गांधीजींना तेथील सर्वधर्मिय प्रार्थनेत रामनाम सुरु झाले की मुसलमान उठून निघून जात हे पाहून खूप दु:ख झाले. हिंदुंची सक्तीची धर्मांतरे खून .बलात्कार ,मंदिरे-राजवाडे यांची नासधूस याची दखल स्वत: गांधीजींनीच आपल्या भाषणात घेतली.(दि.१५-११-१९४६ अ.प्रे.हिंद या वार्ता संस्थेचे वृत्त.) गांधीजींना हिंदु-मुस्लीम एकता धोरणाचे धोरणाचे "हेचि काय फल मम तपाला" असे झाले असावे.
गांधीजींच्या खूनात सहभागी असलेले विष्णु करकरे हे सुद्धा ५ नोव्हेंबर १९४६ ला बंगालकडे रवाना झाले होते. नागपुरला त्यांना श्री.द.मा.देशमुख व श्री. चांदे येऊन मिळाले. मध्यप्रदेश चे त्यावेळचे गृहमंत्रींनी या हिंदुत्वनिष्ठांना नौखाली च्या हिंदूंसाठी मदत निधी दिला. करकरे रायपुर ला पोचताच चंद्राबाई नावाच्या तरुणीला शेरखां अब्दुल हुसेन नावाचा गुंड नेत असल्यचे लक्षात येताच त्यांनी तिची सुटका करवुन हिंदु पुढारी लाला गुरुदत्त मल्ल यांच्या कडे पोचवले तिची शुद्धी करवून ,तिच्या चरितार्थाची सोय करण्यात आली.
हिंदुसभेचे हे पथक कलकत्याला पोचले. हिंदुसभेने तेथे निर्वासित आश्रय केंद्र व हॉस्पिटल उघडले होते. करकरे यांनी पुढे वेगवेगळी मदत केंद्रे सुरु केली. कपडे व अन्न यांचे वाटप सुरु झाले. चांदपुर ला एक पत्रकार करकरे यांना भेटला तेथे त्याचे हिंदूंच्यावर झालेल्या अत्याचारांचे टिपण करकरेंना पहावयास मिळाले. चांदपुर हून करकरे व हिंदुसभेचे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या.
दौलतगंज,विपुला.सोनाइमुरी इ.हिंदु वस्ती च्या गावांना भेटी दिल्या असता एकही हिंदु तिथे शिल्लक राहिला नव्हता. तेथुन जवळच करकरे दलाल बाजार येथे रॉय या संपन्न कुटुंबाकडे गेले. त्यांची तिजोरी मुसलमानांना फोडता न आल्याने त्या गुंडांनी क्रेन आणून ती नेली व पेट्रोल ने वाडा जाळला होता. तेथून नंदिग्राम,हाजीगंज,श्रीपुर,बादलपुर अशा अनेक गावांना नथुराम गोडसे यांचे सहकारी करकरे यांनी भेटी दिल्या व मदत कार्य केले. नौखाली चे हिंदुसभा अध्यक्ष त्यावेळी राजेंद्रलाल राय हे होते. हिंदुंना मुसलमानांपासून वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी लढता लढता प्राणार्पण केले.
करकरेंनी या दौर्याचे वृत्त वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केले. या दौर्याचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. पुढे गांधी वधाच्या खटल्यात त्यांनाही शिक्षा झाली. हिंदुमहासभा निवडणुकात पराभूत झाल्याने त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही.त्यामुळे काही जणांना हिंदु पक्ष महात्मा गांधी व कॉंग्रेसविरुद्ध फक्त आरडाओरडा करत राहिले त्यांनी प्रत्यक्ष असे कार्य काहिच केले नाही असा समज करुन घेतात. शालेय इतिहासात तर हिंदुमहसभा-जनसंघ इ. नावेच नाहीत.इतिहास विजेत्यांचा पक्षपाती असला तरी त्यांना इतिहास सहजासहजी पुसता येत नाही. तो कुठे ना कुठे तरी अस्तित्वात असतोच.
आंतरजालावर हिंदुमहासभेच्या कार्याविषयक रिपोर्ट - श्वेतपत्रिका उपलब्ध आहे , सत्यशोधक मंडळींसाठी त्याचे अनुसंधान (लिंक) याप्रमाणे,
http://ia600208.us.archive.org/23/items/shortreportofhin00slsn/shortreportofhin00slsn.pdf
No comments:
Post a Comment