********** थोडा वेळ लागेल पण यश १००% ************
मी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचा समर्थक आहे हे माझ्या कपाळावर लिहिले आहे का काय कळत नाही, पण मला आतापर्यंत एकाही बॅंकेत पैसे काढायला त्रास झाला नाही. सर्वत्र सुटे पैसे मिळत राहीले, cash counter असो वा ATM अर्ध्या तासा पेक्षा अधिक काळ कोठेही थांबावे लागले नाही.
जनता सहकारी बॅंकेत १०००, ३०००, ५००० अशा पधतीने रक्कम काढता येते आहे. त्यात नेहेमी एक हजार रुपये १०० च्या नोटात व बाकीचे दोन हजाराची नोट मिळाली. हे दोन हजार सुध्दा अगदी सहजी सुटे होत गेले. काही छोटे वा मध्यम व्यापारी लोक जेव्हा क्रेडीट/डेबिट कार्ड घ्या म्हटल्यावर नाही म्हणाले, तेव्हा त्यांच्यापुढे मी २००० ची नोट पुढे करत होतो, ते निमुट पणे मला सुटे देत होते. Pay tm* चे खात आहे व त्याच्या wallet मध्ये पण पैसे भरुन ठेवले आहेत , पण त्याचाही वापर करायची अद्याप एकदाही वेळ आली नाही.
रोकड सुलभता कायम राहिली आहे. अगदी घरकाम करणारे, भाजीवाले, फळवाले रिक्षा इ. बरोबर लहान लहान व्यवहार करताना कसलीही अडचण आली नाही adjust करावे लागले नाही. ATM वरच्या रांगा दिसल्या ते रांगेत का उभे रहातात हे पण कळले नाही, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थीच ८०% जास्त प्रमाणात रांगेत का दिसतात हे कोडे पण उलगडलेले नाही.
L.I.C., M.S.E.B. , Internet, Share Market, Telephone इ. बाबबत डीजिटल होऊन मला किमान पाच पासुन ते पंधरा वर्षे होऊन गेली. तीही अडचण नाही. ग्राहक पेठ गेली काही वर्षे कसलाही अधिक सरचार्ज न घेता क्रेडीट कार्ड accept करते आहे, त्यामुळे महिन्याच्या किराणा मालाचा प्रश्न नाही.
काही तथाकथित विद्वान, सुत्रसंचालकांसह, बकवास चर्चा करणाऱ्या न्युज चॅनेलवर १ दिनांकेपासुन परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी आक्षेपार्ह विधाने सर्रास करत आहेत, हि त्यांची चिंता नसून दंगली व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे, का मोदी आल्यापासून व नोटाबंदंच्या निर्णयानंतर पाण्याविना मासोळी सारख्या तडफडणाऱ्या अस्वस्थ लोकांच्या वतीने चर्चात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या या धमक्या आहेत यावर प्रशासन व पोलिस खात्याने विचार करायला हवा. कारण असे बडबडणाऱ्यांत मनात विष-भरलेले अराजकतावादी व नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक सुध्दा आहेत. मोदी आले तर देश सोडुन जाऊ म्हणणारे, पुरस्कार वापसी करणारे, भारत के तुकडे होंगे हजार म्हणणारे अस्वस्थ आहेत. मोदी आल्यावर दंगली होऊन अमुक एक हजार लोक मरतील वगैरे वाचाळपणा करणारे सुध्दा हतबल झालेत. आपल्या थयथयाटाने भूकंप होईल अशी आशा बाळगुन आहेत. पण मोदींची प्रशासनावर उत्तम पकड आहे याची खात्री आहे. त्यामुळे या धमक्या प्रत्यक्षात उतरावयाला गेले तर त्यांचे काळे चेहरे जगापुढे उघडे पडतील.
नोटाबंदीचा निर्णय हा दीर्घकालिन निर्णय आहे वार्षिक ताळेबंद मांडुन त्याचा परीणाम कळणार नाही.
पुर्वी पण रु. १००० च्या नोटा रद्द केल्या होत्या , आता वेगळा काय फरक पडेल अस वाटणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की आता मानसिकतेत फरक पडणार आहे.
पुर्वी खाल्लेला पैसा सुरक्षित असण्याचा फील असायचा करप्ट लोकांना !
पुर्वी खाल्लेला पैसा सुरक्षित असण्याचा फील असायचा करप्ट लोकांना !
आता कोणत्याही क्षणी वाममार्गाने मिळवलेला पैसा मातीमोल करण्याची ताकद सरकारी यंत्रणेत असल्याची खूणगाठ बांधली आहे भ्रष्टाचारी लोकांनी मनाशी.
सरकारने- शासनाने आपल कणखर अस्तित्व दाखवुन, आमच कोण काय वाकड करु शकणार आहे या भ्रष्टाचारी मानसिकतेवर केलेला आघात पण इतर फायद्यांप्रमाणेच कमी महत्वाचा नाही. निगरगट्ट कातडी असलेल्या लोकांच्या मनात सुध्दा या निर्णयाने धडकी भरवली आहे.
पुर्वीचे १००० रु कोणाला सहसा दिसायचे पण नाहीत. आता पाचशे नोटेचे पण अवमूल्यन झाले आहे. अगदी तळागाळाच्या व्यवहारात सुध्दा भ्रष्ट्राचार होतो त्यालाही हा दणका आहे. मोठे भ्रष्टाचार धोक्याचेच पण ते सर्वसामान्यांना प्रत्यक्ष भिडत नसतात, रोजच्या आयुष्यावर परिणाम दिसायला दिर्घकाल जात असल्याने जाणवत नाहीत. पण चतुर्थ श्रेणीतल्या भ्रष्टाचाराला सर्वसामान्य मनुष्याला प्रत्यक्ष भिडावे लागते व तो एकाच वेळी त्याचा शोषक आणि शोषित अशा दोन्ही भूमिका निभावतो, हि तर एक विलक्षण स्थिती आहे. मला भ्रष्टाचार्यांना पैसा द्यावा लागतो म्हणून मी पण दुसरी कडून पैसे खाणार असे हे दुष्ट चक्र भारतात तयार झाले आहे.
सरकारच्या या आणि येऊ घातलेल्या पुढील कडक पावलांनी हे दुष्टचक्राचा लवकरात लवकत भेद व्हावा, हि लढाई आपल्या सगळ्यांची आहे. तात्पुरत्या फायद्या तोट्यांकडे पाहुन रुसुन बसण्याची नाही.
अर्थक्रांतीमधले नोटाबंदी हे केवळ पहिल पाऊल आहे. मागचा काळा पैसा खणुन निघेल तेवढा निघेल पण यापुढे काळा पैसा निर्माणच होऊ नये या व्यवस्थेची बिजे या निर्णयात रोवली आहेत. दहशतवादाला आळा हा एक साईड इफेक्ट आहे. आत्मघातकी लोकांना केवळ नोटाबंदीने रोखता येत नाही हे लहान पोरांनाही कळते.
जर पुढची टर्म मोदींनाच मिळली तर हि लढाई अधिक प्रभावशाली होईल. दुसरे कोणी आले तर परत मंदावेल, पण अगदीच उलटे निर्णय घेतले नाही गेले तर थांबणार नाही आता. रोकडमुक्त व्यवहार ही २१ व्या शतकाची पाऊलवाट ठरेल.
पुढची टर्म पण मोदींना मिळाली (ती मिळेल याचीच जास्तीत जास्त शक्यता आणि अपेक्षा आहे) तर निवडुन आल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे २०२२-२३ मध्ये रु. २०००/- ची नोट सुध्दा क्रमाक्रमाने रद्द केली जाईल यात शंका नाही. २०१९ ला सुध्दा मोदींकडेच नेतृत्व येणे देशाच्या व राष्ट्राच्या हिताचे असेल.
© चंद्रशेखर साने
No comments:
Post a Comment