आंबेडकरांची राजकिय चळवळ नंतरच्या काळात केवळ विशिष्ट समाजाच्या हक्कांपुरती मर्यादीत झाली , तर सावरकर समस्त हिंदु समाजाच्या हिताचा विचार करत होते, दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने ते एकमेकांचे राजकिय विरोधक होते त्यामुळे आंबेडकरांनी जे लिहिले तेच प्रमाण मानायची गरज नाही. आंबेडकरांना सावरकरांच्या राजकारणावर टिका करणे गरजेचे होते कारण ते त्यांचे समाजकारणात पण प्रतिस्पर्धी होते, मूलत: आंबेडकरांची जात सोडता अन्य अस्पृश्य समाजात सावरकरांना मान होता तो आंबेडकरांना डाचत असे त्यामुळे त्यांनी सावरकरांविषयी काही वेळा पक्षपाती लिहिले आहे.
विशेषत: मालवण ला १९२९ ला जी फार मोठी पुर्वास्पृश्य परिषद झाली, त्यात अध्यक्षपदासाठी आंबेडकर व सावरकर अशी दोन नावे पुढे आली. परंतु अन्य पुर्वास्पृश्य, विशेषत: चर्मकार समाजाचा आंबेडकरांच्या नावाला प्रखर विरोध होता , सावरकरांचे नाव मात्र सर्वच दलित मंडळींना पसंत होते, व शेवटी सावरकरांचीच अध्यक्ष म्हणुन निवड झाली.
सावरकरांचे समाजकार्य पाहुन बहुजन मंडळी प्रभावित झाली होती. शाहु महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्र गुरु शंकराचार्य यांनी सावरकरांची थोरवी या समारंभात व रत्नागिरीत पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून मान्य केली. महर्षी वि.रा. शिंदे यांच्यासारख्या समाजसुधारकाने तर ईश्वराने आपलेही आयुष्य सावरकरांना द्यावे एवढे त्यांचे समाजकार्य महान आहे असे म्हटले.
मानवी स्वभाव लक्षात घेता या घटनांनंतर आंबेडकरांना व आंबेडकरी समाजाला सावरकर हे शत्रु वाटु लागले असण्याची शक्यता आहे. खरतर सावरकरांनी रत्नागिरीला आंबेडकरांना आमंत्रण देऊन आपण केलेल्या सुधारण व कार्य प्रत्यक्ष पहाण्यास व अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत करण्यासंबंधी पत्रही लिहिले. पण आंबेडकरांनी बहुदा हे आमंत्रण हेतुत: चुकवले व केवळ ऐकिव माहितीवर सावरकरांवर समता पत्रातुन टिका करणे चालु ठेवले. सावरकरांसोबत असलेले दलित नेते परोपरीने आंबेडकरांना सावरकरांशी युती करण्यासंबंधी सुचवत राहिले पण आंबेडकरांनी राजकीय नफ्या-तोट्याचा विचार करुन त्यांची उपेक्षा केली कारण त्यांन राजकारणात आत्मप्रस्थानाची गरज होती. (गांधीजी मात्र सावरकरांना भेटुन गेले कारण त्यांची राजकीय प्रस्थापना आधीच झाली होती.) तसच सावरकरांना भेटण म्हणजे त्यांच्या तेजस्वी व्यक्तीमत्वा समोर झाकोळून जाणे.( आपल्या जातीसंस्थेचे वास्तव शेवटी असे आहे की ज्याच्यासाठी लढले गेले ती जात दुसऱ्या जातीचा नेता असला तरी संशयानेच पहाते त्यात सावरकर तर ब्राह्मण, त्यामुळे आंबेडकर व त्यांची विशिष्ट जात यांनी सावरकरांकडे एक राजकीय स्पर्धक असेच पाहिले, याउलट इतर वंचित जातींना आंबेडकरांच्या तोडीचा नेता न मिळाल्याने म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा, सावरकरांचा तितकासा द्वेष वाटत नाही व ते सावरकरांचा पण कृतज्ञता बुद्धीने आदर करतात, निदान गलिच्छ पध्दतीने लिहित तरी नाहीत.) आंबेडकरी समाज मात्र काही सन्माननीय लेखकांच अपवाद वगळता सावरकरांनी दलितांसाठी इतके मोठे समाजकार्य करत असूनही सावरकरांचा तिटकारा करताना दिसतो, याचे मुख्य कारण इतर समाज सतत हिंदुत्वाच्या प्रवाहातच राहिले. आंबेडकरांनी मात्र सावरकरी व्याख्या नाकारत हिंदु म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा करत मुळातच भारतात जवळपास तृणवत जालेला बौध्द धम्म हिंदुत्वाच्या कक्षेतुन बाहेर काढला.
पुढे राजकीय अपरिहार्यता म्हणून कॉंग्रेस विरुद्ध काही काही निवडणुकांत आंबेडकरांनी सावरकरांशी हात मिळवणी केली.
जर अवतार आणि दैवत या कल्पना सोडून अभ्यास केला तर सर्व थोर थोर व्यक्तींचे मानवी पातळीवर मुल्यमापन करणे शक्य आहे. अन्यथा नुसत्याच आरत्या ओवाळत रहाणे सहज शक्य आहे, ज्यला तसे करायचे त्याने तसे खुशाल करावे, माझा तो मार्ग नाही. मी कोणत्याच महापुरुषाला नुसते "अवतार" मानत नाही. ते खूप मोठे असले तरी त्यांचा अभ्यास करताना आपण तटस्थ असावे अशी माझी भूमिका आहे.
No comments:
Post a Comment