Skip to main content

महाकाव्यातल्या नीतीकल्पना



रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म्‌ " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत. राम-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले.  रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत्करला. आयुष्यभर साथ देणाऱ्या सीतेचा (स्त्री-पत्नी)लोकांच्या शब्दासाठी आणि कालपुरुषाला दिलेल्या शब्दासाठी लक्ष्मणाचा (पुरुष-बंधु) रामाने त्याग केला आणि स्वत: व्रतस्थ जीवन जगुन शरयुत आत्मसमर्पण केले.


दुर्योधन म्हणतो धर्म काय आणि अधर्म काय हे मला चांगल कळत पण मला धर्म धरवत नाही आणि अधर्म सोडवत नाही.

शरण आलेल्या शत्रूला मारायचे नाही, धर्मयुद्ध, हातात सापडलेल्या शत्रुला बावळट कल्पनांच्या आहारी जाऊन सोडून द्यायचे इ . नीतीकल्पनांनी भारतीय इतिहासात पराभवांचे इतिहास गेले. श्रीकृष्ण हा उपयुक्ततावादाचा पहिला आचार्य. वेळ पडली तर कालयवनासमोरुन भरधाव पळ काढून झोपलेल्या मुचुकुंदाच्या गुहेत लपणारा, जरासंधाच्या द्वारकेवरच्या स्वाऱ्यांपासून पळुन जाऊन रणछोड हि उपाधी पत्करणारा, भीष्माला त्याच्याच कडे जाऊन त्यास मारण्याचा उपाय विचारण्याचा सल्ला देणारा, शंभर अपराध सहन करुन शेवटी यज्ञभूमिवर शिशुपाला चा वध करणारा, युद्धाचा बोल पांडवांवर येऊ नये म्हणून केवळ पाच गावे द्या म्हणून चलाख शिष्टाई करणारा, कंसमामाचा वध करुन भावंडांच्या हत्येचा सूड घेणारा, न धरि शस्त्र करी ची प्रतिज्ञा मोडून रथाचे निखळलेले चाक हातात घेऊन अनावर झालेल्या भीष्मावर चालुन जाणारा श्रीकृष्ण, गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी फोडवणारा भगवान श्रीकृष्ण हिच आपली राजनीती असली पाहिजे. पण अहिंसा आणि सद्‌गुण विकृतीला बळी पडून आपण आपले स्वातंत्र्य गमावले आणि ८०० वर्षे पारतंत्र्यात गेलो.

रामायण महाभारतात अनेक नीती कल्पनांची उकल आहे. वरवरची घटना पाहुन , एक एक घटना स्वतंत्र करुन महाकाव्याची संगती लावता येत नाही, संपुर्ण काळाच्या परिघात प्रदक्षिणा घालून त्यांची संगती लावावी लागते.
 अन्याय करणारे स्वत:च्या सोयीचे तत्वज्ञान निर्माण करुन स्वत:च्या अन्यायांचे समर्थन करत असतात. आणि अशा तत्वज्ञानाला कोत्या बुद्धीने विचार करणारे बळी पडत असतात आणि रावण-वाली--शूर्पणखा-दुर्योधन-कर्ण-कैकेयी- महिषासूर हे सर्व त्यांच्या दृष्टीने शोषित ठरतात व हेतुत: लोकांचा बुद्धीभेद करत६ असतात. न बुद्धीभेदं जनयेद !




Comments

Makarand Desai said…
साने जी, अगदी अचूक विचार.... भारत जेव्हा जेव्हा श्रीकृष्णांना विसरला आहे, तेव्हा तेव्हा भारत गुलामीच्या दिशेने गेला आहे ! धर्माच्या नावाखालील सद्गुणविकृती जेव्हा मदांध आणि राक्षसी आक्रमकांना मदत करते तेव्हा ती विकृती त्या आक्रमक मदांधतेपेक्षाही भयानक असते. विहिरीत पाव टाकून बाटले जाणाऱ्यांचे, मुळातले पाणीच कच्चे असले पाहिजे... त्यामुळेच "मी इराण्याकडेच काय पण अख्खा इराणी जरी खाल्ला तरी बाटणार नाही" अशी शिकवण देणारे सावरकर आदर्श ठरतात.... !

Popular posts from this blog

Freedom at Midnight मधील सावरकर–गोडसे आरोप : १९७७ च्या प्रज्वलंत दिवाळी विशेषांकातील न्यायालयीन नोंद

  १९७७ च्या ‘प्रज्वलंत’ दिवाळी विशेषांकातील एक महत्त्वाचा समकालीन दस्तऐवज Freedom at Midnight हे Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहिलेले पुस्तक १९७५ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरावर त्या काळात आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणाबाबत आज इंटरनेटवर अनेक परस्परविरोधी दावे आढळतात. काही ठिकाणी असे म्हटले जाते की केवळ खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती; तर काही ठिकाणी न्यायालयीन कारवाई झाल्याचा उल्लेख आहे. या वादाचा शोध घेताना मला मिळालेला अत्यंत महत्त्वाचा समकालीन स्रोत म्हणजे ‘प्रज्वलंत’ या मराठी नियतकालिकाचा दिवाळी विशेषांक, १९७७. या अंकातील संबंधित चार पाने येथे मूळ स्वरूपात देत आहे. या पानांमध्ये Freedom at Midnight च्या मराठी अनुवादाविरुद्ध करण्यात आलेली कारवाई, गोपाळ गोडसे यांची भूमिका, पुणे न्यायालयातील कारवाई तसेच ‘नागपूर न्यायालयात अभियोग दाखल’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच संबंधित मजकूर काढण्याबाबत प्रकाशकांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेचा ...

वृत्तविचार

वृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न ! काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत १. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद . १. अक्षरगणवृत्ते:- . प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात. १. लघु किंवा ऱ्हस्व व २. दीर्घ किंवा गुरु लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत. "ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील, ख,खि व खु ...

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...

. लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळे , नागवेकर व सहकारी यांनी गायलेले हे काव्य ऐकताना मनात एक शांत भाव दाटुन येतो. या गाण्याचे शब्द मला ऐकु येतात ते असे, . रात्र काळी घागर काळी यमुनाजळेही काळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी गळामोती येतावळी काळी वो माय... ॥ धृ ॥ मी काळी, कांचोळी काळी कासकासोनि ते काळी वो माय बुंथ काळी ... ॥ १ ॥ एकली पाण्याला, नव जाय साजणी सवे पाठवा मुर्ती सावळी वो माय बुंथ काळी... ॥ २ ॥ विष्णुदासनाम्याची, स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी वो माय बुंथ काळी.... ॥ ३ ॥ . विष्णुदासनामा हे एकनाथांच्या काळचे ! संत नामदेव महाराज वेगळे !! विष्णुदास म्हणजे विठ्ठलाचे दास. कृष्णाचे काळे रुप संतांना प्रिय होते. काळा रंग म्हणजे सर्व रंगांचे एकत्रीकरण. डांबर काळे असते त्यापासून सर्व रंग निर्माण करतात. सर्व मूळ रंग एकत्र केले की पुन: काळा रंग तयार होतो. यमुनेचे जळ काळे, घागर काळी. जे आणायचे ते काळे ज्यातून आणायचे ते काळे, जो आणतो आहे तोही आता काळाच. आता एवढे झाल्यावर वरपांगी रुप तरी व...