Friday, December 16, 2016

तुका म्हणे ऐशा नरां

तुका म्हणे ऐशा नरां मोजुनी माराव्या पैजारा ***
प्रत्येक कैद्याला तुरुंगातील कामाचा भत्ता मिळतो. तुरुंगातून सुटल्यानंतर समाजात त्याचे पुनर्स्थापन करायचे कोणत्याही शासनयंत्रणेचे धोरण आणि कर्तव्य असते. मग ती परकिय असो वा स्वकीय.
इतर अनेक राजबंद्यांना जशी* राजक्षमा मिळाली तशी सावरकरांना त्यांच्या कोणत्याही सुटकेच्या अर्जांसाठी ब्रिटीशांनी कोणतीही क्षमा केली नाही. व अंदमानातुन सोडले सुध्दा नाही. तर त्यांना अंदमानातून केवळ रत्नागिरीच्या तुरुंगात हलवले. त्यामुळे सावरकरांना मुळात अर्जांवर आधारीत क्षमा दिलीच गेली नाही. कारण ब्रिटीश त्यांचे सुटकेचे अर्ज म्हणजे केवळ सुटका करुन घेण्याची चाल असल्याचे ओळखुन होते. त्यांना सोडुन देण्यास ब्रिटीशांसारखा धुर्त शत्रू मुर्ख नव्हता.
नंतर दोन अटी म्हणजे रत्नागिरीत स्थानबध्द राहीन व राजकारणात भाग घेणार नाही या आणि केवळ याच दोन अटींवर सावरकरांना तुरुंगातून सोडून रत्नागिरीत स्थानबध्द केले गेले. जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत आणि कोणाही सहकाऱ्याची नावे , कटासंबंधी माहिती विचारायची नाही या सावरकरांच्या मुख्य प्रतिअटी होत्या त्या ब्रिटीशांनी मान्य केल्या. स्थानबध्दतेच्या काळात म्हणजे १९२४ ते १९३७ अशा १३ वर्षांच्या काळात त्यांच्या वर पोलिसांची नजर असे. गुप्त पोलिस पाळतीवर असत. त्यांची वकिलिची पदवि रद्द केली होती व सनद दिलिच गेली नाही त्यामुळे वकिली करणे अशक्य होते , इतकेच नव्हे तर BA ची पदवी पण काढुन घेतली होती, तसेच त्यांच्यावरच्या राजद्रोहाच्या गुन्ह्यामुळे त्यांना नोकरी मिळणे अशक्य होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या सासऱ्यांची पण सर्व मालमत्ता जप्त केल्याने ( त्यांचा चष्मा व अंगावरचे कपडे सुध्दा जप्त केले गेले होते व तुरुंगात ते वापरत असलेला चष्मा आणि कपडे ही सुध्दा सरकारी मालमत्ता होती. तुरुंगातून पुढे १९२४ ला सुटल्यावर सुध्दा त्यांना एका स्नेह्याने दिलेले कपडे घालावे लागले होते) त्यांना उपजिविका करणे अशक्य होते. व स्थानबध्दता म्हणजे पण एक प्रकारे तुरुंगवासच असल्याने त्यांना भत्ता मिळणे योग्यच होते, त्यास पेन्शन वा निवृत्तीवेतन नाही तर तुरुंग भत्ता म्हणतात. तुरुंगात जेवणखाणाची सोय हि सुध्दा एखादा कृतघ्न माणूस सावरकर तुरुंगात ब्रिटीशांचे अन्न खात बसले होते असे म्हणु शकेल. हा भत्ता सुध्दा त्यांना १९२९ पासुन मिळु लागला आधीची पाच वर्षे नाही. १९३७ पर्यंत हा तुरुंग भत्ता सावरकरांना मिळत असावा, उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नव्हते. ६०/- ही त्या काळात अत्यंत तुटपुंजी रक्कम होती (जो इतर बंगाली राजबंद्यांना रु. १००/- मिळत असे) व त्यांच्या त्या हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन गांधीवादी विचारवंत व सावरकरवादी नसणारे संशोधक कै.श्री. य.दी.फडके यांनीच करुन ठेवले आहे. ते सर्वांना मान्य व्हायला हरकत नाही. या काळात सावरकर जे लेखन करत त्याचे तुटपुंजे मानधन व धाकट्या भावाची थोडीशी आर्थिक मदत एवढच त्यांना मिळत होते.
जे कोण लोक या उपजिविकेची सर्व साधने काढुन घेतल्याने, ब्रिटीश सावरकरांना चरितार्थ चालवण्यासाठी देत असलेल्या ६० रु भत्त्यावर (जी त्या काळात सुध्दा अत्यंत तुटपुंजी रक्कम होती) बोट दाखवत असतील ते सर्व एक नंबरचे हलकट वृत्तीचे आणि माणुसकीला काळीमा असलेले नीच मनुष्यच असू शकतात. "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा" , पण यांना पैजारांनी म्हणजे जोड्यांनी बडवले तर जोड्याचाच अपमान होईल.
-चंद्रशेखर साने

No comments:

सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...