मी आधी भूमिका मांडली होती की शरद पोंक्षेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल तरी त्यांनी हा विषय काढण्याने काहिही साध्य होणार नाही. जुने उकरुन नुसत समाजात वाद माजतील. मात्र साम टिव्ही वर काल ज्या प्रकारे शरद पोंक्षेंना ट्रोल करुन सहा जणांनी मिळुन आवाज बंद केला त्यात परत चार ते पाच वेळा नथुरामला सावरकरांचा पोपट आणि सावरकर नथुरामला लिहुन देत होते आणि त्याप्रमाणे तो बोलत होता असे कोणतेही पुरावे न देता बोलले जात होते, सावरकरांची निष्कलंक सुटका होऊन सुध्दा परत त्यांना आरोपिच्या पिंजऱ्या त उभे केले जात होते ते पाहता नथुराम विरोधी मंडळींचा लोकशाही वरचा विश्वास , इतिहासाचे प्रेम आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोटा दंभ स्पष्ट दिसुन आला. हा नुसता एका नाटकाचा वाद नाही तर दोन विचारधारांची अविरत लढाई आहे, हे नाटक हा अगदीच क्षुल्लक निमित्त आहे आणि हा वाद म्हणजे दोन्ही विचारधारांची पुर्ण व खरी ओळख नाही. हा संघर्ष सतत चालु रहाणार आहे. नथुरामवरचे नाटक बंद केले तरी सावरकरांवर हल्ले होण आणि त्यांची बदनामी करण चालुच रहाणार आहे. मग नाटकाचे प्रयोग का बंद करायचे? नथुराम हा इतिहास आहे आणि शरद पोंक्षेंना ते वा...