Tuesday, August 23, 2011

भारतातील तुर्की सत्तांतर :- खिलजी ते तुघलक मार्गे(व्हाया) फसलेली भारतीय राज्यक्रांती

इ.स.१३२० मध्ये दिल्लीचे खिलजी घराणे जाऊन तुघलक घराणे आले. या सत्तांतराच्या दरम्यान भारतीयांच्या एका गटाने परकिय आक्रमक राष्ट्राविरुद्ध केलेल्या फसलेल्या क्रांतीची घटना समाविष्ट असून फार थोडया लोकांना या इतिहासाची माहिती असते. तुगलक घराण्याचा वेडा महंमद बहुतेकांना माहिती असतो. गिरिश कर्नाड यांचे "तुघलक" हे एक प्रख्यात नाटकही आहे. "अल्लाउद्दीन खिलजी व महाराणी पद्मिनी " यातून उभ्या राहिलेल्या संघर्षाची कथा,नाटक,सिनेमा रुपी कलात्मक माहिती येऊन गेली आहे. मराठीत याच काळावर अल्लाउद्दीन खिलजी च्या दरबारातील अमीर खुस्रो व दक्षिणी गायक कलाकार गोपाळ नायक यांच्यातील गायन जुगलबंदीची मध्यवर्ति कथा कल्पून "देवगिरी बिलावल " या नावे एक कादंबरीही २०-२५ वर्षांपूर्वी वाचलेली आठवते.गोपाळ नायक या महान भारतीय गायकाने अमीर खुस्रो याला यशस्वी टक्कर दिली. अमीर खुस्रो ने गोपाळ नायकांना हरवण्याचा प्रयत्न केला पण श्रुती, ग्राम,मुर्धना ,जाति मुर्धना इ. शास्त्रीय संगीताची वैषिष्ट्ये कशाशी खातात हे त्याला शेवटपर्यंत कळले नाही.तरिही अमीत्र खुस्रोच्या नंतरच्या इराणी संगीतज्ञाने काही राग खुशाल अमीर खुस्रोच्या नावावर दडपुन दिले आहेत.

मात्र या सत्तांतराच्या काळात गुजरात च्या भारवाड या एका लढाऊ जमातीने दिल्लीचे तख्त परत ताब्यात घेतले होते व तब्बल सहा महिने भारतीय राज्याची पुनर्स्थापना केली होती या रोमहर्षक इतिहासावर फारसा कोणी प्रकाश टाकलेला नाही. केवळ स्वा.सावरकरांनी एक स्वतंत्र प्रकरणच या विषयावर लिहिलेले आहे. मात्र "सहा सोनेरी पाने " हे इतिहासलेखन किंवा नाट्य-काव्यशास्त्र विनोद याची कलाकृती नसून इतिहास समिक्षा असल्याने त्यात बरेच तपशील आलेले नाहीत.(सहा सोनेरी पाने चे इंग्लिश भाषांतर करणारे कै.श्री.श्री.त्र्यं.गोडबोले यांचे एक अप्रकाशित नाटकही याच विषयावर आहे ते "प्रज्वलंत" मासिकातून प्रसिद्ध झाल्याचे आठवते )गुजराथीत " करण घेलो" या नावाची याच काळावर एक कादंबरी आहे. मी कॉलेजमध्ये असताना यावरच एक ऐतिहासिक कादंबरी लिहिण्याचा अव्यापारेषु व्यापार केला होता.

परंतु एकंदरीत एका बाटवल्या गेलेल्या अत्याचारीत भारतीयाने गुलामीतून बाहेर पडून तब्बल सहा महिने परत स्वतंत्र भारतीय सिंहासन स्थापित केले होते या रोमहर्षक कथानकाची भुरळ अन्य कोणत्या इतिहासकार,नाटककार,कथा-कादंबरीकार यांना पडू नये याचे आश्चर्य वाटते. अर्थात यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाहिही ! कारण बहुतेक आक्रमक धर्मांध तवारिखकारांनी या भारतीय वीरांची अत्यंत तीव्र शब्दात निर्भत्सना करुन शिव्या शापांची लाखोली वाहिली असल्याने परकियांच्या ओंजळीने पाणी पिणार्‍या , अस्मिता गमावलेल्या भारतीय इतिहासकारांनी व कथा-कादंबरीकारांनी त्यांचीच रि ओढली आहे. याला काही अपवाद असले तरी ते स्वत:च्याच निष्कर्षांना भीत भित त्यांनी लेखन केलेले असे आहे.

मात्र अमीर खुस्रो चे "देवलदी-खिज्रखॉं", "नुह-सिपेहर"," तुगलकनामा " या तवारिखा, झियाउद्दीन बरनी चे तारीख-ए-फिर्रोजशाही, इब्न बतुता व फेरिश्ता यांची अरबी-पर्शियन भाषेतील प्रवासवर्णने यातून जे लिहून ठेवले आहे त्यातून योग्य तो अर्थ काढत मूळ संदर्भ देत हा इतिहास मांडायचा हा एक प्रयत्न !( Elliot & Dowson : History of India VIII volumes)

पार्श्वभूमि

खिलजी सुलतान दिल्लीवर आले त्यावेळेपर्यंत दिल्लीत इस्लामी सत्ता पाय रोवून उभी होती. दक्षिण भारतात मात्र अद्याप आक्रमणाचा धक्का पोचला नव्हता. सातव्या -आठव्या शतकात अरबांचे एक मोठे आक्रमण भारतीयांनी यशस्वीपणे परतवले होते. ते एवढे यशस्वी झाले कि काहि हजारांच्या संख्येने आलेले आक्रमकांपैकी बातमी सांगण्यापुरतेच काय पाच-दहा जण जिवंअत परतु शकले. याचा जिहादींनी एवढा धसका घेतला की पुढे १०-१२ पिढयांपर्यंत इस्लामी आक्रमकांनी भारताकडे काणाडोळा करुन पहाण्याचे धाडस केले नाही. अमेरिकेत दह वर्ष हल्ला झाला नाही तर केवढा मोठेपणा समजला जात आहे. इथे जागतिक इस्लामीकरण व आक्रमणांच्या सुवर्णकाळात २००-२५० वर्षे तब्बल ८-१० पिढ्या एकही इस्लामी आक्रमण होऊ शकले नाही हा हिंदुंचा फार मोठा पराक्रम होता. हा इतिहास सुदधा अधोएखित केला जात नाही.पुढे सिंध चा काही भाग मुसलमानांनी व्यापला व सक्तीची धर्मांतरे घडवली. पुन: विजय मिळाल्यावर सिंधु च्या काठावर देवल महर्षींनी त्यांची प्रख्यात देवलस्मृती रचली व सर्व बाटवल्या गेलेल्या भारतीयांची शुद्धी करुन टाकली. ( नंतरच्या काळात अगदी शिवकाल व पेशवाईच्या काळातही व आजच्या काळातही याच देवलस्मृतीच्य आधारावर शुद्धी केली जाते. प्रत्येक स्मृती हि एक समाजसुधारणा होती.घटनादुरुस्तीच म्हणा ना. स्मृतींना कमी लेखण्याचे कारण नाही. संपूर्ण देवलस्मृती भाषांतरासह येथे पहा-> http://www.orkut.com/CommMsgs?cmm=26107071&tid=5521474067325686353)

परंतु पुढे हे धोरण राहिले नाही व ब्राह्मणवर्गाचा शुद्धीविरुद्ध कल होऊ लागला(दक्षिणा मिळत असली तरी विरुद्ध होता,पावित्याच्या अंध कल्पनांमुळे). ब्राह्मणेतर समाज शुद्धीच्या बाजूने होता. जसजसा हिंदूंचा सामरिक पराभव होऊन सत्ता आक्रमकांच्या हाती गेली तसतशी शुद्धी मागे पडली इतकेच नव्हे तर बाटवलेल्यांवर लक्ष ठेवण्याचीही इस्लामच्या पाईकांना गरज भासेनाशी झाली कारण बाटलेल्यांना समाज बहिष्कृत करुन स्वत:चेच कट्टर शत्रू निर्माण करत होता. तरिही कुराणाच्या आज्ञेप्रमाणे काफिरांशी वर्तणुक करणे व्यावहारिक दृष्ट्या दिल्लीच्या सत्ताधार्‍यांना शक्य नव्हते. यावर दिल्ली दरबारात एक मोठी चर्चा घडली व सर्वानुमते इस्लामचे भारतात काय धोरण असावे यासंबंधी एक व्यापक धोरण (Policy) ठरवले गेली. मुस्लीम अलिगढ विद्यापीठाने काही तवारिखांचे हिंदी अनुवादही केले आहेत त्यातील तारीख-ए-फिरोजशाही मधला संबंधित उतारा जसाच्या तसा,

"निजामुद्दीन जैनुदी (वझीर) ने उन उलेमाओंसे हो उपस्थित थे सुलतान के सम्मुख कहा, कि’ इसमें कोई संदेह नही या शक नही की आलिमोंने जो कुछ कहा वह ठिक है ।हिंदुओंके विषय में यही होना चाहिये कि या तो उनका वध किया जाए या उन्हे इस्लाम स्वीकार करने पर विवश किया जाए । (किंतु) हिंदू बहुत बडी संख्या में है। मुसलमान उनके मध्य में दाल में नमक के समान है। कही ऐसा न हो कि हम उपर्युक्त आदेशोंका प्रारम्भ करे और वे सुसंगठीत हो कर चारो ओर से विद्रोह तथा उपद्रव आरंभ कर दे। (इसलिए) जब कुछ वर्ष व्यतित हो जाएंगे और राजधानी के भिन्न भिन्न प्रदेश और कस्बे मुसलमानोंसे भर जायेंगे तथा बहुत बडी सेना एकत्र हो जाएगी . उस समय्हम आज्ञा दे सकेंगे की या तो हिंदुओं का कत्ल किया जाए या उन्हे इस्लाम स्वीकार करने पर विवश किया जाए।

खिलजी कालातही हिंदूंची स्थिती दारुण झाली होती. हिंदूंकडे द्रव्य साठू नये याची काळजी अल्लाउद्दीन खिलजी चे अधिकारी घेत. द्रव्य साठले तर हिंदू बंड करतील, त्यांना धर्माच्या आज्ञांप्रमाणे कठोरपणेच वागवले जावे असेच सवच मुस्लीम सत्ताधार्‍यांचे मत असे. अल्लाउद्दीनाच्या काळातील भारतीय प्रजेविषयी रियासतकार सरदेसाई लिहितात,

"हिंदूंना हत्यारे,घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत,उंची पोषाख करु नये,छानछोकीने राहू नये असा त्याने बंदोबस्त केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे.गाईम्हशींचासुद्धा कर द्यावा लागे.कोणाही हिंडूच्या घरात सोने,चांदी वा सुपारीसुधा उरली नाही.हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमनांच्या घरी चाकरी करावी लागे.हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींणा मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे" मुसलमानी रियासत पृ. १४१

तरिही सर्व थरातले हिंदू धर्मनिष्ठच राहिले. प्रसंगी अत्याचार सोसून व संधी मिळताच उलटुन ते अन्यायाचा प्रतिकार करत.फिरोजशहा तुगलकच्या काळातली खुद्द दिल्लीतीलच एका धर्मनिष्ठ ब्राह्मणाची एक गोष्ट झियाउद्दीन बरनी ने नमूद केली आहे ती अशी,

Third Mukaddama.—Burning of a Brahman before the Royal Palace.

A report was brought to the Sultán that there was in Dehlí an old Brahman (zunár dár), who persisted in publicly performing the worship of idols in his house; and that the people of the city, both Musulmáns and Hindus, used to resort to his house to worship the idol. This Brahman had constructed a wooden tablet (muhrak), which was covered within and without with paintings of demons and other objects. On days appointed, the infidels went to his house and worshiped the idol, without the fact be­coming known to the public officers. The Sultán was informed that this Brahman had perverted Muhammadan women, and had led them to become infidels. An order was accordingly given that the Brahman, with his tablet, should be brought into the presence of the Sultán at Fírozábád. The judges and doctors and elders and lawyers were summoned, and the case of the Brahman was submitted for their opinion. Their reply was that the provisions of the Law were clear: the Brahman must either become a Musulmán or be burned. The true faith was declared to the Brahman, and the right course pointed out, but he refused to accept it. Orders were given for raising a pile of faggots before the door of the darbár. The Brahman was tied hand and foot and cast into it; the tablet was thrown on the top and the pile was lighted. The writer of this book was present at the darbár and witnessed the execution. The tablet of the Brahman was lighted in two places, at his head and at his feet; the wood was dry, and the fire first reached his feet, and drew from him a cry, but the flames quickly enveloped his head and consumed him. Behold the Sultán's strict adherence to law and rectitude, how he would not deviate in the least from its decrees.

आक्रमक ब्राह्मण वर्गाला काही वेळा जिझिया करात सवलत देत असत, काही वेळा नाकारत असत. फिरिजशह तघलक ने ब्राह्मण वर्गाला सुद्धा जिझिया देणे भाग पाडले. त्यांच्या उपोषण ,सत्याग्र्ह याकडे दुर्लक्ष केले. शेवटी थोडीशी सवलत देऊन जिझिया लावला गेला.

The Jizya, or poll tax, had never been levied from Brahmans; they had been held excused, in former reigns. But the Sultán convened a meeting of the learned men and elders, and suggested to them that an error had been committed in holding Brahmans exempt from the tax, and that the revenue officers had been remiss in their duty. The Brahmans were the very keys of the chamber of idolatry, and the infidels were de­pendent on them. They ought therefore to be taxed first.

तवारिखांचा आदर्श महमूद गझनी असे. तारिखे फिरोजशाहीत जर सुलतान महमुद परत हिंदुस्तानवर स्वारी करता तर सर्वप्रथम त्याने इस्लामला रोखणार्‍या ब्राह्मणांची प्रथम कत्तल केली असती.भारतात हिंदुंना बाटवण्यात मुख्य अडसर ब्राह्मणांचा आहे. फखरे मुदब्बीर नावाच्या तवारिखकाराने हिंदूंचा विनाश कसा करावा हेच केवळ सांगणारा आदाबुल हर्ब वश्शुजाअत नावाचा ग्रंथ लिहिला.

हसन-खुश्रुखानाची पार्श्वभूमि

अल्लाउद्दीन च्या वेगवेगळ्या स्वार्‍यांमधे पराभूत भारतीयांना गुलाम म्हणून आणले जाई. या गुलामांकडून सक्तमजुरी करुन घेणे ,त्यांना बाटवणे या सारखी कामे करुन घेतली जात. स्त्रियांना बटकी ,दासी म्हणून जननखान्यात कामे करावी लागत.

इ.स.१२९९ च्या गुजराथवरील स्वारीत अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजेने केलेया गुजराथवरील हल्ल्यात गुजराथचा राजा कर्णदेव पराभूत झाला. खिलजींना अपार लूट मिळाली. त्याचबरोबर राजा कर्ण ची पत्नी कमलदेवी व कन्या देवलदेवी यांनाही पकड्ण्यात आले. त्यांच्याबरोबर सहस्त्रावधी हिंदू स्त्रिया व बालके पकडून गुलाम म्हणून दिल्लीला पाठ्वण्यात आली.शेकडो मंदिरे फोडली गेली किंवा मशिदीत रुपांतरीत केली गेली. खलजी राजवटीवर विशेष काम केलेले इतिहासतज्ञ के.एस्‌.लाल आपल्या History of the Khalajij या ग्रंथात लिहितात,

"The buildings of Allauddin outside the Capita lmentioned may be made of the mosque at Mathura and the tomb of Shaikh Farid which was probably a converted Hindu or Jain Temple. There is another Masjid built about the same time at Broach.It is also a convert Jain temple." page 332

याच स्वारीत वारंवर भ्रष्ट केले गेलेले सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन: फोडले गेले, तेथील मुर्ती दिल्लीला आणवून तख्ताची पायरी म्हणून वापरली जाऊ लागल्याची माहिती तारिख-ए-फिरोजशाही देते.

याच स्वारीत भारवाड या गुजरातमधील लढाऊ जमातीतले काही कुमार पकडून नेण्यात आले. त्यातील सर्वात जो देखणा होता त्याचे नाव "हसन" व त्याच्या भावाचे नाव हिसामुद्दीन असे ठेवले गेले.दरबारातले काही अधिकारी त्यांच्यावर समलिंगासक्त ख्झाले. पण हा हसन मनातून संतप्त होता. कमलदेवी हिला अल्लाउद्दीनाने जनानखान्यात घातले तर तिची मुलगी देवलदेवी हि अल्लाउद्दीनाचा मोठा मुलगा खिज्रखानाकडे पाठवण्यात आली. हसन वर अल्लाउद्दीनचा धाकटा मुलगा मुबारक खान याची अतोनात मर्जी झाली. खुश्रुखानाची जात काही वेळा परवार काही वेळा भारवाड अशी तवारीकातून दिली गेली आहे. या जातीविषयी माहीती अशी:- "काही मातापंथीय काही रामानंदपंथी- झाला बापजी या पुण्यवानास भजतात-नवस करतात-मृतांस जाळतात- क्रियाकर्म ब्राह्मणांकडून केली जाते-,वस्ती- गुजराथ व काही महाराष्ट्र- कृष्णाचा धर्मपिता नंद ज्या जातीचा होता त्याच मेहेर जातीचे हे लोक अशी एक कथा- काहिंचया मते वैश्य पुरुष व शूद्र स्त्री यांपासून हि जात निर्माण झाली ( शुद्र म्हणजे सवर्णच सवर्ण शब्दाची फोड ज्याला वर्ण आहे तो शूद्र हे सुद्धा स-वर्णच)-मुळचे गोकुळ ,वृंदावनातील असावेत. पुरुष कमरेभोवती,डोक्याला व खांद्यावर अशा तीन घोंगडया घेतात-गुरांचे,शेळ्यामेंढ्यांचे कळप पाळणे,दूध विकणे हे व्यवसाय- लग्नात ब्राह्मण पौरोहित्य करतो तो उपलब्ध नसल्यास मुलीकडील एखादी व्यक्ती करते- सोडचिठठीची पद्धत-विधवेस धाकट्या दिराशी लग्न करता येते. (संदर्भ भारतीय संस्कृती कोश)

परिया,परवार किंवा बरवड अशी काही असली तरी एक गोष्ट नक्की की हि एक लढाऊ जात असून त्या काळात सैन्यात नोकरीला या लोकांना बर्‍याच राजांकडून ठेवले जात असे.

विटंबित झालेला "हसन" संधीची वाट पहात होता. आपल्या पराक्रमाने तो वरच्या पदाला पोचत होता. सन १३१६ बाटलेल्या मलिक काफूर याने अल्लाउद्दीन ला ठार मारले व स्वत:च सुलतान झाला. अल्लाउद्दीनाच्या सर्व मुलांना त्याने कैदेत घातले पण हसन खुष्रुखानाच्या अंतस्थ सहायामुळे लवकरच मुबारकखानाला सुटका होऊन मलिक काफुरला ठार करता आले.मुबारकखान लगेचच तख्तावर आरुढ झाला व सुलतान कुतुब-उद-दीन नावाची द्वाही फिरवता झाला. या हसनला त्याने खुश्रुखान हि पदवी देऊन सर्व राज्यकारभार त्याच्या तंत्राने चालवू लागला.खुश्रुखानाने आपल्या गुप्त बेतांचा कोणताही सुगावा लागु दिला नाही. पण त्याच्या मनात दिल्लीला हिंदुपदपादशाही स्थापन करण्याचे विचार होते हे त्याच्या पुढच्या कृत्यांवरुन दिसून आले.मलिक काफुरप्रमाणेच खुश्रुखानानेही दक्षिणेत विजय मिळवले.पण त्याने हिंदू राजांना जिंकले तरी सुलतान दक्षिणेकडची स्वारी त्याच्या आधीन करुन दिल्लीत परतल्यावर खुश्रुने हिंदुंवर अत्याचार केल्याचे दिसत नाही. उलट

मलबार ला ताकीखान नावाच्या एका धनाढ्य मुसलमान सावकराशी त्याचे वैर उत्पन्न होऊन त्याची सर्व संपत्ती त्याने हरण केली. दक्षिणेतील हिंदु राजांबरोबर त्याने कटकारस्थाने सुरु केल्याची कागाळि सुलतान कुतुबुद्दीनाकडे होऊ लागल्याने अचानक त्याला दिल्लीला परत येण्याचा हुकून दिला गेला. काही तवारिखकार त्याला कैद करुन आनले गेले असेही लिहितात. यावेळी खुश्रुखानाच्या मनात कदाचित दिल्लीला परत न जाताच तेथील हिंदु राजांच्या मदतीने स्वतंत्र राज्य स्थापन करायचा विचार असावा.

(Mullik Khoosrow, who had gone to Malabar, stayed there about one year. He plundered the country of one hun­dred and twenty elephants, a perfect diamond, weighing one hundred and sixty-eight ruttys, with other jewels, and gold to a great amount. His ambition was increased by his wealth; and he pro­posed to establish himself in the Deccan in an in­dependent sovereignty.)

त्याआधी त्याच्या भावाला, हिसामुद्दीन याला,गुजराथचा सुभेदार म्हणून पाठवले असता तेथील हिंदू सरदारांशी कट केल्याच्या सुगावा लागल्याने पकडून दिल्लीला आणवले गेले असता शिक्षा म्हणून त्याला ४-२ थोबाडीत मारुन सुलतानाने सोडून दिल्याची तक्रार तवारिखातून दिसते.

याचप्रमाणे खुश्रुखानाचा दक्षिणेतला कट फसला असावा व त्वरित दिल्लीला परतावे लागले. दिल्लीला परतल्यावर खुश्रुखानाने आपण जिंकलेली संपत्तीची रास सुलतानापुढे ओतली. सुलतानाने त्याचा बहुमान करुन त्याच्याविरुद्ध कागाळ्या केलेया सरदारांना कडक शिक्षा केल्या. खुश्रुखानाने यापूर्वीच आपल्या बर्‍याचशा हिंदू नातेवाईकांना दिल्लीला बोलावून घेतले होते. त्यांना काही अधिकाराच्या व सैन्यातील जागाही देवविल्या होत्या. त्याच्या मामाचे नाव "रणडोल" असे अमीर खुस्रो लिहितो. इतर सहकार्‍यांची नावे कर्कमाजनाग, ब्रह्म,जहारिया अशी काही सामान्य तर काही चमत्कारीक वाटणारी दिली आहेत.झियाउद्दीनने "तोबा" नावाच्या एकाच साथिदाराचे नाव दिले आहे. हा दरबारात विदुषकी चाळे करीत असावा असे दिसते.

परंतु तवारिखांनी दिलेलि माहिती व शिव्याशाप नि:संशय एकतर्फी आहेत. अमीर खुस्रो हा "निजामुउद्दीन औलिया" याचा चाहता होता. त्याची आई हिंदू असून त्याचे बालपण आजोळी गेल्याने त्याच्यावर नि:संशय कडवे संस्कार जाले नव्हते. त्याच्या तुगलकनामात त्याने तुलनेने खुश्रुखानाविषयी झियाउद्दीन बरनी पेक्षा सौम्य भूमिका घेतली आहे.हे दोघेही या सर्व इतिहासाचे प्रत्यक्षदर्शी दरबारी असल्याने त्यांनी लिहिलेल्या माहिती ला नक्कीच मोल आहे. निजामुद्दीन औलिया हा नंतर सत्तेवर आलेल्या तुघलकांच्या विरोधी होता. "दिल्ली तो बहोत दूर है " हा इतिहासप्रसिद्ध वाक्‌प्रचार म्हणजे या अवलियाने घियासुद्दीन तुघलकाचा आदेशाला दिलेले उत्तर आहे. असो.एकंदरीत खुश्रुखानाने सुलतानाची त्याच्यावरील कामासक्ती, स्वत:चा पराक्रम व अभिनय व आपल्या भारवाडांचे सैन्य या जोरावर आपला पक्ष बळकट करत आणला होता.

रियासतकार सरदेसाई खुश्रुखानाविषयी लिहितात - "खुश्रुखानाचे आचरण चमत्कारिक आहे. त्याच्या हातून अनेक असंबद्ध कृत्ये घडली. प्रथमत: त्याने सरकारी खजिना खुला करुन फौजेस मुबलक द्रव्य देऊन तिला वश केले. त्याने आपल्या नावाचा खुत्बा वाचवला,स्वत:ची नाणी पाडली व पुढे स्वत:ला हिंदु समजून तो मुसलमानांविरुद्ध वर्तन करु लागला.त्याने देवलदेवीशि लग्न केले ( गुजरात ची अल्लाउद्दीन ने पळवलेली राजकन्या ,राजा करण घेला याची मुलगी). त्याच्या हिंदु अनुयायांनी दिल्लीतील सर्व मशिदीत मुर्ती स्थापन केल्या. .....चितोड व रणथंबोरच्या हिंदु राजांन्नी प्रयत्न केला असता तर त्यांना स्वतंत्र होण्याची संधी होती. पण त्यंनी प्रयत्न केला नाही. ... हिंदुपदपादशाही स्थापण्याची खुश्रुखानाची फार इच्छा होती. त्याच्याविषयी बखरकारांनी दिलेली माहिती नि:संशय एकतर्फी आहे. ह्यावेळी हिंदुंनी लिहिलेली माहिती सापडली तर त्यांच्या या बंडाचा चांगला उलगडा होऊ शकेल."

यानंतर प्रत्यक्ष दिल्लीच ताब्यात घेण्याची योजना खुश्रुखानाने आखली.इब्न बतुता या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार त्या काळी स्वत:हून मुसलमान होऊ इच्छीणार्‍या हिंदूंना स्वत: सुलतान भेटून सोन्याची साखळई ,थोडेफार द्रव्यादी सन्मान देत असे.

  • One day Khusrú Khán told the Sultán that several Hindus desired to become Musulmáns. It is one of the customs in this country that, when a person wishes to become a convert to Islám, he is brought before the king, who gives him a fine robe and a necklace and bracelets of gold, proportionate in value to his rank. The Sultán told Khusrú to bring the Hindus before him, but the amír replied that they were ashamed to come by day on account of their relations and co-religionists. So the Sultán told him to bring them at night.

  • वरील मजकुरात फार अर्थ भरलेला आहे. एकतर शांततेच्या काळात पैसा वापरुन आमिष दाखवून धर्मांतरे होत. ज्यांना या फायद्यांसाठी बाटायचे होते त्यांना त्याची शरम वाटे. म्हणून त्यांना बळाने रोखु शकणारा कोणीही नसला तरीही ते हे कृत्य करण्यास समाजापासून लपुन छपुन जात. सर्व जाती व वर्ग सहसा धर्म बदलण्यास अनुकूल नव्हते. बहुतेक स्वार्‍यंमधे हजारो लोक बाटवले जात. पण समाज धुरीणांच्या महामुर्ख पणा मुळे या बाटलेल्या लोकांची शुद्धी होण्याची शक्यताच उरली नव्हती व आक्रमक राष्ट्राला एकदा बाटवलेल्यांवर नजर ठेवण्याची गरज उरत नसे. युरोप व अन्य जगात मात्र अरबी राष्ट्रवाद्यांना नव्यानेच सामिल केलेल्या राष्ट्रिकांना संभाळणे हि डोकेदुखी असे कारण संधि मिळताच ते लोक इस्लाम सोडत.

रात्री मुसलमान होऊ अशा बहाण्याने आलेले सर्व हिंदूंनी अचानक दंगल माजवली. सुलताना संशय येऊन तो पळू लागला. तेवढ्यात खुश्रुखानाचा सहकारी जहारीया तिथे पोचला व सुलतानाचे डोके त्याने छाटुन टाकले.

उजाडता उजाडता सर्वत्र खुश्रुखानाच्या नावे द्वाही फिरवली जाऊन सर्व दरबारींना भारवाडांनी पकडून आणले व सर्वांची नव्या सुलतानाला मान्यता मिळाली. सुलतान नासिरुद्दीन खुश्रुशहा असे नाव घेऊन तख्तावर बसला. येथपर्यंत जे झाले ते सत्तांतरच्या इतिहासात सर्वसामान्य होते. अल्लाउद्दीन खिलजी स्वत:चा चुलता व सासरा जल्लालुद्दीन खिलजी चा खून करुन सत्तेवर आला. मलिक काफुरने खिस्रखानाचे डोळे फॊडले. तर मुबारक खान उरल्यासुरल्या अंध केलेल्या भावांचा खून करुन त्यांच्या बायका आपल्या जनानखान्यात घालून तख्तानशीन झाले होते. पण सर्वजण खलिफाचे प्रतिनिधी, इस्लामचे नेक पाईक , भारत दारुल-इस्लाम करण्याला कटीबद्ध होऊन आले होते. परंतु नव्या सुलतानाने व नविनच खेळ आरंभला. दिल्लीतील मशिदीतून मुर्तींची स्थापना केली जाऊन पूजाअर्चा होऊ लागली, कुराणाचा सन्मान राखला गेला नाही, मुसलमान स्त्रिया हिंदूंच्या आती सोपवल्या गेल्या इ. आरडाओरड व आरोप त्यांनी खुश्रुखानावर करत त्याच्यावर शिव्यांची लाखोली वहात, त्याची खालची जात काढत तवारीखांनी केली आहे. खुश्रुखानाने गोहत्याबंदी केली व जे जे हिंदूंना पवित्र त्या सर्वाचे पावित्र्य राखण्याचे हुकूम काढले गेले.

झियाउद्दीन बरनी लिहितो,"हिंदुओने कुरान का कुर्सी के स्थान पर प्रयोग करना प्रारम्भ कर दिया ।मस्जिद के ताकी में मुर्तिया रख दि गयी और वहा मूर्तीपूजा होने लगी। उस xxx का राज्याभिशेक होने से तथा हिंदुओंके अधिकारसंपन्न होने से काफिरी नियमोंको उन्नती प्राप्त होने लगी।"

इसामी हा आपल्या फुतुहत सलाटीन मध्ये लिहितो," खुसरोखॉं के शासन में मुसलमान अत्यंत निर्बल हो गये। मुसलमानोंको बडी हानी पहुंची।"

इब्न बतुता लिहितो," जब खुसरो खॉं सुलतान हुआ तो उसने हिंदुओंको विशेषरुप से सम्मानित करना प्रारम्भ कर दिया। वह खुल्लमखुला इस्लाम के विरुद्ध कार्य करने लगा । उसने काफीर हिंदुओंकी प्रथा के अनुसार गौहत्या रोक दी । हिंदू गौ का बडा सम्मन करते है । खुसरो खॉं चाहता था की मुसलमान भी ऐसाही करे।"

"This event occurred on the 25th of Rubbee-ool-Awul, in the year 721. In the morning Khoosrow, surrounded by his creatures, ascended the throne, and assumed the title of Nasir-ood-Deen. He then ordered all the slaves and servants of Moobarik, whom he thought had the least spark of honesty, to be put to death, and their wives and children to be sold as slaves. His brother was dignified with the title of Khan Kha-nan, or chief of the nobles, and married to one of the daughters of the late Alla-ood-Deen. Khoos-row took Dewul Devy, the widow of his murdered master and sovereign to himself, and disposed of the other ladies of the seraglio among his beggarly relations."

-History of the Rise of Mohammedan Power in India

तथापि मुसलमानांनाही एकदम दुखावणे बरे नाही म्हणून इमामांकडून त्याने आपल्या नावाचा खुत्बाह पढवून घेतला. खुत्बा म्हणजे सुलतानाच्या सन्मानाची प्रार्थना व घोषणा असते. त्याचबरोबर त्याने आपल्या नावाचे नाणेही पाडून घेतले. सुदैवाने ते आजही उपलब्ध असून त्याचे छायाचित्र पुढील प्रमाणे ,


Nasir al-Din Khusru (1320), Billon 2-gani Weight: 3.53 gm., Diameter: 17 mm., Die axis: 11 o'clock Legend: al-sultan al-azam nasir al-dunya wa'l din, dated 720 (= 1320 CE) / Legend, within circle: shah khusru, around: al-sultan wali amir al-muminin

यानंतर खुश्रुखानाने देवलदेवीशी विवाह केला. तिचे या कटात मोठा सहभाग असल्याचे सावरकरांनी नमूद केले असले व बरेच महत्व दिले असले तरी तसा कोणताही ऐतिहासिक पुरावा फारसा मिळत नाही.मात्र एकंदरीत गुजरातच्या या राजकन्येच्या आयुष्याची परवड झाली यात संशय नाही.

खुश्रूखानाची कारकिर्द खुश्रूखानाची सुलतान म्हणून कारकिर्द २० एप्रिल १३२० ते ६ सप्टेंबर १३२० अशी साधारण साडेचार महिन्यांची आहे. (संदर्भ Advance study in the History of India by J.L.Mehta page nos.185-86)

पहिल्या तीन महिन्यात त्याच्याविरुद्ध कोणाही मुसलमान सरदाराची ब्र ही काढण्याची छाती झाली नाही. मात्र यावेळी देशाच्या अन्य भागातील हिंदू राजांनी कोणताही उठाव केला नाही. बहुतेक स्वस्थ रहा व पहा असे धोरण त्यांनी अवलंबले. खरे तर यावेळेपर्यंत खिलजी राजवटींविरुद्ध अन्य राजे उठाव करत असत. ते शांत बसले होते असे अजिबात नसून हिंदूंचा सततचा अंतर्गत उपद्रव व सीमेवर मोगलांचे हल्ले याने ते त्रासलेले असत. हा उपद्रव एवढा होता की वेड्या महंमदाने आपली राजधानी देवगिरीला हलवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हिंदू बंडखोरांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल असा त्याचा कयास होता. पण या काळात कोणताही उठाव झाला नाही व परकिय राष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची हि एक चांगली संधी भारतीयांनी गमावली असेच म्हणावे लागते.

गियासुद्दीन तुघलक हा पंजाबचा सुभेदार असून कुशल असा सेनापती होता. मोगलांशी त्याला सतत युद्ध करावे लागल्याने लढाई करण्यात अनुभवी होता. त्याने खुश्रूखानाविरुद्ध प्रथम इस्लाम खतरेमेची घोषणा केली. प्रथम त्याने काही सरदरांना गुप्तपणे पत्रे पाठवली. पण खुश्रुखानाच्या दहशतीमुळे फारसे कोणी खुश्रुखानाच्या विरुद्ध जाण्यास धजेना. याचवेळी फक्रुद्दीन जेना हा तुघलकाचा मुलगा जो पुढे वेडा महंमद म्हणून इतिहास प्रसिद्ध झाला तो एका रात्री खुश्रूखानाच्या कैदेतून निसटण्यात यशस्वी झाला. खुश्रुखानाने संकट ओळखून ताबडतोब एक तुकडी आपल्या भावाच्या नेतृत्वाखाली तुघलकावर पाठवून दिली. यानंतर अजून काही मुसलमान सरदार तुघलकाला जाऊन मिळू लागले. तघलकाचे व खुश्रुखानाच्या सैन्याची शेवटी "इंद्रप्रस्थ" या प्राचीन नगरात गाठ पडली.

तुघलकनामामध्ये अमीर खुस्रो ने या लढाईचे वर्णन दिले आहे. तो लिहितो," खुसरो खॉं के भाई हिसामुद्दीन ,राय रायॉं रंधोल हातिम खॉं, और बहुत से नये अमीर जो गुलामी से अमीरी की श्रेणी तक पहुंचे थे अपनी अपनी सेनायें लिए साअथ थे। सेनाके आगे हाथियों की पंक्तिया थी और उन्ही के चारो ओर दस हजार ब्रादि ( अर्थात भारवाड) जाति के सवारे थे। उनके नाम अहर देव,अमर देव,नर्सिया,पर्सिया, परमार आदि थे।"

युद्ध सुरु झाले. सुरुवातीला खुश्रुखानाला यश मिळत होते. पुन: एकदा बाजी पलटली तेव्हा सर्व हिंदू सैंन्य संतापले व ग्यासुद्दीनाच्या सैंन्यावर तुटुन पडले.

अमीर खुस्रो लिहितो,"...इतने में हिंदुओंकी सेनाने आक्रमण कर दिया। मैल गाजी (तुगलक) तुरंत इस भय को भॉंप गया । हिंदुओंके "नायाsssयण" के नारे के साथ उसने "अल्ला हू अकबर का नारा लगाया । किन्तु यह आक्रमण इतनी तीव्र गतीसे किया गया था कि गाजी के सॅंभलते सॅंभलते हिंदुओंने उसकी सेना के बहुत झण्डे काट डाले ।"

याप्रमाणे हिंदूंचा विजय झाला व ग्यासुद्दीन काही अंतरापर्यंत पळून गेला. पण निकराची वेळ ओळखून त्याने फिरुन पुन: सैंन्य गोळा केले व विजयाने गाफील झालेल्या खुश्रुखानाच्या सेनेवर परत आक्रमण केले. तुगलकाचा हा हल्ला अचानक व वेगाने झाल्याने त्याच्या सैंन्यापासून वेगळा पडला. हिंदुंधे अंदाधुंदी माजली. काही जण दिल्लीकडे पळाले तर काही जण गुजरात च्या दिशेने. त्यांचा पाठलाग करुन त्यांना मारण्यात आले. काही पळाले. खुश्रुखानालाही पकडून ताबडतोब ठार मारले गेले. सक्तीने बाटवलेल्या व अन्य हिंदूचा एक उद्रेक फसला.

खुश्रुखान अपयशी ठराला. पण त्याचे महत्व कमी होत नाही. छळात पिचून जाऊनही त्याने आपल्या हिंदुत्वाची निष्ठा मनात जागरुक ठेवली होती व वेळ येताच ४-५ महिन्यांसाठी का होईना दिल्लीचा हिंदू सुलतान बनला. बाटलेल्यांनी आपल्या हिंदू नातेवाईक व मित्रांच्या मदतीने पलटुन वार केल्याची हि पहिलीच घटना होती. सन ६ सप्टेंबर १३२० ला खुश्रुखान मारला गेला. पण बाटलेल्यांनी परत हिंद् होऊन हिंदुराज्य स्थापन करण्यासंबंधीच्या त्याच्या स्मृती इतिहासाच्या गती-प्रतिगतीच्या लाटांवर तरंगत राहिली. सन १३२४ मध्ये काश्मिरच्या शेवटच्या हिंदू राणी कोटाने आपला नवरा मुस्लीम झाल्याने शस्त्र उपसले तर दक्षिणेत पुढे केवळ सोळाच वर्षांनी म्हणजे सन १३३६ मध्ये हरिहर व बुक्क या दोन बाटवल्या गेलेया तरुणांनी पुन:श्च हिंदूत्व स्वीकारून विजयानगरचे प्रबळ व वैभवशाली हिंदू साम्राज्य उभारले.

समाप्त

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...