Skip to main content

Posts

Showing posts from 2016
सावरकरांनी काय केले? गोव्याच्या कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे, त्यास अल्प शब्द मर्यादेत उत्तर देणारे माझे संकलन दि. २८-१२-२०१६ ला दैनिक गोमन्तक मध्ये मुद्रित झाले. http://epaper.dainikgomantak.com/…/29Dec2…/Enlarge/page2.htm

अस्मितेच "भांडवल" मराठी माणसाला व्यावसायिक बनवंयास अपुरे !

***** अस्मितेच "भांडवल" व्यापारी व व्यावसायिक होण्यासाठी पुरत नाही **** १९४७ ते १९७१ पर्यंत हिंदुमहासभा शिल्लक होती व क्रमाक्रमाने कमकुवत होत गेली. या काळात सावरकर जवळपास निवृत्त झाले होते. आपण हिंदुहिताचे राजकारण करतो ,आपल्या नावात हिंदु शब्द आहे तरी हिंदुमहासभेला यश का मिळत नाही, हिंदु माणस आपल्याला मते का देत नाहीत याची उमज हिंदुमहाभेला पडत नव्हती. आपल्याला संपवत आहेत म्हणून वैचारीक दृ्ट्या सर्वात जवळ आलेल्या संघ परिवार, जनसंघ, गोळवलकर गुरुजी यांच्या नावे बोटे मोडणे, तळतळा ट करणे या शिवाय अन्य उद्योग हिंदुमहासभेला राहिले नाहीत. मूळ वैचारीक शत्रू बाजूलाच राहिले.आज हिंदुमहासभा या पक्षातला आधीचा "अखिल भारतीय" हा शब्द अक्षरश: केविलवाणा वाटतो. हा पक्ष अधुनमधुन दिसतो ते मूठभर कार्यकर्ते आणि अन्य कोणाही पक्षाकडे नाही एवढ्या मोठया "अ.भा.हिंदुमहासभा भवन" या दिल्लीतल्या वास्तुच्या आधारावर. महाराष्ट्रात दोन पक्ष मराठी माणसाच नाव घेतात. तामिळनाडु प्रमाणे महाराष्ट्रात पण दोनच स्थानिक पक्षांना स्थान रहावे आणि आलटुन पालटुन आपल्याच घराण्याचीच सत्ता महारष्ट्रात अ...

मराठे शाहिची १२८ वर्षे

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अधिकृत काळ म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकापासून ( १६७४) ते पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह करुन ब्रिटीशांची तैनाती फौज स्वीकारली तोपर्यंत १८०२ पर्यंत. १८१८ ची लढाई हि केवळ एक दिवा विझतानाची फडफड होती,सेनापती बापु गोखले यांचा आदरच आहे पण... खरा शेवट १८०२ ला दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटीशांचे मांडलिकत्व स्वीकारले तेव्हाच झाला. या १२८ वर्षात अनेक चढ उतार व संकटे आली. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या संकटात, महाराष्ट्र ध र्माला जागून मराठी हिंदुंनी २७ वर्षे कडवी झुंज देऊन औरंग्याला गाडला. बाजीरावांनी भारतभर मुलुखगिरी केली तर नानासाहेब पेशव्यांच्या काळात, रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी हिंदुंनी पार अटकेपर्यंत झेंडे रोवले. पुढे पानीपतचे संकट आले. मराठी हिंदुंची अपार हानी झाली, पण तो जेत्यांना जिंकणारा पराभव होता. त्यानंतर काही काळातच थोरल्या माधवराव पेशव्यांनी हा पानीपतचा पराभव धुवुन काढला. सवाई माधधवरावांच्या काळात खर्डयाला निजामाला धुळ चारली तो मराठी हिंदुंच्या ताकदीचा सर्वोच्च बिंदु समजला जातो. नंतर मात्र उत...

निरंजन पाल

खुर्चीवर बसलेल्या सावरकरांच्या शेजारी उभे असलेले गृहस्थ श्री. निरंजन पाल- त्यांची थोडक्यात ओळख पहिल्या पिढीतल्या लाल-बाल-पाल या त्रि-नेत्यांमधील श्री. बिपिनचंद्र पाल यांचे ते सुपुत्र-सावरकरांचे अनुयायी-अभिनव भारत चे सदस्य- ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ते सावरकरांसमवेत उपस्थित होते व "सागरा प्राण तळमळला" या काव्याचे प्रथम उमटलेले शब्द सावरकरांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकुन कागदावर लिहुन घेणारे. अभिनव भारतच्या पतनानंतर चित्रपट क्षेत्रात प्रवेश, लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मिती  प्रक्रियेत सहभागी- भारतात आल्यावर चित्रपट उद्योगातच प्रवेश केला. निरंजन पालांनी "अछुत कन्या" या गाजलेल्या हिंदी सिनेमाचे पटकथा लेखन केले ( श्री. गांधी (महात्मा) ) यांनी पाहिलेला एकमेव हिंदी सिनेमा "अछुत कन्या" हाच होता बहुतेक - १९५२ ला निरंजन पालांनी सावरकर भवनात येऊन सावरकरांच्या १८५७ चे समर या जगद्‌विख्यात ग्रंथावर चित्रपट काढण्यासंबंधी सावरकरांशी चर्चा केली, मात्र तो चित्रपट माहीत नसलेल्या कारणांनी प्रत्यक्षात आला नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयी सोयीचे

कला, अभिव्यक्ती यांवर पुरोगामी दहशत आणि मुस्लिम तुष्टीकरणात्मक धोरण ठेवणे याचा आधुनिक भारताचा इतिहास खूप मोठा व खेदजनक आहे. मी वाचलेली दोन उदाहरणे , कै.श्री.विश्राम बेडेकर यांचा शेजारी हा चित्रपट खुप गाजला. ग्राऊंड लेव्हलला हिंदु-मुस्लीम कसे एकत्र रहातात वगैरे सांगणारा आणि फाळणीच्या असपासच्या काळातला हा प्रबोधनपर चित्रपट. मला पण आवडला. धर्माच्या पलिकडे जाऊन मानवता जपावी, परस्परांत सौदार्ह जपावे आणि ते दुतर्फा असावे याचा मी पुरस्कर्ता आहे. पण यात एक मेख अशी आहे, की या दोन हिंद ु व मुस्लिम शेजाऱ्यात भांडण होऊन दुहीचे बीज पेरले जाते त्यात चुक दाखवली गेली ती हिंदु शेजाऱ्याची. यावर लेखक कै.विश्राम बेडेकर यांची त्यांच्याच एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्रात आलेली टिपण्णी अशी की, हिंदु शेजाऱ्याची चुक दाखवणे योग्य होते कारण हिंदु हे सहनशील असल्याने ते त्यांना कमीपणा दर्शवणारी पटकथा सहन करु शकतात पण मुसलमान समाजाला ते रुचले नसते. म्हणुन त्यांनी पटकथेत हिंदु व्यक्तीचीच चूक दाखवणे आवश्यक व चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरवले व तसेच लेखन केले. दुसर उदाहरण कै. सुधीर फडके यांच. फार...

अख्खा हत्ती खाण्याची युक्ती

एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन हिंडत असताना त्यास एक मेलेला हत्ती दिसला. तो बेहद्द खुष झाला. मेलेल्या हत्तीचे मांस आता त्याला खूप दिवस पुरणार होते. त्यास जिवंत ठेवणार होते. पण तेवढ्यात त्यास सिंहाची डरकाळी ऐकु आली. कोल्हा चतुर होता. सिंहाला पाहताच तो नम्रपणे म्हणाला, या या महाराज आपलीच वाट पहात होतो, आपल्या साठीच मी या हत्तीची राखण करत थांबलो होतो. आपण जंगलाचे राजे, आपलाच या मांसावर हक्क ! वनराज खुष झाले, म्हणाले, तू माझा खरा नागरीक. पण आत्ता मा झे पोट भरले आहे व तशीही मी दुसऱ्याने केलेली शिकार खात नसतो, तेव्हा तुझ्या एकनिष्ठेचे बक्षिस म्हणून हि शिकार मी तुला देऊन टाकतो. कोल्हाने वाकुन नमस्कार केला आणि सिंह तेथून निघुन गेला. कोल्ह्याने हत्तीचे निरिक्षण सुरु केले. हत्तीच कातड जाड आणि काळ केसाळ होत. कोल्ह्याच्याने ते एकट्याच्याने फाडणे अशक्य प्राय होते. तेवढयात तिथे एक वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली. कोल्हा हुशार होता, अजिबात न घाबरता तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अरे वाघोबा, हि शिकार वनराज सिंहांनी केली आहे आणि मला ते राखण करण्यास सांगु...

थोडा वेळ लागेल पण नोटाबंदीला यश १००%

********** थोडा वेळ लागेल पण यश १००% ************ मी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचा समर्थक आहे हे माझ्या कपाळावर लिहिले आहे का काय कळत नाही, पण मला आतापर्यंत एकाही बॅंकेत पैसे काढायला त्रास झाला नाही. सर्वत्र सुटे पैसे मिळत राहीले, cash counter असो वा ATM अर्ध्या तासा पेक्षा अधिक काळ कोठेही थांबावे लागले नाही. जनता सहकारी बॅंकेत १०००, ३०००, ५००० अशा पधतीने रक्कम काढता येते आहे. त्यात नेहेमी एक हजार रुपये १०० च्या नोटात व बाकीचे दोन हजाराची नोट मिळाली. हे दोन हजार सुध्दा  अगदी सहजी सुटे होत गेले. काही छोटे वा मध्यम व्यापारी लोक जेव्हा क्रेडीट/डेबिट कार्ड घ्या म्हटल्यावर नाही म्हणाले, तेव्हा त्यांच्यापुढे मी २००० ची नोट पुढे करत होतो, ते निमुट पणे मला सुटे देत होते. Pay tm* चे खात आहे व त्याच्या wallet मध्ये पण पैसे भरुन ठेवले आहेत , पण त्याचाही वापर करायची अद्याप एकदाही वेळ आली नाही. रोकड सुलभता कायम राहिली आहे. अगदी घरकाम करणारे, भाजीवाले, फळवाले रिक्षा इ. बरोबर लहान लहान व्यवहार करताना कसलीही अडचण आली नाही adjust करावे लागले नाही. ATM वरच्या रांगा दिसल्या ते रांगेत का उभे र...

तुका म्हणे ऐशा नरां

तुका म्हणे ऐशा नरां मोजुनी माराव्या पैजारा *** प्रत्येक कैद्याला तुरुंगातील कामाचा भत्ता मिळतो. तुरुंगातून सुटल्यानंतर समाजात त्याचे पुनर्स्थापन करायचे कोणत्याही शासनयंत्रणेचे धोरण आणि कर्तव्य असते. मग ती परकिय असो वा स्वकीय. इतर अनेक राजबंद्यांना जशी* राजक्षमा मिळाली तशी सावरकरांना त्यांच्या कोणत्याही सुटकेच्या अर्जांसाठी ब्रिटीशांनी कोणतीही क्षमा केली नाही. व अंदमानातुन सोडले सुध्दा नाही. तर त्यांना अंदमानातून केवळ रत्नागिरीच्या तुरुंगात हलवले. त्यामुळे सावरकरांना  मुळात अर्जांवर आधारीत क्षमा दिलीच गेली नाही. कारण ब्रिटीश त्यांचे सुटकेचे अर्ज म्हणजे केवळ सुटका करुन घेण्याची चाल असल्याचे ओळखुन होते. त्यांना सोडुन देण्यास ब्रिटीशांसारखा धुर्त शत्रू मुर्ख नव्हता. नंतर दोन अटी म्हणजे रत्नागिरीत स्थानबध्द राहीन व राजकारणात भाग घेणार नाही या आणि केवळ याच दोन अटींवर सावरकरांना तुरुंगातून सोडून रत्नागिरीत स्थानबध्द केले गेले. जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत आणि कोणाही सहकाऱ्याची नावे , कटासंबंधी माहिती विचारायची नाही या सावरकरांच्या मुख्य प्रतिअटी होत्या त्या ब्रिटीशांनी मान्य केल...

Name of Story - हा देश एक मुर्खांचा बाजार

एका पर्वतावरील वृक्षावर 'सिंधुक' नावाचा एक पक्षी राहात होता. त्याच्या विष्ठेतून सोन्याचा रवा पडे. एकदा त्या वृक्षाजवळून एक पारधी चालला असता, तो सिंधुक त्याच्या समक्ष शिटला. त्याच्या विष्ठेत चमकत असलेले सोने पाहून त्या पारध्याने त्याला जाळ्यात पकडले. मग त्याला घेऊन घरी जाताना तो पारधी मनात म्हणाला, विष्ठेतून सोने देणारा पक्षी मजपाशी आहे हे वृत्त जर राजाला कळले, तर तो या पक्ष्याला तर घेऊन जाईलच, पण त्याशिवाय तो मलाही शिक्षा ठोठवील. त्य ापेक्षा हा पक्षी राजाला नेऊन दिलेला बरा. मनात असे ठरवून त्याने त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य राजाला सांगून, त्याला त्याच्या हवाली केले आणि राजाने त्या सिंधुकाला एक सेवेकाकरवी पिंजर्‍यात अडकविले. तेवढ्यात त्या राजाचा प्रधान तिथे येताच, जेव्हा राजाने त्याला त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य सांगितले, तेव्हा तो म्हणाला, 'महाराज, पक्ष्याच्या विष्ठेतून सोने निघणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही त्या पक्ष्याला पिंजर्‍यातून मुक्त करा.' राजाने त्याप्रमाणे करताच तो पक्षी एका उंच जागी जाऊन शिटला. त्या विष्ठेतून चमचमणारे सुवर्णकण पाहून राजा म्हणाला, 'अरेरे ! ...

आंबेडकरांचे नेतृत्व दलितात सर्वमान्य होते का?

आंबेडकरांची राजकिय चळवळ नंतरच्या काळात केवळ विशिष्ट समाजाच्या हक्कांपुरती मर्यादीत झाली , तर सावरकर समस्त हिंदु समाजाच्या हिताचा विचार करत होते, दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने ते एकमेकांचे राजकिय विरोधक होते त्यामुळे आंबेडकरांनी जे लिहिले तेच प्रमाण मानायची गरज नाही. आंबेडकरांना सावरकरांच्या राजकारणावर टिका करणे गरजेचे होते कारण ते त्यांचे समाजकारणात पण प्रतिस्पर्धी होते, मूलत: आंबेडकरांची जात सोडता अन्य अस्पृश्य समाजात सावरकरांना मान होता तो आंबेडकरांना डाचत असे त्यामुळे त्यांनी सावरकरांविषयी काही वेळा पक्षपाती लिहिले आहे. विशेषत: मालवण ला १९२९ ला जी फार मोठी पुर्वास्पृश्य परिषद झाली, त्यात अध्यक्षपदासाठी आंबेडकर व सावरकर अशी दोन नावे पुढे आली. परंतु अन्य पुर्वास्पृश्य, विशेषत: चर्मकार समाजाचा आंबेडकरांच्या नावाला प्रखर विरोध होता , सावरकरांचे नाव मात्र सर्वच दलित मंडळींना पसंत होते, व शेवटी सावरकरांचीच अध्यक्ष म्हणुन निवड झाली. सावरकरांचे समाजकार्य पाहुन बहुजन मंडळी प्रभावित झाली होती. शाहु महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्र गुरु शंकराचार्य यांनी सावरकरांची थोरवी या समारंभात व ...

सावरकर: अंदमानपुर्वीचे व अंदमाननंतर

सावरकरांना अंदमानातच जिहादाचे खरे रुप समजून आले. अंदमानात त्यांना मुस्लीम अधिकाऱ्यांच्या जिहादि वृत्तीचा अर्थ कळला. अंदमानतच सावरकरांनी कुराणाचा अभ्यास केला. केवळ इंग्लिश भाषांतरावर विसंबुन न राहता , इतरही पुस्तके अभ्यासली. तसेच एका मुस्लीम कैद्याकडून सश्रद्ध मनाने गेय स्वरुपातले, आवाजातील चढ उतार असलेले मूळ अरबी कुराणही ऐकले. अभिनव भारतात मुस्लीम सदस्य होतेच त्यांच्यातील काहिंशी सावरकरांची खूप मैत्री जमली होती असे सेनापती बापट यांनी नमूद केले आहे. मदनलाल धिंग्रा मात्र "इन लो गोंपर ज्यादा भरोसा मत करो" असे सावरकरांना म्हणत असत. सावरकरांची इस्लाम विषयी सर्व मते नंतर बदलली. हिंदुमहासभेत मुस्लीमांना घेऊ नये यावर ते ठाम होते. हिंदुमहासभा फुटुन जनसंघाची स्थापना याचे मुख्य कारण श्यामाप्रसाद मुखर्जी व संघाला सत्तेत यायचे असेल तर मुसलमानांची मते मिळाल्याशिवाय ते शक्य नाही असे वाटत होते, सावरकरांना सत्तेच्या राजकारणासाठी जनसंघ स्थापन झाला तेव्हा तो हिंदुहित पहाणारा पक्ष न उरता त्याची दुसरी कॉंग्रेसच होईल अशी भीती वाटत होती. सत्ताकारण करणाऱ्याला या ना त्या स्वरुपात मुस्लीम लोका...

महाकाव्यातल्या नीतीकल्पना

रावणाला धर्म समजवणाऱ्या बिभिषणाला रावण संतापुन म्हणाला "राक्षसाणां परोधर्मा परदारा विघर्षण्म्‌ " धर्म - अधर्म कसला सांगतोस, परस्त्रियांना पळवणे हाच राक्षसांचा परमधर्म. झाडाच्या आड दडुन बाण सोडणाऱ्या रामाला वाली म्हणतो, मी पशु आहे, भावाला युद्धात पराभूत करुन त्याच्या पत्नीवर हक्क प्रस्थापित करणे हाच आमचा धर्म. मात्र त्यावर रामाने तु पशु आहेस म्हणून झाडामागून लपुन बाण मारुन मी मृगया केली हा युक्तीवाद त्याला मान्य नाही , त्यावेळी त्यास मानवी नीतीनियम स्वत:ला लागु करायचे आहेत. रा म-वाली संवादात रामाने केलेल्या नीतीवादाच्या युक्तीवादात वाली निरुत्तर झाला आणि डोळ्यात अश्रु आणुन त्याने प्राण सोडले.  रामाने स्वत: राज्य घेतले नाही सुग्रीवाला राज्य परत दिले आणि वालीच्या पुत्राला अंगदाला युवराज्याभिषेक करवला. सोन्याच्या लंकेचा मोह धरला नाही, "प्रासाद इथे भव्य परि भारी आईची झोपडी प्यारी" असे म्हणत अयोध्येस परतला. हनुमंताला भक्तीशिवाय काहीच दिले नाही, सीतेने अर्पण केलेला रत्नहार एक एक रत्न फोडून राम आहे का शोधत मारुतीने फेकुन दिला. लक्ष्मण व सितेने रामासोबत वनवास पत...

आझादीचे स्त्रोत आणि स्तोत्रकार

मोक्ष मुक्ती हि तुझीच रुपे तुलाच वेदांती । स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती ।। स्वातंत्र्याच , मुक्तीच आणि उर्दुतल्या "आजादी" शब्दाच स्तोत्र लिहिणारे आणि गाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आज मरु घातलेली कॉंग्रेस आणि मेलेल्या लाल बावटयांचे मुख्य शत्रु झाले आहेत. सर्व पातळी सोडुन ते सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, वर्तमानकाळात सावरकर हे त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे शत्रु ठरलेत हि मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्या सावरकर द्वेषाला वैचारिक प्रत्युत्तर देण्यास महाराष्ट्रातले व बाहेरचे अभ्यासक समर्थ आहेत, कारण हे सर्व आरोप मुख्यत: वस्तुस्थितीपेक्षा द्वेषावर आधारित आहेत. असे आरोप खोडणे फार सोपे असते. मग हे विरोधक असे का करत आहेत? त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडॆ हिंदुत्ववादी अथवा भाजपा अथवा मोदी सरकार विरुद्ध फारसे विरोध करण्यास हातात काही उरलेले नाही. काही घटना वा कमी वकुबाच्या व्यक्तींचा वापर करुन अकांडतांडव करुन मोदी व भाजपा यांची लोकप्रियता घटल्याचे भ्रामक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करुन स्वत:च निर्माण केलेल्या आनंदवनभुवनी गुंगीत रहाणे हेच त्य...

माझी वाचनयात्रा

वयाच्या साधारण ८ व्या वर्षापसून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग.शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली. माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत वृत्तविचार शिकवत त्यातून कविता करण्याचा नाद लागला. त्...

लोकशाही, पक्षिय राजकारण आणि सावरकर

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग, "......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे . जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध ( कायदा ) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्ह...

टाळ्या दिल्यात मत नाही दिलित

गांधीहत्येतून निष्कलंक सावरकर सुटल्यावर, नेहरु-पटेलांच्या सत्तेच्या वरवंट्या खाली भरडल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनात, गलितगात्र झालेल्या किंवा जवळजवळ नष्ट झालेल्या हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार मूळ धरु लागला होता. याचा एक भाग म्हणुन हिंदुमहासभेचे एक प्रचंड अधिवेशन कलकत्ता येथे झाले. देशभरातून ५०००० हून जास्त संख्येने हिंदुसभा कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख सल्लागार म्हणुन बोलताना सावरकरांच्या भाषणातला एक भाग, "......सरकारी रोषामुळे अनेक महासभावादी संतापले आहेत. त्यांचा राग अनाठायी नाही. ब्रिटीशांनी देशभक्तांना छळले त्यापेक्षाही अधिक खुनशीपणा कॉंग्रेसने हिंदु कार्यकर्त्यांच्या संबंधात दाखवला आहे . जेव्हा लाहोर जळत होते नि सहस्त्रावधी हिंदु साध्वी राजरोस जोहार करत होत्या तेव्हा स्वस्थ असलेले सरकार खाडकन जागे होऊन हिंदुंवर हत्यार धरु लागले. नेहरु म्हणाले हिंदुंनी निर्बंध ( कायदा ) हातात घेता कामा नये. मला हे मान्य आहे. जनतेने निर्बंध हातात घेऊ नये. पण केव्हा? सत्ता हाती असलेले सरकार अराजकांपासून निरपराध्यांचे रक्षण करत असेल तेव्हा ! जेव्हा...

माझी वाचनयात्रा

माझी वाचनयात्रा वयाच्या साधारण ८ व्या वर्षापासून मला वाचनाचा नाद लागला. माझ्या हाती चुकून पडलेली कादंबरी म्हणजे ह.ना.आपटे यांची "उष:काल" मी कादंबरी हातात घेतली आणि सलग ८-१० तास वाचून काढली. मी माझ्या आजोळी एका आवडत्या जागी लपुन बसलो होतो आणि तिकडे माझी शोधाशोध चालु होती. वाचलेले सर्वच कळत नव्हते, सुलतानगड, नानासाहेब, पाटीलबोआ, सुभान्या आणि सावळ्या. सावळ्याने तर मला वेड लावले. त्याने खानाची केलेली फजिती हा माझा आवडता भाग. पारायण करुन मनमुराद हसत असे. शिवाजी महाराजांचा कादंबरीतला उल्लेख , त्यातली गूढता अंगावर शहारे आणुन गेली. माझ्या वडीलांनाही वाचनाचा नाद. त्यामुळे वाचन खाद्य घरात भरपुर. याच सुमारास आणीबाणी वगैरे राजकारण खूप जोरात, त्यामुळे १०-११ व्या वर्षीच इतर कोणाही समवयस्क मुलांपेक्षा राजकारणाशी मी जास्त परिचित नक्कीच होतो, आजोळी सावरकर मय वातावरण. तिथे सर्व सावरकर साहित्य वाचून काढले. पुण्यात आलो की आमच्या काकांचे ग्रंथालय. तिथली सुमारे सात आठशे पुस्तके वाचून काढली. पण माझा सुदैवाने सखाराम गटणे कधी झाला नाही. दहावीत मराठीचे निबंध वगैरे उत्तम लिहू लागलो. दहावीत व...