Tuesday, August 23, 2011

वाल्मिकी रामायणाचे आकलन

रामायण हा एक इतिहास आहे. तो काव्यात्मक इतिहास आहे. यात वेगवेगळी अनेक प्रकारची भर पडलेली असून ते इतिहास नसून केवळ त्याचे आपल्या राजकीय ,जातीय, मानसिक गुलामगिरी यांचे प्रदर्शन आहे. काहिच भाग हे नव्या वाटा शोधतात. आपल्या पूर्वजांनी हे जे इतिहास लिहिले त्याचे स्वरुप सांस्कृतिक इतिहासाचे असून घटनात्मक पद्धतीने लिहिलेले नाहित. सांस्कृतिक इतिहासाचे आधुनिक पद्धतीने परिक्षण करणे मूळातच चूक आहे. जीवशास्तरातले प्रश्न पदार्थविज्ञानाने सोडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे हे आहे.एखाद्या पुस्तकात अभावाचा मुद्दा आला की लगेच घटनात्मक चिकित्सा करणारे संशोधक ती गोष्ट त्याकाळि अस्तित्वातच नसल्याचा शोध लावतात.उदा. पाणीनीच्या व्याकरणात स्त्रियांच्या नाकातील दागिन्यांचा उल्लेख नसला तर त्याकाळी नाकात दागिने घालण्याची प्रथाच नव्हती असे विचित्र अनुमान हे लोक काढतात. त्यांची बुद्धी भारतीय संस्कृती हिन ठरवण्यासाठी इतकी व्याकुळ असते की मुळात पाणीनी चा हा ग्रंथ दागिने किंवा अलंकार या विषयावर नसून व्याकरणावर आहे याचाही त्यांना विसर पडतो.रुपक कथा उलगडताना त्याचे तारतम्य ठेवावे लागते.परंपरांचा विचार करावा लागतो.

..............

रामायण हा इतिहास आहे असे वाल्मिकी रामायणच सांगते.

"पूजयंश्च पठंश्चैनमितिहासं पुरातनम्‌" वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग १२८

महाभारत व अन्य साहित्य यात रामायणातील अनेक उल्लेख आले असून महाभारतात रामानंतरचा ३६ वा राजा मारला गेल्याचाही उल्लेख आहे.

ज्याप्रमाणे रामाच्याच वंशातील एका राजपुत्राचा राजकर्तव्याखातर राजाला त्याग करावा लागला तसाच रामाला केवळ सीतेचाच नव्हे तर लक्ष्मणाचाही त्याग करावा लागला. त्याची कथा अशा प्रकारची. एकदा कालपुरुष रामाशी चर्चेसाठी आला असता त्याने त्यास आपल्या एकांतात जर कोणी आला तर मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे सांगितले. रामाने लक्ष्मणालाच कोणी आत येऊ नये म्हणून राखण करायला सांगितले. थोड्याच वेळात संतापी ॠषी दुर्वास तेथे आले असता त्याम्णि मला आताच्या आता रामाला भेटायचे आहे व अवज्ञ केल्यास अयोध्या भस्मसात करेन असा धाक घातला. लक्ष्मणाने नाईलाजाने आत प्रवेश केला. राजधर्माप्रमाणे रामाने सीतेप्रमाणेच दंड म्हणून अमात्य व मंत्री मंडळाच्या सल्ल्याप्रमाणे लक्षमणाचा त्याग केला. रामावाचून लक्ष्मण म्हणजे त्याचा मृत्युच. लक्ष्मणाने शरयु त प्राणांचा अवरोध करुन जलसमाधी घेतली.

हि कथा येथे थोडक्यात देण्याचे कारण की सीता त्याग हा लिंगभेदाचा प्रश्न नसून राजधर्माचा विषय होता हे या लक्ष्मण त्यागाच्या प्रसंगावरुन स्पष्ट होत आहे. सीतेला ,एका स्त्रीला वेगळा न्याय व लक्ष्मणाला .एका पुरुषाला वेगळा न्याय असा प्रकार नव्हता.

पुढे इतर विषय हाताळण्याआधी एक स्पष्ट करावेसे वाटते. आर्य - अनार्य हि थेअरी टाकाऊ असून भारतात भेदनीती रुजवण्यासाठी हि घाणेरडी गोष्ट युरोपिअन संशोधकांनी माथी मारली आहे हे स्पष्ट केले पाहिजे.आर्य हा शब्द वंश या अर्थी भारतीय साहित्यात आलेला नाही. हे वैचारिक बलात्कार करुन युरोपिअन लोकांनी आपल्या राजकिय-आर्थिक आक्रमणासोबत सांस्कृतिक आक्रमकतेचे धोरण राबवले असून त्यात ते कमालीचे यशस्वी ठरले यात संशय नाही. साम्यवादी इतिहासकार किंवा अन्य विषिष्ट हेतुने केलेया इतिहासावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याला संस्कृत येत नाही हे रड्सगाणे आळवण्यापेक्षा ते शिकावे किंवा निदान त्यांची अधिकारी अशा शास्त्री-पंडितांनी केलेली प्रामाणिक भाषांतरे तरी एकदा पहावीत. साम्यवादाचा अंतिम हेतु काय आकाशातून टपकला आहे का कि काय?

महाभारतात शांतीपर्व अध्याय ५९ मध्ये पुढिळ श्लोक आलेला आहे,

न वै राज्यं न राजाSसीत्त्‌ न दण्डो न च दाण्डिक: ।

धर्मेणैव प्रजा: सर्वा रक्षन्ति स्म परस्परम्‌ ॥ १४॥

भावार्थ: - "तेथे राज्य नाही,राजा नाही,दण्ड करणारी शासनयंत्रणा नाही व जिला दण्ड करायचा असा अपराधीही नाही.कर्तव्यासाठीच कर्यव्य या जाणीवेचा पूर्ण उदय होऊन लोक तेे परस्परांचे रक्षण करतात.

मार्कस च्या " Withering away of the State" हि कल्पना कृतयुगातील वरिल श्लोकातून केलेली उसनवारी आहे हे स्पष्ट च आजे. पण निवाळ जडवादाचा विचार करुन जाणीव व मन यांचे स्वातंत्र्य ल्कक्षात न घेता हि सर्व मांडणी झाल्याने ती आता केवळ एक कल्पनासृष्टी म्हणून राहिली आहे.

या कृतयुगातील या विकसित अवस्तेला उतरती कळा त्रेतायुगात लागून समाजात काही अपराधी बीजे उत्पन्न होतात व दण्डशक्तीची गरज उत्पन्न होते व सामाजिक जीवनाची पातळी त्रेतायुगात टिकून रहाते. भगवान श्रीराम हे या दंडशक्तीचे आदर्श प्रतिक. द्वापारयुगात हा राजदंडही अपकृष्ट रुप धारण करतो तेव्हा संस्कृतीलाही ती नष्ट करावी लागते. भगवान श्रीकृष्ण या द्वापारयुगाचे आदर्श होत. सार्वत्रिक अध:पतन होते, लोकांची मती भ्रष्ट होते ते हे कलियुग. कलियुगात मुख्य मंत्र असतो तो स्वत:च्या हक्कांचा , पण त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीव सर्व समाजाला करुन देण्यात समाजधुरीण कमी पडतात. "हक्क" या एकाच शब्दाभोवती फेर धरुन समाज मने प्राचीन ग्रंथांची चिरफाड करतात , " कर्तव्य" या शब्दाची मातब्बरी संपते.

रामायण कालात राजसत्ता असली तर लोकेच्छा हिच प्रमाण

रामायणात राजसत्ता असली व राजा हा विशिष्ट वंण्शातून निवडला जात असला तरी लोकेच्छा हिच प्रमाण रामायण काळात होती ,निदान रामायणात तरी तसे उल्लेख आहेत. आपला राजा व राणी कोण हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला होता. स्वत: रामाच्या इक्ष्वाकु वंशातल्याच एका राजाला लोकेच्छेखातर त्याग करावा लागला होता. भारतीय शासनसंस्था कधिही अनियंत्रित नव्हती.

रामायण, अयोध्याकांड,सर्ग १ म्हणते,

" याप्रमाणे ज्याच्या पराक्रमाला तोड नाही अशा शीलचारित्र्य संपन्न समर्थ अशा रामाने आपला "राजा" व्हावे अशी प्रजेची इच्छा झाली. राम प्रजेला अत्यंत प्रिय आहे हे दशरथाने ओळखले.

रामायण, अयोध्याकंड सर्ग २ मधे दशरथाने रामयुवराज्याभिशेकाचा हा निर्णय लोकांवर सोपवला. या श्लोकात तो म्हणतो ," मी जे ठरवेले आहे ते विचारपूर्वकच अशी आपली खात्री असेल तरच मला संमती द्यावी किंवा मी दुसरे काय करावे ते सांगावे.जर मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला हिताची वाटत नसेल तर स्वहिताचा निर्णय प्रजेने स्वतंत्र पणे घ्यावा. "

यानंतर सभेत "राम ,राम " अशा घोषणा झाल्या यावर पुढील श्लोकात दशरथ विनोदाने पण गांभीर्याचा आव आणून म्हणतो,

"काय हो !मी धर्माने तुम्हा लोकांचे आजवर पालन पोषण केले असूनही तुम्ही माझ्या युवराज का करु पहाता?(माझ्याहून तो तुम्हाला अधिक प्रिय कसा?)

अराजकता प्रजेला कधीच मान्य नसल्याने राम-लक्ष्मण वनवासाला गेल्यावर व भरत ,शत्रुघ्न उपस्थित नसल्याने ताबडतोब वसिष्ठांच्या अध्यक्षतेखाली सभा भरुन अन्य योग्य पुरुषाची निवड करण्याची प्रक्रीया सुरु झाली,

इक्ष्वाकूणामिहाद्यैव कश्चिद्राजा विधीयताम्‌ ।

अराजकं हि नो राष्ट्रं विनाशं सम वाप्नुयात्‌ ॥८॥

आपले हे राष्ट्र अराजकामुळे विनाश पावु नये म्हणून इक्ष्वाकु कुळातीलच कोणाला तरी त्वरीत राजा करावे"

निष्कलंक सीता दहा महिने रावणाच्या कैदेत राहिल्यावर राणी म्हणून सिंहासनावर असावी का नाही याची कुजबुज नसून खूप मोठी चर्चा अयोध्येत सुरु झाली. कोण कोणाची बायको असावी एवढ्यापुरता हा प्रश्न मर्यादित राहिला नसून आपली राणी म्हणून कोण असावे हा प्रश्न होता.

युरोपिअन संशोधकांचे हेतु

भारतीय संस्कृती हिन दर्जाची ठरवणे , जे चांगले असेल ते त्यांनी आपल्याकडून घेतले व हिण असेल ते मात्र स्वत: भारतीयांचेच असा नीच हेतु मनात ठेवूनच बहुतांशी युरोपिअनांचे लेखन झाले आहे. त्यांचे हेतु त्यांनी लपवले सुद्धा नाहीत. मॅक्स मुल्लरनेच Chips from a German Workshop" याच्या प्रस्तावनेत आपल्या संशोधनाच्या हेतुंची कबुली दिली आहे.

http://www.gutenberg.org/files/24686/24686-0.txt

भारतवर्ष आध्यात्मिक दृष्ट्या हिन दर्जाचे व रानटी अवस्थेतील आहे असा प्रचार सुरु झाला. पराभूतांचा इतिहास कोणत्या हेतुने प्रेरित असतो त्याचे हे उदाहरण आहे. पण आपल्या थोर थोर विचारवंतांना भारतीय इतिहासात्च आर्य -अनार्य असा खोटा संघर्ष दाखवून त्यातील विजेते व पराभूत अशी विबागणी करुन इतिहास लिहऊन भेदाची मुळे अजून खोलवर नेण्याची भ्रष्ट बुद्धी होते.

जस्टीस वुड्राफने एका ठिकाणी केलेल वर्णन असे,

"It is obvious that it can be established that India, on this and over account, is not civilized but barbarous, that is an argument against her capacity for political autonomy. It is necessary, in particular, to deny the alleged Spiritual Character of Indian Civilization. It would never do to admit this, for spirituality is honoureद of all men, and where it exists, there are other excellences."

डॉ.मॅक्डोनल्ड सारख्यां अभ्यासकांनी हिंदुस्थानच्या सांस्कृतिक साहित्यात स्वच्छ पणे असा नियम बनवला,

"The sole aim here being the attainment of Truth, it is a positive advantage that the translators of ancient sacred books should be outsiders rather than the native custodians of such Writings. The latter could escape their religious bias and orthodox Brahmins could not possibly do so."

एकदा हा नियम केला की भारतीय संस्कृती बद्दल हवे ते तारे तोडावयास वाट मोकळी. परंपरा लक्षात न घेता "पतिमेकादशं कृधि" या वेदवाक्यातील अडाणी भारतीयाला मर्म लक्षात येईल ते थोर्थोर युरोपिअनाण्मा कळणे दुरापास्त होऊन "Make her husband the eleventh man" अशी दिव्य भाषांतरे जन्माला आली. वर अहंकार असा की एक संशोधक लिहितो, We do not believe Sayana understood the expressions of th Veda better than any European interpreter but we think the Veda far better and more correctly than Sayana."

पुढे पुढे हा अहंकार लोप पावून या संशोधकांना वेळोवेळी लिहावे लागले ते असे ," This stanza is difficult , I do not thoroughly understand understand it, This stanza is very obscure, I find this stanza hopelessly obscure, and I do not attempt to translate it"

यांचे सर्व संशोधन भारतीयांचा तेजोभंग व युरोपिअन सत्ता राखणे, भारतीयांना आत्मभान विसरुन आपापसात लढवणे हाच असल्याने अशा संशोधनाला मानाचे स्थान मिळाले.

रामायणाला लभलेला पहिक्ला संशोधक वेबर ,याने तर सारे रामायणच परकिय साहित्यातून उसनवारी केलेल ठरवले. या वैचारिक बलात्कारातून जन्मलेल्या पिढ्या अजून त्यांचेच कौतुक करत आहेत. स्वतंत्र बुद्धीने संशिधन करण्याची इच्छा नाही. पाय दुखतात म्हणून ज्या प्राचीन मौलिक संपत्तीवर आपण उभे आहोत ते पायच तोडून लुळेपांगळे होऊन युरोपिअनांच्या कुबड्या वापरण्यात धन्यता मानत आहेत. भारतीय सांस्कृतिक इतिहासाच्या संशोधनशास्त्राचीच या लोकांची पद्धतच मुळात चुकीची आहे. १. अभावाचा पुरावा मानणे २ .अर्धवट शब्दसाम्य वा साम्यस्थळावरुन स्थलकाल निर्णय करणे, ३. भाषाशास्त्राला कालनिर्णयाच्या दृष्टीने दिलेले फाजील महत्व, प्रक्षेपाचे नियम , विसंगती व रुपक यातून इतिहासाची फाजील मोडतोड केली गेली आहे.

फॅसिझम,साम्यवाद ,लोकशाही व रामराज्य

लोकेच्छा हि रामायणात मुख्य अंगे होते हे मागे लिहिलेच आहे. अर्थात हि लोकेच्छा राज्यसंस्थेपर्यंत पोचवण्यासाठी रामायण कालिन यंत्रणा कशी होती हे पहावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ स्वीकारले ती रामायणातील कल्पना आहे. राजा दशरथालाही आठ अमात्य होते. त्यांचे वर्णन रामायण ,बालकांड, सर्ग ७ श्लोक १ ते १९

राजाचे हित पहाणारे, राजाचे अंतरंग ओळखणारे, राज्यकार्यात निमग्न, अति पवित्र , विद्वत्ता , विनयशील इ. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे गुणवर्णन ,त्यांच्या निवडीसाठी राजाने लावलेले निकष इ. चा उहापोस या श्लोकांत आहे.सैन्य व धन यांनी युक्त असे राज्यशकट या अमात्यांनी तयार केले.

मात्र राजा व अमात्यसंस्था एवढेच शासनयंत्रणेचे स्वरुप नसून अजून एक यंत्रणा अस्तित्वात होती ती म्हणजे मंत्रीसंस्था. हि तिसरी संस्था अशासाठी होती की राजा व अमात्य चांगले असले तर जनहित उत्तम साधले जाते. पण हि यंत्रणा स्वार्थी व संकुचित निघाली तर जनहिताचे काय?

फॅसिझम असे सांगते की आम्ही संपत्तीची व्यक्तीगत मालकी मान्य करु पण प्राप्त परिस्थितीत त्याचा वापर कोणी ,किती व कसा करायचा हे ठरवण्याचे अधिकार राजसत्तेकडे घेऊ व सामाजि८क अन्यायाच्या व संघर्षाच्या सर्व बाबी त्वरित निकालात काढू. मुसोलिनीने हे तंत्र प्रत्यक्षात आणले व त्याने सुव्यवस्था निर्माण झाली असे ब्रिटिश अर्थतज्ञांचेच मत आहे. मात्र यातही राज्यसंस्था अनियंत्रित राहीली.सत्ता व सैन्य या ताकदीचे केंद्रिकरण झाले व घात झाला. साम्यवादाला सुद्धा बेलगाम यंत्रणेला पायबंद घालण्याचा उपाय सापडला नाही. यावे मुख्य कारण सामुयवाद हा जडवादी असून जाणीव व मन हि जडापेक्षा (Matter) भिन्न वस्तुच नाही असे साम्यवादाने मानले व तो कोसळला. लोकशाहीत भ्रष्ट यंत्रणा दर ५ वर्षांनी बदलली व सत्तेचे विकेंद्रिकरण झाले तरी ते कोडगे होऊन शोषण करीतच रहातात.

रामायणाने यावर तोडगा असा काढला. तो असा,

लोकपाल विधयक व रामायण

अमात्य संस्था हि शेवटी राजाची नोकर असल्याने उदरनिर्वाहासाठी राजावर अवलंबुन असते. सर्वकाळ राजावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही व राजाची निरंकुश सत्ता स्थापन होते राजा जर अविचारी व विकारी स्वार्थी निघाला तर प्रजेचे मरण ठरलेले. तेव्हा केवळ वैराग्य व त्याग याच बाबत संपत्तीने श्रीमंत असलेले व ज्ञानमय जीवन जगणारे ,त्याचबरोबर राजाचे मिंधे नसून उपजिविकेचे स्वतंत्र साधन असलेले लोक त्यांची सत्ता राजावर नेमण्यात आली होती. हे ८ मंत्री वसिष्ठ वामदेव हे २ ॠषी व त्याव्यतिरिक्त सुयज्ञ, जाबाली,काश्यप, गौतम ,मार्कंडेय व कात्यायन अशा अन्य ६ जणाम्ची नावे महर्षी वाल्मिकि देतात. थोडक्यात ८ मंत्रीसंस्था व ८ अमात्य यांच्यामध्ये राजाचे स्थान असे. हे मंत्री राजाच्या इच्छेविरुद्धही निर्णय सुचवत असत. विश्वामित्र दशरथाची मदत मागायला आला तेव्हा पुत्रप्रेमाने व्याकुळ दशरथ आधी उतावीळ पणे वचने देऊन बसला तो माघार घेऊ लागला असता वसिष्ठांनी त्यास निर्भय सल्ला दिला. रामायण,बलकांड सर्ग ७

...........

(अवांतर:सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेयकाचे येथे सहजच आठवण येते. पंतप्रधानांनाही या कक्षेत आणुन अंकुश ठेवण्याची मागणी आहे. हि यंत्रणा जर बलवान होऊ शकली तर काही अंशी शासनयंत्रणेला अंकुश बसू शकतो. अर्थात केवळ निस्वार्थी व भ्रष्ट यंत्रणेचा भाग नसून पुरणार नाही तर हे लोकपाल विद्वान व निर्भय असावे लागतील.)

आधी लिहिल्याप्रमाणे कर्तव्यासाठी कर्तव्य हि रामराज्यात असली पाहिजे. सधय केवळ हक्क मागितले जातात. रामराज्यात परत कर्तव्यांना महत्व येईल. साम्यवाद कामगारांना हक्क शिकवतो, कामगार वर्गच सत्ताधारी होतो कर्तव्यांचे भान रहात नाही. भांडवलषाहीत केवळ स्वार्थ व नफा एवढीच उद्दिष्टे राहतात सामाजिक जाणीवा अस्तित्वात रहात नाहीत.

अलिकडे जे जे प्राचीन संस्कृतीत आदर्श सांगितले त्यांचे विकृतीकरण व खलप्रवृत्तींचे ग्लोरिफिकेशन करण्याची साठ दिवसेंदिवस वाढतच वालली आहे. त्याच प्रमाणे रावणाविषयीही त्याची प्रतिमा वाजवीपेक्षा जास्त तेच्जाळण्याचा प्रयत्न होतो.

रावण भक्तांच्या भूमिकेचे स्वरुप साधारण असे,

१.रावण हा विद्वान असून गोदावरीच्या तीरापर्यंत र्त्याचे राज्य पसरले होते.

२.सीताहरण करण्याचा प्रसंग सोडला तर पूर्वायुष्यात रावणाने कधीही कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवले किंवा बलत्कारिले असा उल्लेख रामायणात नाही.

३.रामाचे दंडकारण्यातील आगमन हे आक्रमण होते.

४.प्रथम आगळीक शूर्पणखेचे नाक कान कापून रामनेच केली.रावणाच्या राजघराण्याचा अपमान रामाने केला. व या कृत्याचा सूड घ्यायचा म्हणूनच केवळ रावणाने सीतेला पळवले.

रावणाचे वाल्मिकी रामायणात आलेले सत्य स्वरुप

रावण हा वडिल ब्राह्मण व आई राक्षस कुळातील असा आहे. बिभिषण सोडून अन्य मुलांनी आईच्या संस्कृतीचा स्वीकार केला होता.रावण अत्यंत शूर व प्रभावी व्यक्तीमत्वाचा होता. स्वत: राम च म्हणतो " हा राक्षस अधर्म व अनृत (असत्य) यांनी युक्त असला तरीतेजस्वी व बलवान आहे. याचा पराभव अद्याप कोणीही करु शकले नाही. वा.रा. युद्धकांड सर्ग १११बिभिषण म्हणतो," याने याचकांना दाने दिली.सर्व राजभोग घेतले. युद्धकांड सर्ग १०९

मात्र असे असूनही तो आपल्या क्रुर व अधर्माने युक्त होता.त्याने त्याचे सर्व गुण झाकून टाकले गेले. मुळात हे राज्य त्याचे वडील पौलस्त्य ॠषींनी त्याचा सावत्र भाऊ कुबेर यास दिले असता रावणाने बलाने ते हिरावून घेतले होते.

रावणाचा कामुकपणा व स्त्रियांवरील अत्याचार

१. कुशध्वज नावाच्या ॠषीची वेदवती नावाची लावण्यवती कन्या हिमालयाच्या अरण्यात तप:श्चर्या करित बसलेली रावणाच्या दृष्टीस पडली असता रावणाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. वेदवतीने तळतळाटाने अग्नीत प्रवेश करुन आपला जीव दिला व रावणाला शाप दिले.

रामायण उत्तरकांड सर्ग १७- "या प्रमाणे वेदवतीने त्यास स्वत:चे म्हणणे समजाउन सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग न होता त्या दुष्टाने त्या मुलीचे केस धरुन तिला ओढले. ती संतापून त्यास म्हणाली हे दुष्टा याप्रमाणे तू माझे घर्षण केल्यावर आता माझी जगणुयाची इच्छा नाही.

२.देवभूमिवर चाललेला असता त्याच्या नजरेस रंभा नावाची अप्सरा पडली. त्याबरोबर तिच्यावर बलात्काराच्या इच्छेने तो मागे लागला.

"रावणाचे म्हणणे ऐकुन रंभा रडत रडत त्याला म्हणाली कि या पद्धतीने ऊ माझ्याशी बोलु नकोस. तू माझा गुरुसमान आहेस. व धर्माने तुझी सून आहे. कारण कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी माझा संकेत ठरला आहे म्हणून मी येथे आले आहे. पण रावणाने तिचे काही न ऐकता तिला तेथील शिलाखंडावर ओढूण तिच्यावर बलात्कार केला- रामायण,उत्तर्कांड ,सर्ग २६

३.विवाहित स्त्रियांना पळवणे हास रावणाच्या आवडीचा खेळ होता.

"पुरी भोगवती गत्वा पराजित्य च वासुकिम्‌

तक्षकस्य प्रियां भार्या पराजित्य जहार य:"

भोगावती नगरीत जाऊन त्याने वासुकीचा पराभव केला व तक्षकाच्या प्रिय अशा धर्मपत्नीचे अपहरण केले.

४.सीतेशी बोलताना रावण म्हणतो,

स्वधर्मो राक्षसां भीरु सर्वदैव न संशय:

गमनं वा परस्त्रीणां हरणं संप्रमथ्य वा"

-रामायण ,सुंदरकांड, सर्ग २०

" हे भीरु, परस्त्रियंना त्यांच्या संमतीने भ्रष्ट करणे अथवा त्यांच्या बंधुजनांना ठार मारुन त्यांचे अपहरण करणे हा राक्षसांचा धर्म आहे."

रावणाने पकडून नेलेल्या स्त्रियांच्या तांड्याचे वर्णन वाल्मिकिंनी अत्यंत दारुण वर्णन केले असून २० श्लोकात ते दिले आहे. - रामायण ,उत्तरकांड,सर्ग २४

विलाप करताना या सर्व स्त्रिया रावणाला शिव्याशाप देत होत्या. तो मरेल तो सुदिन असे म्हणत होत्या. परस्त्रियाच काय पण स्वकुलातील स्त्रियांनाही तो एक मोठे संकट होता असे वाल्मिकी रामायण सांगते.

शूर्पणखा अन्यायग्रस्त अबला?

स्वत: शुर्पणखेने रावणाला आपल्यावरचा अन्याय सांगण्याऐवजी सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करुन त्याची कामुकता चाळवली.

रामायण अरण्यकांड सर्ग ३४ मधील १८ ते २३ या श्लोकात ती म्हणते त्याचे भाषांतर,

" मी देव ,गंधर्व,यक्ष्ग अथवा किन्नर यापैकी कोठेही सीतेसारखे अपूर्व लावण्य पाहिले नाही. सीता ज्याची पत्नी होईल व आनंदाने ज्याला आलिंगन देईल त्याचे जीवन इंद्रापेक्षाही अधिक भाग्याचे होईल. त्या सुंदरीला तूच योग्य पति आहेस असे माझे मत आहे. तुझ्यासाठी मी तिला पळवून आणावयास गेले असता क्रुर लक्ष्मणाने ,मला विरुप केले. सीतेचे सौंदर्य पाहिले की मदनाच्या बाणांनी तू घायाळ होशील. सीता तुला हवी असेल तर या कार्यात यश मिळावे म्हणून तू र्ताव्बडतोब आपले उजवे पाऊल उचल"

जी स्त्री आपला अपमान हि प्रेरक शक्ती न मानता सीतेचे लावण्य वर्णुन सांगते व स्वत:च्या तोंडाने कोणते सत्कर्म करण्यासाठी आपण रामच्या झोपडीत गेलो ते सांगते आहे तिचा आदर्श आजच्या स्त्रिया कसा ठेवू शकतात? बंधुच्या कामतृप्तीसाठी एखाद्या स्त्रीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या शूर्पणखेला शिक्षा करण्यात रामाने वा लक्ष्मणाने असे कोणते अपकृत्य केले?

मग रावणाने सीतेवर अत्याचार का केला नाही?

रावण जर असा होता तर त्याने सीतेला सर्व प्रकारांनी वळवत बसण्याचा प्रयत्न का केला? कधी गोड बोलून कधी धाक दाखवून ,कधी रामाचे धडावेगळे केलेले मायावी मस्तक दाखवून तिची आळवणी का करत बसला?

याचे उत्तर वाल्मिकी रामायणात आलेले आहे. रावणाल एकूण तीन वेळा शाप मिळाला होत. एका ठिआकाणी तर रावण स्वत:च आपल्याला का शाप मिळाला ते सांगतो- रामायण ,युद्धकांड,सर्ग १३

थोडक्यात भावार्थ-

"पूर्वी ब्रह्मदेवाकडे जात असताना पुंजिकास्थला नावाच्या अप्सरेवर मी बलात्कार केला. त्या वेळी ब्रह्मदेव्वाने मला असा शाप दिला कि मी जत या प्रकारचा अत्याचार केला तर माझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील.त्या शापाच्या भयाने मी सीतेवर बलात्कार करित नाही.

दुसर्‍या शापाचे वर्णन वाल्मिकी रामायण ,उत्तररकाण्ड ,सर्ग २६ मध्ये आहे ते नलकुबेराने रंभेवर अत्याचार केल्याने दिलेल्या शापाचे.

तिसरा शाप त्याने बलात्कारलेल्या सर्व स्त्रियांचा मिळून असा होता,

"तस्माद्वै स्त्रीकृतेनैव वधं प्राप्स्यपि दुर्मति:

सतीभिर्वरनारीभिरेवं वाक्येbhyudirite || 21 || - वा. रामायण ,उत्तरकांड, सर्ग २४

अर्थ:- ज्याअर्थी हा साध्वींवर बलात्कार करतो त्याअर्थी स्त्रीमुळेच त्याचा नाश होईल."

शाप इ. गोष्टी बाजूला ठेवल्या तरी यामागे अन्य राजकिय कारणे होतीच. एकतर रावणाचे सर्व सामंत हि आपत्तीऊ रावणाने ओढावून घेतल्याने रुष्ट होते. अगदी कुंभकर्णानेही त्याला याबाबत दोष दिला आहे. बिभिषणाला तर त्याचे हे कृत्य अजिबातच आवडले नसून तो त्याचा पक्ष सोडून गेला होता. महाभारतात ज्याप्रमाणे (महाभारताची मूळ प्रत भांडारकर संस्थेने संपादित केली आहे तीच प्रत महाभारताचा अभ्यास करताना सध्या प्रमाण मानावी ) दुर्योधनाचे कृत्य पसंत नसूनही त्याला द्रोण-भीशःम यांनी नाईलाजाने साथ दिली तोच प्रकार रामायणातही थोडा-फार फरक सोडता होता. सीतेवर अत्याचार करु न धजण्याचे हे एक महत्वाचे कारण होते.

समजा रामाचे आक्रमण होते पण त्यामागे हेतु कोणता?

विस्तारवाद हाच जर हेतु असता तर रामाने आपल्या राज्याला लंकेचे राज्य जोडून घेतले का? वानरांचे राज्य जोडून घेतले का? धर्मात्न्मा असे म्हणून बिभिषणाला त्याने राज्याभिशेक केला. जननी जन्मभूमिश्च सर्गाद अपि गरियसी " हा श्लोक तर प्रसिद्धच आहे. जन्मभूमि समोर स्वर्ग ही तुच्छ असता सोन्याची लंका काय कामाची? असे राम बिभिषणाला म्हणतो ( प्रासाद इथे भव्य परी,मज भारी आईची झोपडी प्यारी हि सावरकरांची कल्पना यातलीच असावी)

अन्यायाचा शेवट हाच रामाच्या कार्याचा हेतु होता. रावणी वृत्तीचे लोक हे नरमांसभक्षक असून त्याचे अनेक उल्लेख वाल्मिकी रामायणात आले आहेत. रावणाचे राज्य गोदवरी पर्यंत पसरलेले नसून चंपा सरोवर म्हणजे सुग्रीवाच्या राज्यापर्यंत पसरले होते.तिथे कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेले तपस्वी आपली नित्यकर्मे करीत त्यांच्यावर अत्याचार करणे ,त्यांना मारुन खाणे हि मानवी संस्कृतीला घातक असे रावणाचे अन्यायी राज्य संपवणे हा हेतु होता.

रावण स्वत:ही नरमांसभक्षक होता. सीतेला वळवून घेण्यासाठी धमकी देताना माझे ऐकले नाहिस तर तुझे मांस न्याहारी म्हणून उद्या माझ्यासमोर असेल असा श्लोक स्पष्ट पणे आला आहे. - वा. रामायण ,सुंदरकांड, सर्ग २२

दंडकारण्य हे नरमांसाचे चराउ कुरण म्हणून रावण प्रवृत्तीचे लोक वापरत होते.

स्वत: रामानेच सीतेजवळ या परिस्थितीचे असे वर्णन केले आहे,

ते चार्ता दण्डकारण्ये मुनय: संशितव्रता:

वसंत: कालकालेषु नवे मूलफलाशना:।

न लभंते सुखं भीरु राक्षसै: क्रूरकर्मभि" ॥५॥

भक्ष्यन्ते राक्षसैर्भीमैर्नरमांसोपजीविभि: ।

ते भक्श्यमाणा मुनयो दण्डकारण्यवासिन: ॥६॥

-रामायण ,अरण्यकांड,सर्ग १०

" हे सीते ,हे दण्डकारण्यातले व्रतधारी मुनि अत्यंत दीन झालेले आहेत. ते बिचारे समयानुरुप उत्पन्न होणार्‍या कंदमूलफलावर उपजिविका करणारे आहेत व आपल्या व्रतनियमात दंग राहून ते कोणाच्या भानगडीत पडत नाहीत. तरिही क्रुरकर्मे नरमांसभक्षक भयानक राक्षस त्यांना खाऊन फस्त करित असतात. कारण नरमांस हे तर राक्षसांच्या उपजिविकेचे साधनच होय.मानवजातीचा केवढा भयानक संहार या दुष्ट सवयींच्या लोकांनी चालवला असेल"

सीतात्याग

एका परीटाच्या म्हणण्यावरुन हे घडले असा चुकीचा समज होण्याचे कारण पद्मपुराणातील पातालखंडातील उल्लेख हा आहे. रामायणात हि कथा नसून तिथली आहे. रामायणात स्पष्टपणे पौरा: कथन्ति शुभाशुभं" , पौरापवाद: सुमहान्‌" असे स्पष्ट उल्लेख आहेत. (पौर म्हणजे लोक,प्रजा) कवी अथवा पुराणिकांनी स्वार्थाने किंवा इतिहासातील तत्कालिन समजुतींप्रमाणे विसंगती येत असेल तर ती दूर व्हावी या चांगल्या हेतुने पण स्वत:चुया बुद्धीने जी भर पडत गेली.

सारांश रामाने सीतात्यागाचे केलेले कृत्य बरोबर का चुक ते पहाण्यापूर्वी लोकेच्छा हिच रामायणात अंतिम होती हे सिद्ध होते.

रामाचे सीतेवर आत्यंतिक प्रेम होते हे रामायणावरुनच निर्विवाद सिद्ध होते. त्याने केलेले तिचे अनुरंजन,त्यांचे दांपत्यजीवन , तिचे हट्ट पुरवणे व तिच्यासाठी केलेला विलाप दोन्हीची वर्णने मूळ रामायणात आलेली आहेत. सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या रामाचे वर्णन मारुतीने सीतेजवळ केलेल आहे.

सीत्यात्यागानंतर रामाने अन्य विवाह न करता तिची प्रतिमा घेऊन धर्मकृत्ये केली असून स्वत:ही सर्व सुखंचा त्याग करुन व्रतस्थ जीवन जगले. स्वत:च्या खुषीसाठी,स्वार्थासाठी अथवा वैयक्तिक कारणांनी केलेला हा त्याग नव्हता हे उघड आहे. जे कर्म स्वार्थाचा लवलेख ही नसता केले जाते ते अर्थातच दोषमुक्त ठरते. सीता त्याग करुन रामांनीही स्वत्चे उभे आयुष्य जाळून घेतले आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे त्या युगात "हक्क" पेक्षा "कर्तव्य" मोठे होते. कोणतीही नीतीमूल्ये हि सार्वकालिक नसून परिवर्तनीय असतात. आजच्या राजसत्ते कडून आपण ज्या अप०एक्षा करतो त्या जर योग्य असतील तर रामाचे वर्तनही योग्य ठरेल. राज्यकर्त्यांची (राजा व महाराणी) संशयातीतता शुद्ध असावी अशी जर तत्कालिन प्रजेची इच्छा असेल तर तामाचे ते वर्तन योग्यच ठरते. जर ते अयोग्य असेल तर आजच्या राज्यकर्त्यांकडूनही आपण अशा अपेक्षा करणे अयोग्य ठरेल. तेव्हा जे घडले तो अन्याय असेल तर तो केवळ सीतेवर नसून रामावर झालेला अन्यायही होता असे म्हणणे संयुक्तिक ठरेल ... जर आजची पत्नी हक्क लोकेच्छेपेक्षा अधिक प्रमाण मानायचा असेल तर ! आधीच म्हटल्याप्रमाणे रामाच्याचच वंशातील एका "पुरुषाचाही" त्याग केला गेला होताच.

ज्याप्रमाणे रामाच्याच वंशातील एका राजपुत्राचा राजकर्तव्याखातर राजाला त्याग करावा लागला तसाच रामाला केवळ सीतेचाच नव्हे तर लक्ष्मणाचाही त्याग करावा लागला. त्याची कथा अशा प्रकारची. एकदा कालपुरुष रामाशी चर्चेसाठी आला असता त्याने त्यास आपल्या एकांतात जर कोणी आला तर मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे सांगितले. रामाने लक्ष्मणालाच कोणी आत येऊ नये म्हणून राखण करायला सांगितले. थोड्याच वेळात संतापी ॠषी दुर्वास तेथे आले असता त्याम्णि मला आताच्या आता रामाला भेटायचे आहे व अवज्ञ केल्यास अयोध्या भस्मसात करेन असा धाक घातला. लक्ष्मणाने नाईलाजाने आत प्रवेश केला. राजधर्माप्रमाणे रामाने सीतेप्रमाणेच दंड म्हणून अमात्य व मंत्री मंडळाच्या सल्ल्याप्रमाणे लक्षमणाचा त्याग केला. रामावाचून लक्ष्मण म्हणजे त्याचा मृत्युच. लक्ष्मणाने त्यान्ट्र शरयु त प्राणांचा अवरोध करुन जलसमाधी घेतली.

हि कथा येथे थोडक्यात देण्याचे कारण की सीता त्याग हा लिंगभेदाचा प्रश्न नसून राजधर्माचा विषय होता हे या लक्ष्मण त्यागाच्या प्रसंगावरुन स्पष्ट होत आहे. सीतेला ,एका स्त्रीला वेगळा न्याय व लक्ष्मणाला .एका पुरुषाला वेगळा न्याय असा प्रकार नव्हता.

सीतात्यागासंबंधी स्वत: सीतेची भूमिका

राम-सीता यांच्यातील परस्पर स्नेह व प्रेम अत्यंत दाट असून त्यांना त्यांच्या एकमेकांची चांगलीच परिक्षा होती.

रामाला स्वत:ला आपल्या चारित्र्याविषयी संशय नाही हे तिला पूर्ण माहित होते. या बाबत रामाने राजधर्माचेच पाल्कन करावे असे तिउला वाटत होते. त्यासंबंधी रामायणात आलेले श्लोक असे,

मामिकेयं तनुर्नूनं सृष्टा दुःखाय लक्ष्मण |

धात्रा यस्यास्तथा मेऽद्य दुःखमूर्तिः प्रदृश्यते || ३||

वक्तव्यश्चैव नृपतिर्धर्मेण सुसमाहित:

यथा भ्रातृषु वर्तेथास्तथा पौरेषु नित्यदा

परमो ह्येष धर्मस्ते तस्मात्किर्तिरनुत्तमा १५

अहं तु म्नानुशोचामि स्वशरीरं नरर्षभ १६

"लक्ष्मणा, माझे हे शरिर केवळ दु:ख भोगण्यासाठिच परमेश्वराने उत्पन्न केले आहे असे दिसते. इतकी दु:खी स्त्री जगात कोणी असेल काय? राजाला तू सांग की तू आपल्या धर्माप्रमाणे वाग व जसे बंधूंशी तसेच प्रजाजनांशी वाग. हाच तुझा खरा धर्म आहे व यानेच जगात तुझी कीर्ती होईल. माझ्या स्वत:च्या शरीराची मी पर्वा करीत नाही."

शेवटी स्वत: मशर्षी वाल्मिकी रामाला सीतेचा स्वीकार कर अस सांगतात तेव्हा राम म्हणतो,

सेयं लोकभयाद्‌ब्रह्मन्नपापेत्यभिजनता ।

परित्यक्ता मया सीता तद्‌भवान्‌ क्षन्तुमर्हति

"ती निष्पाप आहे हे माहित असूनही केवळ लोकापवादाच्या भीतीनेच मी तिचा परित्याग केला आहे, आपण मला क्षमा करावी. मी तिचा स्वीकार अवश्य करेन ,पण लोकांच्या अंत:करणातील भाव शुद्ध होण्यासाठी सीतेने सर्व लोकांसमक्ष दिव्य करावे."

या प्रसंगाचे अत्यंत कारुण्यपूर्ण वर्णन वाल्मिकींनी केले आहे.

प्रसंगाच्या शेवटी सीता जमिनीत गेल्यावर पश्चाताप दग्ध पौरजन त्या भूमिला अश्रुंचे सिंचन करु लागले असे वर्णन आहे.

(अपूर्ण)

1 comment:

Gamma Pailvan said...

नमस्कार चंद्रशेखर साने! आपले विवेचन आवडले. उत्तरार्धाची वाट पहात आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...