंध उरला नाही.
काल माझे ज्येष्ठ स्नेही डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले यांच्या विशेष आमंत्रणावरुन दिवसभर संघस्थानावर म्हणजे मोतीबागेत होतो. मुख्य भाग होता समाज माध्यामत असलेली आव्हाने.

त्या निमित्ताने आज  संघाची बैठक , बौध्दीक आणि चर्चा यांना उपस्थिती लावली. फारच छान अनुभव होता. जागतिकीकरणाच्या नव्या आव्हानांना कस सामोर जाव, संघ विचारांपुढची आव्हान, समाज माध्यम, वृत्त वाहिन्या अशा अनेक गोष्टींना, काही ओझरता स्पर्श करणारी तर काही सखोल असणारी, अशी चर्चा झाली. अत्तिशय हसतखेळत, चर्चेचा उच्च स्तर टिकवणारे तोही हास्यविनोदाचे वातावरण राखुन त्यामुळे सर्व वेळ अगदी मजेत व तरिही खूप काही विचार प्रवृत्त करणारा असा गेला.

संघाचा असा मी नसलो , म्हणजे दैनंदिन शाखात मी कधी गेलो नाही ना कधी संघाच्या कोणत्याही सेवाकार्यात किरकोळ घेतलेला सहभाग वगळता, फार मोठा असा सक्रिय सहभाग घेतलेला नाही तरीही, संघ या संस्थेच्या कार्याचे आणि विचारांचे निरिक्षण करत असतो. त्यावरुन सांगु शकतो की संघ बदलत आहे, कात टाकत आहे आणि पुरोगामित्वही अगदी सहजी स्वीकारत आहे. सहभागी १००-१५० स्वयंसेवक सर्व समाजघटकातले होते. काही जण पुर्वीच फेसबुक वर मित्र आहेत त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली.

आज मला जाणवलेला संघ हा पुर्वीपेक्षाही जास्त तरुण, ग्लोबल, आधुनिक आणि परंपराप्रेमी पण सुधारणावादी असा दिसला. जयहिंद !!

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!!

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...