कायदेशीर दृष्ट्या कपुर आयोग उच्च न्यायालयात टिकणार नाही याची कल्पना आल्याने स्युडो सेक्युलरांनी, त्यांच्यातल्या काही मुखवट्यांना आता एकदम पलटी मारुन सावरकर कायदेशीर दृष्ट्या गांधीहत्येला जबाबदार नसले तरी नैतिक दृष्ट्या मात्र गांधीहत्येला जबाबदार आहेत असा स्वत:चाच मुद्दा खोडणारे मत मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रथम नैतिक दृष्ट्या सावरकर गांधीहत्येला जबाबदार होते या आरोपाला मी प्रथम उत्तर देतो. नैतिक दृष्ट्या गुन्हेगार हे कायद्याच्या कक्षेत येत नाहित. ज्या लोकांची ठाम समजूत असते की अमुक-तमुक व्यक्ती एका विशिष्ट घटनेला जबाबदार आहे पण न्यायालयात निर्दोष सुटला आहे वा प्रबळ पुराव्या अभावी सुटला आहे त्याच्या बाबत ते अशी संज्ञा वापरतात. हिच संज्ञा नथुरामला गांधीजींबाबत वापरायची होती. सुमारे दोन लक्ष लोकांचे फाळणीमुळे प्राण गेले, हजारो स्त्रियांची अब्रु गेली , कित्येक सक्तीने धर्मांतरीत झाले , आणि सुमारे २ कोटी लोक निर्वासित झाले, वर ५५ कोटी रु. गांधीजींच्या हट्टामुळे पाकिस्तानला देण्यास भारत सरकारकारला भाग पडले, या सर्वाला नथुरामने नैतिकदृष्ट्या गांधीजींना...