Tuesday, August 23, 2011

"स्वा.सावरकर- डॉ.आंबेडकर सहकार्य व मतभेद" टिपणे

१.१९२४ ला रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यावर स्वा.सावरकरांचे अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सुरु.

२.श्रद्धानंद मध्ये महाडला अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरु देण्याला मान्यता द्यावी या साठी लेख. सावरकरांनी यात पूर्वास्पृश्यांना पाणी भरु देण्यास विरोध करु नका असे स्पृश्यांआ उद्देशुन लिहिले तर पूर्वास्पृश्यांना लिहिले, स्पृश्यांनी तुम्हाला पाणी भर्य दिले नाही तर तुम्ही हिंदुधर्म सोडून जाल ही धमकी देऊ नका.कारण हिंदुइधर्म हा काही एकट्या स्पृश्यांचा नाही.त्यावर तुमचाही तेवढाच हक्क आहे.हि तुमची सामाईक मत्ता आहे.त्यासाठी लढा द्या. हिंदुधर्मावरिल अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही रक्ताने धुवुन काढू ही डॉ.आंबेडकरांची प्रतिज्ञा खर्‍या हिंदुस शोभणारी आहे.म्हणूनच त्यांचा सत्याग्रह आम्ही न्याय्य समजतो.

३.सावरकरंचे अनुयायी व हिंदुमहासभेचे कार्यकर्ते नवी मौज चे संपादक श्री.अनंत गद्रे यांनी डॉ.आंबेडकरांची भेट घेतली व त्यांना डॉ.मुंजे,डॉ.कुर्तकोटी व बॅ.सावरकर यांना भेटण्याचा आग्रह केला. गद्रे यांनी पुढे लिहिले की या भेटीमुळे आंबेडकरांविषयी चे बरेच गैरसमज दूर झाले.

४.समता पत्राचे मात्र सावरकरांवर टिकेचे लेख चालुच. संपादक लिहितात, सावरकर हे फार मोठे शूरवीर आहेत.मोठे हुतात्मे आहेत .पण जोपर्यंत ते ब्राह्मणी धर्माचे पक्षपाती आहेत तोपर्यंत त्यांच्यावर टिका करणार.

५.समता पत्राची सर्व टिका सावरकर जपून ठेवत. १४-८-१९२८ ला सावरकरांनी समता संघास पत्रास पत्र लिहून खुलासे केले. त्यात मुख्यत्वे लिहिले, आपल्या प्रत्यक्ष भेटित मी माझी मते आपणास संगितली असता व त्याप्रमाणे वागत असता माझ्या नावचा उल्लेख करुन मी त्याविरुद्ध आहे असे भासवता त्याअर्थी आपली टिका प्रामाणिक नसून तिचा हेतु काही दुसराच असला पाहिजे. हिंदुसमाजात प्रांतिक वा जातीपातीचे भेद न मानता पंक्तीव्यवहार व विवाह व्यवहार चालु झाले पाहिजेत. मात्र अजून काही काळ हिंदुंनी अहिंदुंना मुली देऊ नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. जेव्हा आपल्यातले जातीभेद नष्ट होऊन अहिंदु त्यांचे अहिंदुत्व विसरुन मानवतेने वागु लागतील तेव्हा हिंदुत्वही मानवतेत विलिन होईल. तेव्हा मी हिंदुत्व राखु इच्छीतो -त्यातील जातीभेद नव्हेत- सध्या राखु इच्छीतो. हे मत ज्याला मान्य नसेल त्याने त्यापुरती टिका करावी. श्रद्धानंदात माझ्या नावाने आलेल्या लेखांपुरताच मी जबाबदार आहे हे ही ध्यानात ठेवावे.

६.१९२८ ला मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवात वाद माजून आंबेडकर,सी.के.बोले ,प्रबोधनकार व स्पृश्यांचे वतीने जावळे,पुरंदरे बावडेकर गंगाधर जोशी यांच्यात तडजोड होऊन अस्पृश्यांना स्पृश्यांइतकाच अधिकार.

७.१९ मे १९२९ ला सावरकर मालवण येथे भरलेल्युआ पूर्वास्पृश्य परिषदेसाठी गेले. अध्यक्षपदी डॉ.आंबेडकरांची निवड झाली होती. पण चर्मकार मंडळींना त्यांचे नाव फारसे पसंत नव्हते. त्याचवेळी मुंबईला गिरणी कामगारांच्या संपामुळे आंबेडकर येऊ शकले नाहीत. स्वा.सावरकरांचे नाव पूर्वास्पृश्यांमधील दोन्ही जातींना मान्य असल्याने अध्यक्षपदी सावरकरांची निवड. सावरकरांचे व त्यांच्या अनुयायांचे परिषदेतील वर्तन पाहून पुण्याचे चर्मकार पुढारी श्री.राजभोज म्हणाले, बॅ.सावरकरांचे निष्कपट व प्रेमळ वर्तन पाहून माझ्या मनातील हिंदूसंघटनाविषयीच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत.या परिषदेत सावरकरांनी पूर्वास्पृश्यांना आपले अधिकार मिळवण्यासाठी निर्भय ल्होऊन लढा देण्याचा उपदेश केला.

याच परिषदेत सर्वांना सावरकरांच्या हस्ते जानवी देण्यात आली. वेदांचाही सर्वांना समान अधिकार असल्याचे सावरकरांनी सांगितले. पूर्वास्पृश्य पुढारी सुभेदार घाटगे म्हणाले आम्ही महार -चांभार केव्हाही हिंदुधर्म सोडणार नाही. श्री, सुभेदार हे पुणे हिंदुमहासभेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते.

८.ऑगस्ट १९२९ मधे डॉ.आंबेडकर एका न्यायालयीन कामासाठी रत्नागिरीला येणार होते.विठठलमंदिरात सावरकरांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे भाषण करायचे ठरले. ही कल्पना त्याकाळात राबवणे अत्यंत कठीण होती. सावरकर अनुयायांनी यासाठी शेकडॊ सश्या जमवल्या. त्यावर सर्व जातीच्या लोकांच्या सह्या व अंगठे !मात्र आंबेडकरांना तातडिने मुंबईला जावे लागल्याने हे भाषण झाले नाही. मात्र त्या ठिकाणी दोघांची अर्धा तास भेट झाली. विरोधकांनी सावरकरांना तुम्ही आंबेडकरांना भाषण करु देण्यासाठी ५०० सह्या गोळा केल्यात आम्ही ५००० सह्या विरोधात गोळा करु असे सांगितले. अस्पृश्यता निवरणाचे काम त्यावेळी किती दुर्घट होते ते लक्षात येते.

९.सावरकरांनी केलेले जातीभेद निर्मुलनाचे काम पाहून कर्मवीर वि.रा.शिदे (डिप्रेस्ड क्लास मिशन) यांनी सावरकर म्हणजे चालतेबोलते पतितपावन असून आम्ही जे ठरावात मागतो ते इथे रत्नागित्रीत प्रत्यक्षात आलेले दिसते.

१०.सावरकरांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या पतितपावन मंदिरात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवंशी महार परिषद.यात सावरकरांचे अभिनंदन,मास-मद्य न पिण्याची प्रतिज्ञा,हिंदुधर्म न सोडण्याचे आश्वासन इ.अनेक ठराव.

११.सावरकरांची भूमिका आंबेडकरांना मान्य पण ते म्हणत, हिंदुसमाज अद्याप सावरकर व मुंजे यांच्या मागे नाही.त्यामुळे त्यांच्या सहानुभूतीला व्यवहारात मूल्य नाही. (दलितबंधु २३-४-१९३२)

१२.हिंदुधर्म सोडण्याच्या आंबेडकरांच्या धमक्यांना अन्य पूर्वास्पृश्यांचा तीव्र विरोध व आंबेडकरांवर राउंडटेबल मधे प्रवेश करुन घेण्यासाठीचे व जागा कायम राखण्यासाठीचे डावपेच आखत असल्याची कडक टिका. श्री.राजा, श्री.राजभोज मुंबईचे देवरुखकर हिंदुमहासभेचे समर्थक

१३.एप्रिल मध्ये डॉ.आंबेडकर पंजाबात गेले असता तेथील हिंदुमहासभेने व सावरकरांचे लंडनचे सहकारी डॉ.गोकुळचंद नारंग यांनी आंबेडकरांना सांगितले कि आंबेडकरी कुटुंबात रोटी बेटी व्यवहार करण्यास पंजाबी हिंदु सज्ज आहेत. पण हिंदुधर्मातच ठेवण्याचे हे प्रयत्न आंबेडकरांचे समाधान करु शकले नाहीत.

१४.६.-९.१९३२ ला गणेशोत्सव. समारंभात तिसर्‍या दिवशी चर्मकार समाजातील L.L.B.चे विद्यार्थी श्री.सोनावणे यांचे सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भाषण.पतितपावन मध्ये पूर्वास्पृश्य किर्तनकारांचे किर्तन. चौथ्या दिवशी अस्पृश्यता नि जातीबेद यावर सत्यशोधक समाजाचे पुढारी श्री.माधव्राव बागल यांचे सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भाषण. सत्यशोधक बागल म्हणाले सावरकरांचे हे कार्य पाहून असे वाटते की असा प्रभावशाली पुरुष जर आम्हाला देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो.त्याच रात्री क्षात्र जगद्‌गुरुंचे भाषण.सावरकर म्हणाले की शाहू महाराजांनी क्षात्जगद्‌गुरु पीठ स्थापन केले.आम्ही आमच्या आजच्या यज्ञाने घोषणा करतो की वेद व धर्मासंबंधी सर्व अधिकार अखिल हिंदूंना प्राप्त होऊ शकतात. श्री. क्षात्र जगद्‌गुरु म्हणाले की वीर पुरुष परिस्थिती निर्माण करतो हे कार्क्लाईल चे मत मला पटत नसे पण स्वा.सावरकरांनी गेल्या ५ वर्षात जे सामाजिक बदल घडवून आणले ते पाहता हे मत खरे असल्याचे मला दिसून आले.

रत्नागिरी कार्यासाठी सावरकरांना आंबेडकरांचे एक पत्र," I however wish to take this opportunity of conveying to you my appreciation of the work you are doing in the field of social reform. If the untouchables are to be part and parcel of the Hindu society, then it is not enough to remove unaccountability; for that matter you must destory chaturvarnya. I am glad that you are one of the very few who have realised this."

१५.वारंवार झालेल्या अपमानांनी व सत्याग्रह निष्फळ ठरल्याने चिडलेल्या आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा. याने सावरकरांना अत्यंत दु:ख झाले. याविषयी लेखात त्यांनी लिहिले, आंबेडकर हिंदु धर्म सोडणार याचे मला जेवढे आश्चर्य वाटले नाही एवढे ते अन्य चांगला र्म शोधून काढत आहेत या बातमीने वाटले. हिंदु धर्म बुद्धीवादी नाही म्हणून ते सोडत असले तर त्यात आश्चर्य नाही पण त्या कसोटीने जगात आजचा एकही धर्म ग्राह्य ठरणार नाही.

१६.धर्मांतराच्या घोषणेनंतर अनेल धर्म-पंथ आंबेडकरांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करु लागले. शीखही त्याला अपवाद नव्हते. १९३६ ला शिरोमणी शीखप्रचार समितीने त्यासाठी परिषद घ्यायचे ठरवले व त्या परिषदेला सावरकरांना आमंत्रण दिले. सावरकरांनी उत्तर दिले माझ्यावरील स्थानबद्धतेमुळे मी येऊ शकणार नाही,तरी या परिषदेला मी प्रकटपणे सहानुभूती व्यक्त करतो कारण शीख हेही हिंदुच आहेत.

१७.हिंदूंचा इतिहास पराभवाचा आहे या डॉ.आंबेडत्रांच्या विधानाला सावरकरांचे "हिंदूंचा विजयशीळ इतिहास" या लेखाद्वारे उत्तर.

१८.प्रांतिक विधानसभांच्या निवडणुकीत डॉ.आंबेडकरांचा श्री.ल.ब.भोपटकरांना पाठींबा तर आंबेडकरांना भोपटकर, केळकर जम्नादास मेहता यांचा पाठिंबा. आंबेडकर व जम्नादास विजयी मात्र भोपटकरांचा पराभव.

१९.सावरकरांची संपूर्ण मुक्तता. जुलै १९३७ मधील एका सत्कारास उत्तर देताना सावरकर म्हणाले,मनुष्याची योग्यता कोणत्या जातीत तो जन्माला आला त्यावरुन ठरण्याची रुढ्गी बंद झाली व गुणावरुन तिची योग्यता ठरू लागली म्हणजे हिंदुंमधील विषमता नष्ट होईल. डॉ.आंबेडकरांसारखा विद्वान तुमच्या जातीत जन्मला हे तुमचे भाग्य आहे. त्यांच्यामुळे महार जातीतील माणसे किती ऊंच जाऊ शकतात ते सिद्ध झाले.त्यांची धर्मांतराची घोषणा पारलौकिक नसून व्यावहारीक असामानतेविषयी आहे. व्यावसायिक विषाता नष्ट झाली की धर्मांतर झाल्यासारखेच आहे.

२०. जून १९३८ ला सावरकरांनी ग.वि.केतकर यांना पत्र पाठवले की डॉ.आंबेडकर हे हिंदुसभेच्या हिंदुसंघटनास अनुकूलता दर्शवत आहेत तरी त्यांची त्वरीत भेट घ्यावी.

२१.सैनिकीकरण याचे परिपत्रक सावरकरांनी आंबेडकरांना पाठवून त्यांच्या पक्षाने सैनिकि महाविद्यालय सुरु करण्याच्या विधेयकास पाठिंबा देण्याची विनंती केली.शस्त्रनिर्बंध दूर करण्याचा सावरकरांचा प्रयत्न.

२२.२८ जाने १९३९ ला दादर येथे निवडणुक सभेत सावरकरांनी श्री. रामभाऊ तटणीस यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत मते द्या असे भाषण केले. अध्यक्ष बॅ.जम्नादास मेहता असून याच वेळी आंबेडकरांचेही याच सभेत तटणीसांसाठी भाषण.

२३. दि.५ मे १९३९ साध्यानुकूल सहकार (Responsive Co-Operation) या धोरणाप्रमाणे भारत्मंत्र्यांचे समादेशक डॉ.राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ उपहार दिला. या समारंभाला पालिका आयुक्त श्री. भट व हिंदुसभेच्या इतर नेत्यांबरोबर डॉ.आंबेडकर व स्वा. सावरकरांची उपस्थिती.या प्रसंगी सावरकर म्हणाले, संघराज्य,महायुद्ध आदी महत्वाचे प्रश्न उपस्थित होणार आहेत .त्या प्रसंगी डॉ.राव हिंदुहिताच्या दृष्टीने मत देतील असा विश्वास वाततो.

२४.भागानगरच लढा सुरु. काही स्वयंसेवकांचा पुण्यात सत्कार. त्याप्रसंगी बोलताना पूर्वास्पृश्य समाजाचे श्री.कृष्णराव गांगुर्डे म्हणाले, "आज काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाविरोधात असलेले कळवणकर शास्त्रींसारखे अनेक लोक व मी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभ आहोत. हे सावरकरांनी केलेले कार्य आहे. आता डॉ.आंबेडकरांनीही याच हिंदुधजाखाली एकत्र यावे."

२५.सोमवार दि. ९ ऑक्टोबर १९३९ ला सकाळी ११ ते १२ एक तास सावरकर व व्हाईसरॉय यांची भेट. भेटीहून बाहेर आल्यावर भेटिसाठी आलेल्या डॉ.आंबेडकरांशी त्यांची भेट. तिथेच अर्धा तास सावरकर व आंबेडकर यांच्यात गप्पागोष्टी झाल्या. या भेटीत व्हाईसरॉयने कॉंग्रेस व मुस्लीम लिग प्रमाणेच हिंदुमहासभेलाही वाटघाटींसाठी निमंत्रण देण्याचे मान्य केले.

२६.हिंदुंवर सीमाप्रांतात होणार्‍या आक्रमणांचा प्रतिकार. सावरकरांनी प्रकृती अस्वास्थ्य बाजूला ठेऊन ९ जाने १९४० ला रामभाऊ तटणीस यांच्यशी चर्चा केली. १३ जाने. ला डॉ.आंबेडकर व आचार्य दोंदे यांच्याशी सावरकरांची चर्चा.हे दोघेही सावरकर सदनात सावरकरांची विचारपूस करण्यासाठी आले होते. या भेटीनंतर जीना-सावरकर भेटीची चर्चा सुरु झाली पण या वार्तेत तथ्य नसल्याचे "केसरी" ने प्रसिद्ध केले.

२७.जानेवारी १९४० लाच सावरकर-आंबेडकर व जीना एकत्र येणार अशा वार्ता वृत्तपत्रातून येत होत्या. त्याला उद्देशून दैनिक सकाळ ने लिहिले," बॅ.जिना, बॅ.सावरकर व डॉ.आंबेडकर या तीघांची प्रकृती भिन्न असली तरी त्यांच्या राष्ट्रीय विचारांची विकृती एकच असल्याने तिघांचा दृष्टीकोन व तो मांडण्याची पद्धत अखेर एकच आहे."

२८.६ फेब्रुवारी १९४० ला पारशी समाजच्या सभेला इतरांबरोबर सावरकर, डॉ.आंबेडकर व डॉ.नारायणराव सावरकर उपस्थित. यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, कोणत्याही राष्ट्रीय कार्यात नि राज्यकारभारात अल्पसंख्य जमातींना योग्य तो वाटा देण्यास हिंदुमहासभा सिद्ध आहे. इतर अल्पसंख्यांकांनी हिंदुस्तान तोडयाच्या मुसलमानांच्या मागणीशी गट्टी करु नये. याच सभेत डॉ.आंबेडकरांनीही भाषन केले. (टाईम्स ऑफ इंडिया ६-२-१९४०)यापूर्वी २२ जने ला सावरकरांनी पारशी समाजाच्या नेत्यांशि स्वतंत्र चर्चा केली होती.

२९.यानंतर नवयुग मध्ये आंबेडकर व सावरकरांच्यात फूट पाडण्यासाठीचे लेख .

३०.त्या वर्षातील निवडणुकात हिंदुसभा,सनातनी,आर्यसमाजी व आंबेडकरांच्या स्वतंत्र श्रमिकक्ष व Liberal पक्ष सर्वांनी एकमेकांना जमेल तेवढे सहकार्य करुन निवडणुका लढवल्या व बहुतांशी ठिकाणी त्यांच विजय होऊन कॉंग्रेसचा पाडाव झाला.सावरकरांनी हिंदुविघातक कॉंग्रेसचा पाडाव शक्य आहे हे या निवडणुकांनी दाखवून दिले असे म्हटले.

३१.एप्रिल १९४० च्या सुमारास चुनीलाल मेहता यांच्या घरी कॉंग्रेसेतर पक्षांच्या सभेला स्वा.सावरकर ,डॉ.आंबेडकर तसेच र.पु.परांजपे उपस्थित. या सभेत एक आघाडी करण्याचा प्रयत्न झाला.

३२.दि.१४-१५ मार्चला मुंबईत ताजमहाल हॉटेल मध्ये कॉंग्रेस व मुस्लीम लीग वघळून अन्य पक्षांची बैठक भरली. त्यात सुमारे चाळीस नेते उपस्थित. सावरकर व आंबेडकरही या बैठकीला उपस्थित्य होते. या बैठकीला विशेष मार्गदर्शन सावरकरांनी केलुयाने त्यांचा आभाराचा विशेष उल्लेख अध्यक्ष बॅ.सप्रू यांनी केला.क्रांतीकारी म्हणजे केवळ आक्रस्ताळी असा बर्‍याच जणांचा समज होता. पण यावेळी सावरकरांना जवळून पाहिल्याने बहुतेकांचा हा गैरसमज दूर झाला. सावरकरांचे तर्कशुद्ध व निर्भिड विचार ऐकल्याने ते मोठे विचारवंत व बुद्धीमान असल्याचा बहुतेकांनी उल्लेख केला( "उदय" अमरावती दि.२८ मार्च) या परिषदेला हिंदुमहासभेचे पुढारी प्रामुख्याने उपस्थित होते. टाईम्स ने लिहिले," The acceptance of resolution will be tantamount to setting up Hindu Raj at the center supported with British Bayonets.( Times of India,26 March 1941)

33.जीना सावरकरांना भेटण्यास उत्सुक असल्याचे सिंध चे हिंगोरानी यांनी कळवले. चिमणलाल सेटलवाड व डॉ.आंबेडकरही सावरकर-जीना भेट व्हावी म्हणून प्रयत्नशील होते.

३४.आंबेडकरांच्या "पाकिस्तान" या पुस्तकाविषयी सावरकरांना पत्रकारांनी विचारले असता सावरकर महणाले, आंबेडकरांनी हे पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यासंबंधी आपणाशी चर्चा केली होती. सैन्यात मुसलमानांचे आधिक्य झाले तर पाकिस्तान निर्माण होईल हे विधान परिस्थितीचे थन आहे पाकीस्य्तानचा पाठपुरावा नव्हे.उलट हिंदूंनी अधिकाधीक संख्येने सैन्यात जावे या माझ्या प्रयत्नांना ते पुष्टी देणारेच आहे.

३५.दि.१५ एप्रिलला सावरकरांनी आंबेडकरांचे सुवर्णमहोत्सवाचे वेळी अभिष्टचिंतन केले. आंबेडकरांना अपृश्यतानिवारण कार्य केल्यासाठी शुभेच्छा देतानाच सावरकर म्हणाले आंबेड्शकरांचे हिंदुविरोधी विचार व कृती हिसुद्धा माझ्या लक्षात आहे. तीही हिंदुसंघटनाला सहाय्यक होईल अशी आशा धरुन मी त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

३६.दि.२६ जुलै १९४१ ला ७५ पुढार्‍यांची पुण्यात बैठक झाली त्यात सावरकर व आंबेडकर सहभागी. या परिषदेत सावरकरांचे वैशिष्ट्य्पूर्ण भाषण. अखंड व अविभाज्य हिंदुस्थानाचा ठराव . परिषदेत उपस्थित असलेल्या तात्यराव केळकर ,पं.नथुराम गोडसे व अ.स.भिडे गुरुजी यांच्या सह सावरकर त्याच दिवशी अन्य सभा व राजकिय कामांसाठी सांगलीला रवाना.

३७.व्हाईसरॉयने वाढवलेल्या कार्यकारीणीत मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व न मिळाल्याने डॉ.आंबेडकरांनी तिचा निषेध केला. दि,८ ऑगस्ट ला सावरकरंनी पत्रक काढून आंबेडकरांना पाठींबा दिला. पत्रकातच या वर्गाचे प्रतिनिधी आंबेडकरांवाचून दुसरा योग्य मनुष्य नसल्याने त्यांचीच निवड करावी असी मागणी सावरकरांनी केली.

३८.दि.११ एप्रिल १९४३ ला दिल्लीत हिंदुसभाभवनात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर डॉ.आंबेडकरांशी एक तास विचारविनिमय.

३९. ६ जून १९४३ ला मुंबईत "सावरकर सप्ताह" गवालिया टॅंक (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) येथे सावरकरांचा भव्य सत्कार र.पु.परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या भाषणात सावरकर म्हणाले सर्व अल्पसंख्यांकांचे आपण प्रतिनिधी असल्याचे जीना भासवतात पण मुसलमान सोडून अन्य पारई,ख्रिश्चन देश खंडित करण्याच्या बाजूने नाहीत. सर्व मुसलमानही जीनांच्या बाजूने नाहीत. अस्पृश्य जरी वेगळी जागा मागत असले तरी घाबरुन जायचे कारण नाही. डॉ.आंबेडकरांशी माझे याविषयी बोलणे झाले आहे त्या आधारे मी सांगतो ते फक्त वसतीसाठी ओसाड जागा मागत आहे, तेव्हा त्यांच्यापासून भय बाळगण्याचे कारण नाही. या कार्यक्रमाचे "इंडिया मुव्हीटोन" ने चित्रीकरण केले असून त्या NEWS REELS मिळवण्याचे प्रयत्न चालु आहेत. यथावकाश त्या www.savarkar.org वरुन प्रसिद्ध केल्या जातील.

४०.दि.२० जून १९४३ ला सावरकरांचा रोहिदास सुधारक मंडळ व विविध चर्मकार समाज संस्थांच्या वतीने सावरकरांचा दादर येथे सत्कार करण्यात आला.त्यावेळी सावरकर म्हणाले," हिंदूसमाजाने तुमच्यावर ज्काही अन्याय केले तरी तुम्ही हिंदूधर्म सोडू नका. आपापसातील जातीभेद गाडून टाका .मी त्यासाठी प्रयत्न केले समाजाने माझ्यावरही बहिष्ख्कार टाकला टिका केली. पण मी समाजहिताचे काम सोडले नाही. एकनाथ अस्पृश्याच्या घरी जेवले म्हणून त्यांच्यावरही बहिष्कार पडला. प्सण शेवटी तेच संत मानले गेले. डॉ.आंबेडकर आता व्हाइसराय च्या कार्यकारीणीवर सदस्य झाले आहेत .माझा त्यांना पाठिंबा आहे. तुम्हीही तसेच प्रयत्न सुरु ठेवा. मिळतील ती अधिकार स्थाने घ्या. अशी अधिकारपदे घेणार्‍या हिंदूंना माझा पाठिंबा राहील. तसेच आपण सैनिकी शिक्षणही घ्यावे.

४१. सन १९४६ घटनासमितीसाठी हिंदुसभेतर्फे डॉ.मुखर्जी तर मुस्लीम लिग व युरोपिअन गटांच्या पाठींब्याने आंबेडकर घटना समितीवर निवडून गेले. मुखर्जींणा कॉंग्रेसचा पाठींबा.

यावेळी अग्रणीच्या लेखानुसार सावरकर घटना समितीत जाण्यास उत्सुक नव्हते असे दिसते. मंत्री,राष्ट्रपती होण्यापेक्षा किंवा भारतररत्न पेक्षा स्वातंत्र्यवीर हिच उपाधी त्यांना अधिक प्रिय असावी.

क्रमश:

1 comment:

Abhimanyu said...

**** हिंदू धर्माचे नुकसान होऊ नये या साठी स्वा. सावरकरांनी बाबा साहेबांना ख्रिस्ती अथवा मुस्लिम होण्या ऐवजी हिंदू धर्माच्या अत्यंत जवळ असलेल्या बौध्द पंथाचा स्वीकार करण्याची सूचना दिली व व बाबासाहेबांनी ती मान्य केली. त्यांच्या मुळेच त्यांचे असंख्य अनुयायी ख्रिस्ती अथवा मुस्लिम होण्या ऐवजी बौध्द पंथीय झाले.****
ह्या मुद्द्याला काही ऐतिहासिक सदर्भ / पुरावे उपलब्ध आहेत काय ? सदर मुद्दा मला माझ्या कै. तीर्थरूपांनी सांगितला होता. पण तसे काही सदंर्भ / पुरावे मला अद्याप सापडलेले नाहीत.

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...