कला, अभिव्यक्ती यांवर पुरोगामी दहशत आणि मुस्लिम तुष्टीकरणात्मक धोरण ठेवणे याचा आधुनिक भारताचा इतिहास खूप मोठा व खेदजनक आहे. मी वाचलेली दोन उदाहरणे ,
कै.श्री.विश्राम बेडेकर यांचा शेजारी हा चित्रपट खुप गाजला. ग्राऊंड लेव्हलला हिंदु-मुस्लीम कसे एकत्र रहातात वगैरे सांगणारा आणि फाळणीच्या असपासच्या काळातला हा प्रबोधनपर चित्रपट. मला पण आवडला. धर्माच्या पलिकडे जाऊन मानवता जपावी, परस्परांत सौदार्ह जपावे आणि ते दुतर्फा असावे याचा मी पुरस्कर्ता आहे.
पण यात एक मेख अशी आहे, की या दोन हिंदु व मुस्लिम शेजाऱ्यात भांडण होऊन दुहीचे बीज पेरले जाते त्यात चुक दाखवली गेली ती हिंदु शेजाऱ्याची. यावर लेखक कै.विश्राम बेडेकर यांची त्यांच्याच एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्रात आलेली टिपण्णी अशी की, हिंदु शेजाऱ्याची चुक दाखवणे योग्य होते कारण हिंदु हे सहनशील असल्याने ते त्यांना कमीपणा दर्शवणारी पटकथा सहन करु शकतात पण मुसलमान समाजाला ते रुचले नसते. म्हणुन त्यांनी पटकथेत हिंदु व्यक्तीचीच चूक दाखवणे आवश्यक व चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरवले व तसेच लेखन केले.
दुसर उदाहरण कै. सुधीर फडके यांच. फार पुर्वी त्यांना सावरकरांच्या "काळे पाणी " या कादंबरीवर एक चित्रपट काढायचा होता, व त्याची जुळवाजुळवही त्यांनी सुरु केली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने अट घातली की सावरकरांनी या कादंबरीतले रफीउद्दीन हे खलपात्र बदलुन ( सावरकरांनी रंगवलेले रफीउद्दीन हे पात्र ७००-७५ % माधव काझी उर्फ लखोबा लोखंडे प्रमाणे वागणारे आहे, हा योगायोग की सावरकरांचा भविष्यवेध , सत्यघटेनेचा व कादंबरीचा नेमका काळ तपासावा
लागेल) हिंदु नामक करावे, अन्यथा त्याच्याच सारखे दुसरे एक हिंदु खल पात्र पटकथेत सामिल करावे. लेखकाने काय लिहावे याचे दिग्दर्शन , निर्देशन व अटी सावरकर मान्य करणे शक्यच नव्हते व हा चित्रपटच बारगळला.( माझा व कै. सुधीर फडके यांच्यात सावरकर चित्रपटासंबंधात काही वाद १९८९ साली उद्भवला होता, आधी माझा लेख व त्यावर प्रतिवाद करणारा कै.श्री. फडके यांचा लेख "साप्ताहिक सोबत" मध्ये प्रसिध्द झाला, त्यात कै. फडके यांनी वरील दोन्ही हकीकतींना दुजोरा दिला होता.)

-चंद्रशेखर साने
संदर्भ:-
एक झाड दोन पक्षी- विश्राम बेडेकर
काळे पाणी आवृत्ती १९८४ - प्रस्तावना
काळे पाणी आवृत्ती १९८४ - प्रस्तावना
No comments:
Post a Comment