हज यात्रेला मिळत असलेली सबसिडी बंद करण्याचा निर्णय परस्पर घेणे योगी आदीत्यनाथांच्या हाती नसला तरी मानस सरोवरासाठी सबसिडी देण्याची त्यांनी घोषणा केली आहे, हि एक चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकारने काही वर्षांनी योग्य वेळ येताच वाटल्यास सर्वच बंद करावे. पण आता मानस सरोवर यात्रेला जास्तीत जास्त हिंदुंनी जावे. अर्थात हि यात्रा काही सोपी नाही. हि यात्रा करण्यास फिटनेस अर्थातच महत्वाचा असतोे, त्या वाचून यात्रेकरु होण्यास परवानगीच मिळत नाही. मानस सरोवराचे सौंदर्य अप्रतिम आहे. आपला एक सांस्कृतिक , धार्मिक आणि राष्ट्रिय सीमावर्ती विभागातला ठेवा, स्वातंत्र्यानंतर आपणास लाभलेल्या व आपण निवडलेल्या ढिसाळ नेतृत्वामुळे आपल्या हातातुन गेल्याचे दु:ख होते. या यात्रेचा आणि सबसिडिचा काही हिस्सा चीनला जात असला तर ते पाप जुन्या राज्यकर्त्यांचे आहे. ज्यांना हा हिस्सा चीनला जातो आहे म्हणून दु:ख होते त्यांनि चीनी मालावर बहिष्कार घाला म्हणुन प्रचार करणे , व स्वत:ही तो अमलात आणणे हे जास्त व्यावहारीक आहे. चीनला यात्रेतुन जाऊ शकणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा चीनी मालामुळे जातो आणि देश...