Wednesday, May 18, 2011

लोकमान्य टिळक, छत्रपति आणि वेदोक्त प्रकरण

कोल्हापुरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने (राजोपाध्ये नव्हेत)स्वत: अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. राजोपाध्याय स्वत: आजारी असल्याने ते तिथे हजर नव्हते. या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केली. जाणकारांनी शाहु महाराजांच्या लक्षात हि गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने "छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!" असे उद्धट उत्तर दिले. पण छत्रपती शाहु महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरही तो ब्राह्मण ऐकेना, त्यातुन त्याने स्वत: शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या महामूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. मात्र हा विधी पण संस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला, त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे स्वरुप आले.

स्वत: शाहू राजांना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती का नाही? त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते. कोल्हापुरच्या विद्याविलास च्या संपादकांना लिहिलेले हे पत्र,

"माझ्या मतासंबंधि बराच गैरसमज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरता पाठवत आहे.सत्यशोधक, समाजिस्टांचा हलल माझेवर का? ज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध ,थिऑसफी इ. पंथांची काही तत्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काही तत्वे मला मान्य आहेत. मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही. हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले .मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते? मला वेद मान्य असून ,मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का?

कळावे,

शाहू छत्रपती

मुंबई , ता २३ मार्च १९२१

अशा विचांरांचे हे छत्रपती या वेदोक्त वादात कसे फसले वा इंग्रजांच्या राजकारणाने फसून व काही लोकांच्या सल्ल्याने का वागले, लोकमान्यांची भूमिका काय होती याचा हा इतिहास!

लोकमान्य टिळक विरुध्द चिरोल

चिरोलच्या ’दि अनरेस्ट एन इंडिया’ या लोकमान्यांवर आणि चित्पावन ब्राह्मणांवर गरळ ओकणारे पुस्तक त्याचे मराठी भाषांतर भास्करराव जाधव व अण्णासाहेब लठ्ठे व प्रो.म.गो.डोंगरे या तिघांनी केले व ते पुस्तक स्वखर्चाने छापून शाहूमहाराजांनी फुकट वाटले. महाराजांनी सर व्हलेंटाईन चिरोलच्या पुस्तकाच्या लेखनासाठी दरबारी पाहुणा म्हणून ठेऊन घेतले. कागदपत्र परवले, पैसा दिला. महाराजांचे ॠण चिरोलने स्वत: प्रस्तावनेतच मान्य केले आहे. मंडालेहून आल्यावर टिळकांनी चिरोलवर अब्रुनुकसानी चा दावा दाखल केला. या खटल्यात भास्करराव जाधव आणि डोंगरे चिरोल साहेबाचे साक्षिदार म्हणून उभे राहिले. शाहु महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी विरोध केला असे चिरोलने म्हंटले होते त्यासंदर्भात टिळकांच्या वकिलांनी १९०१ ते १९०८ या काळातले केसरीचे अंक समोर ठेऊन प्रश्न केला की "टिळकांनी शाहुमहाराजांच्या वेदोक्ताच्या अधिकाराला कोठे विरोध केला ते दाखवा." कारण काहीजणांनी तसा लेखी व तोंडि प्रचार केला होता. तेव्हा या दोघांनीही टिळकांनी वेदोक्ताच्या संबंधात लोकमान्यांनी शाहूमहाराजांना कधिही विरोध केला नाही हे कबूल केले. डोंगरे म्हणाले वेदोक्त "प्रकरणात व्यक्तीश: छत्रपतिंविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखवता येणार नाही. किंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहेच असे टिळक म्हणत होते असे मला वाटते."

याच केस मधे सत्यशोधक भास्कररावांची जी साक्ष झाली ती त्यांची मनोवृत्ती स्पष्ट दाखवतात. जाधव म्हणाले , "मला या वेदोक्तामधे काहिहि अर्थ दिसत नाही ब्राह्मण विरोधी जातात म्हणून आम्ही हा हक्क मागतो. हिंदुंनाच काय पण मुसलमान ख्रिस्ती यांनाहि हा अधिकार असावा असे मला वाटते!" तेव्हा वकिलांनी प्रश्न केला कि मग तुमच्या मागणीप्रमाणे मुसलमान व ख्रिश्चनांनिही वेदोक्ताची मागणी केली असेल. त्यावर जाधवांनी उत्तर दिले. अद्याप त्यांनी ती मागणी केली नाही. जाधवांनी हे प्रकरण कसे रंगवले असेल याचा अंदाज करता येईल.

भास्करराव जाधव यांची कार्यशैली

राजोपाध्ये यांची भूमिका मांडणारे पत्र पुढे देतो पण हे सविस्तर पत्र ५ मे १९०२ ला पाठवले त्यावर दुसर्‍याच दिवशी महाराजांच्या खाजगी कारभार्‍याचे उत्तर आले व त्यात राजोपाध्यांना बडतर्फ केले गेले व जप्तीचा हूकूम दिला. १३ मे ला शाहू लंडनला निघाले व १५ मे ला मुंबईला बोटित बसले. त्यांच्या पाठीमागे सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी राजोपाध्ये यांची उत्पन्ने जप्त केली पण ती केवळ उपाध्येपणाशी संबंधित न करता खाजगी मालकिची उत्पन्नेसुद्धा जप्त केली . एवढेच नव्हे तर या वादाशी संबंध नसलेल्या छोट्या गावातील शेकडो ब्राह्मणांना च्या लहानसहान जमिनी जप्त करून त्यांना देशॊधडिला लावले. हि सर्व उत्पन्ने मंदिरांची व्यवस्था लावण्यास पूर्वापार या मंडळिंना दान म्हणून मिळाली होती हि सर्व ब्राह्मण परागंदा होऊन ब्रिटिश हद्दीत निघून गेली. मूळ प्रश्न होता केवळ क्षत्रियत्वाचे संस्कार लोप पावल्याने छत्रपतींनी प्रायश्चित्त घेण्याचा होता. त्यांचे क्षत्रियत्व ब्राह्मण समाजाला मान्यच होते. जाधवांनी खुनशिपणाने राजोपाध्येंवर जप्तीचा हुकूम बजावण्याची वेळ राजोपाध्यांच्या मुलाच्या लग्नघडीलाच काढली. या सत्यशोधक जाधव यांनी ६ मे १९१९ ला एक व्याख्यान दिले त्यात कुणबई वैदिक वर्ग निर्माण करु नये असे उद्गार काढले. वेदपठ्ण करण्यातच पुरुषार्थ नाही असे म्हटलाने वेदाभिमानी असल्याने छत्रपति शाहू संतापले मग जाधवांनाच सपशेल माफी मागावी लागली.

टिळकांची भूमिका

शाहु छत्रपतीं प्रकरणाचा फायदा घेऊन सत्यशोधकांनी ब्राह्मण -क्षत्रिय समाज सोडून सर्वच हिंदु समाजाला,- परधर्मियांनाहि- वेदोक्ताचा अधिकार मिळाव म्हणून प्रचार करत होती. यासंबंधि टिळकांनी लिहिलेले शब्द, " जातिभेद हा हिंदु समाजाच्या हाडीमासी खिळलेला आहे. .... हे परंपरागत किंबहुना रचनासंगत भेदाभेद अजीबात सोडून टाकून सर्व हिंदुस्थानातील जातींचा सबगोलंकार करणे इष्ट असले तरी शेकडो वर्षे ते शक्य नाही हे कोणासहि मान्य केले पाहिजे व आम्हि आजच्या प्रश्नांचा जो विचार करणार आहोत तो याच धोरणावर करणार आहोत. समाजाच्या स्थितीत जो काही पालट कोणास करावयाचा असेल तो व्यवस्थेने बेताबेतानेच केला पाहिजे व तोही असा असला पाहिजे कि त्याची उपयुक्तता लोकांच्या चटकन लक्षात येईल. हल्ली जी वेदोक्ताची चळवळ सुरू झाली आहे ती त्या प्रकारची नाही...मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे त्यांचा हात धरणारा या काळात कोणी राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणानेच तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही.... निरनिराळ्या जातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हास पाहणे आहे व तशा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहीले आहेत."

वेदोक्ता बाबत टिळकांचे जाहिर मत

५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात " कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."

लोकमान्य टिळक यांना विद्धंसक सुधारक होण्यापेक्षा विधायक सुधारणावादी व्हावेसे वाटत होते हे स्वच्छ दिसते. आधी राजकिय स्वातंत्र का आधी सामाजिक सुधारणा हा वाद प्रसिद्ध आहेच. पण या प्रकरणात त्यांची अकारण बदनामी केली गेली.

टिळक विधायक सुधारणावादी होते. जातीभेद मोडणे त्यांना इष्ट ही वाटत होते पण क्रमाक्रमने. खुद्द शाहु राजांनी तंजावर प्रकरणात मराठा समाजातील भोसले, घोरपडे,पवार ,जाधव आदि केवळ १२ मराठा घराण्यांतच वेदोक्ताचा अधिकार आहे असे सांगीतले. म्हणजे खुद्द छत्रपतींनीही सर्व मराठा समाज किंवा सर्व ब्राह्मणेतरांना वेदोक्ताचा अधिकार आहे किंवा हवा असे १९१७ पर्यंत म्हटले नव्हते.

टिळक हे हिंदुसंघटक असून सर्व जाती एकत्र याव्यात असेच त्यांना वाटत होते. शिवजयंती व गणेशोत्सव यांना राष्ट्रीय स्वरुप देण्याच्या त्यांच्या चळवळीमागे सर्व जातींचे एकत्रीकरण हाच उद्देश होता.शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव या आपल्या लेखात टिळक सारांशाने म्हणतात,"...राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.एकराष्ट्रीयत्व म्हणजे काही दृष्य पदार्थ नव्हे......सर्व लोकांच्या आदरास पात्र असलेल्या जितक्या अधिकाधिक वस्तु असतात त्या मानाने एकराष्ट्रियत्वाची कल्पना अधिकाधिक दृढ होत जाते हे तत्व सर्वमान्य आहे. ... अशा गोष्टी अद्याप दुर्दैवाने आम्हास फारशा उपल्ब्ध नाहीत.गाई आणि ब्राह्मण यांचा प्रतिपाळ अशा दोन गोष्टी एकेकाळी होत्या...पण याहीपेक्षा आजचा काळात सर्वांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रपुरुषांचे स्मरण होय.त्यातूनही ज्या शूर पुरुषांनी मरठे ,ब्राह्मण ,परभू,शेणवी वगैरे कोणताही भेद मनात न आणता "गुणा: पुजस्थानं गुणिषु नच लिंगम्‌ नच वय:" या न्यायाने ज्याचा जो गुण आढळण्यात आला त्याचा सारवजनिक कार्यात उपयोग करुन सर्वांस राष्ट्रीय एकत्वाच्या जाळ्यात आणले त्याचे स्मरण सर्वांस श्रेयस्कर होईल. श्री शिवछत्रपतींचे चरित्र अशाच प्रकारचे आहे....शिव छत्रपतींचा उत्सव करणार्‍यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. या उत्सवात मराठे आणि ब्राह्मण, अगर ब्राह्मण आणि परभु अशा प्रकारचा कोणताही भेद करणे अतिशय गैरशिस्त आहे.....शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्यात एक प्रकारची कृतज्ञता बुद्धी आमच्या मनात आहे त्याव्यतिरिक्त अशी जयंती साजरी करण्याने एकराष्ट्रीयत्वाचा उदय होईल हा फायदा लहान सहान नाही."

सयाजी महाराजांची भूमिका

सयाजीराव महराजांनी या प्रकरणात विधायक भूमिका घेऊन हा वाद कोल्हापूरप्रमाणे बडोदे संस्थानात माजू दिला नाही. त्यांनी १८९६ ला एका पत्रात म्हंटले आहे की "मला पुराणोक्त आणि वेदोक्त यात स्वत:ला काही कमी जास्त श्रेष्ठ वाटत नाही. मात्र सामाजिक दृष्ट्या वेदोक्त श्रेष्ठ पद्धत मानली जाते. पण अशा रितीने लोक केवळ विधी आणि कर्मे यातच बुडुन धर्माची तत्वे विसरुन गेली आहेत ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून मी सुधारणा हाती घेतली आहे."

राजोपाध्यांची भूमिका

शाहु महाराजांना अंघोळ न करता पूजा सांगू पहाणार्‍या मूर्ख ब्राह्मणाला शासन केल्यावर जे मुख्य राजोपाध्ये त्यांना दरबारातर्फे काही विचारणा झाली.त्यात त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याची आपली इच्छा आहे किंवा कसे असे विचारले गेले ते पत्र किंवा यादी ७ - १० - १९०१ चे आहे.

यावर राजोपाध्ये ते मुंबईला एका परिक्षेसाठी निघाले होते त्यांनी राजांची समक्ष भेट घेऊन परत आल्यावर शास्त्राप्रमाणे विचार करण्यासाठी बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील याच्या विचारविनिमयासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो असे सांगीतले . छत्रपती शाहू राजांची मान्यता मिळाल्यावर ते मुंबाईला निघून गेले. शंकराचार्य ,काशी ,वाई इ, स्वखर्चाने घेऊन येतो असे राजोपाध्ये यांनी राजांना लेखी कळवले होते. त्यास मूक संमती मिळाली. राजोपाध्ये परतल्यानंतर मधल्या ८-१० दिवसात कोणीतरी शाहू राजांचे कान भरले व राजोपाध्यांना काशी आदी हून शास्त्री लोकांना आणण्यास मनाई करण्यात आली. वर उल्लेखलेले पत्र हि राजोपाध्यांना ७-१० ऐवजी १ महिना १० दिवस एवढे उशीरा म्हणजे १८-११-१९०१ ला मिळाले.

५- मे १९०२ ला राजोपाध्ये यांनी महाराजांना पाठवलेल्या पत्राचा सारांश,

१. रा.ब.दिवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाही. आपण वस्तुस्थिती सोडून कळवले हे माझे दुर्दैव आहे. ....

२.सरकरवाड्यातील हव्यकव्य कृत्ये वेदोक्त वा पुराणोक्त करायचे काम माझे नाही तर सरकारास जे विधि असतात ते सरकार नसताना मी करायचे असतात.विशेष प्रसंगी सरकार असताना मी फक्त त्यांचे सन्निध असावे एवढेच माझे काम आहे.पद्धत कोणतीही असो.

३. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारांची इच्छा आसल्यास तसे करण्यास माझी काहीही हरकत नाही.

४.मला नेहमीच्या वहिवाटिप्रमाणे सूचना मिळाली नाही म्हणून मी हजर झालो नाही. नेहमीप्रमाणेच सूचना मिळताच मी हजर झालो हि.यावरुन असे दिसेल कि मी उपाध्यायाचे काम सोडलेले नाही.

५. काशी,नाशिक इ.क्षेत्रांकडून निर्णय आणवले पाहिजेत त्यास हुजुरांची मान्यता पाहिजे.

६.शास्त्राची अनुज्ञा आणल्याशिवाय हे काम केले( संस्कार लोप पावल्याने प्रायश्चित्त करून पुन्हा वेदोक्त पद्धत सुरू करण्यासंबंधि) तर माझेवर येथील ब्रह्मवृंदाचा बहिष्कार पडेल. मजवर बहिष्कार पडल्यास माझी हरकत नाही पण मीच बहिष्ख्रुत झालो तर धार्मिक विधी करणार कोण?

७. १५ मे ला माझ्या मुलाचे लग्न बावड्याचे जहागिरदार यांचे मुलीशी ठरले आहे. ते झाले की मी शास्त्राच्या निर्णय मिळवण्याच्या उद्योगाला लागतो, व तसा निर्णय मिळवून मी जुलै १९०२ चे आत उत्तर देतो. एखादी वहिवाट बंद पडली कि नव्याने सुरू करताना शास्त्राचा निर्णय आणवण्याव्चा पूर्वापार चालत आलेला सामान्य नियम आहे. तो या बाबत सोडून एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक कृत्ये करण्याचा प्रारंभ केला गेला यामुळे हे प्रकरण या थरावर आले हे माझे दुर्दैव आहे.

८.सरकारांच्या परंपरागत उपाध्येपणावरुन मला दूर का करण्यात येऊ नये असा प्रश्न प्रस्तुत यादित मला विचारला आहे. या प्रश्नाला सध्या एवढेच उत्तर देतो कि शास्त्राज्ञेस व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटिस अनुसरून मी आपले काम करण्यास सिद्ध आहे तोपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नाहि.

पण यावर लगेच ६ मेला तुमचे उत्तर समाधनकारक नाही असे उत्तर आले व लगेच जप्तीचा हूकुम काढला जाउन राजोपाध्येंना काढून टाकण्यात आले व जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरुन काढला असा खोटाच आरोप केला गेला. वास्तविक राजोपाध्ये यांनी उत्तर दिले त्यात हुजुरांचे घराणे क्षत्रिय का शूद्र याचा प्रश्नच उद्भवत नाही असे लिहिले होते.

मधे ३०-३५ वर्षांच्या काळात अज्ञान छत्रपतिंच्या मुंजीही झाल्या नव्हत्या. कारण सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यात होता. पण स्वत: शाहु महाराज छत्रपती झाल्यावर याच राजोपाध्यांनी शाहूंना गायत्री मंत्र दिला होता. आणि हे स्वत: महाराजांनीच एका हुकुमात मान्य केले होते. पुढे महाराज श्रावणीही करत असत. जो श्रावणी करतो त्याला वेदोक्ताचाही अधिकार असतोच असतो हे जो धर्मशास्त्र जाणतो त्यालाच कळेल. महाराजांसाठीचे सर्व श्रावणीचे विधी स्वत: राजोपाध्येच करत. या श्रावण्या जुन्या राजवाड्यात भवानी देवीसमोर होत व १६ कायदेकरी म्हणजे धर्मपंडीतहि आपल्या श्रावण्या महाराजांच्या उपस्थितीतच करत.

याचा अर्थच असा होता कि , राजोपाध्ये व अन्य पंडीतांना राजांच्या क्षत्रीयत्वाची किंवा वेदोक्ताच्या अधिकाराची कधीही शंका नव्हती. मधल्या काळात ४० वर्षे संस्कार लोप पावला होता. तो प्रायश्चित्ताशिवाय सुरू करणे हे अशास्त्रीय एवढेच राजोपाध्ये व अन्य ब्रह्मवृंदाचे म्हणणे होते. आणि शास्त्राला ते धरुनच होते.

१९१२ ला तंजावरच्या वारसा हक्काबद्दल वाद निघाला असता शाहू राजांनी अर्ज केला. एकूण २४ हक्कदार होते. या खटल्यात खालच्या कोर्टाने तंजावर वंश हा धर्मशास्त्र दृष्ट्या संस्कार न केला गेल्याने (लग्न ,मुंज सारखे) शूद्र ठरवला व धर्मशास्त्र दृष्ट्या धर्मपत्नी नसलेल्या व्यक्तीचा अधिकार मान्य केला. यावर शाहु राजांनी अपिल केले व आपल्या घरात कित्येक वर्षे वेदोक्त विधी बंद होते म्हणून आपणही शूद्र आहोत असा मुद्द्दा मांडला. मद्रास हायकोर्टातून निकाल आला. कोल्हापुरचे वेदोक्त प्रकरणही हायकोर्टात निघाले.. ब्राह्मण ज्या पद्धतीने विधी करतात तोच महाराजांना हवा होता. शककर्त्या शिवरायांचाही तसा आग्रह नव्हता. क्षत्रियांस उचित असे विधी गागाभट्टांनी ठरवले त्या प्रमाणे विधी होत. त्यास व प्रायश्चित्तास कोल्हापुरचे महाराज तयार होते तर वाद तेव्हाच मिटला असता .

"तेव्हा क्षत्रिय संभाळणे हे मुख्यत: यजमानांच्याच हाती आहे.कोल्हापुरच्या महाराजांनी त्यात चूक करून पुन्हा उपाध्यायाला आपल्या म्हणण्याप्रमाणे वाकवण्यासाठी कामावरुन काढून टाकले व जप्ती आणण्याचा अन्याय केला " असा अप्रत्यक्ष शेरा मद्रास च्या हायकोर्टाने मारला. शिवरायांप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन वेदोक्त विधी सुरू करावेत काही काळ विधी केले नाहीत म्हणून त्यांचे क्षत्रियत्व रद्द होत नाहि व ते शूद्र ही ठरत नाहीत असे कोर्टाने सूचित केले.

मद्रास हायकोर्टाचा निकाल सुमारे २२५ पानांचा असून तो इंडियन लॉ रिपोर्टरच्या मद्रासच्या १९२५ च्या vol x L VIII मधे दिलेला आहे. सर्वांत गंमत हि की क्षत्रीयत्वासाठी भांडणार्य़ा महाराजांनी ब्राह्मणांप्रमाणे वेदोक्त विधी सुरू केले. ते अद्याप तसेच चालु आहेत. हायकोर्टात मधे काही काळ मुंजी वगेरे वेदोक्त विधी झाअले नव्हते असे पुराव्यातून निष्पन्न झाले त्यामुळे कोल्हापुर घराणे क्षत्रिय का शूद्र याचा निर्णय देऊ नये अशी विनंती राजांतर्फे करण्यात आली. तशी नोंद निकालात स्पष्टपणे करण्यात आली आहे. महाराजांच्या मृत्युनंतर धर्मविधींपुरते छत्रपती ब्राह्मण पद्धतीने वेदोक्त करतात व त्यापुरते ते ब्राह्मण झालेत आणि हे त्यांनी सुरू केलेले ब्राह्मण पद्धतीचे विधी मराठा पुरोहित करतात.

१९१८ ला युवराजांचे लग्न सयाजीरावांच्या नातीशी ठरले. त्यांनी आवश्यक असलेले प्रायश्चित्त घ्यावे असे सुचवले. ७५ वर्षात कोल्हापुरच्या औरस वारसाचा विवाह होणार तेव्हा परंपरेप्रमाणे पहिले केळवण राजोपाध्ये यांचे व्हायचे. त्याप्रमाणे राजोपाध्येंना राजांचा निरोप गेला. पण राजोपाध्ये यांनी मी आता राजोपाध्ये नसल्याने ते शक्य नाही असे कळवले. तेव्हा राजे स्वत: त्यांना भेटले.शेवटि केळवण हि झाले. रितसर प्रायश्चित्त ही राजांनी घेतले. राजोपाध्येंच्या व त्यांच्या मुलाच्या देखरेखीखाली सर्व विधी कोल्हापुर व बडोदे येथे झाले. त्यावेळी १६ कायदेकरी ब्राह्मणांपैकी एकाने आपले जप्त उत्पन्न सोडावे म्हणून अर्ज केला तो मन्य झाला. सर्वांची उत्पन्ने सोडण्याचे मान्य करून छत्रपतींनी आपल्या मनाचा थोरपणा दाखवला. मात्र राजोपाध्ये आणि अन्य ब्राह्मणांनी आमची चूक नसता आम्ही अर्ज का करावा अशी भूमिका घेतली व अर्ज केले नाहीत .पुढे महाराजही हि गोष्ट विसरले व कोणाचीही उत्पन्ने सुटली नाहित.

केसरीचा राजोपाध्येंना सल्ला काय होता?

"...कोल्हापुर येथले राजोपाध्ये यांच्या मूळ सनदा कशा आहेत ते आम्हाला बरोबर माहित नाही. - राजोपाध्ये यांना आमची सूचना आहे की महाराज परत आल्यावर त्यांचे पुढे हे प्रकरण पुन्हा मांडावे व निस्पृह रितीने त्यांची समजूत घालण्याची खटपट करावी आणि ते नच जुळले तर हे प्रकरण इंग्रज सरकार कडे न्यावे. दिवाणी किंवा फौजदारि हक्क देणे ही राजांच्या खुषीतील गोष्ट आहे. पण मामुल वहिवाटीप्रमाणे उपाध्येपण करण्यास तयार असता इनाम गाव काढून घेणे महाराजांच्या खुषीतील अधिकारातील गोष्ट नाही."

राजोपाध्ये हे नामदार गोखले यांचे वर्गमित्र असून राजकिय दृष्ट्याही टिळक पक्षिय नव्हते. टिळकांचा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. केवळ जी माहिती उपलब्ध होत असे त्यातून टिळकांनी भूमिका मांडली. त्यात विधायक सुधारक आणि न्यायाची बूज राखणे एवढाच आधार होता.

इंग्रजांची भूमिका

परंतु राजोपाध्यायांनी टिळकांची सूचना न मानता छत्रपती येण्याअगोदरच राजांनी लंडनला जाण्यापूर्वी नेमलेल्या संस्थानाच्या काळजीवाहू कौन्सिल कडे जप्तीच्या फेरविचारासाठी अर्ज केला. कौन्सिल ने तो फेटाळला. त्यवर राजोपध्ये यांनी तो संस्थानच्याच पोलिटिकल एजंट कडे अपिल केले. एजंट ने महाराजांच्या अखत्यारीतला विषय म्हणुन नाकारले. शेवटि राजोपाध्ये यांनी मुंबईच्या गव्हर्नर कडे अर्ज केला. त्यावेळी लॉर्ड नॉर्थकोट हा गव्हर्नर होता. त्याने प्रथम राजोपाध्ये यांच्या बाजूने निकाल दिला. तेवढ्यात शाहु राजे लंडनहून परतले व त्यांनी गव्हर्नरची भेट घेऊन हा निकाल फिरवायला लावला. हा निकाल महाराजांच्या हुषारीमुळे फिरला असे त्यांचे पहिले चरित्रकार कोल्हापुरचे दिवाण लठ्ठे यांनी शाहू मेमॉयर्स भाग १ पृ २०८ वर दिलेल्या टिपात म्हटले आहे.

यानंतर राजोपाध्ये यांनी व्हाइसरोय लॉर्ड कर्झन कडे अर्ज केला. पण २-३ वर्षे फ्रेजरने तो दाबून ठेवला. ५-०१-१९०५ ला नामदार गोखले यांच्या सांगण्यावरुन उपाध्यायंनी पुन्हा अर्ज पाठवला. तेव्हा सर्वच कागदपत्रे मागवली गेली. त्यावर फ्रेजर ने एक टिपण करून पाठवले त्यावरुन इंग्रजांनी जातीय वाद वाढवणे , कर्झन विरुद्ध फाळणीविरुद्ध टिळकपक्षीयांनी उठवलेल्य रानाला खीळ घालणे व फॊडा आणि झोड या कुटिल राजकारणाचा डाव खेळणे कसे साध्य केले ते दिसेल.

या टिपणाच्या सुरुवातीला आलेल्या वाक्यांचा भावार्थ - " मी या केसचा विचार करताना मझे एकेकाळचे पाल्य म्हणून शाहू छत्रपतींकडे ओढा असल्याने त्यांचा पक्षपती म्हणून विचार करत आहे हे कबुल करतो."

याच टिपणात फ्रेजर म्हणतो, " सनदेच्या अर्थासंबंधि शंका असेल तर मला वाटत की राजकारणाच्या दृष्टिने आपण याचा विचार केला पहिजे. जर राजोपाध्येला पूर्ण चेचला नाही तर सरकारची इभ्रत जाईल आणि महाराजांचा पराभव होईल."

अशा प्रकारे हा न्यायाचा प्रश्न न रहाता इंग्रजांची इभ्रत व राजकारण यांचा प्रश्न झाला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला खतपाणी घालून ,फोडा अणि झोडा चे तंत्र येथेही इंग्रजांनी वापरायचे ठरवले.

राजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या पत्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ या नावाने काही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वत:चा फायदा होतो का ते पहत आहेत. लावालाव्या करून चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहे. राजांविषयी आदर राखुन मी सांगूतो की याने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे."

"राजोपाध्यायांनी महाराजांना शूद्र म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हटले " असा खोटा प्रचार जाधव व अन्य सत्यशोधकांनी केला. ब्रिटिशांनी टिळक पक्षियांवर सूड उगवण्यासाठी त्यास उचलून धरुन ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वादाला खतपाणी घातले. ब्राह्मण वर्गाला अन्य समाजापासून फोडायचे त्यांना राजकारणास फायद्याचे होते. असे असले तरी इंग्रजांना हा वाद जातीय नाही हे माहित होते. याबाबत हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने ३ मार्च १९०५ ला एक पत्र लिहिले त्याच भावार्थ,

"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रिय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत.आणि ते तसे म्हणत नाहित असे म्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहे. राजोपाध्ये ४ थ्या उतार्‍यात म्हणतात, मराठी राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हापुरचे राजघराणे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे , त्यात कोणताही वाद नाही."

समाजात जातीय गैरसमज पसरवण्याचे कार्य त्यांनी पद्धतशीर पणे केले. आणि शाहू महाराज आणि त्यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांनाही या वादात काहीही संबंध नसताना गोवले गेले. मूळ काय आहे हे न वाचताच अद्यापहि या प्रकरणला जातीय रंग दिला जातो..भले भले लोक याला बळी पडतात तर सामान्यांची काय होत असेल अवस्था?.

संदर्भ :- वेदोक्त ,शाहूमहाराज आणि टिळक, लेखक: कै.ग.रं.भिडे (कोशकार भिडे)


संदर्भ :- वेदोक्त ,शाहूमहाराज आणि टिळक, लेखक: कै.ग.रं.भिडे (कोशकार भिडे)


मुखपृष्ठ
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-१

वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-२
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-३
वेदोक्त प्रकरणा वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खुपेरकर शास्त्रींचे निवेदन-४


टिळकांचा शाहूंच्या अभिनंदनाचा लेख: करवीर क्षेत्री राजकिय कपिलाषष्ठीचा योग


Tuesday, October 6, 2009

एक त्यागमय जीवन : स्वा.सावरकर


आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाजासाठी वाहून घेतलेल्या स्वा.वि.दा.सावरकर यांनी २६ फेब्रुवारी १९६६ ला प्रायोपवेशनाच्या साधनाने आत्मार्पण केले. सर्व आयुष्यभर त्यांनी एकच ध्येय जपले ते म्हणजे भारतीय समाजाची पारतंत्र्यातून मुक्ती ,देशस्वातंत्र्य! त्यासाठी त्यांनी स्वत"चे स्वातंत्र्यही पन्नास वर्षांसाठी पणाला लावले.
स्वा.सावरकर हे विज्ञाननिष्ठ व नास्तिक होते. जास्त अचूक शब्द वापरायचा तर अज्ञेयवादि होते. कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध होत नाही तोपर्यंत सिद्धांत म्हणून त्यांनी कधीच स्वीकारली नाही. भारतीय योगशास्त्र मात्र त्यांनी विज्ञाननिष्ठ मानले. "कुंडलिनी" ही भारतीय मानसशास्त्राने जगाला दिलेली देणगी आहे असे त्यांचे मत त्यांनी मांडले.आपल्या मनोबलाच्या आधारे त्यांनी अचाट अशी कृत्ये केली. "कि न घेतले व्रत अम्ही अंधतेने, बुद्ध्याची घेतले म्या वाण करी हे सतीचे" या काव्यपंक्ती त्यांच्या नि:स्वार्थ त्यागाच्या प्रेरणेतूनच स्फुरलेले आहे. देशस्वातंत्र्यासाठी लढताना अगदी जाणूनबुजून ,डोळसपणे दु:खाचा- सतीच्या वाणाचा स्वीकार त्यांनी केला."माझी जन्मठेप" या आपल्या आत्मचरित्रातून त्यांनी स्वीकारलेल्या त्यागी जीवनाचा व दु:ख स्वीकाराचा प्रत्यय ठायी ठायी येतो.माझी जन्मठेप मधे ते म्हणतात, "माझ्या या कष्टमय हेतुपूर्वक स्वत:वर कोसळून घेतलेल्या संकटांचे पर्वताखाली चिरडलेल्या आयुष्यात जर कोणता एखादा नियम अतिशय कडु पण अतिशय हितपरिणामी झाला असेल तर तो सदोदित प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरुन त्यास मनाची सिद्धता करुन ठेवणे हाच होय." (पृ. १७ समग्र सावरकर वाड्मय खंड-२ )
पृ.८२ वर तुरुंगाधिकार्याशी झालेल्या संवादात ते म्हणतात, "या त्रासात मी स्वत:हून पडलो हे खरे आहे. कारण त्या त्रासात तसे स्वत:हून पडणे हे मला माझे कर्तव्य वाटले तसेच या त्रासातून शक्यतर सुटणे हे ही कर्तव्यच वाटले. ( समुद्रात उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न)

सावरकर अज्ञेयवादि होते.त्यामुळे यातनांनी खचलेल्या मनाला आत्महत्येपासून परावृत्त करताना सूक्ष्म गोष्टींसंबंधी ते जर-तर च्या भाषेत ते लिहीतात,(पृ. १४०) "...पण अशा रितीने जेथे इतर भक्कम यंत्रे चुरून जातात तेथे गुप्त, अज्ञात यातनांचा मार सहन करण्यात उपयोगी पडावे, ते कार्य त्याचेकडून करुन घ्यावे म्हणूनच हे कर्तृत्वशक्तीचे यंत्र केले नसेल कशावरुन?" गुप्त,अज्ञात यातनांचा उपयोग काय याविषयी ते लिहीतात, "...तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल..." पुढे त्यांच्यातला अज्ञेयवादी लिहीतो, "परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि हि बातमी देखील (स्वत:च्या मृत्युची) देशास कळणार नाही मग त्याचा नैतिक परिणाम कोठला होणार?...त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरता स्वत:च्या हाताने करुन आपल्या पक्षाचे हानीत आणि अपजयात भर का घालतोस? " बुद्धीने दिलेले हे कारण मनाला पटल्यावर याच पृष्ठावर सावरकर म्हणतात,"...त्या वेळेस काही घटिका ज्या कार्याचा निदिध्यास लागल्याने मनाने संसाराच्या सर्व सुखांवर लाथ मारली त्या उदात्त कार्याची चर्चा मोकळेपणाने करता आल्याने मन पुन: चैतन्ययुक्त होई. सुप्त तेज पुन: जागे होऊन उठे. सोसले ते अपमान सन्मानच वाटू लागत. भोगलेल्या यातना काहीच नव्हत. भोगावयाच्या आहेत त्याही कर्तव्यच होत हा निर्धार पुन: सबळ होई. ह्या घटिका म्हणजे त्या कोलूच्या कठोर शापातील वरच होत्या."
अंदमानात सावरकरांनी यातनांच्या भीषण कचाट्यातही बंदिवानांमधे शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षणाचे व्यावहारीक फायदे राजाबंद्यांना पटवून देतानाच ते म्हणत ,"नुसते ज्ञान लंगडे तर नुसते कर्म अंधळे. धर्मकारणाप्रमाणेच राजकारणातही ज्ञानयुक्त कर्म हेच समाजास हितकारक होणारे आहे. तुम्ही सध्या एक सेवात्यागाची, यातना सहन करण्याची निष्क्रीय सेवा करताच आहा. त्याचे जोडीस ....तिला आता ज्ञानदृष्टीचीही जोड देऊन दुहेरी योग्यता अंगी बाणवू."
अंदमानाच्या अंधेर कोठडीत उपयुक्ततावादी सावरकरांनी योग, कुंडलिनी, वेदान्त यांचा उपयोग करुन घेतला.मार्सेलिसला समुद्रातून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यावर मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी आत्मबल नावाचे काव्य रचले आहे. त्यात "अनादि मी अनंत मी" असे स्वत:च्या आत्म्याचे वर्णन करुन घोर निराशेतून मनाला पुन्हा बळ प्राप्त करुन दिले.अंदमानात केलेल्या योगाभ्यासाविषयी सप्तर्षी या महाकाव्यात ते लिहीतात,
‘तो दिवस मावळू ये, मग ज्या होतो धरुनि नियमासी ।
चित्तैकाग्र्यासी मी साधित एकान्त विगत षण्मासी ॥
नियमानुरुप त्या मी चित्तैकाग्री करावया प्रगती ।
पुरती सक्त मजूरीहोतांची की धुवोनि कर मग ती ॥
योगीराजाचा त्या ग्रंथ ‘श्री राजयोग’ मी उघडी ।
शान्त रसाचा पेला दूर करावा गमेचि जो न घडी ॥’
सुरुवातीला मन एकाग्र करणे कठीण. सावरकर म्हणतात,
‘ मन हे चंचल भारी ! दुर्निग्रह भासलेचि साधुजनां ।
जड जीव, अनभ्यस्तचि त्यात अम्ही, आवरेचि ते मज ना ॥’
पुढे चित्त एकाग्र होऊ लागले तेव्हा,
‘ घेता घेता ऐशा वृत्ती ध्यानस्थ चित्ती विलयते ।
ये सुखद अनुभवाया ‘आत्म-रती’चा प्रसाद तिल याते ॥’
अन्तर्जोतीवर चित्त स्थिर झाल्यावर अंधार कोठडिला काय घाबरायचे?
‘तूं अन्तर्ज्योति ! तुला या अंधारात घाबरा? पाहे ।
सुख-दु:खाचे साधन बाह्य न, परि मनात बापाहे ॥
अंदमानातून सुटून आल्यावर "कुंडलिनी व हिंदुधज" या विषयावर त्यांनी रत्नागिरीत तीन व्याख्याने दिली.विज्ञाननिष्ठ सावरकरांनी भाषण करताना म्हटले," बंदिवासात असताना एकट्याची एकांतातली करमणूक म्हणून या संबंधाने मी थोडासा अनुभव घेतला आहे." सावरकरांना योगविद्या अवगत होती. त्यांना काही मंत्रही येत असत. रोज काही वेळ ते ध्यान करत असत याला बर्याच जणांनी दुजोरा दिला आहे. योगशास्त्राला सावरकरांनी संपूर्ण विज्ञानावर आधारीत एक प्रत्यक्ष, प्रयोग,अनुभव व पडताळा घेता येणारे शास्त्र मानले आहे.
धर्मातील कर्मकांडाचे प्रतिक असणारी कुंडलिनी हिंदु ध्वजावर अंकीत करणे ही अंधश्रद्धा नाही काय, या प्रश्नावर बुद्धीवादी सावरकर म्हणाले," हे म्हणणे योग्य नाही. योग ही भारताने सर्व जगाला दिलेली देणगी आहे.आपल्या पूर्वजांनी शरीर आणि मानसशास्त्र याचा सहस्त्र वर्षांपूर्वी एवढा खोल विचार केला होता की, अगदी परमावधी चे आश्चर्य वाटते. योगसाधनेचा विचार हा अगदी विज्ञाननिष्ठ आहे. बंदीशाळेत मी कुंडलिनीचा उबारा अनुभवला आहे."
मात्र आपल्या योगसामर्थ्याविषयी सावरकर फारसे बोलत नसत. हा चर्चेचा विषय नाही असे सांगून याविषयीचे प्रश्न टाळत. आपल्या अनुयायांनी व समाजाने जास्तीतजास्त विज्ञानाभिमुख व्हावे आपल्या बोलण्यातून गैर अर्थ निघु नयेत म्हणून या विषयी मौनच पाळणे त्यांना जास्त पसंत होते.सावरकरांनी आपले सर्व आयुष्य समाजासाठी वेचले. समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर, साहित्यिक, नाटककार,महाकवी ,उत्कृष्ट वक्ता, अनेकांना क्रांतीकार्यात प्रेरक शक्ती ठरलेला अशा विविध भूमिका पार पाडल्यावर वयाच्या ८२ व्या वर्षी सावरकरांनी आत्मार्पणाचा निर्णय घेतला. आता आपली काही कर्तव्ये राहिली नाहीत. केवळ जगाला व स्वत:ला हा देह भारभूत होऊ नये म्हणून हा बुद्धीने घेतलेला निर्णय होती. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी "आत्महत्या आणि आत्मार्पण" हा लेख त्यांनी प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी संत रामदास, ज्ञानेश्वर, एकनाथ इ. ची ठळक उदाहरणे दिली. सुरुवातीला समुद्रात देह समर्पित करण्याची त्यांची इच्छा असावी (महायोगी सावरकर : ले. बाळाराव सावरकर) पण आपल्या बरोबर असलेल्यांवर दोष येऊ नये , कायद्याचा त्रास त्यांना होऊ नये या हेतूने तो विचार त्यांनी रद्द केला व अन्न त्याग करुन म्हणजे प्रायोपवेशन करुन आत्मार्पण केले. एका तेजस्वी त्यागमुर्तीचा शेवट दि. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी झाला.
प्रथम प्रकाशन
: मनशक्ती पाठ ऑगस्ट २००९

Wednesday, September 23, 2009

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...

.
लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळे , नागवेकर व सहकारी यांनी गायलेले हे काव्य ऐकताना मनात एक शांत भाव दाटुन येतो. या गाण्याचे शब्द मला ऐकु येतात ते असे,
.
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळेही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळामोती येतावळी काळी वो माय... ॥ धृ ॥
मी काळी, कांचोळी काळी
कासकासोनि ते काळी वो माय
बुंथ काळी ... ॥ १ ॥
एकली पाण्याला, नव जाय साजणी
सवे पाठवा मुर्ती सावळी वो माय
बुंथ काळी... ॥ २ ॥
विष्णुदासनाम्याची, स्वामिनी काळी
कृष्णमूर्ती बहु काळी वो माय
बुंथ काळी.... ॥ ३ ॥



.
विष्णुदासनामा हे एकनाथांच्या काळचे ! संत नामदेव महाराज वेगळे !! विष्णुदास म्हणजे विठ्ठलाचे दास. कृष्णाचे काळे रुप संतांना प्रिय होते. काळा रंग म्हणजे सर्व रंगांचे एकत्रीकरण. डांबर काळे असते त्यापासून सर्व रंग निर्माण करतात. सर्व मूळ रंग एकत्र केले की पुन: काळा रंग तयार होतो. यमुनेचे जळ काळे, घागर काळी. जे आणायचे ते काळे ज्यातून आणायचे ते काळे, जो आणतो आहे तोही आता काळाच. आता एवढे झाल्यावर वरपांगी रुप तरी वेगळे कशाला? त्यामुळे वस्त्रे ,अलंकार हे ही सर्व काळेच भासत आहेत. असे असताना परत ‘एकले न जाता मुर्ती दुजी’ बरोबर कशाला? त्याचे कारण जरी सर्वत्र एक रंग झाला तरी भक्तिचा आनंद हवा असेल तर पुन: द्वैत हवेच. या साजणीने कृष्णाला नव्यानेच समर्पित केले आहे. त्याच्या बरोबर एकरुपता असली तरी त्याला सतत बरोबर तर ठेवायचे आहे.. मुंगी स्वत: साखर झाली तर तिला साखरेची गोडी कशी कळणार म्हणून साखरेपासून भिन्न अशी मुंगी होऊन साखर खाण्याचा आनंद ही हवा आहे. काळ्या फळ्यावर काळ्या खडूची रेषा कधी दिसेल का? म्हणून काळ्या रंगावर पांढरा खडू उत्तम. मनात अद्वैताची भावना राखायची पण बाह्यत: मात्र द्वैत ठेवायचे. मुर्ती बरोबर घ्यायची. अद्वैतातून विष्णुदासनामा विशिष्टाद्वैताकडे वळतात पुन:!
.
या विठ्ठलाचे दुसरे नाव पांडुरंग ! म्हणजे पंढुर रंगाचा किंवा श्वेत वर्णी. पांढऱ्या वर्णातही सर्व रंग असतातच. काळा व श्वेत असे दोन विरुद्ध रंग दिसले तरी गुणात्मकरित्या दोन्ही एकसारखेच.
.
ईश्वराशी एकरुप झाल्याची अनुभूती असलेले बरेच संतकाव्य आहे. ‘अवघा रंग एक झाला’ किंवा ‘पाया पडु गेले तव पाऊलचि ना दिसे...समोर की पाठीमोरा न कळे’ हि काही मोजकी उदाहरणे. हे सर्व संत प्रत्यक्षानुभूतीने जगले आपण केवळ शब्दालंकारांचे धनी !

सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान

सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान - सॄष्टी रचनेविषयी एक तुलना
.
सांख्याची सृष्टी आरंभ आणि रचनेविषयी मतं आणि आधुनिक विज्ञानाशी तुलना करण्याच्या या प्रयत्नाचा उद्देश प्राचीन ॠषींना सर्व आधुनिक विज्ञान माहीत होते असे म्हणण्याचा अजिबात नाही हे आरंभिच स्पष्ट करतो. विज्ञान अधिक व्यापक आहे व ते अधिकाधीक प्रगत होत जाणार आहे. अनेक साधनांची उपलब्धता या प्रगतीला वेगवान करणार आहे. पण आपणास आश्चर्य वाटावयास लावतं ते हे की जड साधनांची कमतरता असतानाही आपल्या प्राचीन ॠषीं आणि तत्वज्ञांनी केवळ पंचेंद्रीयांच्या सहाय्याने पण आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर सॄष्टीच्या उत्पत्ती व रचनेविषयी जी मांडणी केली ती आधुनिक शास्त्रांच्या बरीच जवळ येऊन पोचते.
.
उदाहरण म्हणून सांख्यांचा सत्कार्य वाद व त्यावर आधारीत असलेली सॄष्टीरचना व उत्पत्तीची मांडणी आणि आजच्या विज्ञानातील अणुरचना ,मूलद्रव्ये व त्यातून अनेकविध रूपात निर्माण झालेली सॄष्टी यांची तुलना मनोरंजक ठरेल. सांख्यांचा मूल सिद्धांत असा आहे की या सॄष्टीत नविन असे काहीही उत्पन्न होत नाही.कारण अभावापासून म्हण्जे शून्यापासून फक्त अभाव किंवा शून्यच उत्पन्न होऊ शकेल .म्हणून जगात दिसणार्‍या,उत्पन्न झालेल्या वस्तूंत म्हणजे कार्यात जे गुण दिसतात ते मूळ कारणात अस्तित्वात असल्याच पाहिजेत.हे मत निश्चितपणे न्यायशास्त्राची पुढची पायरी आहे.कारण नैयायिकांच्या मते एका पदार्थाचा नाश होऊन अन्य पदार्थ निर्माण होतो. उदा.बीजाचा नाश होऊन अंकुर आणि अंकुराचा नाश होऊन झाड तयार होते.पण सांख्य मताप्रमाणे अस होत नसून मूळ बिजात असलेल्या द्रव्यांचा हवा आणि पाणि यांच्या संयोगातून अंकुर तयार होतो. शेंगदाण्यातून तेल निघते वाळूतून तेल निघत नाही.याचा अर्थ कारणात असलेले गुणच कार्यात दिसतात,स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत. थॊडक्यात कार्यात जे काही गुण दिसतात ते मूळ कारणातही कोणत्या ना कोणत्या रूपात असलेच पाहीजेत यासच सत्कार्यवाद असं म्हणतात. अर्वाचीन विज्ञानातही कोणत्याही पदार्थाची कितीही रूपांतर झाली तरी सर्व सॄष्टीतील एकंदर द्रव्ये आणि कर्मशक्ती यांची बेरीज कायम राहते.उदा. ऊदबत्तीच जे वजन असत ते ती जळल्यावर राख आणि धुर आणि अन्य सूक्षद्रव्य यांच्या एकत्रित वजना समानच रहात. या मूळ वस्तुमानाच्या सिद्धांताशी सांख्यांचा सत्कार्यवाद मिळताजुळता आहे. हा सत्कार्यवाद सिद्ध झाला असता सॄष्टी शून्यातून निर्माण झाली हा सिद्धांत आपोआपच नष्ट होतो.आज सॄष्टी ज्या अनंत रूपात विकसित झाली आहे त्यामध्ये विविध रूप गुण आकार आहेत पण सत्कार्यवादाप्रमाणे हे सर्व पदार्थ एकाच मूळ द्रव्यापासून विकसित झाले आहेत. वैषेशिकांनीही परमाणू हे जगाचे कारण मानलं पण त्यांना अणूचे द्वयणूक,त्र्यणूक कसे झाले ते सांगता आले नाही. आधुनिक रसायनशास्त्राने शस्त्रशुद्ध पॄथक्करणातून शंभराहून अधिक मूलद्रव्ये शोधून काढली आहेत पण या सर्व मूलद्रव्यांचीही मूळ एकाचएक पदार्थातून निर्मिती झाली असा सिद्धांत आहे. मात्र या सर्व पदार्थातील मूलद्रव्य जरी एकच असलं तरी यात गुण मात्र एकच नसणार कारण सत्कार्यवादाप्रमाणे एकाच गुणापासून भिन्न गुण निर्माण होणे शक्य नाही.पदार्थातील मूलद्रव्य एकच असले तरी विविध गुण आकार ,गंध,काठीण्य एकाच हे एकाच गुणातून निर्माण होणे शक्य नाही. म्हणून सांख्यांनी या एकाच द्रव्याला म्हणजेच प्रकॄती मध्ये तीन गुणांची सिद्धता केली.कारण कोणताही पदार्थ हा अशुध्दतेतून शुद्धावस्थेकडे ,अपूर्णतेतून पूर्णतेकडे जात असतो.तेव्हा तम आणि सत्व हे दोन गुण सिद्ध झाले.तमाकडून सत्वाकडे जाण्याच्या संक्रमणावस्थेतील रज हा गुण सिद्ध होतो.अशा रितीने एकाच पदार्थाची आणि त्रिगुणात्मक प्रकॄतीची सिद्धता झाली. सॄष्टी आरंभापूर्वी हे तीन गुण साम्यावस्थेत असतात. या त्रिगुणात्मक प्रकॄतीतील गुणांत असमानता येऊ लागली की सॄष्टीच्या आरंभाला सुरूवात होऊन विविध रूपं आणि गुणयुक्त पदार्थ आकारात येऊ लागतात.सॄष्टीच्या विनाशानंतर हे गुण पुन्हा साम्यावस्थेत येतात असा सांख्यांचा सिद्धांत आहे.सर्व पदार्थांत सत्व,रज आणि तम गुणांचे मिश्रण असतेच.त्यांच्या मिश्रणाचे प्रमाण जसे जसे भिन्न प्रमाणात होते तसे तसे नवे नवे पदार्थ आणि गुण दॄष्टीस पडू लागतात जे मूलत: एकाच पदार्थातून आणि तीन गुणांतून निर्माण होत असतात.
.
सांख्यांच्या या सॄष्टीरचनेविषयक माहितीनंतर आपण आधुनिक रसायन शास्त्राकडे लक्ष देऊ. अणु किंवा ऍटम हा रसायन शास्त्राचा पाया आहे. रसायन शास्त्राचाच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचा पाया आहे.रसायन शास्त्राने सूक्ष्म अभ्यास करून अणुची रचना कशी असते ते शोधून काढले. अणु हा मूळ पायाभूत तीन घटकांनी बनलेला असतो. ते घटक म्हणजे न्युट्रॉन्स,प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स! हे तीनही घटक सांख्यांनी सिद्ध केलेल्या त्रिगुणांप्रमाणेच तीन भिन्न गुणांचे बनलेले आहेत.इलेक्ट्रॉन्स हे ॠण विद्युतभारीत,प्रोटॉन्स हे धन विद्युतभारीत तर न्युट्रॉन्स हे कोणत्याही विद्युत भारविरहीत असतात.शास्त्रज्ञांनी जी शंभराहून अधिक मूलद्रव्ये शोधून काढली,ती एका विशिष्ट चौकटीत मांडली जिला पिरीऑडीक टेबल म्हणतात.त्याची मांडणी अशी आहे की त्यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूतील प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्या संख्येत असमानता आहे.ही असमानताच या मूलद्रव्यांच्या वेगळेपणाला कारणीभूत झाली आहे. प्रत्येक अणू हा स्थिर होण्याची धडपड करत असतो.जेव्हा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स समसंख्येत असतात तेव्हा तो अणू धन आणि ॠण विद्युतभारविरहीत होऊन स्थिर होतो. यावरून असं दिसतं की न्युट्रॉन जो भाररहीत आहे,तो सांख्यांच्या सत्व गुणाशी साधर्म्य दाखवतो. इलेक्ट्रॉन जो सतत चंचल आहे आणि अणुकेंद्रातील न्युट्रॉन्स आणि प्रोटॉन्सच्या भोवती कक्षेत पण कोणत्याही दिशेत फिरतो तो तमोगुणाशी सारखेपणा दाखवतो तर प्रोटॉन जो धनभारीत आहे तो रजोगुणाशी संबंध दाखवतो. थोडक्यात या तिघांची अणुतील अंतर्गत समसंख्या अणुला स्थिर बनवते. हि संख्या विषम झाली तर इतर अस्थिर अणुंशी बॉन्डींग करून नव्या भासणार्या गुणांचा रूपांतरीत नवा पदार्थ तयार करते.उदा.सोडीयम क्लोराइड . एकाच मूलद्रव्यातील अणूरचनेतील प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स ची असमान संख्या भिन्न भिन्न मूलद्रव्ये तयार करते. न्युक्लीअर केमिस्ट्री अजूनही सूक्ष्म आहे.जसे हायड्रोजन च्या अणूची भिन्न रचना किंवा ऍन्टी मॅटर्स हे अपवाद.पण या अपवादांशी आपल्याला आत्ता कर्तव्य नाही.विज्ञान अजूनही प्रगत होईल आणि नवनवे निष्कर्षही निघतील.पण कोणतीही सूक्ष्मदर्शका सारखी भौतिक साधन नसतानाही भारतीय तत्वज्ञांनी केवळ बुद्धिच्या आणि प्रतिभेच्या बळावर न्युक्लिअर केमिस्ट्रितील तत्वांशी मोठया प्रमाणात मिळताजुळता सिद्धांत मांडला होता तोही उण्यापुर्या ३००० वर्षांपूर्वी. त्याचप्रमाणे विज्ञान हे जडाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे तर सांख्य किंवा तत्वज्ञानं ही जडापलिकडील तत्वांचा शोध घेणारी असल्यानं जडाचा अभ्यास हा दुय्यम स्वरूपात आला आहे.
.
प्रथम प्रकाशन
मनशक्ती डिसेंबर २००८

Tuesday, September 22, 2009

वृत्तविचार

वृत्तविचार
मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी शाळेत असताना शिकले गेल्यानंतर वृत्तरचना हा विषय मागे पडतो. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना तर सहसा याविषयी काहीच माहिती नसते. पण काव्य रचण्याची आवड कोणत्याही ज्ञानशाखेत शिकलेल्या माणसाला असते. त्यांना छंदशास्त्राची माहिती सहज उपलब्ध होतेच असे नाही. ती आंतरजालावर देण्याचा हा छोटा प्रयत्न !
काव्य विविध छंदात केल्याने त्यात तालबद्धता येते व ते गेय होते. वृत्तरचनेचे चार प्रकार आहेत
१. अक्षर गण वृत्ते २. जातिवृत्ते ३. छंदवृत्ते ४. मुक्तछंद
.
१. अक्षरगणवृत्ते:-
.
प्रत्येक अक्षराचे दोन प्रकार यात केले जातात.
१. लघु किंवा ऱ्हस्व व
२. दीर्घ किंवा गुरु
लघु अक्षर साधारण "U" (अर्धचंद्र) अशा चिन्हाने दर्शवले जाते तर गुरु अक्षर "_" या चिन्हाने दर्शवले जाते . बाराखडीमधे अ, इ, उ हे स्वर लघु तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं व अ: हि गुरु अक्षरे होत.
"ख्‌" या व्यंजनाचे बाराखडीत पुढील प्रकारे लघु व गुरु प्रकार होतील,
ख,खि व खु ही लघु अक्षरे तर खा, खी, खू , खे, खै, खो, खौ , खं व ख: ही गुरु अक्षरे होत.
.
लघु अक्षर गुरु कधी होते?
.
१. अनुस्वार किंवा विसर्गाने युक्त असल्यास
.
२. लघु अक्षरापुढे जोडाक्षर असल्यास आणि ते उच्चारताना आघात द्यावा लागल्यास
.
३. ते लघु अक्षर चरणातील शेवटचे अक्षर असल्यास.
.
अक्षरगणवृतातील काव्यरचनेतील क्रमाने येत जाणाऱ्या तीन अक्षरांच्या प्रत्येक गटाला गण म्हणतात. गुरु अक्षर व लघु अक्षर यांच्यातील वेगवेगळ्या रचनेप्रमाणे एकूण आठ गण पडतात. ते य र त न भ ज स म असे. ते लक्षात रहाण्यासाठी त्याची मांडणी पुढील कोष्टकाप्रमाणे लक्षात ठेवता येईल.

१. य = आद्य लघु ( U _ _ )
२. र = मध्य लघु ( _ U _ )
३. त = अन्त्य लघु ( _ _ U )
४. न = सर्व लघु ( U U U )
५. भ = आद्य गुरु ( _ U U )
६. ज = मध्य गुरु ( U _ U )
७. स = अन्त्य गुरु ( U U _ )
८. म = सर्व गुरु ( _ _ _ )
.
अक्षर गण वृत्त्तात गण कोणते या बरोबर यती महत्वाचे आहेत.
.
उदा. शार्दुलविक्रीडिताचे नियम ,
अक्षरसंख्या = १९
यति = १२
गण - म स ज स त त ग
.
म्हणजे प्रत्येक ओळीत १९ अक्षरे असतात. यती १२ व्या अक्षरावर यावा व अक्षरांचा संच म स ज स त त ग असा असावा. पहिल्या सहा गणांची १८ अक्षरे व शेवटचे ग म्हणजे गुरु अक्षर.
.
यती म्हणजे काव्य गाताना येणारे विश्रांती स्थान.शब्द किंवा चरण संपताना तो यावा. क्वचित यतीभंग होतो. मात्र तो चुकीच्या ठिकाणी येऊन हास्यास्पद होणारा नसावा. कवितेतील भाव ही नित्य रहावा.
.
शार्दुलविक्रीडीत ची एक ओळ घेऊन उदाहरण स्पष्ट करु. ( चाल मंगलाष्टकांची)
.
चाले ज्या वरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी
.
चालेज्या / वरती / अखंड / स्तुतिचा / वर्षाव / पत्रातु/ नी
म / स / ज / स / त / त / गुरु
.
चाले ज्या वरती अखंड स्तुतिचा येथे "चा" या बाराव्या शब्दावर यती आला आहे.
शार्दुलविक्रिडीत चे एक माझे स्वरचित उदाहरण पाहू,
.
"तारे पाहुनिया नभी मन कथी, ते रत्नभांडारही ।
देवाचे विखरे सुवैभव खरे, माना कुबेरागृही ॥ "

इंद्रवज्रा हे अन्य एक वृत्त पाहू.
चरणसंख्या - ४
अक्षरसंख्या - १२
यति - ५ व्या अक्षरावरगण - त त ज ग ग
.
दु:खी जगा दूखुनिया द्रवे ते
सच्चीत माते नवनीत वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्र वज्रासहि लाजवीते
.
भुजुंगप्रयात या वृत्तप्रकाराचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे मनाचे श्लोक. रामदास स्वामींच्या काळी पीर,तकियांचे व फकीरांचे प्रस्थ माजले होते. त्यांच्या करीमांना तोडीस तोड उत्तर म्हणून रामदासांनी भुजंगप्रयात मधे मनाचे श्लोक रचले व त्याचा खेडोपाड्‌यातील समाजमनावर फार अनुकूल परिणाम झाला.पीर फकिरांचे करीमा व मनाचे श्लोक यांचे यथायोग्य तुलना होऊन महाराष्ट्र धर्माचे रक्षण झाले.करीमा मधे भुजंगप्रयात चे "य" गणातील शेवटचे गुरु अक्षर नाही एवढाच दोन्हीत फरक.
.
भुजुंगप्रयात:-
चरणसंख्या - ४
यति - ६,१२
गण - य य य य
.
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघू नायका मागणे हेचि आता

* उपजाती :- हे नाव दोन वृत्तांच्या मिश्रणास देतात. पुढे इंद्रवज्राउपेंद्रवज्रा चे उदाहरण आहे,
.
हा जातिविध्वंसन काल आला (इंद्रवज्रा)
समानतेच्या उभवा ध्वजाला (उपेंद्रवज्रा)
राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी (इंद्रवज्रा)
न जाति तो वा उपजाति मानी (उपेंद्रवज्रा)

इंद्रवज्रा - त त ज ग ग यति ५ अक्षरसंख्या ११
उपेंद्रवज्रा - ज त ज ग ग यति ५ अक्षरसंख्या ११
.
मात्रा किंवा जातिवृत्ते :-

मात्रा वृत्त या प्रकारात लघु व गुरु अक्षरांचे गण न पाडता त्यांच्या मात्रा मोजून त्या मात्रांच्या संख्येचे गट पाडले जातात. लघु अक्षरासाठी एक मात्रा तर गुरु अक्षरासाठी दोन मात्रा मोजल्या जातात.उदा. पादाकुलक या मात्रावृत्तामधे आठ + आठ असे गट केले जातात.
हिरवे हिरवे / गार गालिचे १+१+२ १+१+२ / २+१+२+१+२हरित तृणांच्या / मखमालीचे
पतितपावन किंवा चंद्रकांत मात्रावृत्त :-
यात ८ + ८ + ८ + २ = २६ अशा एकूण २६ मात्रा असतात .
पतीतपावन / नाम ऐकुनी / आलो मी द्वा/ रा
१ +२+१+२+१+१ / २+१+२+१+२ / २+२+२+२/ २
पतीतपावन / नव्हेसि म्हणुनी /जातो माघा/रा
२. सुनील नभ हे, सुंदर नभ हे, नभ हे अतल अहा
सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलचि हा
.
चरणामधे दोन,चार,पाच,आठ इ. मात्रांचे गट पाडल्यामुळे लयबद्ध अशी आवर्तने निर्माण होतात. अशा गटांना खालीलप्रमाणे नावे देण्यात आली आहेत.
.
१. पद्मावर्तनी - आठ मात्रांचा गट
२. अग्न्यावर्तनी - सात मात्रांचा गट
३.भृंगावर्तनी - सहा मात्रांचा गट
४.हरावर्तनी - पाच मात्रांचा गट
५. कवठ निंब - चार मात्रांचा गट
.
फटका :- ८ + ८ + ८ + ६
उदा.
१. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको ॥
.
२.हिंदूनृपती सिंधूनृपती पराजीत तो दाहीर
परसत्तेचा कलंक माथी सर्वै वदती शाहीर ॥
.
दोन चरणात भिन्न मात्रा असलेले एक उदाहरण

केशवकरणी :-
चरणसंख्या - २ पहिल्या चरणात मात्रा - २७ दुसऱ्या चरणात मात्रा - १६
.
१.केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा ।
तयाचा सकल जनांवर ठसा ॥
२.खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या ॥
.
अपूर्ण
क्रमश:

Wednesday, September 2, 2009

Savarkar, Rashbehari and Subhashchandra Bose

गुप्त क्रांतीकारी चळवळींनंतर उघड लोकशाहीचे राजकारण करतानाही सावरकरांनी खुलेआम ब्रिटीश विरोध केला. लोकशाही आंदोलनात भाषणे, लेख आणि लोकचळवळी ऊभाराव्या लागत्तात. वर लिहिल्या प्रमाणे महायुद्ध काळात आणि फारशी मोठी कार्यकर्त्यांची संख्या नसल्याने सावरकरांना "चळवळ" अशी उभारता आली नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी ब्रिटीशांना विरोध केला नाही. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून हिंदु पक्षाचे धोरण त्यांनी ठरवले. सप्टेंबर १९३८ च्या "हिंदुस्थान नि झेकोस्लोव्हाकीया" या विषयावरील भाषणात ते म्हणाले," ....आज जपान प्रबळ आहे.आता तो चीनमधे त्याचे राज्य वाढवतो आहे. अशा परिस्थितीत चीन चांगला की जपान चांगला हे ठरवताना आपल्या देशाचा हिताचा कोण हाच मुख्य कस लावला पाहिजे. आमच्या स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा शत्रू बनून जर जपान आपणाला सहाय्य करणार असेल तर आपण त्याच्याशी मैत्री करणेच राष्ट्र हिताचे ठरेल."हिंदुंनी कोणत्या अटिंवर ब्रिटीश सैंन्यात भरती व्हावे याविषयी सावरकर म्हणतात,
१. भावी संघराज्यात सर्व भारतीय सैनिकांवर फक्त भारतीय अधिकार्यांचाच अधिकार चालावा.
२ . भारतीय सैन्याला सर्व सैनिकी शाखांचे शिक्षण मिळावे.
३. भारतीय युवक आपल्या देशाच्याच संरक्षणासाठी सैन्यात भरती होतील, ब्रिटीश लोकशाहीच्या संरक्षणासाठी नव्हे.
.
आझाद हिंदचे संशापक रासबेहारी बोस यांच्याशी सावरकरांचा पत्रव्यवहार सुरु झाला तो दुसरे महायुद्ध सुरु होईपर्यंत चालू होता. पहिल्या पत्राचा दिनांक होता २९-१२-१९३७. त्यात रासबेहारींनी सावरकरांची मुक्त कंठाने प्रशंसा केली व त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयक जाणकारीची विशेष प्रशंसा व कौतुक करुन सावरकर हि भारतीय स्वातंत्र्यासाठी एक महत्वाची अंत्रगत आशा आहे असे लिहीले. सावरकरांनी सुचवल्याप्रमाणे रासबेहारिंनी हिंदुमहासभेची जपान शाखा स्थापन केली.२२-०९-१९३९ ला रासबेहारींनी आपल्या पत्रात सावरकरांना दुसर्या महायुद्धाविषयक धोरणाला पूर्ण पाठींबा दिला. याच पत्रात आझाद हिंद सेनेच्या या संस्थापकाने शंका व्यक्त केली की, गांधीजी भारतातील ब्रिटिश रक्षकदलाचे सर्वात मोठे सहाय्यक असावेत.
.
गुप्त चळवळींशिवाय सावरकरांनी किंवा हिंदुमहासभेने ब्रिटीशांविरुद्ध काय केले? हा प्रश्न चुकीचा आहे कारण सावरकरांनी हिंदुसभेची सूत्रे हातात घेतल्यावेळी स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ बदलले होते. ब्रिटीश सत्ता हळू हळू जाणार हे उघड होत होते. भागानगर संस्थानात ९०% हिंदुंना केवळ १० % जागा मिळत तर १० % मुसलमान ९०% जागा बळकावून बसले होते. त्याविरुद्ध सावरकर व हिंदुसभेने पहिले आंदोलन उभारले. यावेळी कॉंग्रेसचे आंदोलनही चालू होते. हिंदुसभेला अपशकून करायचा म्हणून कॉंग्रेसने आंदोलन स्थगीत केले. हिंदुसभेने एकट्याच्या बळावर (आर्य समाज व काही प्रमाणात शीखांच्या मदतीने) हा लढा तडीस नेला. यानंतर लगेच दुसरे महायुद्ध सुरु झाले. यानंतरचे बहुतेक राजकारण अखंड हिंदुस्तान विरुद्ध फाळणी साठीचा होता प्राधान्य त्यालाच होते. चले जाव चळवळ कोणत्याही प्रकारे गांधीजी कींवा कॉंग्रेसच्या हातात नव्हती. या चळवळीत गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे चळवळ नव्हती. असती तर असहकार चळवळीप्रमाणे हि चळवळ ही महात्म्याला मागे घ्यावी लागली असती कारण हिंसाचार होत होता. सावरकर हिंदुसभेच्या अध्यक्ष पदावरुन १९४३ ला निवृत्त झाले तेव्हाही युद्ध चालूच होते. या कालावधीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र भारत कसा असावा आणि यादवी कशी टाळावी याचेच राजकारण करत होता. फक्त सावरकर पक्ष हिंदुंसाठी राजकारण करत होता कारण हिंदु मतांवर निवडून येणारा कॉंग्रेस पक्ष हिंदुहित खुशाल वार्यावर सोडून देत होता. मुद्दा एवढाच की सावरकरांच्या काळात राजकारणाची दिशा आणि उद्दीष्टे बदलली होती. सावरकरांनी या काळात ब्रिटिशांविरुद्ध कोणती चळवळ उभारली हा प्रश्न त्यामुळे गैरलागू आहे. अखंड हिंदुस्थान साठी जो लढा सावरकर पक्षियांनी दिला त्याला तोड नाही. तो सर्व भारतीय स्वातंत्र्यासाठीच होता. ब्रिटीशांच्या तोडॊ भारत च्या विरुद्धच लढला होता. ब्रिटीश जाऊन त्या जागी अल्पसंख्य मुसलमानांचे राज्य बहुसंख्य हिंदुंवर येऊ नये याचसाठी होता.
बोस यांचे अन्य राजकारण चालु होते त्या कितीतरी आधीपासून सावरकर कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातून रासबेहारी ,आझाद हिंद आणि भारतीयांचे सैनिकीकरणाचे धोरण आखून व्यूह रचत होते. याची थोडी माहिती वर आलीच होती. याउलट सुभाषचंद्र बोसांचा प्रवास सावरकरांच्या भेटिपूर्वी आझाद सेनेच्या दिशेने स्पष्टपणे दिसत नाही. सुभाष चंद्र हे वृत्तीने क्रांतीकारीच होते. सशस्त्र क्रांतीचेच पुरस्कर्ते होते. कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर ते देशव्यापी चळवळ उभारण्यासाठी पाठिंबा मिळवण्यास दौर्यावर निघाले. महाराष्ट्रात हेडगेवारांना भेटावयास गेले मात्र ते अत्यवस्थ होते. तेथून ते डॉ. आंबेडकरांना भेटले त्यात काही निष्पन्न झाले नाही. जीना यांनी तुम्ही हिंदुंचे प्रतिनिधी नाहीत तेव्हा तुम्ही आधी सावरकरांना भेटा असा सल्ला दिला. सावरकरांनी त्यांना रासबिहारींचे पत्र दाखवून सुभाष चंद्रांमधे मूळातच असलेल्या तळमळीला निश्चित दिशा देण्याचे देशकार्य पार पाडले. त्यांची २३ व २४ जून १९४० ला सावरकर सदनात दोन दिवसात मिळून ६ तास झालेली चर्चा हेच सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेने च्या मार्गाचे कारण ठरले. रासबेहारी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या मधील कडी सावरकर त्यांचे राजकीय धोरण आणि प्रेरणा हीच होती. रासबेहारी व सावरकर यांच्यातील पत्रव्यवहार जर भविष्यात सध्या उपलब्ध आहे त्यापेक्षा जास्त उघड झाला तर अजून काही गोष्टी सापडू शकतील. गांधीजींच्या खूनाच्या वेळी सावरकर-रासबेहारी पत्रव्यवहार शासनाने जप्त केला होता असे कळते. तो सध्या कोठे आहे. रासबेहारींचे काही लेखन जपान सरकारच्या ताब्यात आहे का इ. गोष्टींचा शोध घेणे गरजेचे आहे.
.
युद्धाविषयी हिंदुसभेचे अध्यक्ष म्हणून सावरकरांनी धोरण सप्टेंबर १९३९ ला मांडले. त्याची अधिक माहिती नंतर. पण त्यात सावरकरांनी देशस्वातंत्र्याविषयी लिहिले, दोन साम्राज्यांचे युद्ध चालू असताना परतंत्र देशापुढे पहिला पर्याय असतो तो म्हणजे सशस्त्र क्रांती. पण सध्या आपण असंघटित, नि:शस्त्र असल्याने सशस्त्र राष्ट्र्रीय उठाव अशक्य आहे. दुसरे असे की हिंदुसभेच्या किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या प्रकट अधिवेशनात या मार्गाची चर्चा करणे योग्य नाही. ....वेळेच्या अभावी अहिंसक मार्गाची च्वर्चा करता येणार नाही पण एवढेच सांगतो, की संपूर्ण अहिंसा हा अपराध असून सापेक्ष अहिंसा हा सद्‌गुण आहे. जैन आणि बौद्धांची सापेक्ष अहिंसा ही गांधीजींच्या अहिंसेपेक्षा पुष्कळच वेगळी आहे. म्हणून जैनांमधील पराक्रमी स्त्री-पुरुषांनी लढाया मारुन राज्ये निर्माण केली.हिंदुसभेच्या प्रचाराने दुसर्या महायुद्धात सैंन्यात हिंदुंचे प्रमाण ६६ % पस्र्यंत गेले .त्यापूर्वी पर्यंत मुसलमान सैंन्यात ७५ % झाले होते. युद्धासंबंधी चे फायदे विशद करुन सावरकरांनी विचारले, घोषणा करुन तुरुंगत जाऊन पडायचे धोरण हिंदुसभेचे नाही. सैनिकीकरण व औद्योगिकरण हे सध्या फायदेशीर असल्याने तेच हिंदुसभेचे धोरण आहे जेव्हा कायदेभंग नागरी प्रतिकार ,चळवळ फायदेशीर असेल तेव्हा हिंदुसभा ती चळवळ हाती घेईल. ब्रिटीश कण्हत कुंथत का होईना स्वत:च्या गरजेसाठी भारतीयांच्या हातात शस्त्र देऊ करत होते त्याचा फायदा घ्यायला सावरकर हिंदु तरुणांना सांगत होते. हे सर्व धोरण देश स्वातंत्र्याच्या लढ्याचाच भाग होते.

" Veer Savarkar " by Dhananjay Keer" मधून

It is an open secret that Subhash, the devotee of Shivaji and his politics, had discussed the Indian political and international situation respecting World War II with Savarkar at Savarkar Sadan, on June 22,1940, six months before his dramatic disappearance from India in January 1941. in the course of the discussion Savarkar, the Indian Mazzine, inspired Subhash Bose, the Indian Garibaldi, with the idea of an armed revolution from outside in order to intensify the struggle for Freedom. The born general in Subhash took the cue, and played the role of Indian Garibaldi, rightly called the Netaji of the Indian National Army, which was founded by Ras Bihari Bose in the East.After Bose’s mysterious disappearance, Savarkar issued a statement in which he, unlike other statemen, said: “ May the gratitude, sympathy and good wishes of a Nation be a source of never-failing solace and inspiration to him wherever he happens to be! Wherever he happens to be, I have no doubt, he will continue to contribute his all, even health and life to the cause of Indian Freedom.”A world-famous veteran revolutionary and a man of great mental force and a powerful pen ,Ras Bihari Bose, who was the guide and sole adviser of Azad Hind Government of Subhash Bose, was in correspondence with Savarkar till the outbreak of World War II. He was also president of the Japan Hindu Sabha and had immensely contributed through the Indian League of Independence to the forces of the Indian Freedom Movement outside the India. Netaji Subhash. The I.N.A. and India owe a debt of deep gratitude to Ras Bihari Bose. Another great figure of Indian revolution.

The leader and the founder of the I.N.A. both addressed special message to Savarkar on the Radio. In the message Netaji Bose said on June 25, 1944, at night on Singapore Radio: “When due to misguided political whims and lack of vision almost all the leaders of the Congress party are decrying all the soldiers in the Indian Army as mercenaries, it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youth themselves provide us with trained men from which we draw the soldiers of our Indian National Army.” (Ras Behari Bose’s message to Savarkar quoted in Indian Independence League’s publication)

Ras Behari Bose said in his Radio talk addressed to Savarkar: “ In saluting you I have the joy of doing my duty towards one of my elderly comrade-in-arms. In saluting you, I am saluting the symbol of sacrifice itself.” Paying homage to Savarkar’s unexampled sacrifice, untold sufferings and matchless courage, he further said: “ I can see God’s divine hand clearly behind your unconditional release. You have once more proved your real greatness by propagating the theme that our politics must never depend upon the foreign politics of others. England’s enemy must be our friend.” (Free Hindustan., 27 January 1946)

Ras Bihari concluded with Bande Mataram, reiterating his belief that Savarkar’s leadership was the greatest hope inside India. Is any further evidence necessary to prove that the very I.N.A. movement, which Savarkar’s opponents exploited, was the outcome of his ideology, policies and his great book on `1857’, which provided the I.N.A. with slogans, battle cries and vision. And inspired them to fight the battle of freedom? He was the spiritual father of the I.N.A.

As a typical of revolutionary leaders, Savarkar talked very slowly about his personal and home matters. To him secrete were treasures. He was too great a veteran revolutionary leader. None could screw out from him what Dr.Schatt, the German Finance Wizard, told him on the eve of the outbreak of World War II, nor the source he received the letters of Ras Bihari Bose from Japane during the cource of World War II, nor the full details of his meeting with Subhash Bose.

सुभाषचंद्र बोस जपानला पोचण्यापूर्वीच दि.१६-१-१९४२ ला भारतीय स्वातंत्र्यसंघाची शाखा स्थापन हौन ग्यानी प्रीतमसिंग. मोहनसिंग व मेजर फुजिवारा यांच्या नेतृत्वाखाली ५०००० हिंदी सैनिक लढण्यास सिद्ध झाले. जपान हिंदुसभेचे अध्यक्ष आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबेहारी बोस यंच्यातला पत्रव्यवहार मुंबईच्या वरळीच्या बौद्ध विहारातील भिक्षूंमार्फत चालत असे. रासबेहारींनी जपानी भाषेत सावरकरांचे एक विस्तृत चरित्रही लिहीले. एक लेखही लिहीला आहे व त्यावर Savarkar : Rising Leader of New India: His Career and Personality: by Rash Behari Bose : March 1939 ) असा मथळा आहे.
.
दि.२५ एप्रिल १९४१ ला सुभाषचंद्रांनी आपण जिवंत असल्याचे बर्लिन नभोवाणीवरुन प्रकट केले. २१ मार्च १९४२ ला रासबेहारींनी सावरकरांना उद्देशून भाषण केले. त्यात सावरकरांची स्तुती आणि सहकार्याची अपेक्षा तर गांधी प्रभ्रुतींना उद्देशून भाषण केले .दोन्ही भाषणात फार मोठे अंतर आहे.क्रिप्स भेटीसाठी जाताना सावरकरांनी प्रकट केले की " भारताचे स्वातंत्र्य ही आता कोणी द्यावयाची गोष्ट नसून ती भविष्यात घडणारी अटळ घटना आहे."
.
सावरकरांनी सुटून आल्यावर ब्रिटिशांविरुद्ध काय केले असा प्रश्न विचारण्याच्या डोळ्यासमोर सविनय कायदेभंग, असहकार, दांडी यात्रा इ.सारखी आंदोलने तुलनेसाठी असतात किंवा सशस्त्र आंदोलन तरी असते. १९३७ पर्यंत सावरकरांना राजकारण करायची बंदी होती. गांधीजी व कॉंग्रेसप्रणित राष्ट्रकार्य म्हणजे ब्रिटीशांना विरोध करुन जमाव जमवून घोषणा देऊन विरोध करणे, त्यांच्याशी असहकार करणे व परिणामस्वरुपी तुरुंगात जाऊन बसणे हा होता. याउलट सावरकरांच्या दूरदृष्टीला या गोष्टी देशभक्तीच्या पण आचरट अहिंसेमुळे निरुपयोगी वाटत होत्या. नि:शस्त्र प्रतिकारापेक्षा सशस्त्र क्रांतीवर विश्वास असला तरी प्राप्त परिस्थितीत असंघटीत व नि:शस्त्र असल्याने तोही मार्ग बंद होता. अशा परिस्थितीत दुसर्या महायुद्धाची संधी त्यांच्या दूरदृष्टिने साधली. इंग्रज नाईलाजाने भारतीयांच्या हातात शस्त्रे देत आहेत यासारखी सुवर्णसंधी अन्य कोणती येणार होती? त्यामुळे सैनिकीकरण हे हिंदुमहासभेचे धोरण म्हणून त्यांनी नेमून दिले. थोडक्यात तुरुंगभरती पेक्षा सैंन्यभरती हे सध्या सर्वात श्रेष्ठ असे राष्ट्रकार्य आहे असे त्यांना निश्चितपणे वाटले. पण अद्यापही त्यांची ही दूरदृष्टी काही जणांच्या लक्षात येऊ नये आणि त्यांनी तावातावाने सावरकरांनी मुक्तता झाल्यावर ब्रिटीशांविरुद्ध काय केले असे तावातावाने विचारावे हे दुर्दैवच आहे. स्वातंत्र्य मिळवायचे ते केवळ इंग्रजांपासून का अन्य राष्ट्रद्रोही व फुटीरतावादी शक्तींपासूनही असा खरा प्रश्न होता. त्याचबरोबर हे स्वातंत्र्य टिकवायचाही महत्वाचा मुद्दा सावरकरांसमोर होता. त्याचे उत्तर सैनिकीकरण आणि फुटिरतेला उत्तर म्हणून हिंदुराष्ट्रवाद हेच उत्तर होते आणि तेच त्यांनी ध्येय मानले.
.
भागलपूरचा लढा
.
सावरकरांच्या अध्यक्षतेच्या कारकीर्दीत हिंदुमहासभेचा सर्वात मोठा लढा "भागानगरचा नि:शस्त्र प्रतिकार" हा होता. निजामाच्या संस्थानात हिंदुंवर अन्याय होत होता. त्यांच्या मुक्तीसाठी हा लढा दिला गेला. सुमारे १९८० नंतर शासनाने हा लढा स्वातंत्र्याचा लढा म्हणून मान्यता दिली व या लढ्यात लढलेल्या हिंदुसभा व आर्यसमाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्र्यसैनिक म्हणून मान्यता दिली व निवृत्ती वेतनही लागु केले. त्यामुळे हा लढा सावरकरांनी सुटुन आल्यानंतर स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अप्रत्यक्ष प्रतिकाराचे एक उदाहरण समजले जाते. हा लढा लोकशाहीच्या रक्षणासाठी व लोकांच्या न्याय्य हक्क्कांसाठी दिलेला लढा होता. कदाचित निजाम संस्थानाविरुद्ध असल्याने काहिंना तो ब्रिटीशांविरुद्ध वाटत नसला तर दुसरे उदाहरण म्हणजे हिंदुमहासभेने "भागानगरचा लढा" हा सर्वस्वी ब्रिटीश सरकारविरुद्ध दिलेला लढा होता. बिहाराधील भागलपूर येथे हिंदुमहासभेचे अधिवेशन होते व ब्रिटीश सरकारने अधिवेशनावर बंदि घातली. बिहारचे राज्यपालांशी (मि.स्टुअर्ट) पत्रव्यवहार झाल्यावरही शेवटी ब्रिटीश सरकारने या अधिवेशनावर बंदी घालताच सावरकरांनी "भागलपूरचा लढा" करण्याची सिद्धता केली. या नि:शस्त्र प्रतिकाराची रुपरेखा ठरवण्यात आली. त्यात १०-१० कार्यकर्त्यंच्या गटाने भागलपूर मधे प्रवेश करणे,, भागलपूर बंदीचा निषेध करणार्या तारा व्हाईसरॉय कडे पाठवणे, भागलपूर किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यत जेथे हिंदुसभेचे प्रतिनिधी पोचले असतील तेथे प्रभातफेर्या काढून,सभा घेऊन अधिवेशनाच्या कामाला सुरुवात करावी, सर्वांनी एकाच जाग अटक करुन न घेता वेगवेगळ्या ठीकाणी अटक करवून घेऊन घोषणा देऊन जागृती करुन अटक करुन घ्यावी, जे पकडले न जातील त्यांनी वृत्तपत्रे व अन्य माध्यमांतून या घटनांचा प्रचार करावा इ.इ. सावरकर आपल्या कार्यकर्त्यंबरोबर रेल्वेने निघले. त्यांना "गया " स्थानकात अटक करण्यात आली.सावरकरांना गयेच्या तुरुंगात बंदिस्त केले गेले. ठरल्याप्रमाणे जे प्रतिनिधी तुकड्यांनी भागलपूरात पोचले त्यांनी ठरल्याप्रमाणे अधिवेशन सुरु केले.भागलपूरात ठिकठिकाणी सभा/भाषणे केली गेली. या सर्वांत अकाली दलाचे मास्टर तारासिंग,, नथुराम गोडसे, इंदुरचे दुबे, नागपुरचे नरदेव आर्य, बंगालचे नरेंद्रनाथ दास इ. नेते होते.
.
ब्रिटीश शासनाची हि बंदि सावरकर प्रणित हिंदुमहासभेने मोडून काढली. अधिवेशनाच्या वेळापत्रकात ठरलेल्या शेवटच्या दिवशी बंगाल हिंदुसभेच्या नरेंद्रनाथांनी समारोप केला. हिंदुसभेवरील अन्याय्य बंदिविरुद्ध पोलिस दलातही जागृती होऊन श्री. भोलाप्रसाद व विदेश्वरसिंग या दोन पोलिसांनी पोलिसदलाची त्यागपत्रे दिली. या अधिवेशना विषयी अनेक वृत्तपत्रांत सरकार ला दोष देणारी माहिती व सावरकरांच्या नेतृत्वाची स्तुती छापून आली. सरकरचा धिक्कार केला गेला. बिहारमधील "सर्च-लाईट" या डॉ.श्री.राजेंद्रप्रसाद यांच्या वृत्तपत्राने लिहीले," भागलपूरला शासकीय सिद्धतेचा धुव्वा उडाला. हिंदुमहासभेचे अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा महत्वपूर्ण ठरले. शासनाची सत्ता व किर्ती धुळीला मिळाली." संघाचे गोळवलकर गुरुजी ही यावेळी भागलपूरमधे होते ते सावरकरांना तुरुंगात जाऊन भेटून आले. य ८-१० दिवसंच्या कारावासात सावरकरंची प्रकृती पुहा बिघडली. नंतर शासनाने त्यांची मुक्तता केल्यावर ते त्वरीत मुंबईला परतले.
.
सावरकरांचे अजून एक जनआंदोलन
.
शासनाविरुद्ध सावरकरांनी अजून एक जनआंदोलन करायची तयारी केली होती. ती म्हणजे १९४४ सालच्या पंढरीच्या वारीला ब्रिटीश शासनाने बंदी घातली. सावरकरांनी एक पत्रक काढून ब्रिटीश सरकारला बजावले की ख्रश्चनांना रोम जेवढे पवित्र वाटते तेवढेच पावित्र्य पंढरपूराविषयी मरठयांना आहे. युद्धकाळातही हज ची यात्रा शासनाने चालु ठेवली असता या यात्रेवर बंदी का?यानंतर सावरकरांनी हिंदुसभेसाठी व वराकरी गटप्रमुखांसाठी लढ्याविरुद्ध योजना आखली. त्यात वारकर्यांनी बंदी न मानता पंढरपुराकडे यात्रा सुरु ठेवावी मग ते १० यात्रेकरी असोत की १००००, अटक झाल्यास पांडुरंगाच्या नावे तुरुंगवास भोगावा या तुरुंगवासाचे पुण्य यात्रेसारखेच लाभेल,एकादशीच्या दिवशी पंढरपूर वासियांनी भगवी पताका घेऊन दर्शनाला पोचावे , या बंदिमुळे जी जागृती होईल ती खूप मोठी असेल इ. या पत्रकानंतर ४ दिवसातच ब्रिटीश सरकारने बंदि हुकूम मागे घेतला. सावरकरांनी या निर्णायाचे स्वागत केले पण कार्यकर्त्यांना योजनेत कोणताही बदल करु नये अशी सूचना दिली, कारण अन्य काही निमित्त करुन शासन बंदी हुकूम लागू करेल अशी शक्यता होती. हिंदुसभेच्या मार्गदर्शनाखाली त्या वर्षी पंढरपूर यात्रा जस्त मोठ्या प्रमाणात साजरी झाली.ब्रिटीश शासनाने पुन: बंदिचे नाव घेतले नाही. भागानगर ,भागलपूर नंतर पंढरपूर यात्रेनिमित्त हिंदुसभेने जनाधार मिळवायला सुरुवात केली.त्यावर्षी (सन १९४४) सुमारे १.५ लाखांहून अधिक संख्येने वारकरी यात्रेत सामिल झाले..१९४४ मधेच सुभाषचंद्रांनी गांधीजींना उद्देशुन केलेल्या रेडिओ भाषणात त्यांचा पाठींबा मागितला पण सुभाषचंद्र, गांधीजी व कॉंग्रेसला नकोसे झाले होते. त्याच वेळी हिंदुसभेची सावरकरांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै ला दिल्लीत सभा झाली. सभेपूर्वी सावरकरांनी डॉ.शामाप्र्साद मुखर्जी व हिंदुसभेच्या अन्य बंगाली नेत्यांबरोबर गुप्त योजना आखली,त्याप्रमाणे जेव्हा सुभाषचंद्र बंगालपर्यंत सेनेसह पोचतील तेव्हा बंगाल हिंदुसभेने स्वतंत्र होऊन बोसांना उघडपणे मिळावे. उर्वरीत भारतातील हिंदुसभा सैनिकीकरणाचे धोरण व प्रचार पुढे सुरु ठेवेल.

"In fact Nehru originally condemned the activies of the INA and had written accordingly tp the C in C. But after Bose's death and the Japanese surrender he decided to take up their cause. It was God sent opportunity for him as it could be exploited for political purpose. He decided to make them inti `Heros' and `patriots'. In sept. 1945 , congress asked for the release of the prisoners and set up a Defence commitee to handle their cases. The commitee included Bhulabhai Desai,Asif Ali., and Neharu ,himself. Bhulabhai openly saying that the INA trial had given the Congress the best possible weapon for popoganda. --Disastrous Twilight (1986) by Hamid Major General Shahid p.19

कॉंग्रेस कडे पैसा ताकद सर्वच असाल्याने या हिंदुसभेने INA ला प्रथमपासून पाठींबा दिला त्यांना याचा फायदा १९४५ च्या निवडणूकीत मिळाला नाही. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे कॉंग्रेसला निवडणुकीतील मतांचा खरा जनाधार किती होता? कारण केवळ १० % लोकांनाच मताधिकार होता. म्हणजे ब्रिटीशांनी कॉंग्रेसकडे सत्त सोपवताना 10 % लोकच मतांचे अधिकारी होते. ९० % भारतीय जनता या अधिकारापासूण वंचित होती. त्यात पुन्हा मताधिकार बजावणारे किती असतात? कॉंग्रेस यावेळेला स्वातंत्र्य मिळण्याविषयी पूर्ण अंधारात होती. ब्रिटीशांचा महायुद्धात विजय झाल्याने ते जातील असे त्यांना वाटलेच नाही. अचानक सत्ता चालून येताच घाईघाईने देशहिताचा फारसा विचार न करता कॉंग्रेसने फाळणी स्वीकारुन सत्तेचा ताबा घेतला. महायुद्धापूर्वी ७५ % मुसलमान सैंन्यात होते. सावरकर व हिंदुसभा यांच्या सैनिकीकरणाच्या धोरणानंतर १९४३ ला भारतमंत्यांनी सैंन्यातली जी गणना दिली त्यानुसार मुस्लीम ३४% हिंदु ५० % शीख १० % व ख्रिश्चन व अन्य ६ % असे सैन्यबळ झाले होते. सावरकर नसते तर हि संख्या मुस्लिम ७५ % राहती तर सत्तपिपासू नेहरुंना या मुस्लीम सैंन्याने जागेवर राहु दिले असते का अखंड पाकिस्तान निर्माण केला असता याचे उत्तर कोणाही सूज्ञ माणसाला कळू शकेल.

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...