Skip to main content

Posts

Showing posts from February, 2012

सावरकरांची धोरणे आणि आझाद हिंद सेना-लेखांक दोन

मागील लेखातून सिद्ध होते कि सावरकरांचे व सुभाषचंद्र बोस यांची सैनिकीकरण , सशस्त्र क्रांती व परराष्ट्र धोरण या विषयात परतंत्र भारतचे धोरण काय असावे यात सहमती होती. इतकेच नव्हे तर आझाद हिंद सेनेचे मूळ संस्थापक "रासबेहारी बोस" हे सावरकरांच्या बर्‍याचशा धोरणांना अनुकूल होते. जपानमध्ये हिंदु महासभा सुद्धा त्यांनी स्थापन केली होती व सावरकरांची हिंदू व हिंदुत्वाची व्याख्याही त्यांनी मान्य केली असावी असा सहज निष्कर्ष निघतो.सुभाषांबद्दल मात्र ती परिस्थिती नाही नेताजी बोस : सन १९०८ चे सावरकर ? "राजनीतीचे हिंदूकरण व हिंदूंचे सैनिकीकरण " हे सावरकरांनी युद्धकालातील महत्वाचे धोरण हिंदूमहासभेला दिले. ब्रिटीशांच्या अडचणीचा फायदा घेणे ,शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मानणे , प्रत्येक राष्ट्राला आपल्या हिताचे काय ते ठरवण्याचा अधिकार असून कोणत्या धोरणाचा स्वीकार राष्ट्राने करावा हे सापेक्ष असते. जर्मनीला नाझीवाद योग्य असला किंबा रशिया बोल्शेव्हिक असला तर तो त्यांचा प्रश्न असून आपले हित आपण साधले पाहिजे हि परराष्ट्रनीती सावरकरांनी - स्थूलमानाने- हिंदुमहासभेला दिली. ...